Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

शिवाजी व शिवाजीचें मंत्रीमंडळ राजसत्तेचें स्वरूप धारण करून बसलें होतें. येणेंप्रमाणें शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत शिवाजीचें राज्य विशिष्ट देशावांचून व बाह्यतः विशिष्ट प्रजेवांचून अस्तित्वांत येत होतें. शिवाजीच्या मनांत सामान्यतः देशमुखांविषयीं जी अढी कायमची बसली तिचें कारण मावळच्या देशमुखांचे व देशपांड्यांचे व शिवाजीचें ह्या वेळचें दळणवळण होय. देशमुखांच्या सत्तेचा मुख्य उगम विजापूरच्या पातशहाच्या सत्तेंत असल्यामुळें, शिवाजीसारख्या नव्या राजपुरुषाला त्यांनीं अडथळा करावा हें योग्यच होतें. पुण्यापासून दहा वीस कोसांच्या आंत जेवढे म्हणून देशमुख होते, तेवढे प्रथम पादाक्रांत करणें शिवाजीला अवश्य झालें. कां की पातशाही सत्तेचे अगदी शेवटले असे सामर्थ्यवान् प्रतिनिधी म्हटले म्हणजे हे देशमुखच होते. तेव्हां प्रथम नवीन राज्य स्थापित करण्याच्या अवाढव्य कामीं मावळच्या देशमुखांचीं व्यवस्था लावणें शिवाजीला भाग पडलें तें रास्तच होतें. कोणत्या देशमुखाला शिवाजीनें केव्हां दस्त केलें किंवा बांधून घेतलें हें सांगतां येण्यास अद्याप काहींच आधार सांपडलेला नाहीं. इतकें मात्र खास आहे कीं, शके १५६० पासून पुढें पाच सहा वर्षे हा उपक्रम चालला होता. मावळांतील देशमुखांना दस्त करण्याचें कृत्य शके १५६८ त संपूर्ण झालें असावें. निश्चयानें ह्याच वर्षाच्या सुमारास झालें असें मात्र विधान करण्यास कांहीच विश्वसनीय आधार नाहीं. ग्रांट डफ कोणत्या तरी बखरीच्या आधारावर शके १५६८ त शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला असें लिहितो, त्या अर्थी देशमुखांना दस्त करण्याचें काम शिवाजीनें शके १५६८ च्या सुमारास कदाचित् संपविलें असावें असें मीं संदिग्ध विधान केले आहे. शके १५६८ त शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला हें विधान कोणत्या विशिष्ट बखरीच्या आधारावर आपण करतों ह्याचा खुलासा ग्रांट डफनें केला नाहीं. मला उपलब्ध असलेल्या कोणत्याहि बखरींत तोरणा किल्ला घेतल्याचा शक किंवा फारशी सन दिलेला नाहीं. यद्यपि ग्रांट डफच्या जवळ असलेल्या बखरींत हा शक किंवा सन दिलेला असला तरी तो इतर अस्सल प्रमाणांच्या अभावीं खरा कां धरावा हा माझा ग्रांट डफच्या लिहिण्यावर आक्षेप आहे. येथें बहिः प्रमाणांच्या अभावीं बखरींतील शक किंवा सन कोणत्या रूपानें दिला असल्यास विश्वसनीय मानावा, ह्यासंबंधीं विचार करणे योग्य दिसतें. बखरींतून एखाद्या प्रसंगाचा नुसता सन किंवा शक दिलेला असेल तर तो शक किंवा सन खरा धरून चालणें प्रायः उपयोगाचे नाहीं. सन आणि शक दिला असेल तर तो काल त्या प्रसंगाचा बव्हंशीं खरा मानावा. सन किंवा शक, अथवा सन आणि शक देऊन शिवाय तिथी किंवा चंद्र अथवा तिथी आणि चंद्र, दिला असला तर ती मित्ती बिनहरकत खरी मानावी. वरच्या सर्व बाबी देऊन, शिवाय वारहि दिला असेल तर ती मित्ती हटकून खरी आहे असें धरून खुशाल चालावें. हा विचार बखरींतील सन व शक ह्यासंबंधीं झाला. महजरांतील साक्षींत नुसता सन किंवा नुसता शक दिला असल्यास तो विश्वसनीय धरावा लागतो. महजरांचा उल्लेख ह्या स्थलीं करण्याचें कारण असें की, सतराव्या व सोळाव्या शतकांतील अनेक प्रसंगांच्या कालाचा निर्णय त्या वेळच्या महजरांतून दिलेल्या साक्षींतील मजकुरावरूनच प्रायः व्हावयाचा आहे, असा कित्येक महजर पाहून माझा ठाम ग्रह झालेला आहे. सतराव्या शतकांतील इतिहासासंबंधी बखरींतील मजकुराच्या हकीकतीची व कालाची विश्वसनीयता ताडून पहाण्यास जीं बहिःप्रमाणें आणावीं लागतात, त्यांत ह्या महजरांची मातब्बरी विशेष आहे. अठराव्या शतकांतील इतिहासाची निश्चितता ठरविण्यास जे सहाय्य अस्सल पत्रांचें होत असतांना आपण पहात आहों तेंच सहाय्य सतराव्या व सोळाव्या शतकांतील इतिहासाला अस्सल पत्रांच्या अभावीं ह्या महजरांतील मजकुरापासून अंशतः होणार आहे. आतां तोरणा किल्ला घेतल्याचें साल ग्रांट डफनें वरीलप्रमाणें लावून ठरविलेलें आहे असें दिसत नाहीं; व ह्याच कारणाकरितां तें मी खरें मानीत नाहीं. बाकी दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूच्या अगोदर तोरणा किल्ला घेतला गेला असावा, हें निश्चित आहे. परंतु तोरणां अगोदर घेतला किंवा रायगड अगोदर बांधला हें पहाण्यासारखें आहे.

याशिवाय साहोत्रा व नाडगौकी हे हक्क राजाचे होते, त्यापैकीं साहोत्रा पंतसचिव यास दिल्हा, नाडगौकी दुसरे कोणास दिल्ही. आता चौथाई, मोकास वगैरे वजा होऊन बाकी राहिले यांत फौजदारी एक हिस्सा फौजदाराचा हक्क, बाकी दोन हिस्से पातशाही हक्क तो सरकारचा असें ठरविलें. तो जहागीर अंमल असे पुढें ह्मणू लागले. पुरंधर किल्यावर पंतसचिव याजकडून बापूजी श्रीपत होते, त्यांस पुण्याचे कारभारावर ठेविले. संताजी भोसला दिल्लीवर ठार झाला. तो परसोजी भोसला याचा दासीपुत्र होता. छ २३ साबान रोजी पुत्र बाजीराव सुध्दा साता-यास निघाले. (३० जून १७१९) छ ७ रबिलाखर मुक्काम यमुना दक्षिणतीरास होता. (१६ फेब्रुवारी १७१९). 

