Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

खोडी [ कुड्, कुडी N. ] (खोड ३ पहा)

खोड्याळ [कुटिल = खोडिल = खोड्याळ]

खोत [ क्ष्मापतिः ] ( खोती पहा)

खोती [ क्ष्मापत्यं = खोती. खोती म्ह० भूमीची मालकी. क्ष्मापतिः = खोत ]

खोबण [स्कुंभनं = खोबण. स्कुंभ् आधारे] खिळा, बिजागर फिरण्याला आधार म्हणजे खोवण.

(डाव) खोरा हात [ खोर् ]

खोरें ( डोंगराचें ) [ कुहरं = खुअरँ = खोरेँ ] ( भा. इ. १८३३)

खोली १ [ क्रोड: = खोला, क्रोडा, क्रोडिका = खोली ] क्रोड म्ह० मधला भाग, चार भिंतींमधला घराचा भाग.

[ क्रोड, क्रोडा, क्रोडिका = खोली ] क्रोट म्ह० निम्रप्रदेश. खोली म्ह० निम्रप्रदेश.

खोळ १ [ खल्ल = खोळ ] ( भा. इ. १८३६)

-२ [खोलि helmet, helmet-like pot, armour for the head = खोळ ]
घोंगडीची खोळ helmet-like fold of a घोंगडी to wear on the head.

-३ [खोलिः (बाण ठेवण्याचा भाता) = खोळ ] एका प्रकारची पिशवी.

-४ [खोलक (शिरस्त्राण) = खोळ (धोत्राची ) ]

-५ [ (कादंबर्यां ) खोलः = खोळ; खोलिका = खोळ ]

-६ [ खोल म्ह० शिरस्त्राण. खोल = खोळ ( घोंगडीची डोक्यावरून घेण्याची ) ] ( भा. इ. १८३३)

खोळ (धोगटी ) [खोलि म्ह० भाता, बाण ठेवण्याची पिशवी. खोलि = खोळ ( स्त्रि ) ] ( भा. इ. १८३३)

खोळंबणें १ [ लब् १ अवस्त्रंसने. खोल्लंबनं = खोळंबणें ] आकाशांत लोंबत रहाणें. ( धा. सा. श. )

-२ [लब् १ अवस्त्रंसने. क्षणावलंबनं = खणोलंबणँ = खओळंबणें = खोळंबणें ] क्षण म्ह० रिकामा वेळ, त्याचें अवलंबन करणें म्ह० खोळंबणें. ( धा. सा. श.)

खौंदळ [ क्षतबंध ] (खवंद पहा)

लेट् ह्न न् + अवत् + अ= नवत, सुनवत (परोक्ष)
लट् ह्न न् + उ+ त् + अ+ इ = नुते, सुनुते ( तो पिळतो)
लेट् ह्न न् + अ+ उ+ अते = नवते, सुनवते ( तो पिळो)
लट् ह्न न् + उ + ए = न्वे, सुन्वे ( हा पिळतो)
लेट् ह्न न् + अ+ उ+ अत+ ए = नवतै, सुनवतै ( हा पिळो)
लोट् ह्न न्+ उ + त् + अ + अम् = नुताम्, सुनुताम्
लिङ् ह्न न् + उ + ई + त् + अ = न्वीत, सुन्वीत
लङ् ह्न न + अत् = नात् , गृभ्णात् (परोक्ष)
लेट् ह्न न + अ + अत् = नात्, गृभ्णात्
लट् ह्न न + अति = नाति, गृभ्णाति (वर्तमान)
लेट् ह्न न + अ + अति = नाति, गृभ्णाति
लोट् ह्न न + अतु = नातु, गृभ्णातु
लोट ह्न न् + ईतात् = नीतात् = गृभ्णीतात्
लिङ् ह्न न् + ईयात् = नीयात् = गृभ्णीयात्.

