Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
खडा १ [ कठक = खडा ]
-२ [ खट ( hard stone) = खडा. खटी = खडी. चूर्णखटी = चुनखडी ]
-३ [ खद: = खडा ] ( खाडा ५ पहा)
खडा (डा-डी-डें) [ खद् to be firm. खदः firm = खडा ] firm, fixed.
खडें सैन्य reguler fixed army
खडा उभा fixedly or firmly erect
खडा-डें-डी [ खद: = खडा. खद् स्थैर्य ]
खडा पहारा म्ह० स्थिर पहारा.
खडें सैन्य म्ह० स्थिर कायमचें सैन्य.
खडा उभा म्ह. fixedly or firmly erect. (खाडा ५ पहा)
खडी १ [ खटी = खडी. खटी धवलमृत्तिका । ॥ राजनिघंटुः ॥ ]
-२ [ खड्गिका = खडी ] एक प्रकारची तलवार.
-३ [ कठिका = खडी ]
खडें मीठ [ कटकं salt by evaporation = खडें मीठ as opposed to mine-salt ]
खडें सैन्य [कटकं सैन्यं] army in camp established for years. as opposed to temporarily raised army.
खड्डा १ [ खातः ] (खाडा ४ पहा)
-२ [ वर्षपरीतः प्रतिलोमकर्षितास्त्रिः परिक्रम्य खदायामर्क क्षिप्रं संवपति ॥ ७ ॥ ( कौशिकसूत्र ३८ पृष्ठ १०८ Bloomfield)]
दारिलनामक टीकाकार म्हणतो : खदा नाम स्वभावजः गर्त: । केशवनामक टीकाकार म्हणतो : खदां खात्वा ...
खदा या शब्दाचा खद्दा असा द्वित्त उच्चार करून व द स्थानीं डादेश करून खड्डा असा मराठी शब्द निष्पन्न झाला आहे. संस्कृत स्त्रीलिंगाचें मराठी पुल्लिंग आकारान्तास्तव केलें आहे.
ह्या शब्दावरून असें दिसतें कीं, प्राकृत भाषेंतील म्हणून मानलेले देशी शब्द मूळ संस्कृतांतून घेतले आहेत. आणि अशी जर गोष्ट आहे तर प्राकृत व प्राकृतिक भाषा संस्कृतापासून निघालेल्या आहेत. स्वतंत्र नाहींत. ( भा. इ. १८३२)
खण [ क्षणः ( centre, middle ) = खण ] खण म्ह. चार खांबांमधला अवकाश.
संस्कृत भाषेचा उलगडा
ही तीन वचनांची तीन रूपे होत. यांच्या रूपह्नसिद्धीत स् हा एक संख्यावाचक उपसर्ग मूळशब्दाच्या मागे लागत असल्यामुळे, तिन्ही रूपे म्कारान्त दिसतात. देव शब्दाच्या रूपाप्रमाणे ह्कारान्त, औकारान्त किंवा अ:कारान्त दिसत नाहीत. तिन्ही मकारान्त रूपे पाहून पाणिनी संकटात पडला. वस्तुत: हलन्त शब्दांच्या शिरस्त्याप्रमाणे अस्मद् शब्दाची अस्मत् द्, अस्मदौ, अस्मद: अशी रूपे व्हावीत. परंतु ती तशी न होता, लोकांच्या बोलण्यात व वेदभाषेत अहम्, आवाम् व वयम् अशी तिन्ही मकारान्त रूपे पाहून पाणिनीला आदेशाचा आश्रय करून, अस्मत् पासून ही तिन्ही रूपे हटाने काढावी लागली. उपसर्गी भाषा असतात व प्रत्ययी भाषा असतात या बाबीचे स्वप्नही पाणिनीला नव्हते. त्यामुळे प्रत्ययांना आदेश, अंगाला नाना आदेश व अंत्याला आदेश करून, कशीतरी अहम्, आवाम्, वयम् ही रूपे पाणिनीने अस्मद् शब्दापासून निर्माण केली. मूळशब्द अस्मद् नव्हे, हम् आहे, हेही त्याला माहीत नव्हते. समासांत अस्मद् रूप येते, सबब अस्मद् हे प्रातिपदिक त्याने स्वीकारले. परंतु समासांत अस्मद् हे