Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

-२ [गुल्फ = गुप्फ, गुप्फा (अनेकवचन). हकाराचा फेरबदल होऊन व वर्णविपर्यय होऊन खुबा ] (ग्रंथमाला)

खुरकूत [खोरकः = खुरकूत ] गुरांचा रोग.

खुरखुरणें [ खुर् ६ to scratch, to itch खुरति ] to itch, to long.

खुरखुर् [ खरुः ( दर्पः) = खुर्खुर] द्याश्रयकाव्य-४-५४

खुर्दा [ कूर्दः=खुर्दा. कूर्द् खुर्द् to jump ] खेळ, उड्या.*  खुर्दा फार झाला आहे, असें दांडगाई करणार्‍या मुलांना म्हणतात. येथें खुर्दा म्ह० दांडगाई, उड्या.

खुशाल [ कुशल = खुशल = खुशाल ]

खुष [ धृष् to be joyful = खुष ] ह्या घृष् पासून फारसी खुष शब्द निघाला आहे. फारसी खुष आणि मराठी खुष एकार्थक आहेत.

खुळा [ कुणि having a withered arm वैजयंति = खुळा ] खुळा हात.

खुळी (क्षुद्रा = खुळी) wretched, insignificant.

खूण [ क्षुद् ४ संपेषणे. क्षुण्ण = खूण ]
क्षुण्ण म्ह० जखम लागली, चेचलेलें. दगडाची खूण म्ह. दगडानें चेचलेल्याचें चिन्ह.

खून [ कुपिनी (मासे धरण्याचें बांबूचें यंत्र) = खून (स्त्री.) ] मासे धरण्याचें बांबूचें यंत्र.

खेॐ [ क्षिप्रम्] ( खेवों पहा)

खेच [ क्षेय = खेच ] ( खय पहा)

खेचर [ खेचराचें संस्कृत नांव अश्वखरजः. अश्वखरज म्ह० घोडें व गाढव यांजपासून झालेला. पैकीं अश्व शब्द जाऊन नुसता खरज शब्द या प्राण्याला लागूं लागला. गाढवाला खर हा शब्द आहे. तेव्हां खरज हा शब्द घोडा व गाढव यांच्या संकराला लागूं लागला. वर्णविपर्यास होऊन खरज = खजर. ज चा च होऊन खजर = खचर. उच्चार सौकर्यार्थ अ बद्दल ए होऊन खचर = खेचर ] (भा. इ. १८३७ )

खेटर्‍या [क्षेत्रियः committing adultery with the wife of another वैजयंती = खेटर्‍या ] खेटर्‍या ही मराठींत शिवी आहे.

खेटी [खे + अट् (noun) खेऽटिका =खेटी-plural खेट्या घालणें to come and go uselessly.

खेटून (बसणें) [ खेट् १ भये ] (धातुकोश-खेट ३ पहा)


