Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
दिल्ली पुन: परत घेतल्याचे कामास श्रीमंताकडे त्या वजीरानें साहाय्य मागितल्यावरून पुण्याहून सफर (नोव्हेंबर १७५६) महिन्यांत दादासाहेब या लाहोरच्या स्वारीस निघाले. त्यांजबरोबर विठ्ठल शिवदेव वगैरे फौजेचे सरदार होते. तेव्हां विठ्ठल शिवदेव यांस ती कामगिरी दादासाहेब याणीं सांगितल्यावरून त्यांणीं दिल्ली शहर इराणी बादशहाकडील नजीबउद्दवल्याचे ताब्यांत होतें तें घेऊन त्याजवर हल्ला चढविला. तो पळून रोहिले खंडात गेला. दिल्ली शहर बादशहाचे ताब्यांत आल्यावर बादशहा खूष होऊन विठ्ठल शिवदेव यास पोषाख व जवाहीर व मोर्चे वगैरे देऊन राजे उमदे उलमुलूख बहादर असा किताब देऊन शिवाय चांदवड तालुक्यापैकी विंचूरसुध्दां पांच गाव व मनमाड परगणे पाटोदे व दहिवड परगणे वडदरी व चादार परगणे नाशिक व करंजी परगणे कुंभेरी अशी नऊ गावें इनाम दिली. यावेळेस दादासाहेबांचा तळ दिल्लीवरच सरदारासुध्दां राहिला होता. शिवनेर किल्ला पुण्यानजीक जुन्नराजवळचा महंद अलमखान किल्लेदार मोंगलाकडील याचे ताब्यांत होता. तो हा एकच किल्ला मोंगलाकडे राहिला. तो आपल्याकडे असावा अशी बाजीराव बल्लाळ याचे वेळेपासून तजवीज चालली होती; परंतु लढून हस्तगत होण्यासारखा नाही. मोठा मजबूत होता. सबब किल्लेदार याशी उध्दव वीरेश्वर चितळे याचे विद्यमानें बोलणें लावून त्यास जागीर वंशपरंपरेने देण्याचें ठरवून किल्ला सरंजामाचे महालसुध्दां घेतला. जहागीर चाळीस हजारांची बाल्हें वगैरे गांव व नगर जिल्ह्यापैकी कांही गांव असे त्यावेळेस दिले होते; परंतु त्यापैकी बहुतेक गांव पेशवे यानी परत घेतले. एक कसबा बाल्हें हा गांव त्याचे वंशिकांकडे चालत आहे. या सालापासून शिवनेर तालुका असा निराळाच केला. साल गु॥ शीत खमसैन साली नबाब सावनूरकर याजवर स्वारी झाली. तें कार्य करून या सालांत अवल साली छ २० सवाल रोजी (२० जुलै १७५६) पुण्यांत आल्यावर, विजयदुर्ग किल्ला इंग्रजांनी घेतला होता, तो इंग्रजांकडून सरकारांत घेऊन, बाणकोट व त्याखालील गांव हे इंग्रजांस दिले. याची हकीकत मागील सालांत तपशीलवार लिहिली आहे. सदाशिव रामचंद्र यांस खंबायतकर मोंगल याजवर पाठवून त्यानी अमदाबाद घेतली होती ती परत घेतली. वजीर मीर शाबुद्दीन उर्फ गाजुद्दीन याचे पदरी नजीफखान प्याद्याची जमादारी करीत असे व पुढें शिलेदार होऊन मोठा प्रसिध्द होऊन त्यास अंतर्वेद सुभा सांगितला होता. बादशहाची स्त्री मलका जमानी व कन्या चंदाजमानी सिलीमगडावर अटकेंत होत्या. त्यांस अन्नवस्त्र बरोबर न मिळे. त्यांनी कंटाळून असा विचार केला की, आपले भ्रताराकडे समुद्रवलयांकित पृथ्वीचें आधिपत्य होतें, असें असून आपण असें कारागृहांत राहणें ठीक नाहीं, याचा बंदोबस्त करणार पराक्रमी एक नजीबखान रोहिला आहे, त्यास आणण्याविषयी गुप्त रीतीनें खोजास पाठवून, त्यास आणवून, त्याचे विचारें असें ठरलें की आपली मुलगी चंदाजनानी ही कंदाहारचा बादशहाचा पुत्र तेमुरशा हा यास देऊन त्यास येथील बादशाहा करावा व अयोध्येचा नबाब मनसूरअल्ली ऊर्फ सफदरजंग पूर्वी महंमद बादशहाचे वेळेस वजीरी करीत होता त्याचा पुत्र सुजायतदौला यास वजीरी द्यावी, असा शपथपुरस्कर विचार ठरवून नजीबखान यानें आपला भाऊ सुलतानखान यास अबदालीकडे पाठवून त्यास आणविले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
अहो कृतयागस्यावभृतस्नानफलसिध्दिरियमेव । तदाल्हादोद्न्दारफारस्फुरणशद्बितमा-
कर्ण्य मुक्ताफलकबलबहलानंदानंदितकलहंसकुलमिवास्थानमंडपस्था: सुखकलकलैर्ननंदु: ।
तत श्विरंतनांचितन्यायपंचाननं निस्पृहत्वभूत्याभूषितपंचाननं व्यवहारपारपारावार-
नौकर्णधार प्रबुध्दामोदारामरामशास्त्रिणं प्रति श्रीमद्विवाहोचिततिथिनियम: कर्तव्य इति
विज्ञप्ति: प्रेषिता । तद्वाक्यश्रवणं श्रवणभूषणं मत्वास्तुत्वा द्विजकुलकलकलै:-
प्रात:संध्योदितांशुमालीव वादिकुलकोलाहलै: प्रतिहारिदर्शितमार्ग: शिबिकारूढ: श्री-
