श्रीगणेशाय नमः ।। श्रीसवितासूर्यवंश तथा श्रीसोमवंशोत्पति श्रचिंतामणी कौस्तुभपुराणे व्याख्यास्याम ॥ ॥
ॐ नमोजी श्रीचिंतामणी ॥ सद्भाव माझा तुझिया चरणी ।। तुं सर्व सिद्धिची खाणी ।। ह्मणोन अन्योन्य नमन माझें ॥ १ ।। जो सर्वश्वें ईश ॥ नमिला तो आद्यपुरुष ।। कृपापणे उदास ।। तो गणाधिश वंदिला म्या ।। २ ।। विश्वासें आरंभितों ग्रंथ ।। पूर्ण करिता गौरिनाथ ।। जेण्हे पुंण्य आणि पुरुषार्थ ।। ते कथा मुक्तार्थ वदविं देवा ।। ३ ।। विमळोत्तरि तुष्टला गणपती ।। धर्मसंस्थाप्यता ज्ञानमूर्तीं ॥ अभयोत्तर दात्रव्यता भक्तां प्रती । निवेदी स्वयें इश ।। ४ ।। तें चि लाधले महि मान ।। ह्मणोनि शारदेसिं अन्योन्यशरण ।। आदिमाता निधान ।। जोडलें मज प्रती ।।५।। ते अंबिका आदिशक्ती ।। कृपेपणे तुष्टलि सरश्वती ।। वाग्विलास शब्दार्थी ।। अर्पिति जाली ।। ६ ।। म्हणोनि शब्द उन्मळला ।। आधार श्रीगुरुचा लाधला ।। शब्दार्थ पसरला ।। सिंधु जैसा ॥ ७ ।। श्रोते जनी जनार्दन ।। वंदु आदरें करून ।। पुढिल कथा निरोपण ।। आईका भावें ।। ८ ।। जे पुराण संमात कथा ।। स्वयें व्यासरुषिं वक्ता ।। सविता–सूर्यसोमवंशउत्पनता ।। कथिली जि हें ॥ ९ ॥ ऐकतां निवति श्रवण ।। हरति दोष दारुण ।। पितरां संतोष एकोन ॥ तें निवेदन करितों आतां १० ॥ ह्मणोन पुढति विज्ञापना ।। हे कथा वंशसंज्ञा ॥ भगवान् नंददत्त अनुज्ञा प्रादात वाणी ।। ११ ।। कोण्हे येके सुदिनी ।। शंभु उपविष्ट सिंहासनी ।। अर्वांगि गौरि कमळलोचनां ।। विलासंयुक्त ।।१२।। पृछा आदरिली महेशा ।। देवा तुं सर्वज्ञ कैलाशा ॥ अपेक्षा पुरवि आदिपुरुषा ।। वंशउत्पती सांगावी ॥ १३ ॥ कवणा पासुन कवण ॥ कैसे जाले वंज्ञोत्पन ।। स्वामी सांगावें मुळ-कथन ॥ कृपापणे ॥ १४ ॥ महादेव उवाच ।। गीरिज हा संकल्प तुजसि उठावया कारण ।। तें कळलें अनुसंधान ।। युगायुगि राहेल ह्मणोन ॥ तुजसि आदर जाला ।। १५ ॥ तरि आतां चित्त स्थिर करी ॥ उत्पती सांगतों सविस्तरी ।। जेणे संतोष सर्वातें अवधारी ।। तें प्रत्योत्तरि वदतों आतां ॥ १३ ।। प्रथम व्योमासनि अव्यक्तमूर्ति ।। जो अनादि प्रभु लक्ष्मीपती ।। तया पासोन प्रजापती ।। ब्रह्मदेवो ।। १७ ।। ब्रह्मयः पासोन मरंचि अंगिरा ।। उत्पती जालि रुषेश्वरा ।। काश्यप जन्मला अवधारा ।। अवतार चराचरी ।। १८ ।। काश्यप नभाचा अवतार ॥ तयासि अर्क जाला पुत्र ।। तो योमाचा अवतार ।। मार्तंड हा ॥ १९ ॥ तें निजब्रह्म योमासनी ॥ तयाचें तेज हा तरणी ।। तया दिधली नंदिनी ॥ योगमाता ।। २० ।। तियेचे नाम पुरवंती ।। ते वारेंली गभस्ती ॥ लक्षकोटि योगशक्ती ।। आकारलिं ते ।। २१ ।। तयां दोघाचा निजशक्ती ॥ चंद्रप्रभु पुत्र जाला तयां प्रती ।। जाणो अवतरला दुजा क्षिती ।। मार्तड हा ।। २२ ॥ तो जाणोनियां पुत्र ।। महाक्षेत्रि पवित्र ॥ मग मार्तडें दीधला राजभार ॥ मृत्यलोकिचा ।। २३ ।। ऐसा तो महावीर ।। महा-क्षेत्रि धनुर्धर ।। त्या पासोनि वंश-विस्तार ।। जाला पुढा ।। २४ ॥ तो क्षेत्रिवंशि मुळावसानी ।। कैसा विस्तारला तरणी ।। ते कथा शुळपाणी ।। सांगे गीरिजे प्रती ॥२५॥ इति श्रीचिंतामणि-कौस्तुभपुराणे इश्वरपार्वति–संवादे वंशविवंचना-नाम प्रथमो ध्यायः ॥ १ ॥
श्रीगणेशायनमः ।। जो चंद्रप्रभु राजेश्वर ।। सूर्यतेजे क्षेत्रि अंगार ।। समरंगणि धनुर्धर ।। पुरों न सके ॥ २६ ॥ तेणे प्रणिली इंद्रनंदिनी ।। बळें आणिली ईंद्र जिंतानी । तो अजित त्रिभुवनी ।। चंद्रराजा ।। २७ ।। तया राज्य करितां गभस्तिसुता ।। ब्रह्मा भेटला अवचित्ता ।। पुढिल कथा विचारिता । जाला रावो ।। २८ ।। विनति आइके चतुरानना ।। तुं घटिताचि जाणसि विवंचना ।। मज कांता कवण ते कमळलोचना ।। सांगिजे स्वामी ॥ २९ ॥ तवं तो बोलिला ब्रह्म मुनी ।। सुरेश्वरें आराधलासे शूळपाणी ।। ते कथा आईके श्रवणी ॥ सांगता आतां ।। ३० ।। कोण्हे एके दिनी ।। ईंद्र पहुडला शयनी ।। सेवा करि इंद्रायणी ।। विलासयुक्त ।। ३१।। ते वेळि ईंद्रायणी ॥ कामातुर होति कामिनी ॥ इंद्र विनविला मंजुळवचनी ।। पृछा आदरिली ।। ३२ ।। हे इंद्रराया मुगुटमणी ।। तुं ततिस कोटिचा अग्रगणी ॥ तरि मज देई गा नंदनी ॥ महासुंदर ॥ ३३ ॥ जे करिल अष्टनायकांचें गर्वहरण ।। ऐसें रचावें कंन्यारत्न ।। जे मोहिल त्रिभुवन ।। ते दीधलि पाहिजे ॥ ३४॥ ऐसि रचि गा मुद्रा ।। जें भुलवों सक हरिहरा ।। महा सकुमार सुंदरा ।। तेजरुपें ।। ३५ ।। मग इंद्र म्हणे सत्य होईल तुझें वचन ॥ मग निघाला सहस्त्रलोचन ।। पावला कैसा स्वभुवन ।। समस्त देवां सहित ।। ३६ ॥ तेथं बैसुनियां ध्यानी ॥ हृदई चिंतिला पिनाकपाणी ।। ऐसें तप करोनी ॥ ईंद्रदेवें ॥ ३७ ।। तवं तो आला विश्वनाथ ॥ भक्तकृपाळ करुणावंत ।। तो देखोनियां सुरनाथ ।। संतोषला मनी ॥ ३८ ॥ मग ह्मणे माग जालों प्रसंन्न ।। तुवां येवढें कां मांडिलें निर्वाण ॥ इंद्र बोलिला सत्यवचन ॥ शंभु प्रती ॥ ३९ ॥ मज दइं गा कुमरी ॥ जाणो सौभाग्ये जैसि गौरी ॥ त एकोन म्हणे त्रिपुरारी ।। तथास्तु ।। ४० ।।