                                                         श्री.                   (११ आक्टोबर १७१८)

 
म॥ अनाम देशमुख व देशपांडे प्रांत पुणें यांसी :- 
बाळाजी पंडित प्रधान. सु॥ तिसा अयर मया व अलफ. दिल्हें अभयपत्र ऐसाजे :-
तुह्मी हुजूर येऊन विदित केलें की, दुतर्फा दिवाणाचे कसालियाकरितां तमाम मुलूख खराब पडला. तो आबाद करावयाविषयी आज्ञा केली. त्यास तुह्मी अर्ज केला की, पूर्वी मोंगलाचे धामधुमीमुळे मुलूख पडला. अलीकडे थोरात, ढमढेरे, निंबाळकर व किरकोळ यांचे धामधुमीमुळे मुलुखाचा सत्यानाश जहाला. रयत देशांतरास गेली. मुलखात काठवण झालें. याउपरि साहेबी मोंगलाचा तह केला. ते प्रसंगी प्रांत मजकूर स्वराज्यात घेतला. मुलूख महामूर करावयासी आज्ञा केली. तरी सात साला इस्ताव लागले ढेपेस उगवणी असा कौल दिल्हा. रयत देशांतरास गेली तेथे कौल पाठवून रयत आणवून गावांवर वसाहत करूं ह्मणून अर्ज केला. बराय अर्ज खातरेस आणवून, महामुरीवर नजर देऊन सात साला लागले ढेपेस इस्ताव कौल दिल्हा असे. तरी तुह्मीं रयतेचा दिलदिलासा करून, मुलूख महामूर करणें आणि लागले ढेपेस सात साला तनखा उगवणें, बाबती देखील. जास्ती आकार लागणार नाहीं. अभय असें. जाणिजे. छ १७ जिल्हेज. आज्ञा प्रमाण. लेखन सीमा. सुरू रुद्र. चवथे वेळेस शिक्का.

                                                        श्री.
अजहत देशमुख बाळाजी गणेश                                  शाहू नरपति हर्षिनिधान
धडफळे यांजवळ अस्सस असे.                 }                बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान. 

हीं बारा मावळें म्हणजे उत्तरेस राजमाची व चाकण ह्या स्थानांपासून दक्षणेस रायरेश्वराचा डोंगर, अंबेडखिंड खांबटकीचा घाट, ह्या स्थानांपर्यंतचा मुलूख होय. ह्या मुलखापैकीं राजमाचीचा किल्ला कल्याणभिवंडीं येथील मुलाणा अहमदाकडे होता; लोहगडावरून बिलाल हपशी अंदर, नाणें व पवन ह्या मावळांचा बंदोबस्त ठेवी; चाकण किल्ला फिरंगोजी नरसाळ्याकडे होता; घोटणमावळ, पौडखोरें मोसेमावळ व मुठेंमावळ त्या त्या देमुखांच्या ताब्यांत होतीं, गुंजणमावळ तोरण्यावरील किल्लेदाराच्या देखरेखीखालीं होतें; वेळवंड व भोर हीं तेथील देशमुखांच्या अधिकारांत होती; हिरडसमावळांत बांदल देशमुख नांदत होते; व शिवतरखोरें बाबाजी कोंडदेवाच्या ताब्यांत होतें. (चित्रगुप्त ५). मावळांच्या पूर्वेकडील मुलुखांत पुणें व सिंहगड दादोजी कोंडदेवाकडे होतें; पुरंदर किल्ला निळो निळकंठ नाइकवाडी यांच्या ताब्यांत होता व सुपें प्रांतावर शहाजीचा मेहुणा संभाजी मोहिता होता. येणेंप्रमाणें शके १५६० च्या सुमारास राजमाची, लोहगड, चाकण, पुरंदर, तोरणा व रोहिडा ह्या किल्ल्यांच्या मध्यें पुणें प्रांतांत शिवाजीची स्थापना झाली होती. पुणें प्रांताची हद्द उत्तरेस इंद्रायणी, दक्षिणेस बनेश्वर, कापूरहोळ, व पाद्माघाट, पूर्वेस सुपें प्रांत व पश्चिमेस लोहगड व तुंग तिकोना अशी होती. ह्या लहानशा मध्य प्रांतांत राहून शिवाजीला, अथवा खरें म्हटलें असतां, त्याच्या मुत्सद्यांना बाहेरच्या लगत्याच्या प्रांतांत आपला अंमल बसवावयाचा व पसरावयाचा होता. ह्या खटपटीचा उपक्रम शके १५६० पासून शके १५६८ पर्यंतच्या अवधीत बारा मावळांतील देशमुखांना दस्त करून व बांधून ह्या मुत्सद्यांनीं केला. हा उपक्रम चालू असतांना शिवाजीच्या मुत्सद्यांनीं शहाजीच्या जहागिरींत दोन प्रकारची राज्यव्यवस्था ठेविली होती असें म्हणण्यास आधार आहे. विजापूरच्या पातशाहीखाली शहाजीची जहागीर असल्यामुळें सदर जहागिरींत अंमलदार लोक शिवाजीच्या मुत्सद्यांनी निराळे ठेविले व शिवाजीच्या नांवाने नवीन उपस्थित केलेल्या सत्तेच्या दिमतीनें अधिकार मिळालेले अंमलदार निराळे ठेविलें. म्हणजे पुणें प्रांतांतील सुभेदार, काजी, मुजुमदार, हवालदार, मोकदम वगैरे पातशाही अंमलदार अगदीं भिन्न असून, नवीन राज्य संपादण्याच्या कामीं मेहनत करणारे मुजुमदार, सबनीस. डबीर, पेशवे वगैरे अधिकारीहि भिन्न होते. काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दादोजी कोंडदेवाचा एक महजर माझ्याजवळ आहे. हा महजर शके १५६८ व्ययनाम संवत्सरे सु।। सबा आबैन व अलफ छ २५ रबिलाखर म्हणजे ज्येष्ठ व॥ १२ स लिहिलेला आहे. सदर मितीस भरलेल्या पुणें येथील हुजूर हजीर मजालसींत खालील पातशाही अम्मलदार होतेः- १ काजी अबदुला बिन काजी इस्मायल नख काजी, प्रांत पुणें; २ राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार नामजाद, किल्ले कोंढाणा, महालनिहाय, प्रांत पुणें; ३ गोमाजी हवालदार, प्रांत पुणें; ४ नारो सुंदर मुजुमदार, प्रांत पुणें; ५ म्हालोजी झांबरा, मोकदम कसबे पुणें; ६ मालोजी नरसिंगराव व विठाजी नाईक शितोळे देशमुख, प्रांत पुणें. शहाजीचा मुख्य प्रधान अथवा सुभेदार दादोजी कोंडदेव होता; शिवाजीचा मुख्य प्रधान शामराव नीळकंठ होता. शहाजीचा मुजुमदार नारो सुंदर होता; शिवाजीचें बाळकृष्णपंत व निळो सोनदेव हे होते. शहाजीचा म्हणजे पातशहाच्या तर्फेचा हवालदार म्हणजे प्रांतांतील सैन्याचा अधिकारी गोमाजी होता; शिवाजीचा सेनापती खुद्द शिवाजीच होता, स्वतंत्र असा कोणीच अद्याप नव्हता. येणेंप्रमाणें पातशहाचें व शिवाजीचें अधिकारी अगदीं निरनिराळे होते. पातशाही सुभेदार दादोजी कोंडदेव ह्याचा संबंध शिवाजीच्या नवीन राज्यव्यवस्थेशीं वरकरणी बिलकुल नव्हता. बाकी अंतस्थ रीतीनें शिवाजीच्या नवीन राज्याची उभारणी पुणें प्रांतांत दादोजीच करीत असला पाहिजे हें उघड आहे. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या ह्या नवीन राज्याचें स्वरूप विचार करण्यासारखें आहे. राज्याचें लक्षण म्हटलें म्हणजे त्याला विशिष्ट देश, विशिष्ट प्रजा व विशिष्ट राजा अशीं तीन अंगे अवश्य हवीं. परंतु शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या शिवाजीच्या राज्याला पहिलीं दोन अंगे मुळींच नव्हती. चाकणापासून रोहिड्यापर्यंतच्या देशमुखांना शिवाजींनें बांधून घेतलें होतें. खरें; परंतु त्या प्रदेशांतील एक हातभरहि जागा पातशहाची नसून केवळ शिवाजीची अशी म्हणण्यासारखी नव्हती. शिवाजीची सत्ता देशमुखांच्या हृदयांत दहशतीच्या रूपानें व देशमुखांच्या प्रजेच्या मनांत प्रीतीच्या रूपानें वसत होती.

