Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
लट्, लुट्, लृट् आत्मने
त् हे बैजिक सर्वनाम धातूंना लागते. सामीप्य ऊर्फ नैकट्य ऊर्फ स्वीयत्व दाखविणारा ए प्रत्यय लागून ते असे रूप होते. नंतर एकवचनी अ, द्विवचनी आ किंवा ए आणि त्रिवचनी अन् उपसर्ग लागतो. एकवचनी उपसर्ग न लागता, नुसते ते असेही रूप रहाते. त्रिवचनी अन् उपसर्ग न लागता फक्त प्लुत अ ३ लागतो.
अपच् धातु : अपच् + अत =अपचत
अपच् + अताम् = अपचताम्
अपच् + अन्त = अपचन्त
अबिभृ धातु : अबिभृ + त = अबिभृत
अबिभृ + आताम् = अबिभ्रातम्
अबिभृ + अ ३ त = अबिभ्र ३ त
संस्कृत भाषेचा उलगडा
४३ आत्मनायक प्रथमपुरुषसर्वनामांची साधनिका
परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला जसा लहानसा उपोद्घात केला, तसा आत्मनायक ऊर्फ स्वस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेलाही अल्पसा उपोद्घात करणे अवश्य आहे. परस्मायक साधनिकेत असे सांगितले होते की, त् या परोक्ष सर्वनामाला अ हा किंचित्सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून लागतो. आत्मनायक साधनिकेत याच्या उलट प्रकार होतो. सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून सर्वनामाच्या पाठीमागे न लागता प्रत्यय म्हणून सर्वनामाच्या पुढे लागतात. असे प्रत्यय तीन आहेत १) ए, २) अ, व ३) आम् अदस् मधला आद्य अ व एतत् मधला आद्य ए सामीप्यदर्शक आहेत व आम् ही सामीप्यदर्शकच शब्द आहे. आत्मनायक साधनिकेत त् या सर्वनामाला हे अ व ए प्रत्यय लागत. आत्मनायक साधनिकेत दुसरी लक्षात ठेवावयाची बाब म्हणजे वचनांची रूपे प्रत्यय लागून होत नाहीत. उपसर्ग लागून होतात. मागे उत्तमपुरुषसर्वनाम जे हम् त्याची वचनरूपे एका पूर्ववैदिक भाषेत अशीच उपसर्ग लागून झालेली आपण पाहिलीच आहेत. तोच उपसर्गी स्वभाव आत्मनायक साधनिकेत अनुभवास येतो. आत्मनायक साधनिकेत एक वचनाचा उपसर्ग अ आहे, द्विवचनाचा उपसर्ग आ किंवा ए आहेत क आणि अनेकवचनाचा उपसर्ग अन् आहे. तात्पर्य, सामीप्यदर्शक प्रत्यय सर्वनामाच्या पुढे आणि वचनाचे उपसर्ग सर्वनामाच्या मागे या आत्मनायक साधनिकेत लागतात.