३७ सादि प्रत्यय त्य या पूर्ववैदिक शब्दापासून निघालेले आहेत. त्य या शब्दाचा अर्थ संबंध. त चा स पूर्ववैदिकभाषेत सडकून होई. म्हणजे पूर्ववैदिककाळी त्य चा उच्चार कित्येक लोक स्य करीत व कित्येक लोक त्य करीत. स्येन, स्या, स्ये, स्यै, स्यास्, स्यस्, स्य, स्यत्, स्योस्, स्याम्, स्यस्, स्यि, स्यौ, स्यु, ही सर्व त्य = स्य पासून निघालेली रूपे आहेत. स्मै, स्मात्, स्म स्मिन्, ही रूपेक स्यै, स्य, स्यात्, स्यिन् या रूपांचे अपरपर्याय आहेत. स्येन, स्या यांचा अर्थ करण. स्ये, स्यै, स्मै यांचा अर्थ संप्रदाय; स्यत्, स्मात्, स्यस्, स्यास्, स्येस्, स्योस् यांचा अर्थ अपादान; स्य, स्यस्, स्येस्, स्योस्, स्म, स्याम् यांचा अर्थ संबंध; स्यि, स्मिन्, स्यौ, स्यु यांचा अर्थ अधिकरण. त्य= स्य या शब्दाला इन, ऐ, एस्, स्, आम्, उ, इन्, आस, अत् इत्यादी प्रत्यय लाविले म्हणजे स्येन, स्या, स्यै इत्यादी रूपे सिद्ध होतात. स्येन प्रत्यय स्य ऊर्फ त्य ला इन प्रत्यय लागून बनतो, येथपर्यंत तर्क बांधता येतो. परंतु, स्य ला लागणारे इन, आ, ऐ, अत्, अस् हे प्रत्यय कोणत्या पूर्ववैदिकभाषेतून कसे आले या बाबींच्या पुढे तर्क खुंटतो. त्य हा शब्द स्वत:च वैदिकभाषेत प्रत्यय बनलेला दृष्टीस पडतो. इह+त्य = इहस्य. इहत्यं म्हणजे इहसंबंधक. त्य हा विभक्तीप्रत्यय झाल्यावर त्याला लिंग किंवा वचन यांचे प्रत्यय सहजच लागतनासे झाले. सर्व+त्य =सर्वस्य याचा अर्थ सर्वसंबंधक. सर्व शब्द स्त्रीलिंगी चालवावयाचा असे त्यावेळी त्याला स्य हा प्रत्यय न लागता स्यास् प्रत्यय लागे. सर्व+स्यास् = सर्वस्या: म्हणजे सर्वा या स्त्रीलिंगी शब्दाच्या संबंधक. नपुंसकलिंग सर्वस्य असेच पुल्लिंगाप्रमाणे होई.

स्य किंवा स्यास् प्रत्यय ज्या शब्दाच्या पुढे येतो तो शब्द पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी आहे हे त्या प्रत्ययावरून कळते. स्य किंवा स्यास्च्या पुढील शब्दाच्या लिंगवचनांचे दर्शक हे स्य किंवा स्यास्, प्रत्यय नाहीत. म्हणजे स्य किंवा स्यास्, प्रत्यया विशेषणे नाहीत. तेव्हा, मराठी चान्त विशेषणे संस्कृत किंवा वैदिक स्य किंवा स्यस् किंवा स्यास् प्रत्ययांचे अपभ्रंश असणे शक्य नाही. त्य:, त्या, त्यम् अशी तिन्ही लिंगे ज्या पूर्ववैदिक व वैदिक शब्दाची होत असत त्या त्याशब्दापासून मराठीचा, ची, चे हे शब्द निघालेले स्पष्ट दिसतात. इतकेच की, वैदिक स्य, स्यस्व स्यास् प्रत्ययांची खाण व मराठीचा, ची व चे शब्दांची खाण पूर्ववैदिक त्य हा शब्द आहे. त्य हा शब्द वैदिक भाषेत प्रत्यय बनला. परंतु मराठी ज्या पूर्ववैदिक भाषेपासून निघालेली आहे तीत त्य हा शब्द स्वतंत्र तिन्ही वचनी व तिन्ही लिंगी चालणारा होता.