तोफा मोंगलाईत येतील त्याची चौथाई घ्यावी. चौथाई वगैरे स्वराज्य अंमलाबद्दल फरमान कान्होजी भोसलें यांणी गोंडवण व वऱ्हाड व कटक अंमल बसविला त्याप्रमाणें चालावा. बल्लोलखान यासी ताकीद कर्नाटक सुभा फत्तेसिंग भोसलें यांसी देणें. येणेंप्रमाणें कागदपत्र घेऊन प्रधान व सेनापति व साहेबसुभा निघून येतांना जयपूर, जोधपूर, उदेपूर यांची कामे करून महाराजाशी तहाप्रमाणें चालावयाचें कबूल करविले. दरमाहाचे ऐवजात महाराजाची चौथाई याप्रमाणे पुष्कळ खजिना घेऊन साता-यास आले. महाराजाच्या भेटी झाल्या. मुलें माणसे भेटविली. बाळाजी विश्वनाथ यास कर्डेरांजणगांव वगैरे सरदेशमुखी वतन व इनाम गांव दिले. बाळाजीपंत भानू शस्त्रघातें करून दिल्लीस मरण पावले. त्यांचे पुत्र जनार्दन बल्लाळ व बंधू रामाजी महादेव भानू यांस पुण्यानजीक मावळप्रांती बसलाई त॥ नाणेमावळ हा गांव राजशक ४६, छ २० सवाल, श्रावण वद्य ३ रविवारी (२३ जुलै १७१९) इनाम दिल्हा. तो आजपर्यंत त्यांचे वंशजाकडे चालत आहे. बाळाजी महादेव भानू हे नाना फडणीस यांचे आजे होत. दिल्लीस बाळाजीपंत भानू गेले होते. त्यांचे मागें फडणिशीचें काम नारो बचाजी परचुरे यांणी चालविले. औरंगाबादेस पेशवे आल्यावर फडणविशीचें काम रामाजी महादेव लोहगडावर सबनीस होते, त्यांस बोलावून आणून काम करण्यास सांगितले. बहिरा आहे, याजवरून त्याजला दफ्तरचें काम सांगितलें, व फडणिशीचें काम जनार्दन बल्लाळ व बाबूराव राम मोठे होईपर्यंत अंताजी नारायण यांनी करावें, व त्याची मजमूची असामी हरी महादेव यांचे कन्येचे पुत्र कृष्णाजीपंत यांस सांगितली. मुलखास कौल दिल्हा. मोगलाईकडील अम्मल पुण्यांतील उठला. पुणें येथे हरी महादेव सुभेदारीवर होते. मोगलाकडील अम्मलदार बाजी कदम गेला. भीमेअलीकडील सर्व स्वराज्यांत असावें, असा तह निजामानें केला. परशरामपंत प्रतिनिधि यांचा काल ज्येष्ठ शुध्द ८ शके १६४० सोमवारी विलंबी नाम संवत्सरी झाला. (२७ मे १७१८). श्रीपतराव यांनाच श्रीनिवासराव प्रतिनिधी ह्मणतात. त्यांस पदाची वस्त्रे ज्येष्ठ वद्य ५ स (८ जून १७१८) झाली. कान्होजी आंगरे शिमग्यांत येऊन भेटले. रंग वगैरे होऊन सुभ्याच्या सनदा दिल्या. शके १६४० (८ फेब्रुवारी १७१९). जाधवराव आपल्या महालात अंमल उगविण्याबद्दल खटका करू लागले. त्यावर सरलष्कर यांसी पाठवून लढाई झाली. महकूबसिंग व जाधवराव यांचा मोड झाला. धारराव परभू कळंबेकर कामास आले. त्याची सरदारी कनिष्ठ अप्पाराव यांस दिल्ही, व जहागिरी दिल्ही. बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीहून सनदा आणिल्यावर वसुलाविषयी वहिवाट कशी चालावी याजकरितां कायदा केला तो असा की, प्रथम सरदेशमुखी ह्मणजे कोठें शेकडा दहा रुपये व कोठे साडेबारा रुपयेप्रमाणें वहिवाट आहे, ती राजाचें वतन असे ठरविलें बाकी राहिले बेरजेपैकी चौथाई, बाबती राजाचा हक्क ठरविला. बाकी तीन हिसे राहिले त्यास मोकासा असें नांव ठेविले. 