अनेकवचनी येते, एकवचनी येत नाही, हा जो या अस्मद् शब्दाचा विशेष त्याकडे जितके लक्ष द्यावे तितके त्याने दिले नाही. समासात एकवचनी मद् हे रूप येते हे तो पहात होता. मग, मद् हेच प्रातिपदिक धरण्यास काय हरकत होती? किंवा मद् व अस्मद् ही दोन्ही प्रातिपदिके धरण्यास कोणती अडचण होती? शिवाय, पाणिनीने असा विचार करावयाचा होता की, समासात एकवचनी मद् व अनेकवचनी अस्मद् प्रातिपदिक येते. तसे द्विवचनाचे आवद् प्रातिपदिक का म्हणून येत नाही? द्विवचनाला काय म्हणून गाळले? तसेच, अस्मद् हे प्रातिपदिक धरून त्यापासून अहम् आवाम्. वयम्, मद् इत्यादी रूपे आदेश करून जशी काढता येतात, तशीच मद् हे प्रातिपदिक धरून त्यापासून अस्मद्, अहम्, इत्यादी रूपेही आदेश करून काढता येतील. तात्पर्य मूळ शब्द काय आहे, त्याची रूपे वैदिकभाषेत कशी आली, पूर्ववैदिकभाषात
मूळ शब्द कसा चाले, इत्यादी बाबीचे ज्ञान नसल्यामुळे, उत्तम पुरुषसर्वनामाच्या रूपसिद्धी संबंधाने पाणिनीची लंगडशाई पराकाष्ठेची झालेली आहे.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ख
खइ [ क्षति ] तुला खइ लागली. (खय पहा)
खंगणें [ क्षंजनं - खँगणें. क्षंजनं = खँचणें. ज = ग. ज = च ] (भा. इ. १८३५)
खचणें [ क्षंजनं = खँचणें ] ( खंगणें पहा)
खचित् १ [ खलुचित = खलचित्= खचित् (खरोखर) ( अव्यय ) ] (भा. इ. १८३६)
-२ [ खलुचित् = खचित् ]
खचून [ खच् (बांधणें, एकावर एक जडवणें). खचित्वा = खचून भरणें, खचून मारणें, जेवणें इ. इ. इ. शेवटीं खचन म्हणजे अति पुष्कळ.
खच्ची [क्षय्यः (शक्य क्षेतुं)= खच्ची] क्षय करण्यास शक्य.
खंजीर [ खङ्गजीर: = खज्जीर: = खंजीर ] खड्गविशेष.
जीरखड्गे वाणिग्भेदे (विश्वकोश).
खट १ [ क्षतं = खट (न. ) ] खट म्ह० खवडा, क्षत. खट झालें म्हणजे खवडा, क्षत. डोईला खटें झालीं म्हणजे क्षतें झालीं.
-२ [क्षत wound = खट wound] डोक्याला खटें पडलीं.
खटरूट [ खट्वारूढः (जाल्मः) =खटरूट] निंद्य माणूस.
खटकन्, खटदिनि [ चटकर पहा ]
खटनट [ खट कांक्षायां व नट नृतौ ] हा शब्द महाराष्ट्रांत सामान्य स्त्रीपुरुषांच्या बोलण्यांत हमेश येतो. (भा. इ. १८३२)
खटपट [ खाट् कृत्य प्याट् कृत्य किंवा पाट् कृत्य. ह्या शब्दांत खाट् व पाट् हे अवयवशब्द आहेत. ह्यापासून खाटपाट = खटपट हा मराठी शब्द निघाला आहे. ] ( भा. इ. १८३६ )
खटारा - हा शब्द पुष्कळ वर्षे व पुष्कळांनीं भोगून खिळखिळी झालेल्या बायकोला लावतात. क्षत्ता स्यात् सारथौ दाःस्थे वैश्यायामपि शूद्रजे ( भट्टोजी, उणादि २५९) क्षत्तृ = क्षत्तार = खट्टार ( खटारा ) क प्रत्यय = अ. आपल्या म्हातार्या बायकोला विनोदानें खटारा म्हणण्याची चाल महाराष्ट्रांत अशिष्ट ब्राह्मणांत आहे. (भा. इ. १८३३)
खट्याळ १ [ खट + आल = खटाळ = खट्याळ ] ( भा. इ. १८३२ )
-२ [ खट्वारूढः = खट्यालू = खट्याळ. खट्वाक्षेपे २-१-२६ ] going astray.