संस्कृत भाषेचा उलगडा
लिङ् परस्मै
त्, ताम्, उस् हे प्रत्यय आहेत
पचेय् जोड धातु : पचेय् + त् = पचेय्त् = पचेत्
पचेय् + ताम् = पचेय्ताम् = पचेताम्
कपचेय् + उस् = पचयु:
पच्यास् जोड धातु : पच्यास् + त् = पच्यात् + त् = पच्यात्
पच्यास् + ताम् = पच्यास्ताम्
पच्यास् + उस् = पच्यासु:
पिपृया जोड धातु : पिपृया + त् = पिपृयात्
पिपृया + ताम् = पिपृयाताम्
पिपृया + उस् = (आलोप) पिपृयु:
संस्कृत भाषेचा उलगडा
लिट् परस्मै
त् व अत् ही परस्मायक सर्वनामे धातूंना लागतात. हलन्त पुल्लिंगी शब्दाप्रमाणे एकवचनी स् द्विवचनी स् + स् , व त्रिवचनी स् + स् + स् प्रत्यय लागतात. त सर्वनामाचा एकवचनी स उच्चार होतो व द्विवचनी त उच्चार होतो, तोच प्रकार त् या सर्वनामाचा होतो हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
पेच धातु : पपाच् + अ = पपाच
पेच + अतुस् = पेचतु:
पेच् + उस = पेचु:
दद् धातु : दद् + औ = ददौ
दद् + अतुस् = ददतु:
दद् + उस् = ददु:
संस्कृत भाषेचा उलगडा
त् व अत् शब्दांचे अनेकवचन हलन्त नपुंसकलिंगी शब्दांच्या अनेकवचनाप्रमाणे होते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. कमल् व ददत् शब्दांचे अनेकवचन कम ३ लि व दद ३ ति जसे होते तसेच अत् शब्दाचे अनेकवचन अ ३ ति होते. आता अत् शब्द कोणत्याच लिंगी नाही. त्याचप्रमाणे काही पूर्ववैदिकभाषांत कम ३ लि व दद ३ ति ही रूपे कोणत्याच लिंगीं नव्हती; फक्त अनेकवचनी होती. म्हणजे या शब्दांना काही पूर्ववैदिकभाषांत फक्त वचनांचे प्रत्यय लागत, लिंगांचे म्हणून प्रत्यय लागत नसत. अनेक पूर्ववैदिकभाषांचे मिश्रण होऊन वैदिकभाषा निर्माण होत असताना यांच्यावर नपुंसकलिंगाचा छाप मारला गेला इतकेच. गच्छंत् शब्दाचे नपुंसकलिंगी अनेकवचन गच्छंति होते तसे अत् शब्दाचे अनेकवचन अंति होई. अन्ति हे रूप कोणत्याच लिंगी नाही. तसेच गच्छंति हेही रूप जुनाट पूर्ववैदिकभाषात कोणत्याही लिंगी नसे. संमिश्र वैदिकभाषा जन्मास येताना गच्छंतिला लिंग लागले.
लुङ्, लङ्, लृङ् परस्मै
त् व अत् ही परोक्ष ऊर्फ परस्मायक सर्वनामे धातूंना लागत. एकवचनी शून्य, द्विवचनी आम् व अनेकवचनी अन्त्य हलाच्या पूर्वी नुमागम होई किंवा अत् स्थानी उस् आदेश होई.
अपच् धातु :ह्न अपच् + अत् = अपचत्
अपच् + अताम् = अपचताम्
अपच् + अन् = अपचन्
आपिपर् अपिप्ट धातु:ह्न अपिपर् + त् = (त् लोप व र् चा स्)
अपिप:
अपिपृ + ताम् = अपिप्टताम्
अपिपर् + उस् = अपिपरु:
अदा धातु :ह्न अदद् + ताम् = अदत्ताम्
अदद् + उस् =अददु:
अशक् धातु :ह्न अशक् + अन् =अशकन्
अस्था धातु:ह्न अस्थ् + उस् = अस्थु:
संस्कृत भाषेचा उलगडा
लट्, लुट्, लृट्, परस्मै
त् व अत् ही परोक्ष ऊर्फ परस्मै पदे ऊर्फ सर्वनामे धातूला लागतात. ही सर्वनामे संस्कृतभाषेतील हलन्त शब्दांप्रमाणे पूर्ववैदिकभाषात चालत नसत. त्यांचे वचनदर्शक प्रत्यय अगदी निराळे असत. एकवचनी इ प्रत्यय लागे. द्विवचनी अस् प्रत्यय, लागे आणि त्रिवचनी किंवा बहुवचनी इ प्रत्यय लागून, शिवाय अन्त्य हलाच्या अगोदर नुमागम होई किंवा नुमागम न होता आद्यस्वर प्लुत होई.