लङ् ह्न न् + ईत + अ= नीत, गृभ्णीत (परोक्ष)
लेट् ह्न न् + अ + अत = नात, गृभ्णात् (परोक्ष)
लट् ह्न न् + ईत + ए = नीते, गृभ्णीते ( तो धरतो)
लेट् ह्न न् + अ + अते = नाते, गृभ्णाते (तो धरो)
लट् ह्न न् + ए= ने, गृभ्णे ( हा धरतो)
लेट् ह्न न् + अ + अत + ए = नातै, गृभ्णातै ( हा धरो)
लोट् ह्न न् + ईत् + अ+ अम् = नीताम्, गृभ्णीताम्
लिङ् ह्न न् + ई + अ= नीत, गृभ्णीत्
त + अ

लेट् ह्न अ (आज्ञार्थक) + उ + अत = अवत, तनवत (परोक्ष)
लट् ह्न उ + ते = उते, तनुते (वर्तमान) तो ताणतो
लेट् ह्न अ (आज्ञार्थक ) + उ+ अते = अवते, तनवते (वर्तमान) तो ताणो.
लट् ह्न उ + ए = वे, तन्वे (वर्तमान) (हा ताणतो)
लेट् ह्न अ (आज्ञार्थक) + उ+ अत (हा तो हा) + ए (हा हा) अवतै तनवतै
(वर्तमान) (प्रत्यक्ष हा ताणो)
लोट् ह्न उ + त् + अ + अम् = ताम् = तनुताम्
लिङ् ह्न उ + ई + त= वीत, तन्वीत व + उ+ त्
लङ् ह्न न् + ओत् = नोत् ( तो हा तो तो) असुनोत् (परोक्ष)
न + उ + अ+ त् = नवत्.
लेट् ह्न न् + अवत् (न्=तो) सुनवत् (परोक्ष)
लट् ह्न न् + ओति = नोति ( तो हा तो तो प्रत्यक्ष) सुनोति (वर्तमान)
न + उ+ ति
न + उ+ अ+ ति
लेट् ह्न न् + अवति = नवति, सुनवति (वर्तमान)
लोट ह्न न + उ+ तु
न् + ओतु = नोतु, सुनोतु
लोट् ह्न न् + उतात् = नुतात्, सुनुतात्.
लिङ् ह्न न + उयात् = नुयात्, सुनुयात्
लङ् ह्न न् + उ+ त् + अ = नुत ( तो तो तो स्वत:)
सुनुत (परोक्ष)

आत्मने

लङ् ह्न अत् + अ = अत, भवत (परोक्ष)
लेट् ह्न अ (आज्ञार्थक) + अत = आत, भवात (परोक्ष)
लट् ह्न अत् + अ (आत्मत्वदर्शक) + इ (प्रात्यक्षदर्शक), भवते (वर्तमान)
लेट् ह्न अ (आज्ञार्थक) + अते = आते, भवाते (तो होवो)
लट् ह्न अ (हा) + इ (प्रत्यक्ष) = ए, भवे (वर्तमान)
लट् ह्न अ (आज्ञार्थक) + अत (हा तो हा) + ए ( हा प्रत्यक्ष) = आतै = भवातै
(वर्तमान) हा होवो.
लङ् ह्न इ + त् = इत् ( हा, तो) स्वपित्, अनित् (परोक्ष)
लेट् ह्न अ + त् = अत् (आज्ञार्थक अ, तो) स्वपत् (परोक्ष)
लट् ह्न इ + ति = इति (हा, तो प्रत्यक्ष) स्वपिति (वर्तमान)
लेट् ह्न अ + ति = अति (आज्ञार्थक अ, तो प्रत्यक्ष) स्वपति (वर्तमान)
लोट् ह्न इ + तु = इतु (हा, तो, आज्ञार्थक उ) स्वपितु
लोट् ह्न इ + तात् = इतात् (हा तो आज्ञार्थक अ, हा तो) स्वपितात्
लिङ् ह्न ई + अ + अत् = यात् (इच्छार्थक इ, हा, हा तो) अन्यात् स्वप्यात् ह्न स्वप् + इ+ई + अ +अत्