३६ हम् शब्द, सर्व अजन्त शब्द व सर्व हलन्त शब्द यांचे विभक्तीप्रत्यय पहाता, ते भादि किंवा सादि असे दोन प्रकारचे आहेत. पैकी भादि प्रत्यय अभि या जुनाट पूर्ववैदिक शब्दापासून निघालेले आहेत. अभिस्, अभ्यस्, अभ्य, अभ्यस्, अभ्याम् इत्यादी शब्दातील अ चा लोप होऊन भिस्, भ्यस् इत्यादी प्रत्यय निघालेले आहेत. अभि या कर्मप्रवचनीयाचा अर्थ जवळ कडे असा आहे. अभित: या कर्मप्रवचनीयाचा अर्थ सभोवती असा आहे. भक्ता हरि अमि, येथे अभिचा अर्थ शेजारी असा आहे. अभिचा अर्थ कडे असाही आहे. (अभिस्) चा म्हणजे भिस्चा अर्थ करण. भ्यस् चा अर्थ संप्रदान व अपादान आणि भ्यास् चा अर्थ करण, संप्रदान व अपादान. भ्य, भ्यम् चा अर्थ संप्रदान अभिचा अर्थ कडे व भिस् चा अर्थ कडून. देवेभि: म्हणजे देवांकडून. अभिला स् प्रत्यय लागला म्हणजे अर्थ कडून असा होतो. अभिला अ प्रत्यय लागला म्हणजे अर्थ कडे असा होतो आणि अभिला अ, अम्, आम् अस हे प्रत्यय लागले म्हणजे अर्थ कडे किंवा कडून असा दोन्ही होतो. स्वत: अभि शब्दाचे मूळ काय त्याचा अंदाज करण्यास काहीच साधना नाही. परंतु, भादि प्रत्यय या अभिपासून निघालेले आहेत हे निश्चायात्मक ताडिता येते. अभ्यन्त: या प्रत्ययात अभि शब्द स्वच्छ आहे. एकंदरीत अभि हा शब्द फार जुनाट आहे व त्यापासून निघालेले प्रत्ययही फार जुनाट आहेत.

(१) पाणिनी जिला प्रथमा म्हणतो तिला विभक्तीचे प्रत्यय नाहीत, फक्त वचनाचे उपसर्ग किंवा प्रत्यय आहेत. उपसर्गी भाषेत स्, स् + स् व स् + स्+स्, हे उपसर्ग शब्दांच्या पाठीमागे लागतात आणि प्रत्ययी भाषेत शब्दांच्या पुढे लागतात. हे उपसर्ग किंवा प्रत्यय लागून एकवचन, द्विवचन व त्रिवचन यांची जी रूपे साधतात त्यांना द्वितीयेपासून विभक्तीप्रत्यय लागतात. हम् सर्वनामाला अजन्त व हलन्त शब्दांच्याप्रमाणेच स् लागतो, परंतु तो उपसर्ग म्हणून लागतो, प्रत्यय म्हणून लागत नाही.

(२) अजन्त व हलन्त शब्दांप्रमाणे म् हा प्रत्यय हम् सर्वनामाच्या प्रथमेच्या वचनरूपांना लागून द्वितीयेची रूपे साधतात.

(३) येथून पुढे जे तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय आहेत त्यांचे दोन मोठे वर्ग पडतात. एक मादिप्रत्ययांचा व दुसरा सादिप्रत्ययांचा. हम् सर्वनामाला लागणारे मादिप्रत्यय प्रथम विचारास घेऊ. तृतीयेचे भ्याम् व भिस् अजन्त व हलन्त नामांना जे लागतात तेच हम् ला लागतात. चतुर्थी एकवचनी सादिप्रत्यय न लागता, भ्य व भ्यस् हे भादिप्रत्यय हम् ला लागतात. चतुर्थी व पंचमी यांच्या द्विवचनी भ्याम् साधारण आहे. चतुर्थी अनेकवचनी भ्यस् व लागता भ्यस् लागतो. म्हणजे एकवचनी भ्यत् हा एकच प्रत्यय लागतो. तृतीयेच्या एकवचनाचा सादि स्या प्रत्यय धरलेला आहे तो भ्या धरला तरी काम भागते. भ्या= या = या = आ. स्या = या = या = आ. ज्याअर्थी तृतीया, चतुर्थी व पंचमी यांचे सर्व प्रत्यय स्या या प्रत्ययाखेरीज करून मादि आहेत, त्याअर्थी तृतीया एकवचनाचाही प्रत्यय भ्या मानावा असा मनाचा कल होतो. तात्पर्य, तृतीया, चतुर्थी व पंचमी यांच्या तिन्ही वचनी हम् सर्वनामाला भादि प्रत्यय लागतात. शिवाय, पंचमीच्या अनेक वचनीं भ्यन्त: व स्वन्त: हे दोन आणिक भादि प्रत्यय लागत. सादि प्रत्यय पहाता षष्ठीच्या एकवचनी स्य प्रत्यय लागून, आणीक स्म प्रत्यय लागतो. षष्ठीच्या अनेकवचनी स्याम् प्रत्यय लागून शिवाय स्यम् प्रत्यय लागे आणि सप्तमीच्या एकवचनी स्यि प्रत्यय लागून, शिवाय स्मिन् प्रत्ययही लागे. षष्ठी व सप्तमी यांच्या द्विवचनी सर्वसामान्य स्योस् प्रत्यय व सप्तमीच्या त्रिवचनी सर्वसामान्य स्यु प्रत्यय लागत. एकंदर प्रत्यय पहाता, स्त्रीलिंगी व नुपंसकलिंगी प्रत्यय येथे एकही नाही. सर्व प्रत्यय पुढे ज्याला पुल्लिंग म्हणू लागले त्याचे आहेत. म्हणजे भाषेत स्त्रीलिंग व नपुसकलिंग व अर्थात पुल्लिंग या लिंगकल्पना उद्भवण्यापूर्वी हम् या सर्वनामाचीं रूपे बनलेली आहेत.