मन्मंदिरास्थानमंडपमगमत् । तत: पुरोहितप्रमुखद्विन्मंडलानयनार्थ तत्तन्महत्वा-
नुरूपशिबिकादियानानि प्रेषितानि । प्रतिहारिप्रशंसितप्रणामनामसकलविद्वन्मंडलमगमत् ।
हवीयस्वीयस्थानेषूपवेशितम् । निगमप्रकृतिविकृत्यनुपस्थिते:पुटपुटितोष्टपुटै
रूपनिषत्सारसानंदतुंदिलै रगण्यमणिगणप्रणतफणफणाधीश्वरफणीत्युदाहणोद्वरणपणै:
खंडत्रयाखंडोद्दंडपांडित्याडंबरविडंबितावितंडमंडलै: सकलानवद्यविद्योद्यानकलकलै
र्नानाशिखरप्रकैर: सुरालय इव प्रथमादिगणै र्महारुद्र इव स रराज । तदानीं त्रिस्कंध-
संधानसंधारणाधोरणीधीरदैवज्ञवर्य प्रति श्रीमद्विवाहोचिता सकलमुनिमतपरिचिता तिथि:
केत्यपृच्छत् । तत: स्वीयज्ञानाभिमानपवमानांदोलायमानमुखकमलै:-
श्रीमत्सूर्याचार्यादिवर्यसिध्दांतोध्दतषध्दत्युध्दृतदृग्गणितोपकरणशरणानि पंचांगान्यवलोक्य
एकविंशमहद्दोषनि:शेषकरणस्फुरणहेषारवारंभे सति सिध्दपुरुषं सिध्दय इव नयवंतं संपदिव
श्रीमंतं जामित्र्यमैत्र्यातपत्रै: पंचांगशुध्दयादिगुण: स्वयं वृणुते ।
निगमविष्णुपदाचलभूपते
र्निगमविष्णुतलभूमिते ॥
शकवरे करसंग्रहणं विभो
रसविराजितरासग्रहं हरे: ॥४॥
तत: प्रविशति संवत्सर: ।
त्रैलोक्यनायककरग्रहमंगलेन
सर्वे वदंति मम सार्थकनामधेयम् ॥
इत्युत्सवोत्कुलबलाच्छुभकृत्स्वलक्ष्मी
संवत्सरेषु बत दृग्विषयीचकार ॥५॥
चित्रात्मोत्तरायणप्रवेश: ।
सपत्नीं संत्यक्वा प्रियदिनकर: संप्रति चिरात्
कुबेराशायातो मम सदनमप्रार्थितमहो ॥
स्थिरं स्थातुं स्वीयायनमपि विवाहेर्पितवती
प्रभो: प्रोमोद्गारादरदलितपंकेरुहमुखी ॥६॥
तत: प्रविशति वसंत: ।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु॥ सवा खमसैन मया व अलफ सन ११६६, फसली,
अवल साल छ ५ रमजान, ४ मे १७५६,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६७८.
छ १० जमादिलाखर (१ जानेवारी १७५७) श्रीमंत नानासाहेब व भाऊसाहेबसुध्दां श्रीरंगपट्टणचे स्वारीस तोफखाना वगैरे फौजेसहित निघाले. कर्नाटकांत जाऊन संस्थानिकांकडील खंडण्या किरकोळ घेणें त्या घेऊन पुढें श्रीरंगपट्टणास गेले. तेथे ह्मैसूरचा राजा याचा दिवाण त्यावेळेस नंदीराज असतां श्रीमंतांनी मोर्चे लावून सत्तावीस दिवस तोफांचा मार पठाणावर झाला. भाऊसाहेब मोर्चात होते. रंगस्वामीचे देवालयाचे शिखरास गोळा घालून तोफा फुटून माणसें जाया झाली. नंतर पठाणापासून खंडाचें बोलणे लागलें. दरम्यान, महादशेट वीरकर, सरकारचे शेटे मध्यस्थ होते, त्यांचे विद्यमानें खंडणी छत्तीस लक्ष ठरली. तह होऊन त्यापैकी पांच लक्ष रोख घेऊन बाकी ऐवज फिटेतोपर्यंत महाल लावून घेतले होते. नंतर पेशवे यांचे मनांत आलें की, पूर्वी मराठ्यांकडे जितका मुलूख होता तितका घ्यावा. त्याप्रमाणें स्वारी करून छ ३ रज्जब रोजीं (२४ मार्च १७५७) चिनापट्टण घेतलें. शिरें परगणाही घेऊन पर्जन्यकाळ जवळ आला, सबब बाकी राहिलेले परगणे हुसकोटा व बेंगरूळ व बालापूर व कान्हेरे हे परगणे घेण्याकरितां त्या प्रांती कांही फौज बळवंतराव गणपत मेहेंदळे यांजपाशीं ठेवून, छ २७ साबानास (१६ मे १७५७) मुतालिकी शिक्का त्यास देऊन परत पुण्यास निघाले. तुंगा व कृष्णा नदीस पूर असतां यांनी वाट दिली, हें कौतुक सर्वांच्या दृष्टीस पडले. मजल दरमजल २७ दिवसांत पुण्यास आले. परत येतांना बेळगावचा किल्ला नबाब सावनूरकर यांणीं तहात पेशवे यांस लावून दिला होता, परंतु तो किल्ला इसुफ बेग किल्लेदार याजकडे होता तो हस्तगत करून घेण्याकरितां बेळगावास येऊन, छ १४ साबानास (३ मे १७५७) किल्ला सर केल्याची खबर लागतांच तेथील बंदोबस्त करून किल्लेदार यास किल्ला घेतेसमयीं कांही गांव देण्याचें कबूल केलें होतें, त्याप्रमाणें कसबे हुकेरी हा गांव या सालीं दिला; परंतु पुढें चिकोडी मनोळी तालुके करवीरकर संभाजी राजे यांची राणी जिजाबाई साहेब यांस अर्बा सितैनांत दिले, त्यांत हुकेरी हा ठाण्याचा गांव होता तो त्याजकडे गेला, सबब त्याचेमोबदला त्याचे चिकोडी तालुक्यांतले मौजे बलतवाड व गोडवाड व मसरमुदी हीं तीन गांवे त्या