Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
संस्कृत भाषेचा उलगडा
प्राकृत
मध्यम पुरुषवाचकसर्वनामरूपे
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-२ [स्खद to stop. खाडा म्ह० stop ] दुधाचा खाडा म्ह. stop of milk.
-३ [ खाडः = खाडा. खडि भेदने ]
-४ [ खातः (खणलेला चर) = खाडा, खड्डा] (भा. इ. १८३६)
-५ [ खद् स्थैर्ये. खादः = खाडा. खदः = खडा ] दुधाच्या रतिबाचा खाडा पडला म्हणजे रतिबाची गती बंद पडली.
कानीं खडा म्हणजे आवाजाची गती बंद पडणें.
खाडी [ खातिका ] (खाडा १ पहा)
खांडी [ खंड:, खंडिका ] (खांड पहा)
खाडू [ षंढः = खाडू (diminution ऊ) ]
खाणें १ [ खै-खायति = खातें. खान = खाणें ] खाणें म्ह० दु:ख देणें, पीडा करणें. (भा. इ. १८३६)
-२ [ क्षम् = खावं. क्षांत्वा = खाऊन ]
राग खाऊन = रागं क्षांत्वा.
खाणें म्ह० राग, क्रोध, गम वगैरे. (भा. इ. १८३४)
खांणे (मन) [ माझें मन मला खांतें, या वाक्यांत खांणें हा धातु संस्कृत क्षण् पासून निघाला आहे. क्षणणं = खणणं = खांणें ] खांतें म्हणजे इजा करतें. ( भा. इ. १८३४)
खात [ ख्याति = खात ]
खातापिता [ ख्यातापत्यः = खातापता = खातापिता ] खातापिता माणूस म्हणजे पोरेंबाळे झालेला मनुष्य. खाण्यापिण्याशीं मूलतः कांहींएक संबंध नाहीं.
खांदणें [ खांदा den मराठी ]
खांदा [ स्कंधक = स्कंधअ = स्कंदअ = खांदा ] (स. मं. )
खादी १ [ खादिका = खादी ( वस्त्रविशेष ). खद् आच्छादने ] आच्छादण्याचें वस्त्र.
-२ [ खाद्]
खांधटी [ स्कंधास्थि ] ( खामटा पहा )
खापरतोंड्या [ खर्परतुंडः = खापरतोंड्या ]
खांब १ [ खांब हा शब्द स्कंभ या शब्दापासून निघाला आहे; स्तंभ या शब्दापासून निघाला नाहीं. कुठरो दंडविष्कंभ: (अमर-द्वितीय कांड-वैश्यवर्ग-७४) विष्कंभ = स्तंभ] ( भा. इ. १८३३)
-२ [हा मराठी शब्द संस्कृत स्तंभ, महाराष्ट्री खंब्भ, अशा परंपरेनें निष्पन्न झाला, म्हणून प्राकृत वैय्याकरण समजतात; परंतु ती चूक आहे. स्तचा महाराष्ट्रांत त्थ, थ, थ्थ होईल. क्ख, ख होणार नाहीं. पुण्यस्तंभ = पुणथंब; रणस्तंभोवीं = रणथंबोर; या स्थलीं स्तचा थ यथार्थ झालेला आहे. खांब या मराठी व क्खंभ या महाराष्ट्री शब्दांतील ख स्तपासून निघालेला नाही; स्कपासून निघालेला आहे. पाणिनीय स्कंभ् धातूपासून महाराष्ट्री क्खंभ व मराठी खांब निघालेला समजणें युक्त आहे.] (भा. इ. १८३२)
संस्कृत भाषेचा उलगडा
प्राकृत
उत्तम पुरुषसर्वनामरूपे
१ ३
१) अहम् =अहम् १) अहेम = अह्ये
२) हम हम्म= ममहमम् = ममम् २) अमहेमभि: =अमहेमहिँ
३) ममहमया = ममाए 3) अमाहमा भ्यन्त: = अह हिंतो
४) ममहमस्मै = मे, ४) अमाहमा स्वन्त: = अमाहमा सुंतो
५) ममहमत: = ममादो, ५) अमाहमा णाम् = अमाहमा णम
ममहमभ्य: = ममाहि ६) अमहेमषु अह्मेसु
६) ममहम = मह
७) ममहमस्मिन् = ममम्मि
मध्यम पुरुषवाचक तुह्म सर्वनाम प्रत्ययी लोकांच्या भाषेत असे चाले :
तुहम्
१ २ ३
१ तुम् हम्, तुम् हँम् तुम् हौम् तुह्म
२ तुह्मम् ' ' ' '
३ तुह्मया तुह्माभ्याम् तुह्मेभि:
४ तुह्मस्मै ' ' तुह्मेभ्य:
५ तुह्मत ' ' तुह्मभ्यन्त:
तुह्मभ्य: तुह्मास्वन्त:
६ तुह्म तुह्मयो: तुह्माणाम्