लङ् ह्न इ+इ+त् = ईत् (हा हा तो) ब्रवीत्, अदुहीत् (परोक्ष)
वधीत्, अक्रमीत, आसीत्, अग्रभीत्
लेट् ह्न अ + त् = अत् (आज्ञार्थक अ, तो) ब्रवत् (परोक्ष)
लट् ह्न इ + इ+ ति = ईति ( हा हा तो प्रत्यक्ष) ब्रवीति (वर्तमान)
लेट् ह्न अ+ ति = अति (आज्ञार्थक अ, तो प्रत्यक्ष) ब्रवति (वर्तमान)
लोट् ह्न इ + इ+ तु = ईतु ( हा हा तो आज्ञार्थक उ) ब्रवीतु
लोट् ह्न इ + इ+ तात् = ईतात् ( हा तो, आज्ञार्थक अ, हा तो ) ब्रवीतात्
लिङ् ह्न इ + इ+ यात् = ई + आत् = दुहीयात् , ब्रवीयात्

लङ् ह्न अ + उ+त् = ओत् ( हा, तो, तो) अतनोत् (परोक्ष)
लेट् ह्न अ+ उ + अ+ त् = अवत् ( हा, तो, आज्ञार्थक अ, तो) तनवत् (परोक्ष).
लट् ह्न अ+उ+ति= ओति (हा, तो, तो, प्रत्यक्ष) तनोति (वर्तमान)
लेट् ह्न अ+उ+अ+ति = अवति (हा, तो, आज्ञार्थक अ, तो, प्रत्यक्ष) तनवति.
लोट् ह्न अ+ उ+ तु = ओतु ( हा, तो, तो, आज्ञार्थक उ) तनोतु
लोट् ह्न उत् + अ+अत् = उतात् (तो आज्ञार्थक अ, तो) तनुतात्
लिङ् ह्न उ + ई + अ+ अत् = उयात् (तो हा, आज्ञार्थक अ, तो) तनुयात्.
लङ् ह्न उ + त= उत (हा तो स्वत:) तनुत (परोक्ष)

लेट् ह्न अ+अ+ति = आति ( हा, आज्ञार्थक अ, तो, प्रत्यक्षदर्शक इ) भवाति.
लेट् ह्न अ + तु= अतु (हा, तो, आज्ञार्थक उ) भवतु
लोट् ह्न अत् + अ+अत् = अतात् (हा त्तो, आज्ञार्थक अ, हा तो) भवताम्.
लिङ् ह्न अ + ई+त् = एत् (हा, इच्छार्थक इ, तो) भवेत्.
लङ् ह्न अत् + अ (आत्मत्वदर्शक) = अत, भवन , परोक्ष.
लेट् ह्न अ (आज्ञार्थक) अत = आत, भवात (परोक्ष)
लट् ह्न अत + अ (आत्मत्वदर्शक) + इ (प्रात्यक्ष्यदर्शक) = अते, भवते (वर्तमान) (तो होतो)
लेट ह्न अ (आज्ञार्थक) + अत् + अ + इ = आते, भवाते, (वर्तमान) (तो होवो )
लट् ह्न अ = कर, भव, सर, मरे, भर, ब्रव, ग्रह.
लठ् ह्न अ (आत्मत्वदर्शक) + इ (प्रत्यक्ष्यदर्शक) = ए, भवे, (वर्तमान) (हा होतो)
लेट् ह्न अ (आज्ञार्थक) + अत (हा तो हा) + ए (हा हा) = आतै, भवातै (वर्तमान)
(प्रत्यक्ष हा होवो)
लोट् ह्न अत् + अ (आज्ञार्थक) + अम् (हा तो) = अताम् = भवताम्
लिङ् ह्न अ + इ + अ = एय (हा, विध्यर्थक इ + हा), भवेय.