पच् धातु : - पच् + अति = पचति
पच् + अतस् = पचत:
पच् + अन्ति = पचन्ति
पिपर्, पिपृ धातु :ह्न पिपर् + ति = पिपर्ति
पिपृ + तस् =पिपृत:
पिपृ + अ ३ ति = पिप्र ३ ति
दा धातु : दद् + तस् = दत्त:
दद् + अ ३ ति = दद ३ ति
संस्कृत भाषेचा उलगडा
४२ परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांची साधनिका :
साधनिका करण्यापूर्वी, थोडासा उपोद्घात करणे जरूर आहे. मागे तद्, एतद्, इदम्, अदस् या सर्वनामांसंबंधाने विवेचन करताना सांगितले होते की, अदस् हे सर्वनाम अ + तत् = अ + दस् (त चा द व त् चा स् पर्याय होऊन) अशारीतीने सामासिक आहे. त्या विवेचनात असेही सांगितले होते की, इदम्, यनद् व अ, अशी तीन इदमर्थक सर्वनामे पूर्ववैदिकभाषात असत. इदमर्थक अ सर्वनाम सन्निकृष्ट पदार्थ दाखवी. अ म्हणजे हे व दस् = तस् = तत् म्हणजे परोक्षार्थदर्शक ते. अदस् म्हणजे हे ते, परोक्ष पदार्थांहून अलीकडले. अदस् जसे सामासिक सर्वनाम आहे, त्याप्रमाणे इदम् सर्वनामही दोन शब्दांचा समास होऊन झालेले आहे. इ + तम् = इदम्. इ म्हणजे समीपतम ह्न वृत्ती पदार्थ आणि तम् म्हणजे परोक्षवर्ती पदार्थ. इतम् = इदम् म्हणजे समीपतमवार्ती पदार्थ दर्शक सर्वनामशब्द. अदस् व इदम् या दोन जोड सर्वनामांप्रमाणे, एतद् हेही सामासिक ऊर्फ जोड सर्वनाम आहे. ए + तत् = एतद्. ए म्हणजे समीपतरवर्ती पदार्थदर्शक शब्द आणि तत् म्हणजे परोक्षार्थदर्शकसर्वनामशब्द. एतत् ह्न एतद् म्हणजे (समीपतरवर्त्तिपदार्थदर्शक सर्वनाम शब्द) जवळचे हे ते. इदम्, एतद् व अदस् या तीन जोड सर्वनामांच्या आद्यस्थानी इ, ए व अ हे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ समीपतम, समीपतर व समीप असा उत्तरोत्तर कमतर समीपत्व दाखविणारा आहे. इ म्हणजे अगदी निकटवर्ती पदार्थ. ए म्हणजे इ हून दूरचा व अ हून जवळचा पदार्थ आणि अ म्हणजे इ व ए यांच्याहून दूरचा परंतु त् हून अलीकडला पदार्थ. त् म्हणजे अगदी दृष्टीपलीकडील परोक्ष पदार्थ. त् च्या मानाने अ जवळचा व इ आणि ए यांच्या मानाने अ दूरचा. तात्पर्य अ चे सापेक्षत्वाने दूरचा व जवळचा असे दोन अर्थ असत. येणेप्रमाणे अ, इ व ए असे तीन शब्द कमी-जास्त सामीप्य दाखविणारे पूर्ववैदिकभाषात असत. इदम्, एतद् व अदस् या तीन सर्वनामांच्या आद्यस्थानी असणाऱ्या अक्षरांचा अर्थ कमी-जास्त अंतर दाखविणारा ज्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे या तीन सर्वनामांचे द्वितीय अक्षर जे त् तेही अंतर दाखविणारेच आहे. त् हे सर्वनाम सगळ्यांहून अत्यंत जास्त अंतर ऊर्फ दूरीभाव ऊर्फ पारोक्ष दाखविते. इदम्, एतत् व अदस् या तीन जोड सर्वनामांत त् हे बीजाक्षर आहे. या वैजिक त् सर्वनामाची एकवचनी, द्विवचनी व बहुवचनी रूपे पूर्ववैदिकभाषात धातूंना स्वतंत्र लावीत आणि दूरीभाव कमी कर्तव्य असल्यास तू सर्वनामाच्या पाठीमागे, अ हा सामीप्यदर्शक शब्द उपसर्गाप्रमाणे लावून, नंतर तो अत् जोड शब्द धातूंना लटकावून देत. हा उपोद्घात करून, परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला लागतो.
