Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
पुंजा [ पुंजराज = पुंजा (एक देश) ] हें विशेषनाम' खानदेशांत बरेंच आढळतें. (भा. इ. १८३५)
पुलुमायी - हें विशेषनाम शातवाहनवंशांतील राजांच्या नांवांत येतें. पुरुमायी = पुलुमायी. पुरुमायी म्हणजे पुष्कळ माया, लक्ष्मी ज्या जवळ अहे तो, श्रीमान्, धनवान्, लक्ष्मीवान्, पुरूरवस्,
पुरुकुत्स, पुलोमन्, पुलुमन्, ह्या विशेषनामांतील आद्यावयव पुरु आहे, असें दिसतें. ( भा. इ. १८३३)
पेंदा [ वद् १ भाषणे. प्रियंवद: = पिअंवदो = पेंदो = पेंदा] पेंदा हें कृष्णाच्या मित्राचें नांव. ( धा. सा. श. )
पेंद्या [ उपेंद्रक: = (उलोप) पेंद्या, पेंदा ] कृष्णाचा एक खेळगडी.
बगाजी [ भगादित्य ] (आदित्य पहा)
बगु [ भग ] (भगु पहा )
बगू [ भर्ग: = बगू, बगाजी ]
बगोजी [ भगादित्य ] ( आदित्य पहा)
बचंभट [ वत्स = वच्छ = बचं ( भट ), बजं (भट)]
बचाजी [वत्स किंवा वर्चस्]
बची [ वत्सा (मुलगी ) = बाची, बची ]
बच्चू [ वासू: ] (बाची १ पहा)
बजंभट [ वत्स ] (बचंभट पहा )
बजरंग [ वज्रांग = वजरांग = बजरंग. रातील अ चा अ झाला ] हा शब्द अंजनीपुत्राचा वाचक आहे. (भा. इ. १८३३)
बंड, बंडू [ भंड = बंड, बंडू (ममत्वदर्शक) ] बंडोपंत हें नांव मराठींत सामान्य आहे. ( भा. इ. १८३५)
बनशीधर १ [ बंशीधर = बनशीधर, बंशी = मुरली ]
-२ [ वंशीधर ( कृष्ण) = वनशोधर, वंशी ( कृष्ण ) = वनशी. वंशी ( स्त्री ) वाद्यविशेषः. वंशिन् ( पुं. ) वंशवाद्य ज्याच्या जवळ आहे तो. (भा. इ. १८३६)
बनी [ वनिता = बणिआ = बणी = बनी ] मराठींत स्त्रीनाम आहे. (भा. इ. १८३४)
बल्लाळ [ मूळशब्द बालराज. त्याचें अपभ्रष्ट रुप बलराज. त्याचें बालल, त्याचें बालळ, त्याचें स्वरव्युत्क्रमानें बलाळ, त्याचें जोरदार बल्लाळ - बाल - बाळ - बाळजी - बाळाजी, बाळोजी.
बल्लाळ व बाळाजी ही दोन्ही रूपें एकाच व्यक्तीचीं वाचक असतात ] (सरस्वतीमंदिर शके १८२६)
बसन्त्ये [ वसंतिके ] ( दासींचीं नांवें पहा )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
-२ [ चम् to drink, to eat = चव्. चम = चव. taste of eating or drinking
चवकशी [ ईक्ष् १ दर्शने. सम् + ईक्षा = समीक्षा = चवीकशा = चवकशी. समीक्षाकरणं = चवकशी करणें. (धातुकोश-चवकस पहा)
चवकस [ समीक्षक = चवकस ]
चवडा १ [ चपटक, चपेटक = चवडअ = चिवडा (हाताचा किंवा पायाचा)] (स. मं.)
-२[ चतुष्पदः = चउवड: = चौवडा = चवडा ] प्रपद म्हणजे पायाचा पुढचा भाग. चतुष्पद म्हणजे पायाच्या चार बोटांचा भाग.
चवढाळ १ [ समर्द्धक= चवढ्डअ= चवढ + (स्वाथें आल) = चवढाळ ] समर्द्धक म्हणजे वरद कर्ता. चवढाळ म्हणजे निंद्यकर्ता. (भा. इ. १८३६)
-२ [ स्वदालुः = चवढाळ ] expert in testing.
चवल, चवला, चवली [ चतुर्थ + ल = चउ + ल = चवल, चवला, चवली ] अर्ध्या रुपयाचा चतुर्यांश.
चवाठा [ चतुष्पथः = चउअठा = चवाठ ] (भा. इ. १८३६)
चवाळें १ [शंबल] (सांबळ पहा)
-२ [चतुष्पल्लवकं = चवाळें]
चविष्ण [चमिष्णु = चविष्ण]
चहाटळ १ [चाट + ल (स्वार्थक) = चाटळ = चहाटळ] चाट म्ह० लुच्चा.