ब्रूवे या रूपात सामीप्यदर्शक अ व प्रत्यक्षत्वदर्शक इ ही सर्वनामे आहेत आणि ब्रूते या रूपात परोक्षदर्शक त् हे सर्वनाम जास्त आहे. हाच प्रकार लङ् च्या प्रथमपुरुषी एकवचनी दृष्टीस पडतो. अदुह हे लङ् च्या आत्मनेपदी प्रथम पुरुषी एकवचनाचे रूप आहे. अदुग्ध या रूपात त् +अ अशी दोन सर्वनामे आहेत. पण अदुह या रूपात एकटे अ सर्वनाम आहे. अदुग्ध म्हणजे तो (त्) हा स्वत: (अ) दूध काढता झाला आणि अदुह म्हणजे हा स्वत: (अ) दूध काढता झाला. लोट् च्या प्रथमपुरुषी एकवचनी दुग्धाम् व दुहाम् अशी रूपे येतात. दुग्धाम् म्हणजे तो (त्) अ (आज्ञार्थक आगम) स्वत: हा (अम्) दूध काढो. दुग्धाम् म्हणजे तो हा स्वत: दूध काढो व दुहाम् म्हणजे हा स्वत: दूध काढो. कर्मणि लुङ्च्या प्रथमपुरुषीं एकवचनी अकारि, अजनि, अपादि, जानि, पादि, चेति अशी रूपे येतात. या रूपात सामीप्यदर्शक व आत्मत्वदर्शक असे फक्त इ हे एकच सर्वनाम योजिले आहे. अदुह या रूपात जसे एकटे अ हे सर्वनाम योजिले आहे किंवा हन् (त्) या रूपात जसे एकटे त् हे सर्वनाम योजिले आहे, तसेच अकारि, पादि या रूपात एकटे इ हे सर्वनाम योजिले आहे. इ म्हणजे सामीप्यदर्शक हा. ही आत्मनेपदाची उदाहरणे झाली. परस्मैपदी लोट्च्या प्रथमपुरुषी एकवचनी पातु, यातु या रूपाप्रमाणेच पातात् यातात् अशी रूपे होतात. पातु व पातात् या दोन्ही रूपांचा अर्थ

पा + त् (तो) + उ (तो) = तो तो पाळो
पा + त् (तो) अ(आज्ञार्थक आगम) अत् (तो) = तो हा तो पाळो

असा एकच आहे. फक्त पातात् या रूपात आज्ञार्थक अ आगम जास्त आहे. कोणतेही सर्वनाम, साधे किंवा जोड धातूच्या पुढे येते याचे आणिक एक परस्मैपदी उदाहरण देतो. येतप्रमाणे ऐतत् असे लङ्च्या प्रथमपुरुषी एकवचनी रूप होई. अ+ इ (धातु) + त् = (अ) इत्; आणि अ + इ (धातु) + त् + अत् = (अ) इतत्. इत् म्हणजे तो (त्) गेला (इ) आणि इतत् म्हणजे तो (त्) हा तो (अत्) गेला (इ) पहिल्यात तो या अर्थीं फक्त तू हे एकच सर्वनाम योजिले आहे आणि दुसऱ्यात तो याअर्थीं तो हा तो अशी तीन सर्वनामे जोडून योजिली आहेत. अर्थात किंचित् फरक आहे.

त्, त, ति, ते, तै, तु, ताम्, अ , इ, अम्, ए या सर्वनामांप्रमाणे आणिक काही सर्वनामे प्रथमपुरुषी एकवचनी धातूंच्या पुढे लागतात. त्यांची व यांची मिळून सर्वांची याद
अशी: ह्न

लङ् ह्न अ+त्=अत् (हा, तो) भवत् (परोक्ष = भूत)
लेट् ह्न अ+अ+त्=आत् (हा, आज्ञार्थक अ, तो) भवात् (परोक्ष ह्न भूत)
लट् ह्न अ+ति= अति (हा, तो, प्रात्यक्षदर्शक इ) भवति (वर्तमान)

स्मरणार्थ या सर्वनामांच्या मराठी अर्थाचा तक्ता करून ठेवू.

पूर्ववैदिक                             मराठी
अ                                 (अगदी जवळचा) हा
इ                                 (बराच जवळचा) हा
अम्                              (जवळचा) हा
उ                                 (किंचित् दूरचा ) तो
त्                                 (अगदीं परोक्ष) तो
लट्, लङ्, लोट्, लेट् यांच्या प्रथम पुरुषाच्या एकवचनांत वरील सर्वनामांचे खालील जोड येतात.