खंड [ स्कन्ध् १ संचये ] ( धातुकोश-खंड २ पहा)
खडखडणें [ खड् मंथे घुसळण्यासारखा हलवून नाद करणें] ( ग्रंथमाला)
खडखडून १ [ खटखटयित्वा = खडखडून] खटखटाय म्हणजे शब्द करून उठणें. खडखडून जागें होणें म्हणजे शब्द करून व उठून जागें होणें. (भा. इ. १८३६)
-२ [खटखटायते] (धातुकोश-खडखड २ पहा]
खंडलमंडल [ खंडल ( खंड् to break ) मंडल ( to construct) म्हणजे मोडजोड, मोडजोड. Distruction and construction ]
संस्कृत भाषेचा उलगडा
येणेप्रमाणे सहा बोळांतून वाट काढीत काढीत अहम् या विठोबाचे दर्शन पाणिनी घडवितो. इतका प्राणायाम न करिता, अस्मत्चे प्रथमेचे एकवचन अहम् होते, असे निपानत पाणिनीने केले असते तरी काहीच बिघडले नसते. बरे, इतके सहा फेरे घेऊन व अनेक गिरकांड्या खाऊन, अहम्चे काही गणगोत कळते म्हणावे तर तसाही काही लाभ नाही. फक्त अस्मत्चे अहम् होते एवढे कळते. तात्पर्य, अहम्चे गणगोत जाणावयाचे असल्यास, पाणिनीचा रस्ता कुचकामाचा ठरतो. गणगोत जाणावयाचे असल्यास, पाणिनीच्याहून निराळा मार्ग स्वीकारला पाहिजे. पूर्ववैदिककालीन भाषांत उत्तम पुरुषवाचक सर्वनामे दोन सांच्यांची असत. एक सर्वनाम हम या सांच्याचे व दुसरे सर्वनाम हन् या सांच्याचें. हम् या सांच्याच्या सर्वनामाचा उच्चार हम, हम्, अहम् असा वेळ पडेल त्याप्रमाणे तीन प्रकारचा असे व हन या सांच्याच्या सर्वनामाचाही उच्चार डन्, हन्, अहन् असा तीन प्रकारचा असे. पूर्ववैदिकलोक कंठ्या उच्चार फार करीत त्यामुळे सव्यांची स्, क्, प्, म्, न्, इत्यादी सर्व व्यंजने ते प्राय: महाप्राण घालून हस्, :क्, :प, हम्, हन्, अशी उच्चारीत. तात्पर्य, वैदिककाली जो उच्चार म् झाला तो उच्चार पूर्ववैदिककाली हम् असे. उत्तम पुरुषवाचक सर्वनामांसंबंधाने लक्षात ठेवण्यासारखी ही पहिली बाब होय. लक्षात ठेवण्यासारखी दुसरी बाब म्हटली म्हणजे कित्येक पूर्ववैदिकभाषात वचनप्रत्यय शब्दांच्या पुढे लागत. म्हणजे, पूर्ववैदिककाली भाषा दोन प्रकारच्या असत, उपसर्गाने वचनरूपे बनविणाऱ्या भाषा व प्रत्ययाने वचनरूपे बनविणाऱ्या भाषा. दृष्टांताकरिता मराठी व अरबी या भाषा घेऊ. मराठीत सबब या शब्दाचे अनेकवचन, शब्दाच्या पुढे ई प्रत्यय लागून व अन्त्य अ चा लोप होऊन, सबब + ई = सबब् + ई = सबबी असे होते आणि अरबीत सबब् या शब्दाचे अनेकवचन, अ हा उपसर्ग शब्दाच्या मागे लागून व प्रथमस्वराचा लोप आणि द्वितीय स्वराची वृद्धी होऊन, अ + सबब् = अ + स् वा ब् = अस्बाब् असे होते अर्थात् मराठी ही प्रत्ययी भाषा आहे व अरबी ही उपसर्गी भाषा आहे. हाच भेद पूर्ववैदिकभाषात होता. एक भाषा प्रत्ययी असे व दुसरी उपसर्गी असे. पैकीहम् हे सर्वनाम ज्या भाषेत होते ती भाषा उपसर्गी असून, तीत हे सर्वनाम वचनप्रकरणी येणेप्रमाणे चाले ह्न स् या उपसर्गाने एकवचन दाखवीत. स् + स् या उपसर्गानी द्विवचन दाखवीत, आणि स् + स् + स् या तीन उपसर्गानी त्रिवचन दाखवित.