-२ [चाटुल = चहाटळ ] वावदूक.
-३ [चटुल = चहटळ = चाहाटळ = चहाटळ]
काढणें = काहाडणें. लोढणें = लोहोडणें
वाढणें = वाहाडणे. चढणें = चहडणें
पढणें = पहडणें घाडणें = दाहाडणें
चहाडी [चह् १० शाढ्ये] (घातुकोश-चहाड पहा)
चळ [चल् to frolic = चळ]
चळकांप [चलत्कंपः = चळकांप]
चळचळ [चलाचलं = चळचळ]
चळचळ कांपणारें = चलाचलं कंप्रं
चळाचळ [ (वैदिक) चलाचल = चळाचळ ] unsteady trembling चल् चें Reduplicated रूप. झटाझट, पटापट, धपाधप ही reduplicated रूपें आहेत.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चमन [ चमनं = चमन ]
चमन म्ह. विलासी खाणें.
चम्मत [छद्मन्=चम्मत ] ठकविणारा खेळ, युक्ति.
चम्मा [ जम् अदने. जमः = चम्मा ]
चरक १ [स्त्रक्व = चरक्क = चरक ] स्त्रक्व (वैदिक) म्हणजे जाभाड. तोंडाचा चरक या वाक्यखंडांत स्त्रक्व शब्दापासून निघालेला चरक शब्द येतो. वैदिक स्त्रक्वपासून संस्कृत स्त्रक्किणी (द्विवचन). स्त्रक्किणी म्हणजे खालच्या व वरच्या दांताच्या कवळ्या. (भा. इ. १८३५)
-२ [ चारकं (बंघनालयं) = चरक ] तुरुंगा.
चरचर [ चर्च् हिंसायां, चर्चर = चरचर ]
चरचर कापणें, चराचरा कापणें.
चरचरित [ चर्च्य ६ बिन्दायां, तर्जने, मर्त्सने, censure चाचर्च्यते-चाचर्च्यित = चरचरित (टीक इ. इ.) ]
चरणें [शृ ९ हिंसायाम् = शर= सर= चर ] चरणें (गळूं वगैरे). व्रण चरत चालला=व्रणः शीर्यमाणः वर्तते. (भा.इ. १८३४)
चरत [चरत्=चरत] चरणारी, चरत जाणारी जखम म्हणजे पसरत जाणारी जखम.
चरा [चरक = चरअ = चरा ] (ग्रंथमाला)
चराचरा १ [चर्वचर्व] (चर्बट पहा)
-२ [चर्वचर्व = चराचरा (खातो) ]
चराट [ चृत् (गुंफणें, बांधणें) = चरट = चराट, चर्हाट ] चर्हाट म्हणजे गुंफलेला जाडीभरडा दोर.
चर्वट [ चर्व् = अदने. चर्वटं = चर्बट; चर्वचर्व = चराचरा ] (घा. सा. श.)
चर्या [ चरितानि = चरिआइँ = चर्या ] अनेकवचनाचें एकवचन झालें आहे व नपुंसकलिंगाचें स्त्रीलिंग झालें आहे. (भा. इ. १८३२)
चर्हाट १ [ चृत् = चरट = चर्हाट ] (चराट पहा)
-२ [ मराठींत चरहाट = चर्हाट असा दोराला शब्द आहे. अमरांत वराटक असा शब्द आहे. हा अमरांतील शब्द चराटक असा मूळ असावा 'व' च्या स्थलीं ‘च’ चुकून पडला असावा. (भा.इ. १८३३)
चलन चलनी, [ चल् गतौ ] ( द्रम्म पहा )
चव १ [ चम् १ अदने. चंचम्य = चमचमित. चम=चव ] (धा. सा. श.)
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
नर्मदे [ नर्मदे ] ( दासींचीं नांवें पहा)
नागरे [ नागरिके ] ( ,, )
नागाजी [ नागादित्य ] (आदित्य पहा)
नागूबाई [ नागा (विशेषनाम ) = नागूबाई ]
नागेश [ नाग +ईश = नागेश अथवा नाक + ईश = नाकेश = नागेश ]
नागोजी [ नागादित्य ] (आदित्य पहा)
नानबा [ ज्ञानदेवः = नानबा, नाना, नानी F. ]
नाना १ [ ज्ञानदेवः ।] ( नानबा पहा )
-२ [ ज्ञानदेव ] ( नानू पहा)
नानाजी [ ज्ञानी = नाना ( knowing) ]
ननी १ [ ज्ञानदेवः ] ( नानबा पहा )
-२ [ नना ( आई) = ननी = नानी (स्त्रीनाम )] (भा. इ. १८३४)
-३ [ ज्ञानदेव ] (नानू पहा)
नानू १ [ ज्ञानदेव = ग्यान किंवा नान ( एकशेष ).
