२६ यत्, तद्, एतत्, अतत् (अदस्) हे सर्व शब्द तकारान्त आहेत असे पाणिनी म्हणतो. कारण समास वगैरेत यत्, तत् ह्न द् ही रूपे मूळ प्रातिपदिकाची येतात, जसे तत्कारण, यदिच्छा, इ. इ. इ. अन्यत् , कतरत्, इतरत् इत्यादी नपुंसकलिंगी प्रथमेच्या एकवचनाची रूपे यत्, तत्, इत्यादी सर्वनामांच्या रूपासारखी असलेली पाहून आणि समासात अन्य, इतर रूपे आलेली पाहून, पाणिनीला अदडडतरादिभ्य: पंचभ्य: हे सूत्र रचावे लागले, म्हणजे नपुंसकलिंगी प्रथमा व द्वितीया यांच्या एकवचनी अन्य, इतर, इत्यादी शब्दांना अद्ड म्हणजे अद् आदेश होतो असे सांगावे लागले. हा पाणिनीय रस्ता झाला. ऐतिहासिक रस्ता याहून निराळा आहे. पूर्ववैदिकभाषात अन्य व अन्यत्, इतर व इतरत्, त्य व त्यत्, त व तद् अशी भिन्न सर्वनामप्रातिपदिके होती असे ऐतिहासिक दृष्टीला दिसते. पैकी संमिश्र जी वैदिकभाषा व पाणिनीय भाषा तींत त व तद् या जोडीतील तद् हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले आणि अन्य, अन्यत् या जोडीतील अन्य हे प्रातिपदिक व समासक्षम समजले गेले.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57