(१) स् + हम = स् + अहम् = ह + अहम् = हहम् = अहम्, हम्, हम्
(२) स् + स् + हम = ह् + ह् हम = अ + उ + अहम् = औ + अहम= आव् + अहम् = आव् + अअम् = आवाम्.
* पूर्ववैदिकभाषात स् चा हू; ह् चा अ इ किंवा उ; अउ चा उच्चार औ होत असे
हे मागे सांगितलेच आहे.
(३) स् + स्+ स्+ हम् = ह् + ह् + ह् +हम् = उ + अ+ अ + हम् = व + अ+ हम् = व + य + हम् = वयहम् = वयम्.
येणेप्रमाणे उपसर्गी भाषेत
१ २ ३
अहम् आवाम् वयम्
संस्कृत भाषेचा उलगडा
२८ येथपर्यंत जी सर्वनामे सांगितली त्यांच्या स्वभावाहून अत्यंत विपरीत स्वभावाची दोन सर्वनामे आता विवेचनार्थ व पृथक्करणार्थ घेतो. त्या सर्वंनामांना पाणिनी १) अस्मद् व २) युष्मद् म्हणतो. हे दोन शब्द कोणत्याही हलन्त किंवा अजन्त शब्दाप्रमाणे चालत नाहीत. यांना प्रत्ययही निराळेच लागतात. यांची अंगेही निराळ्याच त-हेने सिद्ध होतात. असा सर्वतोपरी विपरीतपणा पाणिनीला या दोन शब्दांच्या रूपसिद्धी संबंधाने भासला. या दोन शब्दांनी पाणिनीला फार छळलेक, या दोन चिमुकल्या पण द्वाड शब्दांकरिता, एकंदर तेवीस स्वतंत्र सूत्रे पाणिनीस रचावी लागलीं. १) प्रत्ययादेशांची सूत्रे, २) अंगादेशांची सूत्रे, ३) अंगान्त्यवर्णादेशाची सूत्रे व ४) रूपद्वजांची सूत्रे अशी उठल्या-बसल्या सूत्रेच सूत्रे काढण्याचे पाणिनीला फार श्रम पडले, एकवीस रूपांच्या सिद्धीकरिता तेवीस स्वतंत्र सूत्रे रचावी लागणे म्हणजे शब्द पराकाष्ठेचे खट्याळ असले पाहिजेत यांत संशय नाही. खरोखरच, हे दोन शब्द सगळ्या वैदिक व पाणिनीय भाषेत अत्यंत मासलेवाईक आहेत. पुढे या शब्दांची जी रूपसिद्धी मी करून दाखविणार आहे तीवरून हा मासलेवाईंकपणा कोणत्या पेठचा आहे ते कळून येईल.