ममतादर्शक ( ग्यानू, नानू)
स्त्रीलिंग (ग्यानी, नानी)] (भा. इ. १८३६ )
-२ [ ज्ञानदेवः याचा एकशेष = ज्ञानः = नाना, नानू ]
नारा [ नारद = नारअ = नारा ] नारा शब्द नारायणाचा एकशेष आहेच. शिवाय नारद शब्दाचा हि अपभ्रंश आहे. नामदेवाच्या एका पुत्राचें नांव नारा होतें.
निवृत्तीनाथ [ निर्वृति beatitude = निवृतीनाथ ]
परसाजी, परसोजी [ परशुरामादित्य = परस (एकशेष ) + जी = परसाजी, परसोजी ] (आदित्य पहा)
पांडुरंग [ पांडुरांग = पांडुरंग ] पांडुरांग असा उच्चार आमजन व देशस्थ कोठें कोठें करतात. (भा. इ. १८३३)
पापा [ पापः (संस्कृत पुरुषनाम) = पापा (पुरुषनाम)] (हें नाम सध्यां बाटलेल्या मुसलमानांत आढळतें )
(भा. इ. १८३४)
पिरी [ प्रीति = पिरइ = पिरी ( स्त्री नाम) ] (भा. इ. १८३३)
पिर्ती [ प्रीति = पिर्ति, पिर्ती (स्त्रीनाम )] (भा.इ. १८३३)
पिर्या १ प्रीतक = पिरअअ =पिरा, पिर्या (पुरुषनाम)] ( भा. इ. १८३३)
-२ [ प्रियः = प्रियू = पिर्यू = पिर्यो = पिर्या (माहाराचें नांव) ]
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चटणी करणें [ चृत् हिंसायां. चर्तनि: = चटणी करणें ] to pound down. तुझी चटणी करून टाकीन shall annihilate you.
चटपट [चाटुपटु = चटपट ] ( भा. इ. १८३६)
चटवंच [ चट् to cheat (चट cheat) + वंच् to cheat = चटवंच ] villain.
चट सारें [ शिष्टं सर्व = चिट सारें = चट सारें ] चट सारें म्हणजे उरलेलें सर्व
चटोर [ चाटुतर = चाटुअर = चाटोर = चटोर ]
चट्टामट्टा [ मंथ्]
चंडोली [ चंडालवल्लिका (चंडालाची वीणा ) = चंडोली ]
चड्ड़ी [ चंडातिका (चंडातक: ) = चंडाइआ = चंड्डी = चड्ड़ी ] अधोरुकं चंडातकं । अर्ध्या मांड्या झांकणारें वस्त्र.
चढणें [ चड् कोपे ] (चिडणें पहा)
चतुरस, चतुरस्र [ चतुरीयस् = चतुरस, चतरस, चतरस्र, चतुरस्र ] चतुरस म्हणजे अधिक चतुर. चतुरस्र हा चतुरस शब्दाचा अपभ्रंश आहे.
चंद्रकोर [ चंद्रकेयूर = चंद्रकोर (अलंकार विशेष) ] (भा. इ. १८३४)
चपट (टा-टी-टें) [ चिपिट flat =चिपट (टा-टी-टें) ] flat.
चपाती [ ( चप्, to grind, परिकल्कने) चप्तिः = चपाती ] चपाती s a cake made of ground corn.
चंबळ [शंबल] (सांबळ पहा)
चंबू १ [शंबूकः= चंबू (गळ्याचा) ]
-२ [ शंबु (शंख) = चंबू] शंखाकृति पात्रविशेष. (भा. इ. १८३६)
चमक [चंक्रमा (वक्रता) = चमक ] पाठींत चमक मारती.
चमकणें १ [ मस्क् १ गतौ. मस्कनं = मचकणें = चमकणें (अक्षरविपर्यय)] आज इकडे कोठं स्वारी चमकली म्हणजे आली. ( धा. सा. श. )
-२ [ (क्रम्) चंक्रम्यते = चकमणें, चँमकणें म्हणजे वारंवार येणें ] (भा. इ. १८३६)
चमचमित [चम् अदने. चंचम्य = चमचमित. चचम्यते = चमचमित. ]
चमचमित अन्न = खाण्यास रुचकर अन्न. (ग्रंथमाला)
चमचा [ चमस = चमच = चमचा (पुलिंग ) ] (भा. इ. १८३२)
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
३ स्मिथ् ज्याप्रमाणें पियदसि या शब्दाचा अर्थ गाफिलपणानें Gracious असा करतो, त्याप्रमाणेंच इतर कित्येक लोक या शब्दाचा अर्थ Seeing bliss, आनंद पाहणारा असा तितक्याच गाफिलपणें करतात. खरा अर्थ असाः- परोक्षप्रियः देवाः । परोक्षं प्रियं येषां ते परोक्षप्रियाः । देवांना परोक्ष हे प्रिय अहे. तें परोक्ष अशोक पहातो. तव्हां तो देवांना जें प्रिय तें पहातो. अर्थात् अशोक देवांना प्रिय असणारच. तेव्हां प्रियदर्शिन् याचा अर्थ Seeing inferentially असा आहे. अशोक हा साध्या प्रत्यक्ष तेवढ्या गोष्टी पाहून राज्य हांकणारा नव्हता. तर परोक्ष अनुमानानें विचक्षणा व अन्वीक्षण करून राज्यकारभार शिताफीनें चालविणारा धुरंधर मुत्सद्दी होता. ही गोष्ट प्रियदर्शिन् या शब्दानें व्यक्त होते. यद्यपि प्रियदर्शिन् या शब्दांत असा खोल अर्थ आहे, तत्रापि अशेकानें हा शब्द आपलें विशेषनाम केलें आहे व प्राचीन संप्रदायाचा बोज राखिला आहे. चाणक्यानें आन्वीक्षिकी विद्येचे मोठे गोडवे गायिले आहेत ते कौटिलीय अर्थशास्त्र या नांवाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांत पहावे.
