Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

५९ (६) तुदादि धातू : ह्न तुदादिवर्गातील इच्छा, विछ, पृच्छ ही अंगे इष्, विद् व पृच्, या धातूंच्या पूर्ववैदिक सनन्त रूपांपासून निघालेली आहेत.
पूर्ववैदिकभाषेंत यङ् चीं रूपे तोतुद् नोनुद, चरीकृष्, अशी होत असत यांचे अवशेष तुद्, नुद्, कृष् (तुदामि, नुदामि, कृषामि) इ. इ.इ. आहेत. किंवा तुद्, नुद्, कृष् हे साधे धातूही समजले गेले तरी चालेल. इतकेच की यांना अदादि सर्वनामे लागतात.
पूर्ववैदिक भाषात यङ् व यङ्लुक् दोन्ही परस्मैपदीं व आत्मनेपदी असे दोन्ही पदी
चालत, हे लक्षात ठेविले पाहिजे.
नुमागम घेणाऱ्या धातूंसंबंधाने भ्वादिगणात जी टीका केली तीच तुदादिगणांतही लागू आहे असे समजावे.
कित्येक धातु दोन दोन गणात चालतात. म्हणजे भ्वादिप्रमाणे चालतात किंवा तुदादिप्रमाणे चालतात. याचे कारण इतकेच की यङ् व यङलुक् यात हे धातू पूर्ववैदिककाली दोन तऱ्हांनी चालत. उदाहरणार्थ :
कृष् ह्न चरीकर्षति पासून कर्षति (भ्वादि)
कृष् ह्न चरीकृष् पासून कृषति (तुदादि)
चेक्षिप्यते ह्न क्षिप्यते (दिवादि)
चेक्षिप्ति ह्न क्षिपति (तुदादि)
चेक्षेप्ति ह्न क्षेपति ( भ्वादि)
क्षेपति हे रूप पाणिनीय संस्कृतात नाही. परंतु असते तरीही फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. क्षेपति हेच रूप काय, पण पूर्ववैदिक भाषेत क्षिप्ति असेही एक रूप असे. या शेवटच्या रूपांसंबंधाने पुढे टीका येईल तुदादिवर्गाला पाणिनी शविकरण म्हणतो.