हुकेरीच्या आकाराचे मानानें त्यास दिले. ते आजपर्यंत याचे वंशजांकडे चालत आहेत. बेळगाव किल्ला घेऊन पुढें मजल दरमजल स्वारी पुण्यास रमजान महिन्यांत आली. जनार्दन बल्लाळ फडणीस वृध्द झाले, सबब त्यांचे पुत्र बाळाजी जनार्दन ऊर्फ नाना फडणीस यांजकडे फडणीशी छ ६ रबिलालवल, मार्गशीर्ष शुध्द ८ सोमवार (२९ नोव्हेंबर १७५६) सांगितली. पुढें लवकरच जनार्दन बल्लाळ वारले. मुलतान व लाहोर प्रांत इराणी बादशहाकडून सन् खमस खमसैनांत परत दिल्लीचा वजीर शाबुद्दीन यांणी घेतले. नंतर दुसरे वर्षी पुन: त्या इराणी बादशहानें परत घेऊन स्वारी करून दिल्ली शहर घेऊन नजीबउद्दवला यास तेथें ठेवून आपण माघारा आपले जागीं गेला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
श्रीगणेशायनम:
अथ रमास्वयंवरम् ।
रसामरपरंपरापरमपुण्यपुंजप्रभो
र्नभोमणिनिभोल्लसद्भ्ररकुंभलंबोदरम् ॥
पयोजविजयोध्दुरांकरकरग्रहगाह्यदृ
ग्रहधिपफलस्पृहारुचिरपत्रिकायांस्तुम :॥१॥
पंचांगत:समुदिताखिलभावसिध्दि
श्चंद्रप्रभाकरकविज्ञपुरंद्ररेज्या -॥
मंदारमेप्रकरहारविराजमाना
वाग्देवतेव रचिता किल लग्नपत्री ॥२॥
पूर्वरंगप्रसंगसंगतिं विना श्रोतृचित्तचित्रचमत्कारोपचय. विकचितता न भवति । अत: किंचिदुच्यते । एकदा तु श्रीमद्वहलमंगल सुधासांद्रनूत्नरत्नाकरीयामंद्रामोद मंदारदाभोल्लसिताद्यसुवेलाया सुवेलाया कुसुमशरप्राज्यसाम्राज्योज्जीवनकलाललितालवालित गंगाधरोत्तमांगल्योंत्तसमांसलेदुमंडलात् पीयूषपुर इव, सत्सौभाग्यारविंदानंदमकरंदामोदमुदितेंदिरामंदिरऱ्हृन्मुकुंदधुरकमलाद्गलिततरमकरंदमंदकिनीव, पंचशरप्रपंचावंचकानुचरचारुचाथेयमंचकोचितक्विचकुसुमात्करोत्फुल्लवल्लीवेल्लितमलयाचलाद् दरदलितवेलापरिमलपरिशीलितमंदसुगंधशीतलानिलइव, कृतसुकृतामृतसंभृतद्वर्णालवालोदित संतानसंतानैकफलना नामात्यकुलतिलकस्वातंरात् त्रिभुवनैकराज्यलक्ष्मीललामश्रीमन्माधवरायविवाहकरणमनो-रथ:प्रादुरभूत्।तत्र साक्षाद्राक्षादीक्षादीक्षिताचार्यवाङ्ममयाधुर्यसुधासेकोज्जीवतानेक-लोकं शक्रविक्रम- विक्रमाक्रमितदिक्चक्रं नितांतसामंतैकांतश्रोंतस्वांत विश्रंभस्तंभगंभीर श्रीहरिपंतामिधमाह्यू स स्वाभिलाषितं निवेदितवान् | तेन तन्मनोरथोक्ति र्जगद्वंद्यव्दिक लेंदुलेखेवांबरेण प्रपूजिता । तदानंदपुलकोद्रमैराकलितकलेवरो वक्ति ।
अहह ! मग मुखाब्धे: पूर्णचंद्रोदय:किम्
समुदयति मदीयप्रेमपीयूषपूरं: ॥
अविकलकलधौतस्थूलमुक्ताकलापै
स्त्रिभुवनजयलक्ष्मीक्षेकृद्वासवोयम् ॥३॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
दहा लक्ष रुपये सांपडले. पेशवे यांशी वांटणी न देता सर्व आपणच घेतले; आणि विजयदुर्ग किल्ला आपणाकडे असावा व बाणकोट पेशवे यांस द्यावें अशी तजवीज योजिली. पेशवे कर्नाटकांतून आल्यावर १२ अक्टोबर १७५६ रोजी इंग्रेजांशी असा तह ठरला की, बाणकोट व त्याखालील मुलूख इंग्रेजांनी घ्यावा व विजयदुर्ग पेशवे यांजकडे असावा. मराठे सरदारांनी किल्ले घेतले त्याची वर्तमाने :- छ ५ मोहरम (१२ अक्टोबर १७५५) भवाळगड फत्ते जाल्याचें वर्तमान आलें. छ २५ रबिलावल (२९ डिसेंबर १७५५) खारेपाटणची गढी फत्ते जाल्याचे वर्तमान आलें. छ १७ रबिलावल (२१ डिसेंबर १७५५) अनवाळें घेतल्याची बातमी आली. छ ८ रबिलाखर (११ जानेवारी १७५६) राजापूर घेतल्याचे वर्तमान आलें. छ २१ रबिलाखर (२४ जानेवारी १७५६) गोवळकोट लढाई होऊन फत्ते जाला. छ ४ जमादिलावल (५ फेब्रुवारी १७५६) गोवळकोट वगैरे महाल सरकारांत घेतल्याचे पत्र रामाजी महादेव यांजकडून आले. छ ११ जमादिलाखर (१३ मार्च १७५६) रसाळगड फत्ते झाल्याची बातमी आली. छ ३ जमादिलाखर (५ मार्च १७५६) विजयदुर्ग फत्ते जाल्याचें वर्तमान आले. कांही दिवस इंग्रजांकडे राहिला. छ ११ व छ २१ जमादिलावल (१४ व २४ जानेवारी १७५६) रामगड घेतल्याची पत्रें आलीं. तुळाजी आंग्रे यास धरून विसापूर किल्ल्यावर कैदेंत ठेविलें. छ १ जिल्काद (१० आगस्ट १७५५) नारायणराव जन्मले. कन्या रास, श्रावण शुध्द ३ रविवार, जानकीबाई दादासाहेब यांची