४ आतां देवानं पिय पियदसि राजा या शब्दांचें भाषांतर करूं. देवांना लाडका जो पियदसि नांवाचा राजाः King पियदसि beloved of the Gods स्मिथचे Sacred and Gracious Majesty हें भाषांतर ह्यापुढें त्याज्य व दुष्ट मानावें हें उचित आहे. (भा. इ. १८३५)
धणबा - धणबा, गणबा, मोरबा हे शब्द संस्कृतांत धनपाल, गणपाल, मयूरपाल असे होते. त्यांचीं प्राकृत रूपें धणबाल, गणबाल, मोरबाल, अशीं झाली. नंतर लचा लेप होऊन धणबा, गणबा, मोरबा अशीं वर्तमान मराठींत (सन १०००-१९०४) बनली. बा प्रत्यय पाल ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. जुन्या जैन नांवांत पाल शब्द बराच आढळतो. (स. मं. शके १८२६)
धनबा [ धनपाल ] ( धणबा पहा)
धनाजी [धनादित्य ] (आदित्य पहा)
धनाबाई [ धनाका (तरुण स्त्री) = धणाआ = धना ] धनाबाई हें नांव मराठ्यांत आहे.
धाकी [ धाकः ] (धाकू पहा)
धाकू [ धाकोSनड्वान् (उणादि ३२७) हें नांव शूद्रांत फार आहे. धाकः = धाका (की-कें), धाक्या. ममतादर्शक धाकू ] (भा. इ. १८३३)
धक्या [ धकः ] ( धाकू पहा )
धांदलभट [ स्थांडिल्यभट्टः = धांदिलभट = धांदलभट ] स्थांडिल्यभट्ट: म्हणजे स्थांडिलावर निजणारा तपस्वी. कांहीं नैसार्गिक कामाकरितां बाहेर गेला असतां व्रतार्थ स्थंडिलाकड़े परत येण्याची जो घाई करतो तो.
धोंडभट [ ढुंढि ] (धोंडी पहा)
धोंडी [ ढुंढि (गणपति) = धोंडी, धोंडभट, धोंडोपंत (भा. इ. १८३३)
धोंडोपंत [ढुंढि ] ( धोंडी पहा)
नवु [ नर्मदे ] ( दासींचीं नांवें पहा)
नरश्या [ नृशंसः = नरश्या ] क्रूर, पापी.