अस्मत् शब्द
समासात शब्दांचे जे रूप येते ते प्राय: प्रातिपदिक समजण्याचा पाणिनीचा प्रघात असल्यामुळे (उदाहरणार्थ, अस्मरत्प्रणीतग्रंथ:), त्याने मूळ शब्द अस्मद् असा मानिला असून, त्या वरून नाना आदेश करून अहम्, आवाम्, वयम् इत्यादी रूपे निष्पन्न केली आहेत. अस्मत् शब्दापासून अहम् रूप तो येणेप्रमाणे काढितो :
(१) अस्मद् + सु अशी स्थिती
प्रथमा एकवचनीं सु स्थानीं अम् आदेश होऊन,
(२) अस्मद् + अम् अशी स्थिती
पुढे सु असता, अस्मद् शब्दातील अस्म् स्थानी अह आदेश होऊन,
(३) अह अद् + अम् अशी स्थिती
द्काराचा लोप होऊन,
(४) अह अ + अम् अशी स्थिती
पररूप होऊन
(५) अह + अम् अशी स्थिती
पूर्वरूप एकादेश होऊन,
(६) अहम्
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कोल्हैर [ कुलालगृहः ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ८४ )
कोवळें [ कोमल =कोंवळ = कोंवळं = कोवळें-ळा-ळी ] (ग्रंथमाला)
कोंवार [ कुमारी ] ( कुंवारी पहा )
कोवारीण [ कौमारिणी = कोवारीण (५-१-१२९ ) ]
कोशिंबीर १ [ कौक्षिंभरिका = कोशिंबरी = कोशिंबीर ] कुक्षिंभर म्ह० पोटाची कूस भरणारा-री-रें. कोशिंबरी म्हणजे पोटाच्या कुशींत कोठें तरी अल्पस्वल्प स्वादार्थ भरलेलें अन्न.
-२ [कुक्षिंभरि: = कोशिंबीर] पोटांत मजेखातर भरण्याचें अन्न.
कोशोंबीर [ कुक्षिंभरि: (भाजी) = कोशींबरी = कोशिंबीर] पक्वान्न खाऊन तुटुंब पोट भरल्यावर कुशी भरण्यास साधन होणारे चविष्ण पदार्थ.
कोशेटा [ कोशकीटक = कोशइटअ = कोशेटा ] (भा. इ. १८३३)
कोहळा [ कुंभफला = कंहअळा = कोहळा. कुष्मांडिका कुंभफला ॥ राजनिघंटुः ॥ ] (भा. इ. १८३७)
कोळ [ कुल् १ संघाते] कोळ. चिंचेचा केळ म्ह० चिंचेचा एके ठिकाणीं जमविलेला गीर. ( धा. सा. श.)
कोळपणी [ कल्पनी (कात्री) = कळपणी = कोळपणी]
कोळसा [(वैदिक) कूल् = जळणें. कूलिश = कुलिशः= कोलिसा = कोळसा ] कोळसा म्ह० जळणारा लांकडाचा विकार. (भा. इ. १८३३)
कोळिस्ता [ कोकिलाक्षः = कोइलाक्सा = कोलिस्ता ]
कौटाळीण [ कौटिल्यः = कोटिला = कौटाळ ] कौटाळचें स्त्रीलिंग कौटाळीण.
कौळी [क्रोडा] (कवळी २ पहा)
संस्कृत भाषेचा उलगडा
२७ दोन या अर्थीं पूर्ववैदिकभाषात द्वम् (द्वंद्व), द्व, द्वा व द्वि असे चार शब्द होते. पैकी द्वं, द्वा व द्वि हे पणिनीयभाषेत समासात येतात आणि द्व वर विभक्तीकार्य चालते, पाणिनी द्वि हा मूळ शब्द धरून व लोप आणि आगम करून त्याच्यापासून द्वम्, द्व, द्वा ही रूपे काढितो ते ठीकच आहे.
पूर्ववैदिकभाषेत त्रि, त्रयस्म् व त्रय असे तीन शब्द असून, शिवाय तिस् म्हणून चवथा शब्द असे. पैकी तिसृ शब्द पाणिनीयकाळी फक्त स्त्रीलिंगी योजीत. पूर्ववैदिककाळी तिसृ यातील ऋ, अर्धमात्राक असे. म्हणजे ऋ तीन प्रकाराचे असत अर्धमात्राक ऋ, एकमात्राक ऋ व द्विमात्राक ऋ ऊर्फ दीर्घ ऋृ, कानडीत किंवा इंग्रजीत ज्याप्रमाणे ए हा स्वर अर्धमात्राक व पूर्णमात्राक असतो त्याप्रमाणे पूर्ववैदिकभाषात ऋ अर्धमात्राक व पूर्णमात्राक असे. हा अर्धमात्राक ऋ तिस्, चतसृ व नृ शब्दांत पाणिनीयकाळी एका ठिकाणी राहिलेला आढळतो. ते ठिकाण म्हणजे षष्ठीचे अनेकवचन. षष्ठी अनेकवचनी तिसृणां, चतसृणां व नृणां अशी रूपे होतात, तिसृणां, चतसृणी अशी दीर्घ ऋकारमय रूपे होत नाहीत, म्हणून पाणिनी सांगतो. नामि या सूत्रे करून देवानाम्, हरीणाम्, मातृणाम्, प्रमाणे तिसृणाम् चतसृणाम् अशी रूपे व्हावीत. परंतु पाणिनिकाळी ती तशी दीर्घ होत नसत. दीर्घ का होत नसत त्याचे कारण, मात्र, पाणिनी सांगत नाही. दीर्घ न होण्याचे कारण तिसृ, चतसृ व नृ यातील ऋ अर्धंमात्राक असे व तो नाम् च्या पूर्वी अत्यंत ऱ्हस्व ऊर्फ अर्ध ऱ्हस्व उच्चारिला जाई. या अर्ध ऱ्हस्वाचा दीर्घ झालाच तर तो एकमात्राक होई, द्विमात्राक होणे अशक्य होते.