बायको बाळंत होऊन वारली. छ १३ जिल्काद श्रावण वद्य १, पुत्र जाला होता. गोपाळराव बर्वे यांची बहीण. छ ४ सफर (९ नोव्हेंबर १७५५) चाकण किल्ला फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ १३ रबिलावल (१७ डिसेंबर १७५५) गलगलें येथें दादासाहेबांचे दुसरे लग्न जालें. मार्गशीर्ष शुध्द १४. राघो महादेव ओक यांची कन्या नांव आनंदीबाई. छ ४ रबिलावल (८ डिसेंबर १७५५) सगुणाबाई यात्रेस गेली. पर्वतीचे तळ्यास काम लाविले. छ २३ सफर मुतालिकीची शिकेकटार परत आली. मुर्शिदाबादचा नवाब अल्लीवर्दीखान मेला. त्याचा नातू-मुलीचा मुलगा-मिर्झाहमद सिराजउद्दवला गादीवर बसला. बुंदीचा राजा मेला. त्याचा मुलगा लहान, सबब पितृव्य पुत्र गादीवर बसूं देईना, राजाच्या बायकोनें शिंद्यांची मदत मागितली. त्यांनी प्रतिस्पर्ध्यास कैद करून, मुलास गादीवर बसविलें. पाऊण कोट रुपये खंडणी घेऊन शिंदे माघारे निघाले. श्रीगोंद्यास श्रीमंत भेटीस आले. अर्धे मारवाड काबीज केलें तें त्यांजकडे दिलें. त्यांस कोणाची वांटणी नाही. जनकोजीस सरदारी शिकेकटार दिली. महादाजी अंबाजी व त्र्यंबकराव सदाशिव पुरंधरे यांचे सरंजाम वांटणीविषयी छ ११ साबान (११ एप्रिल १७५६) रोजी सनदापत्रें झालीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
समक्ष लढाई पाहिली. स्वार पायदळ सरकारचे शे दोनशे पडले. जखमी सरकारचे जाहाले त्यास इनामें बहुत दिली. जखमीनेहि दिले. फिरंग्यांचा नाश बहुत सात आठशे माणसाचा जाहाला. अशी आवई सायंकाळ पावेतों आली. शहरात चौकी पाहारे यांचा बंदोबस्त रोज गु॥ प्रमाणेंच होऊन तोफ शनवारचे वाडयांतच जाहाली. द्वादशी रविवारी वर्तमान उठलें स्वारी माहुलीस गेली, कांही फौज पंढरपुराकडे कर्नाटकांतून पलटणें आली त्याजवर रवाना जाहाली, अल्पिष्टीण नगरास गेले. त्रयोदशीस वर्तमान इंग्रजांचे लोकांत फितुर करून लोक पळवीत होते, ते शिपाई व ब्राह्मण सांपडले. त्यापैकी एक आदमी प्यादा रामजी लोकरे यांस गळीं मि॥ म॥ रीं दिल्ही. गळीं देते समयी गावांत फिरवून दवंडी फिरविली कीं इंग्रजाचा शिपाई फितुर केला सबब गळी देतात. याप्रमाणें जाले. ब्राह्मण तीन चार अ॥ कैदेंत ठेविले. व॥ १४ पासून झाडून वाटा बंद करून माणसांचे झाडे घेऊन कागदपत्र जाण्याचें बंद केले. अमावस्येस याचप्रमाणे वाटांचे बंदोबस्त जाले. पौष शु॥ १ पावेतों सदर्हू प्रों बंदोबस्त झाले. शु॥ २ सायंकाळी आवई उठली, पंढरपुराकडून दोन हजार गाडद व हजार तुरुक स्वार, अठरा तोफा या प्रो कर्नाटकची पलटणें आली, ती माहुलीकडेस स्वारीकडेस गेली. या प्रों वर्तमान आले. शु॥ ३ वर्तमान शहरांत बोलू लागले, कोरेगाव कुमठे येथें पंढरपुराकडून पलटणें आली, त्यांची लढाई झाली, सरकारचे फौजेनें दोन पलटणें गारद केली, सरकारची फौज दोन तीन हजार गारद जाली. याप्रमाणें बोलू लागले. शु॥ ४ व शु॥ ५ सदर्हू प्रों वर्तमान सारे शहरांत बोलू लागले. दोन पलटणें मारिली. सरकारची फौज पांच चार हजार पडली. त्रिंबकजीस जखम लागली. नारोपंत आपटयास गोळी लागली. याप्रों अवया आल्या. शु॥ ६ मंगळवारी याब॥ आवया उठल्या. सायंकाळचे प्रहर दिवसास झाडून सरकारचे झेंडे भगवे चावडयांवरचे व पेठेंतून होते त्यांची भगवी निशाणें काढून काठया होत्या त्या काढून टाकिल्या व फिरंग्यांची निशाणें त्यांचे जवळ होतीं ती मात्र ठेविली. याप्रों वर्तमान जालें. शु॥ ७ वर्तमान स्वारी मिरजेस गेली. फौजा झाडून कोरेगाव, कुमठें, वांगी वगैरे जागोजाग आहे. फिरंगी याचीं पलटणें शिराळे याचे रोखानें आहेत. याप्रों वर्तमान बोलू लागले. शु॥ ८ वर्तमान. सरकारची फौज निरेचे पुलाजवळ कांही आली. श्रीमंत निपाणीस गेले. याप्रों बोलू लागले. शु॥ ९ वर्तमान. सरकारी फौज झाडून मिरजेस रोखासच आहे. श्रीमंत निपाणीस गेले. इंग्रज दोन तीन पलटणें बारामती, शिरोळ वगैरे रोखास आहे. अल्पिष्टीण साहेबहि गारदवंडेकडून बारामतीस गेले. याप्रमाणें बोलूं लागले. शु॥ १०, सदर्हू प्रमाणेंच वर्तमान बोलू लागले.