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
स्मिथनें Sacred हा अर्थ कित्येक यूरोपीयन राजांच्या बिरुदावळीच्या उपमानांवरून काढिलेला आहे. इंग्लंडचे राजे आपणास धर्माचे व संस्थानाचे मुख्य समजतात व स्वतःस Sacred, High, Gracious वगैरे बिरुदें लावितात. तोच प्रकार अशोकानें केला असावा, असें स्मिथला वाटलें इतकेंच. परंतु स्मिथनें एकच गोष्ट ध्यानांत घ्यावयाची होती, ती ही कीं, इंग्लडांतल्याप्रमाणें भारतवर्षात धर्माचें आदिस्थान राजाच्या ठायीं कधीं हि व कोणीं हि मानिलेलें नाहीं. धर्माचें आदिस्थान भारतवर्षात फार पुरातन कालापासून वेदादिग्रंथांच्या व त्यांचा आशय सांगणार्या धर्मगुरूंच्या ठायीं अधिष्ठापिलेलें आहे. इंग्लंडांतल्याप्रमाणें भारतवर्षांत धर्म हा राजाचा अंकित नाही; राजा धर्माचा अंकित आहे. भारतवर्षांत वस्तुतः राज्य कोणाचें ? तर धर्माचें. मोठमोठ्या राजांच्या व महान् महान् महंताच्या अशा उक्ती आहेत कीं, भारतवर्षात धर्मराज्य आहे. या धर्मराज्याचीं, पुरोहित, राजा, अमात्य, दुर्ग, बल, कोश वगैरे अंगें आहेत. म्हणजे भारतवर्षात राजा हा धर्मराज्याचें एक अंग आहे. इंग्लंडांतल्याप्रमाणें धर्माच्या वरती अधिकार करणारा नाहीं. तेव्हां, स्मिथ् म्हणतो त्या अर्थानें Sacred हें विशेषण अशोक आपणा स्वतःला खुळ्यासारखा लावील, हें बिलकुल संभवत नाहीं. आपण देवांचे किंवा देवांना लाडके आहोंत, असें अशोक स्पष्ट म्हणतो. ह्या [ १० म्हणण्याचा आशय काय ? इतर माणसें काय देवांचीं लाडकीं नाहींत कीं अशोकानेंच तेवढी आपल्या लाडकेपणाची फुशारकी मिरवावी ? तर तसें नाहीं. अशी फुशारकी अशोक मिरवीत नाहीं. अशोक एका वैदिक संप्रदायाला अनुसरून हे शब्द वापरीत आहे. भारतीय आर्यकुलांत फार पुरातन कालापासून असा एक संप्रदाय आहे कीं, आपलें पाळण्यांतील खरें नांव कोण्या हि आर्यानें प्रकट करूं नये; एखाद्या टोपण नांवानें आपली प्रथा करावी किंवा निदान मूळ नांवांत थोडा तरी फेरबदल करून मग तें प्रकट करावें. ह्याविषयीं सूत्रांतून स्पष्ट उल्लेख आहेत व हिंदुस्थानांत हा संप्रदाय अद्याप हि विद्यमान आहे. ऐतरेयोपनिपदाच्या तृतीय खंडाच्या शेवटीं ह्या पुरातन संप्रदायाचें एक नामांकित उदाहरणा दिलें आहे. त्याला ब्रह्म दिसलें. तेव्हां इदं अदर्शम् असे उद्गार दानें काढिले. हा उद्गारांवरून त्याचें नांव इदंद्र असें पडलें. त्या इदंद्राला परोक्षत्वानें सर्व देव इंद्र असें म्हणूं लागले. कां कीं, देव परोक्षप्रिय आहेत. प्रत्यक्ष जें इदंद्र हें अक्षरत्रयात्मक नांव तें परोक्षप्रिय देवांना आवडलें नहीं, एतदर्थ त्यांनीं इंद्र हें अक्षरद्वयात्मक परोक्ष नांव पसंत केलें. " तं इदंद्रं सन्तं इंद्र इति आचक्षते परोक्षेण, परोक्षप्रिया इव हि देवाः ।” ह्यांत, देव हे परोक्षप्रिय आहेत, ही गोष्ट प्रामुख्यानें लक्ष्यांत ठेवावयाची आहे. पशू जे आहेत तें प्रत्यक्षप्रिय असतात. म्हणजे इंद्रियांना जें सहज गोचर होईल तें पशूंना किंवा पशुतुल्य द्विपादांना पसंत किंवा प्रिय होतें. परंतु जे देव आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांना परोक्ष जें अनुमानादिप्रमाणजन्य ज्ञान तें प्रिय असतें. असे जे परोक्षप्रिय देव त्यांनीं इदंद्र हें जें प्रत्यक्ष नांव त्यांत फेरबदल करून इंद्र असें परोक्ष नामाभिधान पसंत केलें, आतां अशोकाच्या शिलाशासनांतील देवानं प्रिय पियदसी राजा या शब्दांत हा पुरातन संप्रदाय कसा प्रतीत होतो तें पहा. अशोकाचें मूळ पाळण्यांतील नांव अशोक. हें प्रत्यक्ष नांव स्वत: उच्चारणें किंवा योजणें पुरातन संप्रदायाच्या विरुद्ध. सबब, पियदसि ह्या परोक्ष नांवाचा अशोकानें उपयोग केला आहे. उपयोग करतांना असा परोक्ष नांवाचा उपयोग कां केला तें हि अशोक देवानंपिय ह्या शब्दांनीं व्यंजीत आहे. देवानां म्हणजे 'परोक्षप्रियाणां प्रियः अहं, असे अशोक व्यंजीत अहे. परोक्षप्रिय जे देव त्यांचा प्रिय जो परोक्ष नांवानें प्रथित पियदसि राजा तो असा हुकूम करतो इ. इ. इ. शिलाशासनांत अशोक असें नांव अशोकानें कोठे हि कोरवलेलें नाहीं; पियदसि हें परोक्ष नांव च तो स्वतः सदा योजीत असे. कारण, तसा संप्रदाय भारतवर्षांत फार प्राचीन काळापासून होता. तात्पर्य, प्रियदर्शिन्, पियदसी, हें अशोकाचें परोक्ष नांव आहे. स्मिथ् म्हणतो त्याप्रमाणें पियदसि ह्या शब्दाचा अर्थ gracious असा नाहीं. मूळीं हें विशेषण नाहीं. हें विशेषनाम आहे. दीपवंशांत अशोकाला पियदसि ह्या च नांवानें उल्लेखिलेलें आहे. दीपवंशांत असा प्रयोग व प्रकार झालला आहे, हें हि स्मिथ् विसरला आहे व अज्ञानानें gracious असें भाषान्तर करता झाला आहे.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
चंची [ चंच (पांच बोटें रुंदीचें माप) भर लांब पिशवी] चंची (स्त्रीलिंग ) (भा. इ. १८३२)
चच्चा [ चंचा (a straw-man, an effigy in straw ) = चच्या ] मूल अति च चिमुकलें जन्मलें म्हणजे त्याला मराठींत चच्या म्हणतात.