७ तुह्मस्मिन् ' ' तुह्मेषु
संस्कृत भाषेचा उलगडा
३२ उपसर्गवाल्यांची रूपे प्रत्ययवाल्यांनी घेऊन झालेली जी रूपमाला उत्तमपुरूषसर्वनामांची व मध्यमपुरुषसर्वनामांची वर दिली ती रूपमाला पूर्ववैदिक सर्व आर्यसमाजानी पत्करली असे नाही. काही पूर्ववैदिकसमाजांनी उपसर्गवाल्यांची पद्धती स्वीकारून प्रत्ययी व उपसर्गी अशी भेसळ रूपमाला बनविली. परंतु काही पूर्ववैदिकसमाज जुन्या प्रत्ययी भाषेलाच चिकटून राहून आपली उत्तम पुरुषवाचकसर्वनामांची व मध्यम पुरुषवाचकसर्वनामाचीं रूपे येणेप्रमाणे बनवीत. या जुन्या प्रत्ययी भाषा बोलणाऱ्या लोकांत प्रथमपुरुषवाचक सर्वनामाची दोन अंगे असत, एक महम् व दुसरे अहम्. हे महम् व अहम् शब्द, उपसर्ग न लागता, प्रत्यय लागून चालत. महम् व अहम् शब्दांची रूपे :
अहम्
१ २ ३
१ अहम् अहौम अहम, अह:म, अहाँ:म
२ अहमम् ' ' ' '
३ अहमया अह्माभ्याम् अह्मेभि:
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
खळखळ करणें [ (वैदिक) अख्खलीकृ = खळखळ करणें ( अलोप ) खळखळणें, खळखळाविणें. अख्खलीकृ to shout] खळखळ करतो म्हणजे ओरडतो, रडतो, अडथळा करतो.
खळखळणें, खळखळाविणें [ अख्खलीकृ] (खळखळ करणें पहा)
खळणें [ स्कंदनं = ख्खडणँ = खळणें ] वीर्य स्कन्नं = वीर्य खळलें. घोटक: स्कन्नः = घोडा खळला. ( भा. इ. १८३६)
खळबळ [ स्खल् १ संचलने. स्खलनवलन = खळबळ ] ( धा. सा. श. )
खळमळ [खलं (dross) मलं (dross) = खळमळ ]
खाई १ [ क्षाति (वैदिक heat, singeing ) = खाई, खाय ] आगीची खाय लागली was singed by fire आगीच्या खाईंत पडला fell into the heat of the fire.
-२ [ क्ष्माया = खाई ( नाश ). क्ष्माय् विधूनने ]
-३ [ खादिका = खाई ] (भा. इ. १८३६)
खाऊ [ खादुक = खाऊ (विशेषण, खादाड, लुच्चा) ] (भा. इ. १८३६ )
खाक [ कक्षाग्निः ( कक्षः शुष्ककाननं ) = खाक ( शुष्क आग) ] घर जळून खाक झालें = गृहं ज्वलित्वा कक्षाग्निकं भूतं.
खाकटी [ कक्षास्थि = खाकटी ]
खाकरणें १ [ कख् हसने ] (ग्रंथमाला)
-२ [ खात्कृ = खाकर (णें ) ] (भा. इ. १८३६)
खाकी [ काषाय = काखाई = खाकी ]
खाकोटी [ कक्षपुटी = काखोटी, खाकोटी ]
खागें १ [ कक्ष्यम् inner appartment = खागें ] अंतर्गृह.
उ०-आणि हें चि वायप्रसंगें । मरणाचें जरि खागें ।
तरि तेतुलेन हीं निगे। तमेंसिं तो ॥ ज्ञा. १४-२५३
-२ [ कक्ष्यम् gate = खागें ] दरवाजा. ( ज्ञानेश्वर)
-३ (कक्ष्यम् similarity, effort, object = खागें) object, विषय. ( ज्ञानेश्वर )
खाच [ खातः (पु.), खाता (स्त्री.) = खाच. त = च]
खाचरा [ कर्षु: a furrow, trench = खाचरा ] a furrow, trench. नांगरानें खाचरे पाडणें.
खाजण [ क्षयणं (a bay or harbour) = खाजण ]
खाटिक [ खट्टिक = खाटिक ] (भा. इ. १८३६)
खांड [ खंड:, खंडिका = खांड, खांडी ]
खाडा १ [ खातकः = खाडा ( a pond square and large) खातिका = खाडी (a hollow of salt water) ]
संस्कृत भाषेचा उलगडा
(२१) तु + अस्मासु = युष्मासु
तु + अस्मेषु = त्वस्मेषु
* तुज्झेसु, तुह्मेसु ही प्राकृत रूपे स्वस्मेषु या रूपापासून निघाली आहेत. आता हम्, हन् व तुहम् या सर्वनामांची वर साधलेली रूपे एका ठिकाणी संकलितो.