पूर्ववैदिकभाषेत चार या अर्धी चत्वृ, चतुर् व चतसृ असे तीन शब्द असत. साधनिका वरप्रमाणे.
१ चत्वार् चत्वारौ चत्वार:
चत्वा:
व
१ चतुर् चतुरौ चतुर:
२ चतुरम् ' ' चतुर:
या दोन रूपांची भेसळ होऊन पाणिनीय रूपे बनली.
नपुंसकलिंग
१ चत्वार् चत्वारी चत्वाँरि =चत्वारि
पूर्ववैदिकभाषात षष् हा शब्द असा चाले :
१ षट् ह्न ड्, षण्
२ षट् ह्न ड्, षण्ण् (षष् + न्)
३ षडिभ :
४ षडभ्य:
६ षण्णाम् (षण +आम्,)
७ षटसु
* षण् + आम् येथे ष तील अ चें दीर्घत्व ण् ला द्वित्व करून साधिले आहे. म्हणजे ठसक्याकरिता ण् द्वित्त उच्चारीत व ष तील अ ला सहज च दीर्घत्व येई.
पूर्ववैदिकभाषात अष्ट, अष्टा, अष्टौ असे तीन शब्द असत. त्यांच्या भेसळीने पाणिनीय रूपे साधलेली आहेत. त्यांचा ऊह यथापूर्व करावा.
संस्कृत भाषेचा उलगडा
२६ यत्, तद्, एतत्, अतत् (अदस्) हे सर्व शब्द तकारान्त आहेत असे पाणिनी म्हणतो. कारण समास वगैरेत यत्, तत् ह्न द् ही रूपे मूळ प्रातिपदिकाची येतात, जसे तत्कारण, यदिच्छा, इ. इ. इ. अन्यत् , कतरत्, इतरत् इत्यादी नपुंसकलिंगी प्रथमेच्या एकवचनाची रूपे यत्, तत्, इत्यादी सर्वनामांच्या रूपासारखी असलेली पाहून आणि समासात अन्य, इतर रूपे आलेली पाहून, पाणिनीला अदडडतरादिभ्य: पंचभ्य: हे सूत्र रचावे लागले, म्हणजे नपुंसकलिंगी प्रथमा व द्वितीया यांच्या एकवचनी अन्य, इतर, इत्यादी शब्दांना अद्ड म्हणजे अद् आदेश होतो असे सांगावे लागले. हा पाणिनीय रस्ता झाला. ऐतिहासिक रस्ता याहून निराळा आहे. पूर्ववैदिकभाषात अन्य व अन्यत्, इतर व इतरत्, त्य व त्यत्, त व तद् अशी भिन्न सर्वनामप्रातिपदिके होती असे ऐतिहासिक दृष्टीला दिसते. पैकी संमिश्र जी वैदिकभाषा व पाणिनीय भाषा तींत त व तद् या जोडीतील तद् हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले आणि अन्य, अन्यत् या जोडीतील अन्य हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले.