समाप्त
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
रात्रौ शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मित्ती व॥ १ बुधवारचें वर्तमान. फिरंगी खासा अल्पिष्टीण साहेब बुणगे घेऊन नगरास गेला. कोणी ह्मणते घोडनदीसच आहे, असेंहि बोलतात. खासा स्वारी आली. कोणी ह्मणते घोडनदीसच आहे, असेंहि बोलतात. खासा स्वारी अकळोजेस आहे, गोखले वगैरे जेथच्या तेथे आहेत, शहरातूंन लोक भारी बाहेर जात आहेत, होळकर येऊन मिळाला असें ह्मणतात. कोणी ह्मणतें होळकर याची फौज अजून फार लांब आहे. असें वर्तमान बुधवार सायंकाळपर्यंत जाहालें. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. पुढें द्वितीयेंचे वृत्त गोविंदराव लिहितील. मार्गशीर्ष व॥ २ गुरुवारचें वर्तमान. बापू गोखले यांचे मुलास देवआज्ञा स्वारीत जहाली. बापू गोखले समाचारास गेले होते ते परत आपले लष्करांत आले, असेंहि लोक बोलतात. व गणपतीचे रांजणगांवी गोविंद बक्ष याचे पांच सातशे स्वार आले होते, त्याजवर छापा सरकारचे स्वारींना घोलोन कांही मारिले व कांही पळाले, असेंहि लोक बोलतात. याप्रमाणें सायंकाळ पावेतों होऊन तोफ शिरस्ते प्रो. जाली. वद्य ३ शुक्रवारचें वर्तमान. श्रीमंताची स्वारी ब्राह्मणवाडयाचे घाटावर लिंगदेवास आहे असेंहि लोक बोलतात व इंग्रज घोडनदीस एक पलटण राहून बाकी नगरास गेले, सरकारचे स्वार चरवली पावेतों येऊन गावगन्ना वसूल नेतात, व तोफखाना मिरजेकडे मागें सरकारचा राहिला होता तो व दुसऱ्या आणखी तोफा मिरजेच्या वगैरे मिळोन व गाडदी व काटक पायदळ जमवून स्वारीत पोचल्या असेंहि लोक बोलतात. धारवाडाहून बलारीकडून दोन पलटणें इंग्रजाची घेऊन घोडनदीस पोचली असेंहि लोक बोलतात. या प्रो सायंकाळ पावेतों वर्तमान होऊन शि॥ प्रो तोफ जाली. वद्य ४ मंदवारीं वर्तमान उठलें की बापू गोखले याची सून सती गेली व लोहगडास एक पलटण रवाना जालें. कोणी ह्मणतात इंग्रजाच्या बायका मुंबईस जात आहेत त्या सबब घाटाचे वगैरे बंदोबस्तास गेले. कोणी ह्मणतात लोहगडावर मोहीम केली. दुसरे वर्तमान. सुवर्णदुर्गचा किल्ला पाण्यांतून धुळपांनी गलबतें आणिली व पायमार्गे नारोपंत आवटी यांनी जाऊन हल्ला करून घेतला. या प्रो सायंकाळ पावेतों वर्तमान होऊन शि॥ प्रो तोफ जाली. इ॥ व॥ ५ ता॥ व॥ ७ पावेतों वर्तमान कांही उठले नाहीं. अष्टमीस दोन प्रहरी शहरांत हूल भरली की श्रीमंतांची स्वारी फुलगावास आली, पेंढार वगैरे हजार दोन हजार स्वार तलाव्यास खंडोबाचे माळावर आले, इंग्रजाचे लोक दोन धरून नेले वगैरे. दापोडी आसपासचे गाव झांबडले या आवईनें शहरांत रस्त्यांत लोक माणसावर माणूस पडलें. अशी हूल तीन वेळ सायंकाळ पावेतों भरली. फिरंगी याचे पहारे नाक्यावरी झाडून गाठोडीं बांधून तयार जाले. कोणी बोलूं लागले छापा येतो. कोणी बोलू लागले की शहर घेतात. असें वर्तमान होऊन शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. नवमीस प्रात:काळीच याप्रमाणें हूल भरली. फौज कवडीचे मु॥ आली ह्मणोन आवई येऊन, फिरंगी झाडून तयार होऊन किरकोळ नाक्यावर प्यादे होते ते जमवून, बुधवार वाडयाशी शंभर व गद्रे यांचे वाडयाशी शंभर, व शनवारचे हणमंताजवळ पन्नास, याप्रमाणे (शिरा) याचे रोखाचे रस्त्याचे बंदोबस्त केले. गारपीरचे खटले रास्ते याचे वाडयांत भरून, वाडयाचे रस्ते रोखोन तोफा गाडद वगैरे बंदोबस्त केला. जुने वाडयाचे दिल्ली दरवाजावरील बंगल्यावरचे गच्चीवर एक तोफ चढविली. या प्र॥ बंदोबस्त फिरंग्याचा जाहाला. तोफ शिरस्तेप्रमाणे जाहाली. दशमीस वर्तमान उठलें कीं कोरेगावचे मु॥ दोन पलटणे घोडनदीकडील येत होती त्याची बातमी लष्करात कळली व त्याचे दुमदारीवर पुरंधरे वगैरे फौज होती ती व स्वारीतील फौज हि त्याचे अंगावर जाऊन लढाई मोठी जाहाली. एक पलटण मारिले, याप्रमाणे आवई आली. सायंकाळी शहरात हूल भरली शहरावर छापा येतो. असेंहि लोक बोलू लागले. फिरंगी याचे लोक बुधवार चावडीवर पाऊणशे अ॥ पावेतों तयार, चौकीपाहारा खडा, याप्रमाणें जागोजाग बंदोबस्त केले. जुने वाडयावर दिल्ली दरवाज्यावर दुसरी तोफ आजच चढविली. रोजची तोफ शिरस्त्याची वाडयावरची केली. व॥ ११ मंदवारीं वर्तमान नवल विशेष नाही. अल्पिष्टीण नगराकडून फिरून श्रीमंतांचे फौजेचे दुमदारीवर आला. कोरेगांवी लढाई जाहाली. खरी स्वारी जेजुरीचे रोखास आहे. फौज सारी सरकारी फुलगांव, कोरेगांव, सासवड, जेजुरी पावेतों पसरली आहे. कोरेगावचे लढाईस श्रीमंत बाबासाहेब फुलगांवचे टेकडीवर उभे होते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