चट १ [ चटु (स्तुति) = चट ] (भा. इ. १८३६)
-२ [ चटु (प्रिये निपातः ) = चट ] चट काम करतो म्हणजे आनंदानें काम करितो. (भा. इ. १८३४)
चटकर-चटकर, चटकन्, चटदिनि,
खटकन्, खटदिनि,
झटकर-रि झटकन्, झटदिनि,
सटकन्, सटदिनि,
कटकन्, कटदिनि,
ताडकन्, ताडदिनि,
भाडकन्, भाडदिनि,
पटकन्-र, पटदिनि,
मटकन्, मटदिनि,
फटकन्, फटदिनि,
लटकन्, लटदिनि,
गटकन्, गटदिनि,
थाडकन्, थाडदिनि,
हटकन्, हटदिनि.
न्यधादुत्क्षिप्य समरभटं चटदिति क्षितौ ॥ ५२ ॥
कथासरित्सागर-तरंग ७४-निर्णयसागर
चट्कृत्वा = चट्करूनु = चटकन्
चट्कृत्य = चटकरि, चटकर
चटदिति = चटदिनि
त चा न झाला आहे.
करि, कर, करून, कन्, ( कुन असें पूर्वीचें मधलें रूप ). ( भा. इ. १८३२ )
चटका [ चटका, ( तिखट, मिरें, मिरची ) = चटका ] चटका, तिखट म्हणजे मिर्याचें किंवा मिरचीचें तिखट. (भा. इ. १८३६)
चटणी १ [ चट् (फोडणें ) पासून चटनं, चटणी = चटणी ] चटणी म्हणजे कोणचाही पदार्थ फोडून बारीक केलेला तिखटमिठाचा पदार्थ. (भा. इ. १८३६)
-२ [ चर्तनिः = चटणी. चृत् हिंसायां । ] वाघानें करडाची चटणी उडवली म्हणजे हिंसा केली.
व्यक्तिनामव्युत्पत्तिकोश
(१) खेळणें व (२) प्रकाशणें. पैकीं, खेलनार्थक दिव् पासून निघालेल्या देव शब्दाचा अर्थ जुगारी असा होतो; व प्रकाशनार्थक दिव् पासून निघालेल्या देव शब्दाचा अर्थ निर्जर असा होतो. पहिल्या पक्षीं देवानांप्रिय या सामासिक शब्दाचा अर्थ जुगार्यांचा लाडका, अतएव निंद्य, मूर्ख असा निंदार्थक होतो; व दुसर्या पक्षी अमरांचा लाडका, अतएव पूज्य असा स्तुत्यर्थक अर्थ होतो. दोन्ही अर्थ अशोकाच्या काली प्रचलित होते, हें उघड आहे. स्तुत्यर्थानें यद्यपि कोणीं देवानांप्रिय हा सामासिक शब्द आपल्याला लावून घेतला, तत्रापि ऐकणार्याच्या मनांत त्या समासाचा मूर्ख हा अर्थ निंदार्थ उठण्यासारखा आहे. तेव्हां हा व्द्यर्थक सामासिक शब्द अशोकानें आपल्याला लावून घेतला असेल, असें मानण्याकडे प्रवृत्ति होत नाहीं. कित्येकांचे असें म्हणणें आहे कीं, देवानांप्रिय ह्या शब्दाचा लाक्षणिक अर्थ मूर्ख असा अशोकाच्या नंतर झाला, अशोकाच्या काळीं त्याचा देवप्रिय हा एकच वाच्यार्थ होता. पतंजलि, शंकराचार्य व वाण यांनीं देवानांप्रिय हा सामासिक शब्द स्तुत्यर्थक योजिलेला आहे, तेव्हां अशोकानें हि तो स्तुत्यर्थकच योजलेला आहे, असें हि कित्येकांचें म्हणणें आहे. ह्या म्हणण्यानें देवानांप्रिय