संस्कृत भाषेचा उलगडा
अमु १
१ २ ३
१ संस्कृत भाषेचा उलगडा या ग्रंथाच्या एका प्रतीत पृष्ठ ५९ वर या अमु शब्दाचे वर पुढील फोड कै. राजवाड्यांनी स्वहस्ते लिहिलेली आहे : ह्न
अदम्=अअम्+स्+स्+स्= अदम् (इदम् प्रमाणे)=अअम्+स्+स्= अम्+य+य+य= अम्+ह्+ह्= अम्+ई =अमी अमू (ह्=उ)
तसेच त्याच पानाचें तळाशी पुढील ओळ लिहिलेली आहे ह्न तात् व ताम् ही महत्त्वाची सर्वनामे He, She, it अर्थी आहेत.
अमु: अमू अमा (अमु+इ=अम्वि=अमी)
अमुम् अमृ अमू न् (अम्वि+आन्=अमून)
इ. इ. इ.
या दोन सर्वनामरूपांचे मिश्रण होऊन वैदिक व पाणिनीय रूपे बनली. पैकी अदस् चे असौ हे एकच रूप पाणिनीयभाषेत राहिले, बाकीची सर्व रूपे अमु सर्वनामाची आहेत तद्, इदम् शब्दांच्या स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूपांचा ज्या तऱ्हेने ऊह केला त्याच तऱ्हेने अदस् ह्न अमु सर्वनामांच्या स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूपांचा ऊह करावा.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कोडीस (वाणा) [ कपोतवर्ण = कवोडवण्ण = कओडवाण = कोडवाण. कपोत = कपोतीयस् (तरभाव)=कोडीअस = कोडीस. कोडीस + वाण = कोडीसवाण (णा-णी-पें ) ] कडीसवाणा म्ह० कपोतवर्णाचा. (भा. इ. १८३३)
कोडें [ कुड्यं (जिज्ञासा) = कोडें (आहे)
कुट्टकं (समीकरण ) = कोडें सोडवा ) ]
कोंढा [ कोयष्टिकः = कोढा = कोंढा ] एक पाखरूं आहे.
कोणु [ कः अन्यः = कवणु, कःनु = कोणु, कवणु ] ( ज्ञा. अ. ९ )
कोणें [ क अन्य + अनेन ] ( एणें पहा)
कोतवाल [कोट्टपाल = कोटवाल = कोतवाल ] (भा. इ. १८३२)
कोंदी-धी [ कुसंधि = कुहंधि = कोंधी, कोंदी ] सांदीकोंदींत बसूं नको म्हणजे भिंतींच्या सांधींत किंवा कुसंधींत बसूं नको. कोंदी म्ह० वाईट संधि, सांदी. (भा. इ. १८३६)
कोन [कोण = कोन ] angle, corner of house.
कोंपर [ कूर्पर = कोंपर ] (स. मं.)
कोपरखळी [ कूर्परखनि = कोपरखळी ] कोपरानें खणणारा अवयव. (स. मं.)
कोंबडा [ कुक्कुट: = कोउडा = कोवडा = कोंबडा ]
कोंबडा [कुंभपदी (a woman having pitcher like feet) = कोंबडी ] हा ममतादर्शक अपशब्द आहे. ही कोंबडी आली. कोंबडिच्या.
कोंभैल [ कुड्मलित = कोंभैल ( ला-ली-लें) ] ( धातुकोश-कोंभ पहा )
कोमट [ कवोष्ण ] ( सोमट पहा )
कोयंडा [ कुंचिकादंड: = कोयंडा ]
कोरा [ कर्करः = कोरा ] आरशासारखा स्वच्छ.
कोरान्न [कूर (शिजवलेला भात) + अन्न = कोरान्न ]
कोरीवँ [ कृ ६ हिंसायाम्. कुरेलिम = कोरीवँ ] ( धा. सा. श. )
कोलती, कोलीत [(वैदिक) कूल् = जळणें. कूलित = कोलीत ( जळकें लांकूड). कूलिता = कोलती ] (भा. इ. १८३३)
कोल्हेकुई [ क्रोष्टकूति = कोल्हेकुई. कु to sound, sing ]
कोल्हेभूक, कोल्हेहूक [वुक्क् १ भषणे (भषणं- श्वरवः) क्रोष्टुवुक्कनं = कोल्हेभूक, कोल्हेहूक. (भ = ह) ] (घा. सा. श.)