ह्या वर्षदीडवर्षाच्या अवधींत शिवाजीनें बारा मावळें काबीज करण्याचा उपक्रम केला, ती कशी काबीज केलीं ह्याचा खुलासा सभासदानें व मल्हार रामरावानें केला आहे. “मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिलें,” असा सभासदाचा खुलासा आहे. “मावळें सरदारांस मसलतींत घेऊन, त्यांस अनुकूल करून घ्यावें, त्यांस पत्रे लिहावीं व भेटावें, असें करूं लागलें,” म्हणून मल्हार रामराव लिहितो (पृष्ठ ३०) मावळांतील जे देशमूख शिवाजीला अनुकूल झाले त्यांस त्यानें बांधिलें म्हणजे आपल्याला बांधून घेतलें, जे प्रतिकूल होते त्यांस नरम केले, व जे केवळ पुंडाई करून होते त्यांस जिवें मारिलें. बारा मावळें काबीज करण्याचा हा असा प्रकार होता. देशमुखांना अनुकूल करून घेण्यांत ज्या राजकार्यकुशल मुत्सद्याचा उपयोग झाला, त्याला डबीरीचा हुद्दा देणें अवश्य झालें. ज्या हुद्देदारानें त्यांस दस्त केलें त्यास मुख्य प्रधानकी मिळाली; आणि ज्या लहानशा सैन्याच्या जोरवर पुंडांना जमीनदोस्त केलें त्या सैन्याची व्यवस्था ठेवण्याकरितां एक सबनीस नेमावा लागला. येणेंप्रमाणें बारा मावळें काबीज करतांना, हे हुद्देदार साहजिकपणेंच अस्तित्वांत आले. हीं बारा मावळें काबीज करण्याचें काम शके १५६० च्या अखेरीस सुरूं झालें. तें चाललें असतांना, शिवाजी शके १५६३ त विजापुरास गेला व तेथें असतांना पातशहाशीं उद्दामपणाची बालिश वर्तणूक त्याच्या हातून झाली. शके १५६० त जें उद्दाम कृत्य मावळांत सुरूं झालें होतें, त्याचीच दर्शक ही विजापुरांतील शिवाजीची वर्तणूक होती, हें मनुष्यस्वभावाच्या व विशेषतः बालस्वभावाच्या अनुरूपच होतें. मुख्य प्रधान, अमात्य, युक्त्याभिज्ञ व सेनालेखक ह्या चार हुद्देदारांचा दर्जा केवळ लष्करी होता हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. मुलकी व न्यायखात्यांतील हुद्दे उत्पन्न करण्याची आवश्यकता शिवाजीला शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत भासली नाहीं. तसेंच किल्ल्यांवरील नामजाद लोक ठेवण्याचीहि जरूरी अद्यापपर्यंत पडली नव्हती. कारण, शिवाजीच्या ताब्यांत हा काळपर्यंत एकहि किल्ला आला नव्हता. किल्ल्यांखेरीज करून बाकीचा बारा मावळांतील बहुतेक प्रांत शिवाजीनें काबीज केलाः- काबीज केला म्हणजे बारा मावळांतील देशमुखांना कांही अटीनें बांधून घेतलें. आतां ही बारी मावळें कोणतीं हें नीट समजून घेतल्यानें ह्या विवेचनावर जास्त प्रकाश पडणार आहे. “बारा मावळ पुण्याखालीं, बारा मावळ जुन्नरखालीं” असें तानाजी मालुस-याच्या पवाड्यांत म्हटलें आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखांच्या शके १५३६ तील एका सनदपत्रांत बारा मावळें हे दोन शब्द मी भोर येथें रा. रा. भाऊराव भिडे यांच्या येथें वाचले आहेत. ह्यावरून जुनरापासून चाकणापर्यंत बारा मावळें व पुण्यापासून शिरवळपर्यंत बारा मावळें अशीं एकंदर चोवीस मावळें शिवाजीच्या वेळीं प्रसिद्ध होतीं असें दिसतें. जुनरापासून चाकणापर्यंत असलेलीं १ शिवनेरी, २ जुनेर, ३ मिननेर, ४ घोडनेर, ५ भीमनेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळनेर, अशीं बारा नेरे, नहरे किंवा मावळें प्रसिद्ध आहेत. येथे जुन्नर ह्या नावांसंबंधानें संक्षिप्त उल्लेख करणें जरूर आहे. दक्षिणच्या इतिहासांत डॉ. भांडारकर म्हणतात की जुन्नर हा शब्द जुन्नर, जुननरे, जूर्णनगर व जीर्णनगर, अशा परंपरेनें जीर्णनगर म्हणजे जुनें नगर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. माइया मतें जुन्नर, हा शब्द शिवनेर, भीमनेर वगैरे शब्दाप्रमाणें जुन्नर, जुन्नेर, व जीवनीर अशा परंपरेनें जीवनीर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. जीव हें जुन्नराजवळील एका ओढ्याचें नांव असावें. जुन्नराच्या पश्चिमेस व नाणे घाटाच्या दक्षिणेस जीवधन नांवाचा एक किल्ला आहेच. जीवधन हा किल्ला व जीवनीर हें गांव ह्यांना जीव नदीपासून नामाभिधान प्राप्त झालें असावें. वर दिलेलीं नावें जुन्नराखालीं मोडणा-या बारा मावळांचीं होत. पुण्याखालील बारा मावळें म्हटली म्हणजे १ अंदरमावळ, २ नाणेमावळ, ३ पवनमावळ, ४ घोटणमावळ, ५ पौड खोरें, ६ मोसेंमावळ, ७ मुठेंमावळ, ८ गुंजणमावळ, ९ वेळवंडमावळ, १० भोरखोरें, ११ शिवतरखोरें, १२ हिरडसमावळ. हीं बारा होत.