ह्या शब्दाच्या मी दाखविलेल्या व्द्यर्थत्वाला कोणत्या हि प्रकारचा बांध येतो असें दिसत नाही. अशोक पतंजलि, बाण यांनीं प्रकाशनार्थक दिव् धातूपासून निघालेला स्तुत्यर्थक देवानांप्रिय समास योजिला असेल व प्रकरणानुरोधानें ऐकणार्याच्या किंवा वाचणार्याच्या मनांत स्तुत्यर्थ संदर्भानें उद्भवूं हि शकेल. परंतु निंदार्थ अगदीं उद्भवूं शकणार नाहीं, असें नाहीं. पतंजलि, शंकराचार्य व बाण ह्यांनीं हा शब्द संदर्भानुरोधानें स्तुत्यर्थक योजिला असल्यामुळे, त्यांची गोष्ट सोडून देऊं. अशोकानें प्रौढीनें व सद्भावानें हें विशेषण आपल्याला लावून घेतलेलें आहे; तेव्हां वाचणूच्याच्या किंवा ऐकणार्याच्या मनांत देवप्रियतेच्या बरोबर मूखेत्त्वाचा हि अर्थ उठण्यासारखा आहे. विशेषतः वाचक किंवा श्रोता जर विरोधिपक्षाचा किंवा थट्टेखोर स्वभावाचा असेल, तर दोन्ही अर्थ त्याच्या मनांत उद्भवून, त्याच्या मुखावर हास्याची छटा तेव्हांच उमटेल. प्रत्यन्तरार्थ एक उदाहरण देऊं, समजा कीं, भगवान् बुद्धानें आपल्याला सिद्धार्थ हें नांव घेतलें व तें सद्भावानें घेतलें. निरनिराळ्या श्रोत्यांच्या मनावर ह्या शब्दाच्या श्रवणानें काय भावना उमटतील तें पहा. श्रोता जर बुद्धानुयायी असेल, तर सिद्धार्थ शब्दानें चारी अर्थ ज्याचे सिद्ध झाले आहेत अशा थोर पुरुषाची कल्पना त्याच्या मनांत उभी राहील. परंतु, श्रोता जर बुद्धविरोधी असेल, तर सिद्धार्थ म्हणजे फोडणी देण्याची मोहरी असा अर्थ करून, तो चार थट्टेखोर लोकांत बरा च हंशा पिकवील. असा हंशा उत्पन्न होऊं नये म्हणून च कीं काय, अमरसिंहानें बुद्धाच्या नाममालिकेंत सिद्धार्थ हा शब्द न घालतां, त्याचा पर्याय शब्द जो सर्वार्थसिद्ध तो घातला आहे. सिद्धार्थो मत्स्यं चखाद, हैं वाक्य ऐकून, ( १ ) बुद्धानें मासा खाल्ला हा अर्थ जसा भाविकाच्या मनांत उद्भवेल, तसा च ( २) मोहरीनें मासा खाल्ला, हा अर्थ विरोधी थट्टेखोराच्या मनांत उद्भवेल. ग्रंथांतून सिद्धार्थ शब्द येतो, परंतु व्द्यर्थत्वानें तो थट्टेस पात्र होईल, हें त्या ग्रंथकाराच्या ध्यानांत यद्यपि आलें नाहीं, तत्रापि तें अमरसिंहाच्या ध्यानांत आलें व त्यानें तो शब्द मुद्दाम गाळला, असें मला वाटतें. तो च प्रकार अशोकाचा कां न व्हावा ? प्रायः झाला असावा; व त्यानें देवानांप्रिय हा शब्द सामासिकभावनेनें योजिलेला नसावा, व्यस्तभावनेनें योजिलेला असावा.