(तो) त् + ० =त् (अत्यंत परोक्ष परस्मै) भूत
( तो हा ) त् + अ = त (अत्यंत परोक्ष आत्मने ) भूत
(तो हा ) त् + इ = ति (प्रत्यक्ष परस्मै) वर्तमान
(तो हा स्वत: ) त् + अ + इ = ते (प्रत्यक्ष आत्मने ) वर्तमान
( तो हा स्वत:) त् + अ+ अ+ इ = तै (प्रत्यक्ष आत्मने ) वर्तमान
( तो तो) त् + उ = तु ( परोक्ष परस्मै) वर्तमान
( तो हा तो) त् + अ + अत् = तात् (परोक्ष परस्मै ) वर्तमान
( तो स्वत: हा ) त् + अ + अ + म् = ताम् (परोक्ष आत्मने) वर्तमान

वरील सर्व जोड प्रथमपुरुषाच्या एकवचनीं सामान्यत: येतात. या जोडांहून निराळे असे काही जोड प्रथमपुरुषाच्या एकवचनी संस्कृत व वेदभाषेत आढळतात. त्, त, ति, तै, तु, ताम् ही तकारी दर्शक सर्वनामे धातूंच्यापुढे जशी येतात, तशीच अ, इ, अम् ए, ही सर्वनामेही प्रथमपुरुषी एकवचनी धातूंच्या पुढे आलेली आढळतात. यात काही आश्चर्य नाही. कोणतेही दर्शक सर्वनाम धातूंच्या पुढे येईल. अर्थात, मात्र, फरक होतो. उदाहरणार्थ, प्रथमपुरुषी एकवचनाची ब्रूते व ब्रूवे ही रूपे घेऊ. ब्रूते म्हणजे तो (त्) स्वत: (अ) प्रत्यक्ष (इ) बोलतो आणि ब्रूवे म्हणजे हा स्वत: (अ) प्रत्यक्ष (इ) बोलतो.

४ कोणत्या हि गोत्राचा ब्राह्मण वेदाची कोणती हि शाखा स्वीकारी. प्रायः बापाची शाखा मुलगा स्वीकारी परंतु अन्य शाखा स्वीकारण्यास प्रत्यवाय नसे व नाहीं. एक काश्यप गोत्र आहे तर त्यांत आश्वलायन, आपस्तंब, हिरण्यकेशी, माध्यंदिन, काण्व, वगैरे सर्व शाखा आहेत. चरणाचा हि स्वीकार स्वेच्छेवर अवलंबून असे. चरण व शाखा ह्यांचें महत्व गोत्र व प्रवर यांच्या इतकें विवाहादिसंस्कारांत विशेष नाही. अर्थात् शरीरसंबंधीं किंवा अग्न्युपासनसंबंधीं कार्यात शास्त्रकारांनीं चरण व शाखा ह्यांचा निर्देश बिलकुल केलेला नाहीं.

५ पाणिनि, बौधायन, आश्वलायन, आपस्तंव, शौनक, कात्यायन, पतंजलि, हीं गोत्रनामें आहेत, व्याक्तिनामें नाहींत. गार्ग्यनारायण, लौगक्षिभास्कर, वगैरे जोड नांवांतील गार्ग्य व लौगाक्षि हे शब्द गोत्रवाचक आहेत. गोत्रवाचक्र आहेत म्हणजे आधुनिक परिभाषेत बोलावयाचें झाल्यास आडनांवें ऊर्फ उपनामें आहेत. गार्ग्यश्चासौ नारायणः, लौगाक्षिश्चासौ भास्कर: , नारायण कोण तर गार्ग्य; व भास्कर कोण तर लौगाक्षि. पांच सातशें वर्षांपूर्वी भारतांत आडनांवें नव्हतीं असें म्हणणार्‍यांनीं हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे कीं गोत्र हीं आडनांवें म्हणुन ज्यांना म्हणतात किंवा कुलनामें म्हणून ज्यांना म्हणतात तीं च होत. ताम्रशिलापट्टांत ब्राह्मणांचीं व्यक्तिनामें व गोत्रनामें दिलेलीं आढळतात. पैकीं गोत्रनामें जीं दिलीं असतात तीं आडनांवें च होत. व्यक्तिनामें व आडनांवें सारखींच असल्यास किंवा इतर कारणास्तव वैशिष्टीकरणार्थ ग्रामनामें हि व्यक्तिगोत्रनामांना जोडीत. कशीं जोडीत तें पहावयाचें असल्यास ते ते ताम्रशिलापट्ट पहावेत. विस्तारभयास्तव व सहजोपलब्धिस्तव त्यांचें संकीर्तन करून व्यर्थ जागा आडवीत नाहीं.

