सु ॥ सबा अशरीन मया व अलफ, सन ११३६
फसली, अवलसाल छ ३ माहे सवाल. २४ मे
१७२६, ज्येष्ठ शुध्द ४ शके १६४८.
श्रीपतराव प्रतिनिधि यास सवाल (मे १७२६) महिन्यांत पुत्र झाला. छ ८ मोहरम रोजी (२६ आगस्ट १७२६) साताऱ्याहून श्रीमंताची स्वारी पुण्यास दाखल झाली. व पुन्हा छ १२ माहे म॥ (३० आगष्ट १७२६) स्वारीस निघाले. खंडेराव बल्लाळ चिटणीस आश्विन शु ॥ ५ स (२१ सप्टेंबर १७२६) वारले. पुत्र १ जिवाजी, १ बापूजी, १ गोविंदराव, १ बहिरराव याप्रमाणे असोन वडील जिवाजी खंडेराव यास चिटनिशीची वस्त्रें झाली. दावळजी वाळके यास ममलकतमदार ह्मणोन किताब दिल्हा छ १५ रविलावल (३० अक्टोबर १७२६) रोजी.
सु ॥ समान अशरीन मया व अलफ, सन ११३७
फसली, अवल साल छ १४ माहे सवाल. २५ मे
१७२७, ज्येष्ठ वद्य १ शके १६४९.
छ ३० सवाल रोजी (५ जून १७२७) श्रीमंत सासवडास होते. छ २६ जिलकाद रोजी (४ जुलै १७२७) सासवडास साताऱ्याहून आले. निजाम यांनी आपले हैदराबाद राजधानीत चौथाई मराठे घेतात, त्या ऐवजी दुसरें उत्पन्न कांही देऊन मराठे यांचे येणे जाणें या मुलखी बंद करावे, असे मनांत आणून प्रतिनिधि याचे विद्यमाने शाहू महाराज याशीं बोलणे करून कांही द्रव्य व इंदापुराजवळ काही मुलूख मराठयांस द्यावा व प्रतिनिधि यासही व-हाड प्रांतांत कांही जहागीर करून दिल्ही. हें वर्तमान बाजीराव यास कळताच त्यास राग आला.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)