खिजे [ खिद्यते = खिज्जए = खिजे ] (भा. इ. १८३३ )

खिटखिट [खिट् त्रासे (द्विरुक्ति ) ] (ग्रँथमाला )

खिण [ क्षणं = खिण ] खिण असा उच्चार अशिष्ट करतात.

खितपड [ क्षिति + पत्]

खितपणें १ [ पत् १० गतौ. क्षितिपतनं = खितपणें ] खितपणें म्ह० खालीं जमिनीवर पडणें. ( धा. सा. श.)

-२ [ क्षि + तप् = खितप + णें = खितपणें. क्षि ( क्षय पावणें, खंगणें) व तप् (तापणें) या दोन संस्कृत धातूंच्या जोडापासून हा मराठी खितप धातू निघाला आहे. ] (भा. इ. १८३५)

खितपत [ क्षिप्त = खिपत = खितपत. क्षिप् ४ प्रेरणे ] खितपत पडला आहे = क्षिप्तः पतितोस्ति. क्षिप्त म्ह० टाकलेला, लोटून दिलेला.

खिरा [ क्षीरकः = खिरा ] water-melon.

खुजट [ क्षोदिष्टः = खुजिट = खुजट ] (खुजा २ पहा)

खुजा १ [ कुब्जः = खुजा. कुब्जट: = कुबडा ]

-२ [ क्षुद्रः = खुज्जा = खुजा. क्षोदिष्ट: = खुजिट = खुजट. खुजिट + ल = खुजिटला ]

-३ [ ( क्षोदस् = पाणी ) क्षौदस: = खोजा, खुजा (पाण्याचा ) ] खोजा, खुजा म्हणजे मातीचें पाणी ठेवण्याचें विशिष्ट भांडें.

खुजी [ खुज् १ स्तेयकरणे ] (धातुकोश खुज पहा)

खुटणें, खुंटणें, खुडणें, खुंडणें [ खुंड् to break in pieces (खोडणें पहा)

खुडवा [ क्षुद्रवापः = खुडवा ] (मूळवा पहा) खुतकन् हसणें [ क्षुत् (शिंकणें) = खुत्] शिंकण्यासारखें अल्प हसणें. (भा. इ. १८३२)

खुनशी १ [ क्नसिन्, कनसिकः ] ( धातुकोश-खुनस १ पहा )

-२ [ कुहनशील = खुनशी ] कुहन म्ह० मत्सरी. फारसी शब्दाशीं संबंध नाही. खुनी शब्द निराळा. ( भा. इ. १८३६)

खुनस [ क्नसः ] ( धातुकोश-खुनस १ पहा)

खुनी [ कुहनिक: (कपटी) = खुनी. कुहनं = खून ] खूनकपट असा जोड शब्द च आहे.

