२७ दोन या अर्थीं पूर्ववैदिकभाषात द्वम् (द्वंद्व), द्व, द्वा व द्वि असे चार शब्द होते. पैकी द्वं, द्वा व द्वि हे पणिनीयभाषेत समासात येतात आणि द्व वर विभक्तीकार्य चालते, पाणिनी द्वि हा मूळ शब्द धरून व लोप आणि आगम करून त्याच्यापासून द्वम्, द्व, द्वा ही रूपे काढितो ते ठीकच आहे.
पूर्ववैदिकभाषेत त्रि, त्रयस्म् व त्रय असे तीन शब्द असून, शिवाय तिस् म्हणून चवथा शब्द असे. पैकी तिसृ शब्द पाणिनीयकाळी फक्त स्त्रीलिंगी योजीत. पूर्ववैदिककाळी तिसृ यातील ऋ, अर्धमात्राक असे. म्हणजे ऋ तीन प्रकाराचे असत अर्धमात्राक ऋ, एकमात्राक ऋ व द्विमात्राक ऋ ऊर्फ दीर्घ ऋृ, कानडीत किंवा इंग्रजीत ज्याप्रमाणे ए हा स्वर अर्धमात्राक व पूर्णमात्राक असतो त्याप्रमाणे पूर्ववैदिकभाषात ऋ अर्धमात्राक व पूर्णमात्राक असे. हा अर्धमात्राक ऋ तिस्, चतसृ व नृ शब्दांत पाणिनीयकाळी एका ठिकाणी राहिलेला आढळतो. ते ठिकाण म्हणजे षष्ठीचे अनेकवचन. षष्ठी अनेकवचनी तिसृणां, चतसृणां व नृणां अशी रूपे होतात, तिसृणां, चतसृणी अशी दीर्घ ऋकारमय रूपे होत नाहीत, म्हणून पाणिनी सांगतो. नामि या सूत्रे करून देवानाम्, हरीणाम्, मातृणाम्, प्रमाणे तिसृणाम् चतसृणाम् अशी रूपे व्हावीत. परंतु पाणिनिकाळी ती तशी दीर्घ होत नसत. दीर्घ का होत नसत त्याचे कारण, मात्र, पाणिनी सांगत नाही. दीर्घ न होण्याचे कारण तिसृ, चतसृ व नृ यातील ऋ अर्धंमात्राक असे व तो नाम् च्या पूर्वी अत्यंत ऱ्हस्व ऊर्फ अर्ध ऱ्हस्व उच्चारिला जाई. या अर्ध ऱ्हस्वाचा दीर्घ झालाच तर तो एकमात्राक होई, द्विमात्राक होणे अशक्य होते.
पूर्ववैदिकभाषेत चार या अर्धी चत्वृ, चतुर् व चतसृ असे तीन शब्द असत. साधनिका वरप्रमाणे.
१ चत्वार् चत्वारौ चत्वार:
चत्वा:
व
१ चतुर् चतुरौ चतुर:
२ चतुरम् ' ' चतुर:
या दोन रूपांची भेसळ होऊन पाणिनीय रूपे बनली.
नपुंसकलिंग
१ चत्वार् चत्वारी चत्वाँरि =चत्वारि
पूर्ववैदिकभाषात षष् हा शब्द असा चाले :
१ षट् ह्न ड्, षण्
२ षट् ह्न ड्, षण्ण् (षष् + न्)
३ षडिभ :
४ षडभ्य:
६ षण्णाम् (षण +आम्,)
७ षटसु
* षण् + आम् येथे ष तील अ चें दीर्घत्व ण् ला द्वित्व करून साधिले आहे. म्हणजे ठसक्याकरिता ण् द्वित्त उच्चारीत व ष तील अ ला सहज च दीर्घत्व येई.
पूर्ववैदिकभाषात अष्ट, अष्टा, अष्टौ असे तीन शब्द असत. त्यांच्या भेसळीने पाणिनीय रूपे साधलेली आहेत. त्यांचा ऊह यथापूर्व करावा.