२ वरील पृथक्करणानें एवढें निश्चित झालें कीं देवानंपिय असा समास धरून अर्थ नीट बसत नाहीं, संशयाला जागा रहाते. तेव्हां व्यस्त पदें धरून काय अर्थ निष्पन्न होतो तें पाहूं. दे वा नं पि या ह्या एकापुढें एक येणार्या पांच अक्षरांचे असे दोन भाग पाडले असतां, दोन अर्थ निप्पन्न होतात. देवानां प्रिय: हा एक अर्थ व देवेभ्यः प्रियः हा दुसरा अर्थ. प्राकृतांत चतुर्थीचें काम षष्ठी करते. देवानांप्रिय म्हणजे देवांचा लाडका व देवेभ्यः प्रिय: म्हणजे देवांना लाडका. दोन्ही विभक्ती घेतल्या तरी मतलब एकच. देवानां प्रियः म्हणजे liked of the gods व देवभ्यः प्रियः म्हणजे dear to the gods. ह्या दोन्ही अर्थातून व्हिन्सेन्ट स्मिथचा Sacred हा अर्थ वाटेल तितकी ओढाताण केली तत्रापि निघत नाही. आपल्या Early History of India, २nd. Ed. P. १६६-Note मध्यें स्मिथ् येणें प्रमाणें लिहितो :- " His Sacred and Gracious Majesty" is a fair equivalent of देवानंपिय पियदसि which words formed an official title and cannot be rendered faithfully by etymological analysis.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
च
च १ - त्याचें च काम झालें = तस्यैव कर्म जातं ।
त्याचें काम च झालें = तस्य कर्मैव जातं ।
त्याचें काम झालें च = तस्य मेव कर्म जातमेव ।
बरें च काम झालें = वर मेव कर्म अभूत् ।
असें च झालें पाहिजे = ईदृशमेव वृत्तं पार्थ्यते ।
महाराष्ट्रींत संस्कृत एव बद्दल च्चिय आदेश होती. च्चिअ = चि = च एव निश्चयार्थे । हा महाराष्ट्री च्चिय निपात वैदिक चित् पासून निघाला आहे हें स्पष्ट आहे. प्राकृत वैय्याकरण एव बद्दल च्चिअ आदेश होतो, असें जें म्हणतात, त्या ऐवजीं एव बद्दल वैदिक च्चिअ पासून निघालेला च्चिअ निपात महाराष्ट्रींत योजतात, असें सांगते तर तें शास्त्रशुद्ध झालें असतें.
(भा. इ. १८३३. बरेंच, असेंच इ. इ. इ. शब्द)
-२ [ त्यत् = च्चअ = च (चा-ची-चें ) ] चां-च या सर्वनामाची सप्तमी एकवचन. ( ज्ञा. अ. ९ )
चकण (णा-णी-पें) [ चक्षुष्काण = चक्कआण = चक्काण = चकण ( णा-णी-णें ) ] (भा. इ. १८३२)
चकणा [ चक्षुष्काणः ( चक्षुषा काणः ) = चकणा ]
चकती [ चक्रवृत्तं-चक्रवर्तिका = चकोती = चकती ] वाटोळी पट्टी.
चकली १ [ चष = चख = चक. चक + ली = चकली चष् चाखणें ] चकली हें एक रुचकर पक्वान्न आहे.
-२ [ (चक्कल) चक्रल = चकली ] a round eatable.
-३ [ शष्कुलि = चख्खुलि = चखली = चकली ] एका प्रकारचें पक्वान्न. ( भा. इ. १८३६ )
-४ [शष्कुली = चकुली = चकली ] शष्कुली म्हणून एक पक्वान्न होतें.
चकवा [ चक्रवाकः = चक्कवाअ = चकवा ]
चकाकणें [ चकास्ट दीप्तौ ] (ग्रंथमाला)
चकाटणें [ ( कथ्) चाकथ्यते = चाकटणें, चकाटणें ] ( भा. इ. १८३६)
चकाट्या १ [ कत्थ् १ श्लाघायाम्, चाकत्थ्य = चकाट ] ( धातुकोश-चाकाट २ पहा)
-२ [ चक्राट (लुच्चा, सोदा) = चकाट ] ( भा. इ. १८३२ )
चकारी १ [ चक्रांगी ( दीनार नाणें ) = चकारी ]
भिक्षुकाला एक चकारी मिळाली म्हणजे एक दीनार मिळाला. दीनार ज्या वेळीं प्रचारांत होते त्या कालापासून चकारी हा शब्द भिक्षुक व सराफ यांच्यांत प्रचलित झाला.
-२ [ चक्राट (दीनार रुप्याचा ) चक्राटिका = चकारी ] चकारी दक्षिणा मिळाली म्हणजे एक रुप्याचा दीनार बक्षीस मिळाला, सध्या चवली.
चक्क १ [ चक्क् दुःखे ] चक्क फिरले ( डोळे) इंगा फिरला म्हणजे. ( धा. सा. श. )
-२ [ प्रत्यक्ष = फार चक्क = फार चक्क = चक्क ] प्रत्यक्षं व्रूते म्हणजे चक्क बोलतो. चक्क म्हणजे डोळ्यासमोर. ( भा. इ. १८३४)
चक्का [ चाषकिकं दधि = चक्का दहीं ] चषक म्हणजे लहान पेल्यांत घट्ट विरजलेलें दही.
चखाळ [ खल् १ संचये. चाखल्य = चखाळ, चोखाळ ] ( धा. सा. श. )
चंग [ संगः = चंग ( कंवर बांधणें ) स = च ]
चंगळ [ चंगलता = चंगळ, चंगळाई ]
चंगळ म्हणजे श्रेष्ठपणा, चांगलेपणा, सुकाळ.
चघळणें १ [(गृ) जिगल् (सन्नत) = चिघल = चघळ (णें) गृ (गिळणें) ] (भा. इ. १८३३)
-२ (गृ) जीगीर्यते =जिगिळणें = चिघिळणें = चघळणें ] (भा. इ १८३६)