पुणेयाहून कांही इंग्रज यांची रवानगी लष्करात जाहाली असे बोलतात. होळकर याची फौज तापी नदी उतरली, श्रीमंताची स्वारी नाशिकास जाणार, तेथे ते येऊन मिळणार, असेंहि लोक बोलतात. इंग्रज याची पलटणें हिंदुस्थानात होती ती पांच मेली, कां तरी जरीमरी येऊन मेली, असें लोक बोलतात. नबाबाकडील फौज दहा हजार व पलटणें सुमारे दोन येऊन अठा चो दिवशी सरकारचे फौजेस मिळणार असेंहि बोलतात. सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहली. मित्ती शु॥ ११ भृगुवार + + + श्रीमंताची स्वारी जुनरास गेली. बापू गोखले याचा मुक्काम नारायणगावास आहे, फिरंगी घोडनदीवर आला, मागे फौज पुरंदरे, आपटे व विंचुळकर आहेत, असें ह्मणतात. दुसरें वर्तमान फिरंगी यांची रसद गेली होती ती आपटे यांचे फौजेने वाघोलीचे मैदानांत लुटली, कांही बैल अजमासें चार पाचशें नेले आणि बाकी माघारे आले. असेंहि बोलतात. कोणी ह्मणते की खासा इंग्रज अल्पिष्टिन साहेब पुणें मुक्कामी येणार, असेंहि बोलतात. गंगाधर शास्त्री याचा लेक लोहगडेचे वाटेने येत होता तेथे लोहगडकरी याणी तोफा मारल्या, तेथें कांही इंग्रज याची नासाडी जाहली असेंहि बोलतात. होळकराकडील वकील खंडोपंत बाबा यांसी थोरले वाडयात बलावून आणिले होते, तेथें साहेब याणें सांगितलें की तुचें पत्र येतें की नाही. ते वेळेस वकील याणीं उत्तर केलें की, साहेब, होळकरी डाक चलती नहीं, फेर वर्तमान कैसा आयेगा. तेव्हां तेणें सांगितलें की तुह्मी आपली डाक बसवा आणि रोज दरबारास येत जा. ते वेळेस याची वर्दी आली होती ती पुढें ठेविली. त्यांत मजकूर होता कीं आह्मी नर्मदा उतरलो, मार्गशीर्षी पौर्णिमेचे सुमारास येऊन मिळतो, तुह्मी चिंता करूं नये. ऐशी वर्दी पाहून बहुत येथील साहेब याचा संताप जाहाला. वकिलास काय करतो ? असा सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणे तोफ जहाली. मित्ती शु॥ १२ मंदवारचें वर्तमान तळेगावावर स्वारी आली ते वेळेस निपाणीकर अडला की मला पुण्याकडे जाण्याचा हुकूम द्यावा, मी आणि पुणें जसे घडणें तसें घडेल. श्रीमंतांनी उत्तर केलें की हें ठीक नाही, माझी आणि त्रिंबकजीची गांठ एका दोदिवशी पडावयाची आहे, ती पडली ह्मणजे तुह्मास निरोप देईन. तो ऐकेना. तेव्हां मागील दीड प्रहर रात्र अष्टमीचे दिवशी राहिली. ते वेळेस होळकराकडील डाक आली की स्वारी जलद कोपरगावास यावी, आह्मी येतों आणि गुरुपुष्यावर भेट व्हावी. अशी आली की निपाणकर यांस दाखविली. तेव्हां तो स्वस्थ जाहाला. नाहीतरी पुणें लुटावें की जाळावें असा मनसबा निपाणकर याचा होता. परंतु दैवयोगें राहिला असें लोक बोलतात. कोणी ह्मणते इंग्रज फार बेजार आहे. घोडनदीवरून नगरास जाणार आणि तेथें बळकावून राहणार. असेंहि बोलतात. याप्रमाणें सायंकाळपर्यंत वर्तमान जाहालें. रात्र जाहाली. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मि॥ शु॥ १३ रविवारचे वर्तमान. शहरात सावकारा फार गडबडला. आपली कुटुंबे काढू लागले. कोणी ह्मणत कीं इंग्रज याणें ताकीद केली की आमचे भरंवशावर राहू नये, तुह्मास कळेल तसें करावे. असेंहि बोलतात. कोणी ह्मणतात की आज स्वारीचा मुकाम बादुरास आहे. असेंहि बोलतात. कोणी ह्मणते की त्रिंबकजी भिल्लासुध्दां येऊन भेटला. त्याचे भिल्ल सुमारी ७००० आहेत. कोणी ह्मणते की भोसले यांणी लढाई चांगली मारली, फिरंगी फार शिकस्त जाहाला. कोणी ह्मणते की होळकर याची भेट गुरुपुष्यावर निखालस होणार. सारांश फिरंगी (पळाला) असेंहि बोलतात. सायंकाळ जाहाला. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मित्ती शु॥ १४ सोमवारचें वर्तमान. भोसले याजकडील फौज पाच सात हजार व हत्ती बाणांनी भरून सुमारी २०० व उंटे पाचशें व बाण लावणारी माणसें सुमारे ५०, ते पालखीपदस्त आहेत, असे येऊन श्रीमंतासी मिळाले, असे लोक बोलतात. पुणे बाहेरी धमधमे बांधतो आहे असेंहि बोलतात. इंग्रज घोडनदीवर आहे, गोखले वगैरे तेच तोंडावर आहेत, सल्ल्याचे बोलणे इंग्रज यांणीं घातले आहें, असेंहि बोलतात. अशी सायंकाळ जाहाली. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. मित्ती शु॥ १५ मंगळवार वर्तमान. थोरले वाडयांत साहेब पुणें मुकामीं आहेत ते एके ठिकाणी मिळून कोशल मांडिले आहे. त्यांस वर्तमान असें आलें की सरकारचे आरब सुमारी ५००० हजार शहरांत येणार आणि रस्ते बंद करणार. पुढें कसें करावें ही मसलत येऊन पडली आहे असेंहि लोक बोलतात. इंग्रजाचे लष्करात फार कोशल, फार खराबी आहे, बापू गोखले थुगावास आहेत, श्रीमंत नाशकास आहेत, असेंहि बोलतात. सुरापूरचे बेरडाची फौज तीन हजार व पायदळ एक हजार आहे, आवशी गोखले याचे फौजेत येतें, असें ह्मणतात. इंग्रज यांची पलटणें करनाटकांतून आकळोजेस आली. दोन हजार लोक आहेत असेंहि बोलतात. याप्रमाणें सायंकाळ जाहाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तेव्हां गोखले ह्मणाले कीं ठीक आहे, परंतु, तुमचा आमचा तह व्हावयाचा नाहीं, जें होणें तें लढाईचे अंतीं होय, तुम्हास दारू गोळा नसला तरी पोहचता करितों, रसद वगैरे पोचवितों, स्वस्थ होऊन लढाई व्हावी हें चांगलें. तेव्हां इंग्रज बोललें कीं आह्मास कुंपणीचा हुकूम असा आला आहे. तेव्हां गोखले याणीं सांगितलें कीं आम्ही सांगितलें असें लिहावें. दुसरें वर्तमान कीं गोविंदराव काळे हैदराबादेस गेले होते ते दहा वीस हजार फौजेनिशी आठ पंधरा दिवशीं येणार. असेंहि बोलतात. कोणी म्हणतात कीं जुन्नरची फौज खेडास आली. खेडापासून खंडणी दहा हजार घेतली. पुढें रोख होत चालले आहेत. पुणेयाहून इंग्रज याचीं पलटणें दोन तोंडावर गेलीं आहेत. असेंहि बोलतात. शहरांत वाडयांतील पहारेकरी होते ते कांहीं सरकारच्या वाडयाचा जामदारखाना होता त्याची भिंत फोडावयास लागले. ते कुडतीवाले यांणीं धरून वाडयात नेले. कोणी बोलतात नानाजी माणकेश्वर याचे येथें मेजवानीस गेले तेथें रुपये ६०,००००० साठ लाख घेतले आणि फौजेस खर्चास दिल्हें. असेंहि लोक बोलतात. कोणी म्हणतें होळकर याची बायको फौजसुध्दां महेश्वरास आली. फौज सुमारीं ऐशी हजार आहे. पुणेकडे जेजुरीस येणार असेंहि वर्तमान बोलतात. कोणी म्हणत श्रीमंत, नबाब एक होणार. आणिक एक वर्तमान, नारो विष्णू फौज सुमारीं दहा हजार येऊन, वासोटयास येऊन, महाराज छत्रपती व दोघे भाऊ व मातोश्री ऐशीं घेऊन, स्वारींत गेले. असेंहि बोलतात. असें वर्तमान जनवार्ता शहरांत रविवारचे सायंकाळ परियंत जाहलें. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मित्ती शु॥ सोमवारी वर्तमान श्रीमंताची स्वारी गारदौडेस आली असें बोलूं लागले. कोणी म्हणते, सासवडास येणार असेंहि बोलतात. दुसरें वर्तमान दाभाडे याचें तळेगांव फिरंगी यानीं जाळिलें आणि भवतालें गाव लुटले असेंहि बोलत आहेत. चिंचवड लुटणार असेंहि म्हणतात. सारांश फिरंगी यांची जेरी, श्रीमंताची जबरी असें सोमवारचें वर्तमान आहे. आणीक एक वर्तमान, रामोशी अ॥ २००० जमले आहेत, शहरावर चालून येणार. तेव्हां फिरंगी गडबडला आहे. सावकारींत ताकीद केली कीं तुम्ही हुशार असा, आज गलबल आहे, तेव्हां रविवार रात्रपासून शहरांत पुनरपि रात्रौ हुशारी भारी आहे. सोमवार सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणें तोफ जहाली. मित्ती शु॥८ भोमवारचें वर्तमान शहरांत प्रात:काळीं उठलें कीं श्रीमंताची स्वारी आज पुलगाव आपटीस येणार, तेथें त्रिंबकजी डेंगळा येऊन भेटणार. बराबर भिल्ल सुमारी ५००० व १०००० हजार फौज घेऊन आला आहे असे बोलू लागले. दुसरे बोलतात की मोरेश्वरास आले, बरोबर स्वारीची फौज सुमारी २५००० पंचवीस हजार आहे. कोणी ह्मणते की गोखले व पुरंधरे यांचे मात्र बनत नाहीं, इंग्रजाचा व श्रीमंताचा सल्ला जाहला. गोखले याचे लष्करांत महाराज छत्रपति आहेत असेंहि बोलतात. कोणी ह्मणतें की यांचा त्यांचा तह सर्वांचे मते जाहला ह्मणून बोलूं लागले. कोणी ह्मणते स्वारी गंगेकडे नाशिक कोपरगांवास जाते असेंहि ह्मणतात. कोणी ह्मणतें पुरंधराखाली तीन हजार फौज घेऊन नारो विष्णू आले आहेत. + + + राईतून इंग्रजांची पलटणें जाणार, त्यांची तयारी जाहाली होती ती राहिली. ऐशी सायंकाळ जाहली. भोमवारी रात्री शिरस्तेप्रमाणे तोफ जाहली. मित्ती शु॥ ९ बुधवार प्रात:काळी शहरांत वदंता आली कीं स्वारी तळेगावास नेऊन केंदूर पाबळेस मुक्कामास गेले. लोक बोलतात की सल्ला जाहला. दो चो दिवशी पुण्यांत अम्मल पेशव्यांचा येतो असेंहि बोलतात. त्रिंबकजी डेंगळा जाऊन बापू गोखले यासी मिळाला असेंहि बोलतात. फिरंगी याची पहिली रसद गेली आहे ती अजून पोचली नाहीं, तिला मराठी फौजेने वोढिलें आहे असेंहि बोलतात. कोणी ह्मणतें कोपरगावास स्वारी जाणार, इकडे सध्या येत नाहीं. अशीहि वदंता आली आहे. सायंकाळ जहाला. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. रात्र गुजरली. प्रात:काल जहाला. मि॥ शु॥ १० गुरुवार. आज स्वारीचा मुक्काम नारायणगावचा आहे असे लोक बोलतात. गोखले मागून तळेगाव परियंत आले, इंग्रज तीन कोश मागें, त्याचे मागें सरकारची फौज आहे. पुरंधरे, आपटे आहेत, असें लोक बोलतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा (अठरावे शतक)