संस्कृत भाषेचा उलगडा
(११) तु + आवाभ्याम् = युवाभ्याम्
तु + आवाम् = युवाम् = वाम्
(१२) तु + अस्मभ्यम् = युष्मभ्यम्
तु + अस्माभ्यम् = युष्माभ्यम्
तु + अस्मेभ्यम् = युष्मेभ्यम्
तु + अत्मह् = यु + अहम् = वहम् =वह् = व:
* भ्यस्, भ्याम्, भ्यम् हे प्रत्यय चतुर्थीच्या एकवचनी, द्विवचनी व त्रिवचनी लागले आहेत. भ्यस् इतरत्र लागतो.
(१३) तु + मत् = त्वत्
(१४) तु + आवाभ्यम् = युवाभ्याम्
(१५) तु + अस्मत् = युष्मत्
* पंचमीच्या प्राकृत रूपाकरिता हम् सर्वनामाच्या पंचमी वरील टीका पहा.
(१६) तु + मम = त्वव = तव
तु + मे = त्वे + ते
तु + मह्य = त्वह्य
तु + हम हम = तुह्म
* प्राकृत ते, दे, तुम्म , तुह्म, तुज्झ, तुह ही रूपे ते, त्वह्म तुह्म या रूपांपासून निघाली आहेत.
* तव (अकच्) = तवक. तवकस्य इदं तावकं, तावकीनम्
(१७) तु + आवयो: = युवयो:
तु + आवाम् = वाम्
(१८) तु + अस्माकम् = युष्माकम्
तु + अस्मह् = यु + अहम् = वहम् = व:
तु + अस्मानाम् = त्वस्वानाम्
* प्राकृत वह् = वह् = भे, वो तुह्माणं, तुज्झाणं हीं रूपे वह्, व: व त्वस्मानाम्
या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(१९) तु + मयि = त्वयि
तु + हमयि = तुह्मयि
* प्राकृत तइ, तए, तुमए, तुमे हीं रूपे त्वयि व तुह्मयि या रूपांपासून निघाली आहेत.
* ममम्मि व तुमम्मि ही रूपे अहमस्मिन् व तुह्मस्मिन् या रूपापासून निघालेली आहेत. पुढे तुहम् शब्द पहा.
(२०) तु + आवयो: = युवयो:
तु + आवाम् = वाम्
संस्कृत भाषेचा उलगडा
(३) तु + वयम् = सु + वयम् = हु + वयम् = यु + वयम् = युवयम् = यूयम्
तु + अस्मह् = युष्मह्
तु + अस्मा = युष्मा, युष्माँ
तु + अस्म = युष्म
तु + अस्मे = युष्मे, त्वस्मे
* प्राकृत तुम्हे व तुज्झे ही रूपे त्वस्मे चे अपभ्रंश आहेत.
(४) तु + माम् = तुमाम्, त्वाम्
तु + मा = त्वा
* प्राकृत तुम्, तुमम् हीं रूपे त्वाम्, तुमाम् या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(५) तु + आवाम् = युवावाम् = युवाम्, वाम्
(६) तु + अस्मान् = युष्मान्
तु + अस्मह् = यु + अहम् = वहम् = वह् = व:
तु + अस्मे = त्वस्मे
* प्राकृत वो, तुम्हे व तुज्झे ही रूपे व: व त्वस्मे या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(७) तु + मया = त्वया
तु + मया = तुमया
तु + मये = तुमये
* प्राकृत ते, तइ , तए, तुमए, तुमे, तुमाइ, दे, ही रूपे त्वया, तुमया व तुमयै या रूपांचे अपभ्रंश आहेत.
(८) तु + आवाभ्याम् = युवाभ्याम्
तु + आवाम् = युवाम् = वाम्
(९) तु + अस्माभि: =युष्माभि:
तु + अस्मेभि: = त्वस्मेभि:
* प्राकृत तुम्हेहि, तुज्झेहि ही रूपे त्वस्मेभि: चे अपभ्रंश आहेत.
(१०) तु + मे = त्वे = ते
तु + मभ्यम् = त्वभ्यम् = तुभ्यम् तुह्यम्
* मराठी चतुर्थी एकवचनाची मज व तुज ही रूपे वैदिक व पूर्ववैदिक मह्यम् व तुह्यम् या रूपापासून आलेली आहेत. माझे असे ठाम मत झाले आहे की प्राकृतात चतुर्थी नाही असे जे प्राकृत वैय्याकरण म्हणतात ते वस्तुस्थितीला सोडून आहे. प्राकृतात षष्ठींची व चतुर्थीची रूपे अपभ्रंश होऊन एकसारखी दिसतात त्यामुळे प्राकृतात चतुर्थी नाही असे त्या वैय्यकरणांनी म्हटले. षष्ठीं नाही, फक्त प्राकृतात चतुर्थी आहे असे म्हटले असते तरी चालले असते. मग चतुर्थीचे काम षष्ठी करते असे न म्हणता, षष्ठीचे काम चतुर्थी करते असे म्हणावे लागले असते इतकेच.