शिवाजीच्या दरबारी शास्त्री, पंडित, वैदिक वगैरे विद्वान् लोक असत, असेंहि रामदास म्हणतो. भूषणकवि शिवाजींच्या पदरी होता, म्हणून तुकारामानें आपल्या पत्रांत म्हटलें आहे. स्वतः शिवाजीनें कांही अभंग व पदेंहि रचिलीं होतीं (रामदासाचें चरित्र पृष्ठ २९५). न्यायमनसुबीचीं कामें शिवाजी स्वतः पाही, असें वाई येथील तात्यासाहेब पंताच्या दफ्तरांतील कांहीं कागदांवरून म्हणतां येतें. सारांश, शिवाजी अक्षरशून्य होता म्हणून ग्रांट डफ म्हणतो तें अगदीं निराधार आहे, असें मला वाटतें. शिवाजीनें केलेल्या पदांत उर्दू शब्द बरेच आहेत ह्यावरून शिवाजीस कदाचित् फारशी व निखालस उर्दू येत होतें असेंहि विधान करण्यास अवकाश होतो. पुराणांतील कथा व वेदान्त, तसेंच गायन व अश्वशिक्षा, ह्या विद्याहि शिवाजीला अवगत होत्या. तात्पर्य, पृथ्वीवरील इतर कित्येक महापुरुषांप्रमाणेच शिवाजीहि विद्यासंपन्न होता ह्यांत संशय नाहीं. शिवाजींनें रायगडावर हिराजीच्या हातून शंकराचें भव्य देवालय बांधविलें आहे; त्याच्या देवडीवर दोन श्लोक लिहिले आहेत ते संस्कृतांत आहेत, ह्यावरून शिवाजीला संस्कृताचा अभिमान होता व ती भाषा तो जाणत असे असे दिसतें. शिवाजी संस्कृतज्ञ होता हें त्याच्या आज्ञेवरून राजव्यवहारकोश निर्मिला गेला ह्या एका गोष्टीवरूनच सिद्ध आहे. मराठे लोकांना लिहिणेंवाचणें आपल्या इभ्रतीला शोभण्यासारखें नाहीं असें वाटे, म्हणून ग्रांट डफ लिहितो तें तो काय म्हणून लिहितो तें कळत नाहीं. मराठे लोक शास्त्रीपंडितांसारखे गाढे विद्वान् नाहींत ही गोष्ट कबूल आहे. परंतु सामान्य लिहिणेंवाचणें व हिशेब ठेवणें त्यांच्यापैकीं पुष्कळ लोकांना सध्यां येतें व पूर्वीहे येत होतें ही सर्वमान्य गोष्ट आहे. मराठे म्हणजे कुणबी नव्हेत हें येथें ध्यानांत ठेविलें पाहिजे. कुणबी प्रायः अक्षरशून्य असतात हें सर्वत्र महशूर आहे. परंतु अस्सल मराठे क्षत्रिय जे आहेत त्यांना स्नानसंध्या व लिहिणेंसवरणें अवश्य मानिलेलें आहे. तानाजी मालुस-याच्या पवाड्यांत गुंजाळ नदीवर तानाजी माध्यान्ह संध्या करावयास गेला म्हणून तुळसीदासानें म्हटलें आहे. शिवाजीच्या विद्यासंपन्नतेसंबंधीं हा इतका वाद बस आहे. शामराज नीळकंठ यास शके १५६५ त पेशवाई सांगितली त्यावेळी सोनोपंत डबीरीवर व बाळकृष्णपंत मजमूवर होते. शके १५६७ त सोनोपंत वारल्यावर किंवा घरी बसल्यावर, सोनोपंताचा मुलगा निळी सोनदेव यास पार्थिवनाम संवत्सरीं म्हणजे शके १५६७ त मजमू सांगितली (शिवदिग्विजय १८६). बाळकृष्णपंत वारल्यावर किंवा घरीं बसल्यावर त्याच वेळीं हशमांची सबनिशी रघुनाथ बल्लाळ कोरडे याजकडे होती. शिवाजीजवळ ह्या वेळीं घोडदळ बहुतेक नसल्यासारखेंच असल्यामुळें घोडदळाची सबनिशी अद्याप अस्तित्वांत आलीच नव्हतीं. पायदळावरच समाधान मानून शिवाजीला शके १५६८ पर्यंत रहावें लागलें असे वाटतें. येणेंप्रमाणें शके १५६८ पर्यंत शिवाजीनें आपल्या हाताखालील हुद्देदारांची व्यवस्था कशी लाविली त्याचें थोडेबहुत स्पष्टीकरण झालें. आतां शके १५६८ पर्यंत शिवाजीनें जे हे इतके हुद्दे निरनिराळ्या कर्त्यासवर्त्या पुरुषांना दिले तें निव्वळ डामडौलाकरितां व मुसलमानीं दरबारच्या अनुकरेणच्छेनेंच दिले नसून वेळोवेळी त्या त्या हुद्देदारांची अवश्यकता भासली असावी म्हणूनच दिले असले पाहिजेत, हें उघड आहे. कोणीहि विचारी पुरुष मुख्य प्रधान, अमात्य, युक्त्याभिज्ञ व सेनालेखक, असे राजपुरुष आपल्या पदरीं बाळगूं लागला म्हणजे तो कांहीं तरी राजकारणांत गुंतला असावा असा निश्चयानें तर्क करावा लागतो. सैन्य असल्याशिवाय सबनीस येत नाहीं. बाहेर कांहीं राजकारण उत्पन्न झाल्याशिवाय युक्त्याभिज्ञ म्हणजे डबिराची गरज नाही; जमाखर्च असल्यावांचून अमात्याची जरूर नाही; व स्वारीशिकारीशिवाय मुख्य प्रधानाचेंहि कांहीं काम नाहीं. तेव्हां शके १५६८ पूर्वी शिवाजीनें किंवा शिवाजीच्या मसलतगारांनीं कांहीं तरी राजकारण उपस्थित केलें असलें पाहिजे. ग्रांट डफ शिवाजीच्या पराक्रमाचा प्रारंभ शके १५६८ पासून करतो, व त्याच्या आधीं शिवाजी कोंकणांत दरवडे घालीत असावा, असा निसटता उल्लेख करून पुढें जातो. तेव्हां त्याच्या ग्रंथांत शके १५६८ पूर्वीची शिवाजीसंबंधीं माहिती बिलकुल मिळावयाची नाहीं, हें स्पष्टच आहे बाकी. शके १५६८ पूर्वी शिवाजीनें राजकारण करण्यास सुरुवात केली होती ह्यांत काडीमात्र संशय नाहीं. सभासदी बखरींत ह्या शके १५६८ पूर्वीच्या राजकारणासंबंधी उडता उल्लेख आहे. “येताच बारा मावळे काबीज केली,” म्हणून सभासद लिहितो (सभासद ६). “शके १५६२ यांत या मसलतीचा आरंभ करिते झाले”, असे मल्हार रामराव म्हणतो (मल्हार रामराव ३०). ‘येताच’ म्हणजे बेंगरुळाहून येतांच, बारा मावळें काबीज केलीं असा सभासदाचा आशय आहे. बेंगरुळाहून शिवाजी शके १५६० च्या शेवटीं आला व शके १५६२ सालच्या अखेरीपर्यंत तो पुण्यास होता, हें मागें दाखवून दिलेंच आहे.