६ बौधायनाच्या कालीं गोत्रसंख्या असंख्य झाली होती. तो म्हणतोः--
गोत्राणां तु सहस्राणि प्रयुतान्यर्वुदानि च ।
ऊनपंचाशदेवैषां प्रवरा ऋषिदर्शनात् ॥

गणसूत्रांत पाणिनि गोत्रनामें देतो तीं सुमारें तीन साडेतीन शें व्हावीं. बौधायनाच्या कालीं गोत्रें अर्बुद झालीं होतीं. अर्थात् पाणिनि व बौधायन ह्यांच्यांत अंतर कित्येक शेंकडों वर्षांचें असलें पाहिजे. सूत्रांतून जीं गोत्रनामें दिलेलीं आढळतात - बौधायन, कात्यायन, आश्वलायन इत्यादि-तीं फार तर शंभर दोनशें भरतील. परंतु, स्मृत्यनुसार जीं गोत्रनामें दिलेलीं आहेत त्यांची संख्या सुमारें ५००० पांच हजार भरते. निरनिराळे ग्रंथ पाहून मीं जीं गोत्रनामें जुळविलीं आहेत त्यांची एकंदर संख्या सुमारें ५००० भरते. पैकीं कांहीं नामें नीट कळलीं नाहींत. नक्कल करणार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे व गाढ अज्ञानामुळे अनेकांचे उच्चार व अक्षरविन्यास अशुद्ध पडलेले आहेत. नाना ग्रंथांच्या तुलनेनें, श्रौतगृह्यसूत्रें, पाणिनि, पंतजलि संहिता, ब्राह्मणें, आरण्यकें, पुराणें व इतर धर्मशास्त्रग्रंथ पाहून गोत्रांचे शुद्ध पाठ तयार केले पाहिजेत. ते पाठ तयार करून मग त्यांची तुलना देशस्थांच्या गोत्रांची तोंडी याद तयार करून तिच्याशीं केली पाहिजे. ताम्रशिलापट्टांतून कित्येक अशीं गोत्रनामें आढळतात.

त्यांचा उल्लेख उपलब्ध गोत्रप्रवरांच्या यादींत सांपडत नाहीं. शिवाय भारतवर्षात जेवढा म्हणून ब्राह्मण आहे त्या सर्वांचीं गोत्रें जुळविलीं पाहिजेत. म्हणजे जो मोठा गोत्रोदधि तयार होईल, त्यावरून ब्राह्मणवंशावर, वेदाच्या लुप्त शाखांवर व गोत्रप्रवरांवर मोठा जाज्वल्य प्रकाश पडेल. भारतीय वंशशास्त्राचा ह्या पद्धतीनें अभ्यास करणें फार उपयोगाचें असून अगत्याचें झालें आहे. ब्राह्मणांच्या वंशांत अनार्य लोकांचा भ्रष्ट समावेश पूर्वी कधींतरी, कसातरी, व कोठेंतरी झाला असावा, असा शुष्क व सांशयिक तर्क कित्येक उत्कट कापालिकांनी केलेला आहे. परंतु, विवाहादि संस्कारांत गोत्रप्रवरादिबाबींनीं ब्राह्मणांनीं आपल्या कुलांना इतकें सूक्ष्म बांधून घेतलें आहे कीं ऐतिहासिक कालांत अनार्यांचा ब्राह्मणवंशांत समावेश होणें परम दुर्घट नव्हे तर बिलकुल संभाव्य व शक्य नाही. कापालिकांच्या उपरिष्ट विधानाचा ह्याहून स्पष्टतर निषेध करण्याची आवश्यकता नाहीं.