तेव्हां त्याणीं करार केला कीं आमचे पत्र अल्पिष्टिन साहेब यांसी पोचलें म्हणजे तो निघोन येईल; परंतु आमचें पत्र तेथपर्यंत जात नाहीं. तेव्हां त्यानीं सांगितलें कीं, तुमचें पत्र आम्ही पोंचते करीन. लिहून द्यावें. ते वेळेस लाट साहेब याणें येथील इंग्रजास पत्र दिल्हें तें येथें येऊन स्वारींत गेलें. असें हिंदुस्थानचें वर्तमान लोक बोलूं लागले. कोणी बोलूं लागले कीं दपटीन साहेब दहा पलटणें घेऊन नागपुरास गेला. तेथें भोसले याची फौज चाळीस हजार आहे व पलटणें पाच आहेत. काय होईल तें बघावें असेंही बोलतात. अशी वदंता गुरुवार प्रहर रात्रपर्यंत जाहाली. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. रात्र गुजरली. शु॥ ४ भ्रुगुवारीं ऐशी वदंता लोक बोलूं लागले की फिरंगी अल्पिष्टीन बहाद्दर मागें फिरले, पुणेकडे रोख आहे. दुसरी वदंता कीं स्वारी श्रीमंताची सिध्द जाहाली. असेंही बोलूं लागले. तिसरी उठली कीं नागपुरास लढाई होऊन भोसले शिकस्त जाहाले; आणि गांवांत शिरले; इंग्रज याणीं वेढा दिल्हा आहे. अशी वदंता लोक बोलतात. शिंदे याची डाक पुण्यांत आली. ती फिरंगी याणीं धरून थोरले वाडयांत नेली. आणि साऱ्या सावकार मंडळीस ताकीद केली कीं शिंद्याचे डाकेवर ज्यांचीं पत्रें आलीं असतील तीं आणून दाखवावीं. असेंही वर्तमान जाहालें. शहरचा रामोशी नांव अर्जुन नाईक येऊन भेटला. त्याणें जिम्मा घेतला कीं दरवडा पडूं देत नाहीं. तेव्हां त्यास पोषाख पागोटीं शेले दिल्हे आणि शहरचा बंदोबस्त केला. कोंढवेकर गावकरी यांसी सोडून दिल्हें. आज चिंचवडास धऊस गेली होती. इंग्रजी लोक अ॥ ४०० व दोनशे स्वार असे गेले होते. त्याणीं गावकरी पाटील एक फार फार जखमी केला आणि पाच पाटील व कुळकर्णी दोन धरून आणिले आहेत. त्यास म्हणतात कीं रामोशी तुचे गावचे आमचे हवालीं करावे. तेव्हां त्याणीं करार केला आहे, आठा दिवसांत रामोशी आणून देतों. साहेब बोलला कीं आम्ही बोली ते वेळेस सोडूं. असें भृगुवारचें वर्तमान जाहालें. परंतु आज इंग्रजांचा जोर व पेशव्यांची कमती बोलतात. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. उज्याडलें. मि॥ शु॥ ५ शनवारचें वर्तमान. स्वारींतील वदंता. कोणी म्हणत नागपूर X X X X X कोणी ह्मणतात कीं नबाब पोलादजंग आणि श्रीमंत एक होणार. कोणी बोलतात कीं गोखले व श्रीमंत यांचे वांकडे आले. कोणी बोलतात कीं हिंदुस्थानांत जाणार ऐशी बातमी आली तीस ठिकाण नाहीं. कोणी म्हणत सिध्दटेकासही आले, परंतु फिरंगी याचा जोर भारी आहे. दुसरी बातमी कीं जुन्नरास फौज आली, आजमासें १५००० आहे. कोणाची पुसलें तरी नांव सांगत नाहींत. असें ही बोलतात. कोणीं म्हणतें त्याजवर इंग्रजी पलटण एक व दोनशे स्वार व पांच तोफा गेल्या. असें ही बोलतात. तिसरी बातमी कीं भोसले याणीं सहा पलटणें कापून काढिलीं आणि इंग्रज यासी सहा कोश मागें हटविला आहे. असें हि बोलूं लागलें. शहरांतील वर्तमान गल्ल्या बोळ शहरांत होते ते फिरंगी चिणून भिंती घालीत आहेत. चोरांचे बंदोबस्ता करितां ह्मणतात. आपण सारा गारपिरास येऊन उतरला होता तो आज कांहीं खडकीवर गेला आणि तेथें राहुटया दिल्या. रास्ते याचे वाडयांत फिरंगी जाऊन राहिला. देवाचे नैवेद्य व नंदादीप वगैरे चालते केले. पर्वती बेलबाग वगैरे संस्थानें सर्व पूजा पुरस्कर चालावे. रात्र जाहली. शिरस्ते प्रमाणें तोफ जाहाली. प्रात:काळ शुध्द ६ रविवारचें वर्तमान. लोक बोलूं लागले कीं श्रीमंताची स्वारी सिध्दटेकानजीक बाभूळगांव आहे तेथें आहेत. फौज बरोबर सुमारी २५००० आहेत. बरोबर चिंतामणराव आपा, गोखले यांचे चिरंजीव व अंताजीपंतमामा गद्रे व बाळाजीपंतमामा ही आहेत. बरोबर गोखले मंडळ + + + + + गोखले अलीकडे दहा कोश असें म्हणतात. त्या अलीकडे तीन कोश इंग्रज बहादर आहेत. हे त्याचा सीवार स्वयंपाक पहातात, ते याचा बघतात. अलीकडे विंचुळकर व पुरंधरे आहेत. कोणीं ह्मणतें खासा अल्पिष्टीण बरोबर चटेकरी पांच हातांत काठया व भोई दहा व खिजमत गार असामी दोन व बाळाजी नातू माणसें दोन असे खासा स्वारींत गेले, तेथें प्रभूकडे सांगून पाठविलें कीं आम्ही कांहीं विनंती करावयास आलों आहों, तेव्हां त्याणीं उत्तर केलें कीं जें बोलणें ते बापू गोखले याशीं बोलावें. तेव्हां गोखले याचें लष्करांत आला. त्याणीं त्याचा आदर करून पुशिलें कीं कां येणें जाहलें. ते वेळेस अल्पिष्टीण ह्मणाले कीं तुमचा आमचा तह असावा, तुम्हीं पुणेयासी महाराजास घेऊन चलावें, जसें पहिलें होतें तसें चालावें.