(४) पुणें व सुपें प्रांतांतील व इतरत्र शके १५२२ पासून १५५८ पर्यंत होनाप्पा देशपांडे, मोरो तानदेव, (रायरी येथील बखर) श्रीनिवासराव वगैरे पुंडांनीं बंडाळी करण्याचा अभ्यास सुरू केला होता. (५) जुन्नरापासून पन्हाळ्यापर्यंतचे शितोळे, ढमढेरे, बांदल, शिरके, निंबाळकर, जाधव, घाटगे, घोरपडे, वगैरे देशमुख व त्यांच्या बरोबरीचे देशपांडे एकमेकांशी सदा कांही तरी कुरापत काढून झुंजत असत. त्यामुळें महाराष्ट्राच्या पश्चिम भागीं सर्वत्र गोंधळ माजून राहिला होता. (६) विजापूरच्या दरबारांतील मुत्सद्दी मंडळांत व सरदार मंडळांतहि बेबनांव बहुत झाला होता (शहाजीची बखर, का.).
(७) दिल्लीच्या मोंगलांनी विजापूरकरांच्या राज्यांत बखेडा व फितूर करण्यास तत्रस्थ प्रजेला उत्तेजन दिलें होते
(८) दादोजी कोंडदेव, शहाजी व इतर कारकून मंडळी विजापूरच्या सत्तेचे मोठेसे भक्त होते असें नव्हतें.
(९) संतमंडळींचाहि एकंदर मनोदय यवनांच्या सत्तेच्या विरुद्ध होता. (१०) विजापूरचे पातशहाहि नरम होऊन त्यांच्यांतील कडवें यवनत्व नाहींसें झालें होतें. विजापूरच्या खुद्द आरकांत दत्तात्रयाचें देऊळ बांधिलें होतें, म्हणजे राम व रहिम एक आहेत अशी विचारी मुसलमानांची खात्री झाली होती. (११) शहाजीच्या पदरीं चालतें बोलतें सैन्य होतें. (१२) फलटणचे निंबाळकर, शिरकाणांतील शिरके, कोंकणांतील सोडवळकर व कोडवळकर, वगैरे मंडळींना आपापलीं वैरें साधून घेण्याला शिवाजीला मदत करणेंच अवश्यक झालें होतें. हीं अशी अनेक सामान्य कारणें शिवाजीला प्रोत्साहित करण्यास साहाय्यभूत झालीं होतीं. शहाजीनें शिवाजीला बेंगरुळाहून पुण्यास पाठविलें त्यावेळीं पेशवे, मुजुमदार, डबीर व सबनीस अशी मुत्सद्दी मंडळीं भावीं संस्थानाच्या उपयोगी पडण्याजोगी शिवाजीबरोबर होती. ह्यावरून असें अनुमान होतें कीं, मावळांत स्वतंत्र राज्य स्थापावें अशी शहाजीची दादोजी कोंडदेवाच्या सल्यानें मसलत झाली होती. ही मसलत करण्यास शहाजीला कारण असें झालें कीं, कर्नाटकांत अफजलखान, मालोजी घोरपडे वगैरे विजापूरचे सरदार द्वेषानें शहाजीचें पाऊल स्थिर करूं देत ना. तेव्हां स्वदेशांत म्हणजे सह्याद्रीच्या बंधा-याच्या लगत्यास साधल्यास कोठें तरी स्वतंत्र सत्ता स्थापित करावी म्हणजे दाहीं दिशांनीं जन्मभर वणवण करींत हिंडण्याचा प्रसंग पुनःपुन येणार नाहीं, असा शहाजीचा विचार झाला होता असें दिसतें. स्वतंत्र संस्थान स्थापण्याचें शहाजीनें स्वतःच्या शिरावर न घेतां शिवाजीच्या व दादोजी कोंडदेवाच्या शिराबर टाकण्याचें कारण असें कीं, दादोजी कोंडदेवाला यश आलें नाहीं तर त्यांची बाजू सावरण्यास आपण विजापूरच्या दरबारीं चिकटून असावें. शके १५६३ च्या हिवाळ्यांत पुण्यास आल्यावर शिवाजीनें लवकरच स्वतंत्र राज्याधिकार चालविण्यास सुरुवात केलीं असें म्हणण्यास आधार आहे. शिवदिग्विजयाच्या १८६ व्या पृष्ठावर शामराज निळकंठ राझेकर यांस पेशवाई पुणें मुक्कामीं सुभानुनाम संवत्सरीं म्हणजे शके १५६५ त शिवाजीनें दिली असें म्हटलें आहे. शामराज निळकंठ शिवाजीबरोबर बेंगरुळाहून शके १५६० तच आला होता. परंतु पेशवाईची सनद म्हणजे राजपत्र त्याला शके १५६५ त मिळालें. ह्यावरून असें निष्पक्ष होतें कीं, पुणें व सुपें ह्या दोन प्रांतांवर अम्मल करीत असतांना, अथवा खरें म्हटलें असतां केवळ पुणें प्रांतांवर अम्मल करीत असतांना (कारण सुपें प्रांत संभाजी मोहित्याकडे होता), शिवाजीला पेशवाईच्या अधिकारावर अंम्मलदार नेमण्याची आवश्यकता भासली. शके १५६५ त शिवाजीचें वय १६ वर्षांचे होते. त्यावेळीं महाराष्ट्रांत जी कांहीं विद्या मिळण्यासारखी होती ती शिवाजीला मिळाली होती. शिवाजी लिहिणें वाचणें वगैरे सर्व कांही व्यावहारिक विद्या शिकला असून त्याला संस्कृताचीहि व्युत्पत्ति सामान्यशी येत होती. ह्या गोष्टीचा विस्तृत उल्लेख शिवदिग्विजयांत व मल्हाररामरावकृत चरित्रांत यथास्थित केला आहे. रामदासानें शिवाजीला जें पत्र पाठविलें आहे, त्यांत त्याला त्यानें 'जाणता', 'सर्वज्ञ' वगैरे विशेषणें दिलीं आहेत. तुकारामानेंहि शिवाजीस जें पत्र पाठविलें आहे त्यांतहि शिवाजीला असाच बहुमानपुरस्सर गौरव केला आहे. वामनपंडितांनीं तर 'शिवनिर्विशेषं' ह्या पदाचा उपयोग करून शिवाजीचें व रामदासाचें ज्या अर्थी तादात्म्य वर्णिलें आहे त्या अर्थी शिवाजी सुशिक्षित होता हे कबूलच करावें लागतें.

शंकास्थान पहिलें.
ह्या शंकास्थानांत शिवाजी पुण्यास दादोजी कोंडदेवाकडे रहाण्यास आल्यापासून तोरणा किल्ला घेईतोपर्यंत शिवाजीच्या चरित्रांतील प्रसंगाचा सालवार इतिहास बखरीतून कसा दिला आहे व डफच्या ग्रंथांत त्याचें सालवार वर्गीकरण कोणत्या भक्कम आधारावर रचिलें आहे तें पहावयाचें आहे. आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी शिवाजी शहाजीस बेंगरुळास भेटण्यास गेला होता असें सभासद [पृष्ठ ६] लिहितो, म्हणून शके १५६० हें साल शिवाजीच्या हालचालीच्या प्रारंभाचें असावे असें मी गृहीत धरतों. १५५८ त शहाजहान व महमद आदिलशहा ह्यांचा तह झाल्यावर शहाजी विजापूरकरांचा मनसबदार बनला त्यावेळीं शिवाजी शहाजीबरोबर कदाचित विजापुरास गेला असेल असा अंदाज करतां येईल. १५५९ त शहाजी कर्नाटकच्या स्वारीस गेला असतां, शिवाजी दादोजी कोंडदेवाकडे पुण्यास आला असें वाटतें. व पुण्यास वर्ष सहा महिने राहून १५६० त शिवाजी शहाजीस भेटण्यास बेंगरुळास गेला असें सभासद म्हणतो, तें कदाचित् खरे असेल असें म्हटले तर चालण्यासारखें आहे. दादोजी कोंडदेवाकडे पुण्याकडील कारभाराचें जोखीम असल्यामुळें, दादोजी शिवाजीला घेऊन पांच सहा महिन्यांनी पुण्यास परतला असावा. व पुण्यास आल्यावर शहाजीच्या सांगण्याप्रमाणें दादोजीनें शिवाजीचें पहिले लग्न शके १५६२ च्या वैशाखांत पुण्यांतच केलें. [शिवदिग्विजय पृष्ठ ९९]. बेंगरुळाहून पुण्यास येतांना शहाजीनें शिवाजीबरोबर, शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत मुजुमदार, सोनोपंत डबीर, व रघुनाथ बल्लाळ सबनीस, हे कारकून लोक दिले होते. [सभासद ६, चिटणीस ३०, चित्रगुप्त ३]. बाळकृष्णपंत नारोपंताचा चुलता होता व बाबुराव मुजुमदारहि शिवाजीबरोबर आला म्हणून चित्रगुप्त म्हणतो, परंतु बाबुरावाचें नांव चित्रगुप्तानें पुढील पारिग्राफांत गाळले आहे, व त्यावरून हें पाचवें नांव आगंतुक असावें असें वाटतें. शिवाजीचें पहिलें लग्र झाल्यानंतर म्हणजे अर्थात् दुसरा पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी [शिवदिग्विजय पृष्ठ १११]. म्हणजे १५६३ च्या वैशाख-जेष्ठांत शहाजी विजापुरास आला व पातशहाच्या आग्रहास्तव त्यानें शिवाजीचें दुसरें लग्र केलें आणि चार महिने पावसाळा विजापुरास काढून, व शिवाजीला पुण्यास पाठवून देऊन आपण कर्नाटकात चालता झाला. येणेंप्रमाणें शिवाजी शके १५५८ त पहिल्यांदा व शके १५६३ दुस-यांदा असा दोन वेळा विजापुरांत जाऊन राहिला असावा. पहिल्या खेपेस शिवाजी आठ वर्षांचा असल्यामुळें त्याच्या हातून कसायाचें पारिपत्य व पातशहाची बेअदवी झाली असेल हें संभवत नाहीं. तेव्हां दुस-या खेपेस म्हणजे शके १६६३ त चौदा वर्षांचा असतांना शिवाजीच्या हातून हा वरकरणी दिसणारा उद्दामपणा झाला असावा असा तर्क आहे. हा उद्दामपणा न्याय्य होता हें दाखवून देण्याकरितां बखरनवीस मुसलमानी न्यायाचे दोन मासले देतात. पैठण येथील एका स्त्रीस एका मुसलमान छाकट्याने बाटविण्याचा प्रयत्न केल्यासंबंधींचा पहिला मासला आहे [शिवदिग्विजय १००-१०१]. व दुसरा चतुर साबाजीनें केलेल्या सांको पांझी न्यायासंबंधींचा आहे [शिवप्रताप पृष्ठ ३९ ते ४२]. मुसलमानी राज्यांत न्याय अपवादात्मक असे, असा झोंक ह्या बखरनविसांच्या लिहिण्याचा आहे. स्त्रियांवर बलात्कार करणें, हिंदूचा खून करणें व देव फोडणें, गाई मारणें, धर्म बाटविणे, वगैरे अनन्वित प्रकार मुसलमानी राज्यांत हरहमेश होत व बहुशः जिरत असत. कोंकणांत व देशावर केळकर, पळूसकर, पिसाळ, जाधव, दसपुत्रे वगैरे शेकडों ब्राह्मण व मराठे, यवनी धर्माची दीक्षा जुलमानें किंवा लालुचीनें घेऊन चुकले होते. देशप्रिय व धर्मप्रिय लोकांना हा प्रकार अर्थातच निंद्य वाटे. शिवाजीला व त्याच्या बरोबरच्या इतर अनुयायांनाहि तो प्रकार निंद्यच वाटला असावा हें उघड आहे. त्याचेंच प्रदर्शन हा उद्दामपणा होय. शके १५६३ च्या हिवाळ्यांत शिवाजी पुण्यास आला तो पुन्हां विजापूरच्या दरबारी सेवक या नात्यानें गेला नाहीं. विजापूरचा तिटकारा येण्याला शिवाजीला यवनाच्या धर्माचा द्वेष तर कारण झालाच. परंतु इतरहि आणीक कारणें पुष्कळच झालीं. (१) महाराष्ट्र हें आपलें स्वराज्य असें त्याच्या उपदेशकांना वाटत होतें. [चिटणीस २८]. [२] पुणें व सुपें हे प्रांत निजामशाहींतील विजापूरकरांकडे नव्यानेच गेल्यामुळें त्यावर आदिलशहांची जितकी गच्च मिठी बसावी तितकी बसली नव्हती. (३) शहाजीच्या तर्फे पुण्याचे जवळील ओसाड मावळांची लावणीसंचणी दादोजीनें स्वतः करविल्यामुळें तेथें आदिलशाही अम्मल साक्षात् दृष्टोत्पत्तीस येत नव्हता.