संस्कृत भाषेचा उलगडा
४१ परस्मायक मध्यमपुरुषसर्वनामांची साधनिका :
उत्तमपुरुषसर्वनामांच्या रूपांना तु उपसर्ग लागून मध्यमपुरुषसर्वनामांची रूपे बनतात.
एकवचन परस्मै
स् (ह्), अ (ह्), हि, थ, सि, ही मध्यमपुरुषसर्वनामाची रूपेक क्रियापदात येतात.
यांची साधनिका अशी :
तु + म् = त्व् = स् = ह् =अ
तु+ मि =त्वि = सि = हि
तु + अह्= त्वह् =तह् = थ
द्विवचन परस्मै
थह्, थुह्, तम् ही तीन रूपे येतात. यांची साधनिका अशी :
तु + वह् = त्वह् = थह्
तु + वह् = त्वुह् = थुह्
तु + आवाम् = त्वाम् = ताम् = तम्
बहुवचन परस्मै
अ, त, थ ही रूपे येतात, साधनिका :
तु + म = त्व = त = ह = अ
थ
संस्कृत भाषेचा उलगडा
७ सातवी बाब : उत्तम पुरुषाच्या एकवचनी इतकी पाच सर्वनामे पूर्ववैदिकभाषात का असावी? तर तत्कालीन वस्तुस्थिती येणेप्रमाणे होती. रानटी आर्यांच्या लहानलहान टोळ्या अशा प्रदेशात रहात असाव्या की, जेथे दळणवळणाला फार अडचण पडे व टोळ्यांची जीवितयात्रा, पिढ्या न् पिढ्या हजारो किंवा शेकडो वर्षे एकमेकांचा फारसा स्पर्श व घसट न होता, संथपणे चाले. त्यामुळे प्रत्येक दरीतील रानटी आर्यांच्या प्रत्येक टोळीच्या भाषेत विशिष्ट प्रकार रूढ होऊन विशिष्ट प्रांतिक किंवा टोळिक भाषा जन्मास आल्या. पुढे या टोळया एक झाल्यावर, सर्व टोळ्यांच्या भाषांचा ठसा संमिश्र समाजाच्या भाषेत सहजच उतरला. मूलत: अत्यंत प्राचीनतम काळी सर्व रानटी आर्यांचा एक समाज होता. तो इतर अनार्य समाजाच्या रेट्यामुळे गगनचुंबित पर्वताच्या दऱ्यांत शिरला. त्यामुळे त्या रानटी आर्यांच्या टोळ्या झाल्या. त्या टोळ्या दऱ्यांतून पंजाबाच्या मैदानात येत असता एक होऊन वैदिकसमाज जन्मास आला. असा एकंदर स्थूल इतिहास दिसतो.
द्विवचन परस्मै
व, वह् आणि आवह्, ही तीन रूपे परस्मै द्विवचनात येतात. अह् या सर्वनामाला स् उपसर्ग दोनदा लागून द्विवचन होत असे :
स्+स्+अह्= अ+ ह+ अह्= अउ +अह = औ+अह = आवह् =भाव
स्+स्+अह=ह्+ह्+अह्=उ+उ+अह्=वह्=व
बहुवचन परस्मै
म, मह् ही दोन रूपे येतात. अहम् या सर्वनामाचे अस्मह् हे अनेकवचनी रूप मागे दिले
आहे त्यावरून
अस्मह् = आमह् =आम
अस्मह् = (अलोप) स्मह् = हमह् = मह् = म
संस्कृत भाषेचा उलगडा
(१) येथे एक बाब पूर्वसिद्ध धरावी लागते. ती ही की पुरुषवाचक सर्वनामांची तिन्ही वचनांची प्रथमेची रूपे प्राथमिक भाषेत आधी सिद्ध झाली व नंतर ती धातूंच्या पुढे लागू लागली. हा क्रम ऐतिहासिक दिसतो, सबब सिद्धान्तवत खुशाल मानावा.