खुपस (दशमी) (घृतस्पश् touched with ghee = खुपस (दशमी) ] a cake, the flour of which has been just touched with a little ghee.

खुबा १ [ कूपक = कुवा = कुबा = खुबा] (स. मं.) ना. को. ७

या प्रत्ययांची अजन्त व हलन्त शब्दांच्या प्रत्ययांशी तुलना करू.

            हम् सर्वनाम                  अजन्त शब्द              हलन्त शब्द
१ x १      उपसर्ग स्                    प्रत्यय स्                   प्रत्यय स्
१ x २      उपसर्ग स्+ स्              प्रत्यय स् + स्            प्रत्यय स् +स्
१ x ३      उपसर्ग स्+स्+स्          प्रत्यय स् + स्+स्        प्रत्यय स् + स्+स्
२ x १
२ x २      म्                             म्                              म्
२ x ३
३ x १      स्या ह्न                        स्ये स्येनह्न                  स्या स्या
३ x २      भ्याम्                         भ्याम्                        भ्याम्
३ x ३      भिस्                          भिस्-(ऐस्)                भिस्
४ x १      भ्यह्न भ्यम्                   स्य, स्मै,स्यस्, स्यै        स्यस्
४ x २      भ्याम्                         भ्याम्                       भ्याम्
४ x २      भ्यम्                          भ्यस्                        भ्यस्
५ x १      भ्यत्                     स्यत्,स्मात्,स्यस्              स्यस्
५ x २      भ्याम्                        भ्याम्                       भ्याम्
५ x ३      भ्यात्                         भ्यस                        भ्यस्
             (अ) भ्यन्तर
              स्वन्तर्
६ x १      स्मह्न स्य                 स्य, स्यस्                      स्यस्
६ x २     स्योस्                      स्योस्                         स्योस्
६ x३      स्याम् ह्न स्यम्            स्याम्                          स्याम्
७x१       स्यि, स्मिन्               स्यि, स्मिन्, स्यौ               स्यि
७x२       स्योस्                     स्योस्                           स्योस्
७x३        स्यु                                                         स्यु स्यु

३५ उत्तमपुरुषसर्वनामाला व मध्यमपुरुषसर्वनामाला जे वचनोपसर्ग व विभक्तिप्रत्यय लागतात त्यांचा तक्ता असा :

वचनोपसर्ग
       १         २              ३
१    स्        स्+स्        स्+स्+स्

विभक्तिप्रत्यय
२  म्          म्           म् ( मागील अनुनासिकाचा न्)
     १          २              ३
३  स्या      भ्याम्         भिस्
    स्यै
४   भ्य      भ्याम्         भ्यम्
    भ्यम्
५  भ्यत्       भ्याम्      भ्यत्
                             अभ्यन्तर्
                              स्वन्तर्
६  स्म          स्योस्      स्याम्
     स्य                     स्यम्
७   स्यि         स्योस्      स्यु

खांबटी [ कक्षापुटी, स्कंधपुटी, स्कंधास्थि,} = खांबटी, खामटी the part of body near the sholder blade above or under ] खांबटीला धरून ओढणें.

खांबुल्यो [ खाबुल्लो (खांब, स्तंभ ) ] हा हि शब्द खेळांत योजतात. प्राकृत आहे. ( भा. इ. १८३२)

खामटा [ स्कंधास्थि = खांधटी, खामटी, खामटा ]

खामटी [कक्षापुटी, स्कंधपुटी, स्कंधस्थि] (खांबटी पहा)

खाय [ क्षाति ] ( खाई पहा )

खार १ [ क्षारितं = खार ] क्षारित म्हणजे अपराध, दोषपदराला खार लावणें म्हणजे अपराध, दोष पदरीं बांधणें.