[ १ ] शिवदिग्विजयांतील मजकुराचा अनुक्रम.

येणेप्रमाणें ह्या सहा बखरींतील मजकुराचा अनुक्रम आहे. एका बखरींतील अनुक्रमाचा मेळ दुस-या बखरींतील अनुक्रमाशी बसत नाही हें वरवर पाहणा-यालाहि दिसून येईल. पैकीं शिवाजीप्रतापांतील मजकूर अगदीच तुटपुंजा व अपुर्ता असून गप्पांनी भरला आहे. चित्रगुप्तानें सभासदी बखरींतील मजकूर बहुतेक जशाचा तसा उतरला आहे. रायरी येथील बखरींत कोणत्याच प्रसंगाचा सविस्तर वृतांत नाहीं व शेवटी तर बखरनविसानें मजकुराचा फारच संक्षेप व लोप केला आहे. बाकी राहिलेल्या तीन बखरीचा म्हणजे सप्तप्रकरणात्मक चरित्र, सभासदी बखर व शिवदिग्विजय ह्यांचाच तेवढा येथें विचार कर्तव्य आहे. ह्या तीन बखरींत मोठी उणीव म्हटली म्हणजे बहुतेक प्रसंगाचा शक ह्या बखरींत दिलेला नाहीं. 'नंतर','पुढें', वगैरे शब्दांनींच प्रसंगांचे पौर्वापर्य निश्चित करावयाचें आहे. वस्तुतः प्रसंग जसजसे घडले तसतसे वर्णन ह्या बखरनविसांनीं केलें असतें म्हणजे ‘नंतर’; ‘पुढें’, वगैरे शब्दांपासूनहि कलाचा बोध, दोन चार महिन्यांच्या चुकीनें, करून घेतां आला असता. परंतु पूर्वापार संगतीनेंच प्रसंग ह्या बखरींत वर्णिले आहेत असें निश्चयानें म्हणवत नसल्यामुळें प्रसंगाच्या कालाचें पौर्वापर्य केवळ अतःप्रमाणावरून निश्चित करतां येत नाहीं. तेव्हां पत्रें, यादी वगैरे बहिःप्रमाणांचा आधार घेऊन जो कालनिर्णय होईल तेवढाच खरा मानून स्वस्थ बसले पाहिजे, व ह्या कालनिर्णयाच्या आधारावर मागील व पुढील प्रसंगांचा धरमधोक्यानें कालनिर्णय केला पाहिजे. पुढें इतर विशिष्ट बहिःप्रमाण सांपडल्यास ह्या धरमधोक्यानें ठरविलेल्या कालनिर्णयांत थोडाफार फेरबदल होण्याचा संभव असतो. परंतु, बखरींतील मजकुराच्या कालनिर्णयासंबंधी निश्चयात्मक, चोख व विश्वसनीय विधानें कराण्याची ही अशी अडचण असल्यामुळें, प्रसंगांच्या कार्यकारणभावाचा अर्थात् कांहींच निर्णय करतां येत नाहीं. प्रसंगांचा कार्यकारणभाव व पौर्वापर्य अनिश्चित राहिल्यामुळें त्या प्रसंगांची उपयुक्तता व महत्त्व हीहि नीट ध्यानांत येत नाहींत. बखरींतील मजकुरापासून ऐतिहासिक बोधहि वाचकांना करून देतां येत नाहीं व तो करून देण्याचा आव घातला तर असंभाव्य गप्पांचें समर्थन केल्याचें श्रेय मात्र पदरीं पडतें. ह्या दोषाला शिवाजीचा प्रत्येक मराठी इतिहास व चरित्र पात्र झालेलें आहे हें तर स्पष्टच आहे; परंतु खुद्द ग्रांट डफचा इतिहास ह्या दोषाला अपवादक होईल असेंहि खात्रीनें सांगतां येत नाहीं. कां कीं (१) बखरींची नीट परिक्षा करून ग्रांट डफनें आपला इतिहास लिहिला नाहीं. (२) पत्रें यादी वगैरे खेरीज करून प्रसंगांचा कालनिर्णय त्यानें फारशी तवारिखांच्या प्रत्यंतर पुराव्यावरून केला आहे व प्रत्यंतर पुरावा बखरीच्या इतकाच अविश्वसनीय आहे; (३) व मिळालेल्या पत्रें यादी वगैरेंचाहि जसा उपयोग करून घ्यावा, तसा त्यानें करून घेतला नाहीं. ह्या तीन दोषांमुळे बखरींप्रमाणेंच डफचा इतिहासहि थोडाफार अविश्वसनीय आहे. शिवाजीचा इतिहास ग्रांट डफनें खालील लेखांच्या आधारानें लिहिलाः- (१) सभासदी बखर, (२) मल्हार रामरावकृत सप्तप्रकरणात्मक चरित्र (३) मो-यांच्या जवळील शिवाजीची बखर, (४) टॉमस कोट यानें भाषांतर केलेली बखर, (५) सर बारी क्लोजनें भाषांतर केलेली बखर, (६) कोल्हारच्या कुळकर्ण्याजवळील बखर, (७) खटावच्या देशपांड्याजवळील बखर, (८) काफीखान, (९) विजापूरच्या बखरीं, (१०) व इंग्रजी, पोर्तुगीज, मराठी व फारशी पत्रें यादी वगैरे दहाव्या वर्गांतील साधनांखेरीजकरून बाकींच्या साधनांच्या आधारानें लिहिलेला कोणताहि इतिहास फारसा विश्वसनीय नसतो हें मी वारंवार सांगत आलोंच आहे. तशीच ह्या बखरींची सूक्ष्म परीक्षा करून, डफनें आपला इतिहास लिहिला नसल्यामुळें त्याच्या ग्रंथाला बहुत अपूर्णता आली आहे. ती कशी आली आहें ह्याचें दिग्दर्शन मागें शिवाजीच्या बायकांसंबंधींचा विचार चालला असतांना थोडेंबहुत झालेंच आहे. ह्यापुढें हें दर्शन जास्त विस्तृत करून, ग्रांट डफच्या ग्रंथाची व बखरींची न्यूनता कित्येक शंकास्थानांत दाखवून देतों म्हणजे शिवाजीचा इतिहास विश्वसनीय असा लिहितां येण्यास अद्याप किती तरी सामुग्री जुळावयाची आहे, हें वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत येईल व बखरींचें प्रामाण्याप्रामाण्य योग्य रीतीनें व्यत होईल.