२ मूळ आठ ऋषि. अर्थात् ह्या मूळ ऋषींना गोत्रनामें नव्हती. ह्यांना पुढें प्रजा झाली. ह्या प्रजेला हि प्रप्रजा झाली व वंशविस्तार होऊन, वंशांत कित्येक प्रख्यात पुरुष उदयास आले. त्यांचे नातू वगैरे त्या त्या प्रख्यात पुरुषाचें नांव आपल्या व्यक्तिनामापुढें लावूं लागले. त्यामुळें असंख्य गोत्रें उत्पन्न झालीं. गोत्रें यद्यपि असंख्य झालीं, तत्रापि कोणत्या गोत्राचे कोण कोण पूर्वज यांची ओळख त्या त्या गोत्राला होती. ह्याचें कारण असें कीं, नित्यनैमित्तिक कर्मांत यजमानाला आर्षाचें प्रवरण अग्नीला उद्देशून करावें लागे. आर्ष म्हणजे अष्ट ऋषींचें अपत्य. त्या अपत्यांचें जें क्रमानें नामसंकीर्तन त्यांचें नांव प्रवरण. अमुतोऽर्वाञ्चो होता ॥ अमुतो मूलभूतादृषेरारभ्यार्वाञ्चोऽर्वाग्जातान्मंत्रदृशः क्रमेण तदपत्यसंबंधेन प्रार्थयते तमग्निम् । मूळ ऋषींपासून पुढें झालेले जे मंत्रद्रष्ट् त्यांचें अग्नीकरितां जें नामसंकीर्तन तें प्रवरण. हें प्रवरण अग्रीसंबंधानें करावें लागल्यामुळे व अग्नीचें आराधन हें भारतीय आर्यांचें मुख्य कर्म पडल्यामुळे आर्ष प्रवरांची ओळख भारतीय आर्यांना रोज होत असे व आहे. गोत्रें जेव्हां असंख्य झालीं तेव्हां कोणाचे कोण हें ओळखण्याकरितां प्रवरांची मोजणी करावी लागली. ती सुमारें ४९ भरली. द्वामुष्यायण घेतले तर दोन चार प्रवर अधिक होतील. कित्येक दहा पांच प्रवर आधक हि मानीत; परंतु, बौधायनकालीं ४९ प्रवर मानण्याची चाल पडली. तात्पर्य, असंख्य गोत्रें, ४९ प्रवर व ८ ऋषी अशी परंपरा उत्पन्न झाली.