-२ [ क्षार = खार. क्षारः म्हणजे रस ] लोणच्याचा खार म्हणजे रस.

खारट [ क्षरिष्ट = खारिट = खारट ] (भा. इ. १८३२)

खारिक [ खर्जूरिका = खारिक ]

खाल (लीं) [ खतल = खअल = खाल] ख म्हणजे खळगा, रिकामी जागा. (भा. इ. १८३४)

खालीं [खात = खाल= खालीं (सप्तमी) ] संस्कृत भूतकालवाचक धातुसाधिताच्या तचा प्राकृतांत व मराठींत ल होतो.

खात म्ह० खणलेलें, खड्डा; त्यावरून अधोभागींची जागा. घर खाली करणें, ह्या वाक्यांतील खाली शब्द फारशी आहे. त्याचा अर्थ रिकामें. ह्या फारशी खाली शब्दाच्या ईकारावर अनुनासिकाचा बिंदु नाहीं. (ग्रंथमाला)

खास [ काश्यं = खास ] काश्य म्ह० दृश्य, स्पष्ट. हें खास आहे म्ह० स्पष्ट आहे. (आगाशी पहा)

खिख्या [ किखिता = खिखिआ = खिख्या ] किखि म्ह० माकड. किखिता म्ह० मर्कटपणा. खिख्या म्ह० माकडचेष्टा, थट्टा.

खिचडी १ [ कृसरं, कृसरिका = खिचडी. कृ = खि. स = च. र =ड.]

-२ [ कृशर: = किचडा = खिचडा. ( स्त्री. ) खिचडी ] तांदूळ व डाळ यांचें अन्न म्हणजे कृशर. ( भा. इ. १८३५)

-३ [ कृशरा = किचडी = खिचडी ]