(२) दुसरी बाब : प्राथमिक भाषेत धातूंची दोन रूपे असत, साधी व जोड, जसे भव् व अभव्; नय् व अनय्. भव् म्हणजे होणे व अभव् म्हणजे परोक्ष होणे. नय् म्हणजे नेणे व अन्य म्हणजे परोक्ष नेणे. अभव् + अहम् म्हणजे मी परोक्ष आहे, म्हणजे झालो. होण्याची क्रिया परोक्ष होणे, नेण्याची क्रिया परोक्ष होणे, असा मूळचा अभव् व अनय् या धातूंचा अर्थ होतो. अभव् + अहम् = अभवम् याला पुढे भूतकालीन रूप म्हणू लागले.
(३) तिसरी बाब : भवेय् हा जोड धातू आहे. भव् + एय्. भव् म्हणजे होणे व एय् म्हणजे शकणे. नय् + एय् = नयेय् म्हणजे नेऊ शकणे. भवेय् + अहम् = भवेयम् म्हणजे मी होऊ शकतो. (करू ये, जाऊ या, यातील या धातू मराठीत या एय्पासून आलेला आहे.)
(४) चवथी बाब : भविष्य हा जोड धातू आहे भव् + इष्य् भव् म्हणजे होणे व इष्य् म्हणजे जाणे, भविष्य + अहम्मि = भविष्य + आमि = भविष्यामि म्हणजे मी होऊ जातो, मी होईन.
(५) पाचवी बाब : चकर्, चकार्, हे कर् धातूचे अभ्यस्त किंवा पुनरुक्त किंवा पौन:पुन्यवाचक रूप आहे, याला अ सर्वनामरूप लागून चकर् + अ = चकर म्हणजे मी पुन: पुन: करतो असे रूप होते. कोणतीही क्रिया दोनदा केली म्हणजे पहिल्यांदा जी केली ती क्रिया परोक्ष होते. अशा क्लृप्तीने वैदिकभाषेत लिट् हा भूतकाळ आला आहे. प्रथम लिट् चा अर्थ पुन: पुन: क्रिया करणे असा होता.
(६) सहावी बाब : १) वदामि, २) अस्मि, ३) अवदम्, ४) चकर, ५) वदानि, ६) वदेयम् या रूपात मि, आमि, अम्, अह् आनि यापैकी एकच सर्वनाम येऊन, उदाहरणार्थ मि येऊन, १ वदिम, २) अस्मि, ३) अवदिम, ४) चकर्मि, ५)वदिम, ६) वदेय्मि,
अशी रूपे का झाली नाहीत? पाच निरनिराळी सर्वनामरूपे का लागली? याचे कारण एकच संभवते. ते हे की, वैदिकभाषा ही पूर्ववैदिक अनेक भाषांचे संमिश्रण होऊन बनलेली आहे. पूर्ववैदिक एका समाजात आमि हे सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या समाजात वदामि असे रूप होई. दुसऱ्या समाजात मि हे सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या दुसऱ्या समाजाच्या भाषेत अस्मि हे रूप होई. तिसऱ्या समाजात अह् हे सर्वनामारूप होते व ते धातूला लागून तिसऱ्या भाषेत चकर रूप होई. इ.इ.इ. पुढे या पाचही समाजांचे एकीकरण होऊन संमिश्र वैदिकसमाज बनला व त्या संमिश्र समाजाच्या संमिश्र भाषेतही पाचही सर्वनामेरूपे क्रियापद रूपात दिसू लागली. नामशब्दांचे पृथक्करण करताना जी बाब आढळली तीच बाब क्रियापदांचे पृथक्करण करताना आढळली. यामुळे वैदिकसमाजाच्या व त्याच्या भाषेच्या संमिश्र ह्न स्वभावात्मक सिद्धान्ताला पूर्ण सत्यत्वाचे स्वरूप आले.