३ गोत्रांचें हें वर्गीकरण दुसर्‍या एका प्रयोजनास्तव हि करणें प्राप्त होतें. भारतीय आर्यांत बहिणभावांचे विवाह इष्ट नाहीत; दैत्यासुरांत आहेत. एका च ऋषीपासून, एकाच पूर्वजापासून जी स्त्रीपुरुषें निपजलीं त्यांचे शरीरसंबंध अशास्त्र समजण्याची चाल भारतीय आर्यात फार पुरातनकालापासूनची आहे. गोत्रें जेव्हां असंख्य झालीं, तेव्हां कोण कुल कोणत्या दुसर्‍या कुलांचें सगोत्र आहे व सार्ष ऊर्फ सप्रवर आहे, हें निश्चित मापन करणें जरूर पडलें. कारण समानगोत्र व समानार्ष कुळांत शरीरसंबंध झाला असतां तो व्यभिचार होतो, अशी दृढ समजूत व शास्त्र असे. शास्त्रें व पुस्तकें व ग्रंथ झाल्यावर, हा प्रघात दृढ झाला असें मात्र बिलकुल समजूं नये. प्रघात शास्त्रांच्या व ग्रंथांच्या फार पूर्वीपासूनचा आहे. प्रत्येक ब्राह्मणाला अग्नीचें उपासन करावें लागे. तेव्हां प्रवरांचें संख्यापन आपोआप च होई. समजा कीं कोणी ब्राह्मण जामदग्न्य-वत्स-गोत्री आहे. तर त्याचे पंचार्षेय भार्गव, च्यावन, आप्नवान, और्व व जामदग्न्य हे होत; व तो जमदग्मीप्रमाणें, उर्वाप्रमाणें, अप्रवानाप्रमाणें, च्यवनाप्रमाणें व मृगूप्रमाणें अग्नीची प्रार्थना म्हणजे वरण करी. जामदग्न्या वत्सास्तेषां पंचार्षेयो भार्गवच्यावनाप्रवानौर्वजामदग्न्येति जमदग्निवदुर्ववदप्नवानवच्च्यवनवद्भृगुवदिति बौधायनः । यजमानादूर्घ्वान् मंत्रदृग्भिरव्यवहितानां मूलभूतान् दृष्टक्रमेण संकीर्त्य तद्वत्तद्वदिति सादृश्यसंबंधेन अग्निं वृणीते प्रार्थयत इत्यर्थः । गोपीनाथदीक्षित ओक. होता अनुलोम संकीर्तन करी व अध्वर्यु प्रतिलोम संकीर्तन करी. तेव्हां अर्थातच मूळ गोत्रप्रवर्तक व प्रवरप्रवर्तक यांचे संकीर्तन नित्य होई. अर्थात् आपले आर्ष कोण हें प्रत्येक ब्राह्मणाला माहीत असे. हा गोत्रोच्चरणाचा व प्रवरसंकीर्तनाचा प्रघात आज हजारों वर्षे ह्या भरतखंडांत अव्याहत चालला आहे. एका कुळाचे गोत्रप्रवर दुसर्‍या कुळानें घेऊं नये असा निर्बंध होता व आहे. यो वा अन्यः सन् अन्यस्य आर्षेयं वृणीते स व अस्य तदृषिः इष्टं वीतं वृंक्ते । अशी स्थिति व निर्बंध असल्यामुळें एक ब्राह्मण दुसर्‍या ब्राह्मणाचे प्रवर घेत नसे. मग अनार्य ते घेतील व आपल्याला ब्राह्मण म्हणवितील ही शंका हि यावयास नको. हें गोत्रप्रवरसंकीर्तन नित्य होई त्यामुळें त्यांचें सरसहा विस्मरण होणें कालत्रयीं हि संभाव्य नसे, मग शक्य कोठून होणार ?

परस्मै

लट् : अद् त् इ = अत्ति
लेट् : अद् अ त् इ = अदति, हनति
लङ् : हन् त् = हन् (त्)
लेट् : हन् अ त् = हनत, अदत्

आत्मने
लट् : कश् त् अ इ = कष्टे
लेट् : कश् अ त् अ इ = कशते
कश् अ त् अ अ इ = कशतै
लङ् : ईश त् अ = ईष्ट
लेट् : ईश् अ त् अ = ईशत

लेट् दोन प्रकारचा; पहिला परोक्ष लेट् व दुसरा प्रत्यक्ष ऊर्फ वर्तमान लेट्. कशते, कशतै व अदति, हनति, हा प्रत्यक्ष लेट्; कारण या लेट् मध्ये त् सर्वनामाला प्रत्यक्षत्वदर्शक इ सर्वनाम जोडलेले आहे. हनत्, अदत्, ईशत हा परोक्ष लेट्; कारण या लेट् मध्ये त् सर्वनामाला प्रत्यक्षत्वदर्शक इ सर्वनाम जोडलेले नाही.

प्रत्यक्ष व परोक्ष असा लेट् दोन प्रकारचा असतो, हे प्राचीन पाणिनीच्या किंवा अर्वाचीन युरोपियन वैय्याकरणांच्या लक्षात आलेले नाही. हनत्, अदत्, अदति, हनति, या परस्मैपदी लेट्च्या रूपात व कशते, कशतै, ईशत या आत्मनेपदी लेट्च्या रूपात भेद असा आहे की, लट् व लङ् यातल्याप्रमाणेच आत्मनेपदी रूपात खास स्वत्वदर्शक अ सर्वनाम जास्त आहे. तेव्हा लट्, लङ् व लोट् यातील आत्मनेपदी व परस्मैपदी रूपात अ च्या आधिक्याचा जो भेद तोच लेट् च्या आत्मनेपदी व परस्मैपदी रूपात आढळतो.