सु॥ तिसा अशर मया व अलफ, सन ११२८ फसली, अव्वल
साल छ ६ रजब, २५ मे १७१८,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६४०.


फेरोकशेर पातशाहास सय्यदांनी मारल्यानंतर त्याचे जाग्यावर रफीउद्दरजात या नांवाचा 
पातशाहा सन १७१९ त झाला. त्याचे कारकीर्दीत शाहूस दक्षिणेंकडील सरदेशमुखी वगैरे अमलाविषयी परवाने झाले होते; परंतु ते अमलांत न येतां, सदरहू पातशाहा क्षयरोग लागून लौकर पांच महिन्यांत मयत१२ झाला. नंतर त्याचा भाऊ रफीउद्दवला यास तख्तावर बसविला; परंतु तोहि दोन तीन महिन्यांतच मयत झाला. या कारणानें बाळाजी विश्वनाथ याचें रहाणें, सनदा वगैरे कार्याकरितां, दुसरा पातशाहा होईतोंपर्यंत दिल्लीस झालें. पुढे शहाअलम याचा नातू रोशन एकत्यार या नावांचा उभयता सय्यदांनी तख्तावर बसविला. त्याचे नांव महंमदशहा असे ठेविले. या साली दरबारांत त्या दोघा सय्यदांशिवाय काही कार्य होत नसें. त्यांचे व निजाम उन्मुलुक याचें अंतर्याम शुध्द नव्हतें. त्याशीं सख्य करण्याविषयी सय्यदांनी बराच प्रयत्न केला; परंतु तो मनापासून वश झाला नाही. कारण, त्याजकडे दक्षणचा अधिकार असतां पातशाहानें सय्यदास नेमिलें, आणि निजामुन्मुलुकास मुरादाबादेस पाठविलें. त्याणें तिकडे चांगला बंदोबस्त केल्यामुळे फेरोकशेर पातशाहानें दिल्ली बोलावल्यावरून कितेक दिवस बेरोजमारी होता. पुढे त्यास माळवे प्रांताचा अधिकार देऊन पाठविला. त्याला पुढे अधिक योग्यतेस येण्याची आशा होती; परंतु पुढे लौकरच दुसरी मुद्रा होईल, अशी अटकळ करून तो समय येण्याची वाट पहात बसला होता. पुढे शाहू महाराज यांणी करार केल्याप्रमाणें चौथाई व सरदेशमुखी व शिवाजीनें मुलूख संपादिला होता, त्याबद्दल वगैरे सनदा-पत्रें पातशाहाकडून करवून घेऊन, व फौजेचा खर्च सय्यदांकडून घेऊन, शाहू महाराज यांची मुले, माणसें दिल्लीस ओलीस ठेविली होती, ती घेऊन देशी येण्याचा विचार ठरला. पुढे निजामुन्मुलुक यांणी बाळाजी विश्वनाथ व अंबाजी त्र्यंबक यांची पातशाहापाशी तारीफ केली. पातशाहापाशी मेजवानीबद्दल द्रव्य घेऊन आपल्याबरोबर देशी औरंगाबादेस घेऊन आले. दरम्यान दिल्ली मुक्कामी सरदेशमुखी चौथाई वगैरे मुलुखाच्या सनदापत्रें शाहू महाराजास देण्याचा ठरलेला विचार दिल्ली दरबारांतील कितीक लोकांस न आवडून त्यांणी असा बेत केला की, पेशवे  दरबारांतून सनदापत्रें घेऊन निघाले ह्मणजे रस्त्यांत गाठून सनदा हिसकावून घेऊं. ही मसलत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांस समजली. तेव्हां ह्याविषयीं काय करावें, असें बाळाजी महादेव भानूंस विचारिलें असतां, त्यांणीं अशी सल्ला दिली कीं, आपण सनदा घेऊन दुसरे आडवाटेनें लष्करात गोटांत जावें, मी पेशवे या थाटानें तुचे पालखीत बसून मागून येतों. असा विचार ठरल्याप्रमाणें पेशवे सनदा घेऊन दुसरे आडवाटेने निघाले व भानू इतमामानिशी भर रस्त्याने येत असतां संकेताप्रमाणे तेथील लोकांनी गर्दी केली. तेव्हां संताजी भोसले बरोबर होते, त्यांणी बहुत पराक्रम करून त्या प्रसंगीं पार पडले. बाळाजी महादेव भानू फडणीस यास पेशवे असे समजून त्यावेळेस ठार मारिले. बाळाजी विश्वनाथ दुस-या मार्गाने गोटाकडे येतात तो इकडे असा प्रसंग झाला ! तो पाहून पातशाहा यास निरोप सांगून देशी निघाले. त्यावेळेस संताजी भोसले यांणी पराक्रम केलेला ऐकून सवाई संताजीराव असा किताब राणोजी भोसले यास देऊन फौजेतील सरदार वगैरेस पातशाहाकडून वस्त्रें मिळाली. दक्षणचे सुभ्याची सर्व काळ कुमक राखून, लिहिले जाईल तेव्हा फौज कुमकेस पाठवीत जावी; तळघाट, कोंकण व वरघाट, बालाघाट, दुतर्फादेखील बंदोबस्त किल्ले आणि सरदेशमुखी वतनी अंमल शिवाजीनीं त्याप्रमाणे सहा सुभ्यांत चालावें; व स्वराज्यांत पूर्वी शिवाजीनी अंमल बसविला त्याचे फरमान करून दिले.