३४ या पाचही सर्वनामांच्या रूपाचा आता समाजदृष्टया अर्थ करू. पुरातनकाळी प्राचीन रानटी आर्यपूर्वजांचे दोन मोठमोठे समाज होते. एक समाज उपसर्ग लावून उत्तममध्यम पुरुषसर्वनामांची रूपे बनवी व दुसरा प्रत्यय लावून रूपे बनवी. प्रत्ययी समाजात हम्, हन्अहम्, हमहम् व अहिम अशी पाच सर्वनामे योजणारे पाच पोटसमाज होते. पैकी अह्मि सर्वनाम योजणारा पोटसमाज सर्वात जुना. अह्मि समाजाच्या भाषेतील अहम्मि एवढे एकच रूप प्राकृतात राहिलेले अवशिष्ट दिसते. अह्मिसमाजाहून अर्वाचीन ह्मह्मसमाजाचा समकालीन हन् समाज. हन् समाजाच्या भाषेतील नौ व न: ही दोन रूपे प्राकृतात व वैदिकात आलेली आहेत. अह्मिसमाज, मह्मिसमाज, अह्मसमाज व हन् समाज सर्वनामरूपे प्रत्यय लावून बनवीत. ह्मसमाजही प्रथम इतर चार समाजांप्रमाणे सर्वनामरूपे प्रत्यय लावूनच बनवी. परंतु त्या समाजातील एका मोठ्या पोटसमाजाने उपसर्ग लावून रूपे बनविण्याचा प्रघात पाडला. हा प्रघात बहुश: इतर अनार्यसमाजाच्या घर्षणाने पडलेला असावा. त्यामुळे ह्मसमाजाचे दोन मोठमोठे विभाग झाले, एक विभाग उपसर्गी सर्वनामरूपे योजी व दुसरा समाज प्रत्ययी रूपे योजी. कालान्तराने उपसर्गी ह्मसमाज, प्रत्ययी ह्मसमाज व प्राचीन हन् समाज यांचे पुन: एकीकरण झाले व तिन्ही समाजांच्या भाषेतील सर्वनामरूपांची भेसळ होऊन संमिश्र वैदिकसमाजाची संमिश्र सर्वनामरूपे प्रचलित झाली. त्या संमिश्र वैदिकभाषेपासून पाणिनीय संस्कृत भाषा निघाली. असा हा भाषेचा एक ओघ झाला. अह्मि, हमहम व अह्मसमाज उरले. त्यांचे मिश्रण होऊन त्यांचा दुसरा एक भाषेचा व समाजाचा ओघ झाला. या दुसऱ्या संमिश्र ओघाच्या भाषेत उपसर्गी रूपे नाहीत सर्व रूपे प्रत्ययी आहेत. या दुसऱ्या ओघाच्या भाषेचे व पहिल्या ओघाच्या भाषेचे मिश्रण पाणिनीकालापर्यंत झाले नाही. या दुसऱ्या ओघापासून म्हणजे अहिसमाज हसमाज व अहमसमाज यांच्यापासून प्राकृतभाषा म्हणून ज्यांना म्हणतात त्या भाषा निघाल्या. ह्मसमाजाइतके म्हणजे वैदिकसमाजाइतके हे प्राकृत समाज महत्त्वाला व प्रतिष्ठेला पोहोचलेले नव्हते. वैदिक भाषा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिकांची. या त्रैवर्णिकाहून जे कोणी इतर तत्कालीन आर्यवंशीय लोक होते व ज्यांची संस्कृती त्रैवर्णिकांच्या संस्कृतीहून कमतर होती त्यांची भाषा म्हणजे अह्मिभाषा, हभाषा व अह्मभाषा, ज्यांना पुढे प्राकृत हे नाव संस्कृत या शब्दाच्या अपेक्षेने मिळाले. तात्पर्य, प्राकृतभाषा या वैदिकभाषेच्या समकालीन असून, वैदिक भाषेच्याप्रमाणेच त्यांची वंशपरंपरा अत्यंत प्राचीन आहे. इतकेच नव्हे, तर वैदिकभाषा जशी उपसर्गी व प्रत्ययी भाषांच्या भेसळीने शबल झाली तशी प्राकृत भाषा शबल झालेली नाही. तिची शुद्धता अत्यंत प्राचीनतम काळापासून आतापर्यत जशीची तशी अकलुषित आहे. या अकलुषिततेचे व शुद्धतेचे मुख्य कारण प्राकृत समाजाचा मागासलेपणा होय. वैदिक समाज बहि:समाजाच्या घर्षणाने प्रज्ज्वलित होऊन प्रगतिप्रवण व वैभवसंपन्न झाला. ते वैभव व ती प्रगती मागासलेपणामुळे प्राकृतांना अनुभवता आली नाही. वरील इतिहासावरून स्पष्टच झाले की, प्राकृतभाषा वैदिक किंवा संस्कृत भाषांचे तत्त्वत: अपभ्रंश नाहीत. संस्कृत संपन्न झाल्यावर संस्कृतातील शब्द प्राकृत भाषा आपल्या उच्चारांच्या धर्तीवर आपल्यात सामील करून घेतात. यादृष्टीने प्राकृत भाषांतील शब्दांना संस्कृत शब्दांचे अपभ्रंश समजणे रास्त आहे. परंतु प्राकृत भाषा वैदिक किंवा संस्कृत भाषांपासून अपभ्रष्ट होऊन निघाल्या; या म्हणण्यात इतिहासदृष्ट्या बिलकूल जीव नाही.

३३ पूर्ववैदिकाकळी अहम्, हम्म्, हन्, हन्, ही जशी चार उत्तम पुरुषवाचकसर्वनामे होती तसे पाचवे अहिम असेही एक सर्वनाम होते. या अहिम सर्वनामापासून अहम्मि हे प्राकृत रूप निघालेले आहे. अहिम हे जे हकारी रूप त्याचा सकारी पर्याय अस्मि. अस्मि व अहि ही सर्वनामे फार प्राचीन आहेत.