Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

धारजिणा [ धृज् गतौ धृंजति to glide smoothly. धृंजानः one gliding smoothly = धारजीणा ] one with whom dealings could be transacted smoothly and favourably.

धारजिणें [ धार्यजीवनं ( धार्य जीवनं यस्य) = धारजिणें ]

धारा [ धारा (रीतभात ) = धारा ] शिरस्ता.

धारिष्ट [ धार्ष्ट्यं = धारिष्ट ]

धाला [ समा + धा ] ( धातुकोश-धा ७ पहा )

धावडा [धवट: = धावडा (वृक्ष ) ]

धावा १ [ ( थे ) ध्यायः = धावा ]

-२ [ ध्यै-ध्यामन् = धावा ] prayer.

-३ [ उपधाव् to pray, to praise, स्तवणें = (उप लोप) धावा ]. उपधावः =धावा (prayer to approach)

धांवा [(ध्यै ) ध्यापः = धावा = धांवा ] धांवा म्हणजे वारंवार त्या च त्या गोष्टीचा उच्चार. ( भा. इ. १८३६ )

-२ [ ध्यामन् = धांवा ]

धाविन्नल [ धाव् गतौ : धाविन्न + ल = धाविन्नल (ला-ली-लें) ] धाविन्नणें असा धातू गोडबोले देतो तें चूक.
धावणें ची जुनी निष्ठा धाविन्नल.

धास्ती १ [ ध्वस्ति ] ( धातुकोश धास्त पहा)

-२ [ ध्वस्ति ] (निर्धास्त पहा )

धटाई [ धृष्टता ] ( धटाई पहा )

धिंड, धिंडका [ हिंडी = धिंड, धिंडका. हिंडी name of दुर्गा ] भटक्या स्त्रीला उद्देशून "ही धिंड, धिंडका कोठून आली," असा प्रयोग करतात.

धिमा, धिम्मा [ धमित् = धिमा, धिम्मा ]
धिमा म्हणजे विचारपूर्वक वागणारा. ( भा. इ. १८३४)

धिम्मा २ [ धृतिमान् = धिइमा = धिम्मा ] bold.

-३ [ म्तिमित = थिमिअ = धिमिअ = धिम्म = धिम्मा, धिम्मी, धिम्में ] (ग्रंथमाला)

धिवसा [ अध्यवस्या = ( अ लेप ) धिवसा, धिवंसा ] (भा. इ. १८३४)

धिवसा, धिंवसा [ अध्यवसाय ( उत्साह ) = धिंवसाअ ( अ लेप ) = धिंवसा ] (भा. इ. १८३६ )

धीट [ धीष्टित = धीट्टिअ = धीट ]

पेठे १ - पैष्टा: (स)
-२ पैठीनस्यः (स)
-३ पैष्ठाः (कों )

पेंडसा - पिंडसः (भिक्षु, भिकारी ) = पेंडसा. (भा. इ. १८३३)

पेंडसे - पिंडिकाक्षा: ( कों )

पेशवे - धंद्यावरून (कों)

पै - हें आडनांव ब्राह्मणांत आहे. ह्याचें मूळ पति. (ग्रंथमाला)

पोंक्षे - पवनाशाः ( कों ) ( स )

पोटे - प्रौष्टिकाः (स)

पोतनीस - धंद्यावरून ( कों )

पोते [ सं. पोतक - महा. पोतअ - मरा. पोते ] (म) (इतिहाससंग्रह)

पोरे - पौरेयाः पौरि: (स )

पोळ - पौलाः (स)

प्रभु - प्रभुः ( स )

प्राणी - पारणाः ( क )

फडणीस - धंद्यावरून (कों)

फणशे - पानस्याः (क)

फणसळकर - ग्रामनामावरून. (क)

फणसे - पानस्याः ( कों )

फणिवर - [ सं. फणिवर ] ( म ) (इतिहास संग्रह)

फाटक - फाण्टाः ( स ) ( कों )

फाँटक - फाण्टाः ( कों )

फाळके - स्फालक: ( शत्रोः ) = फाळका (आडनांव)

फुले - पुलहाः (स)

बखले - बाष्कलिः (स)

बखले (बाखले) -बाष्कलिः (क)

बगळे - बालाकयः (स)

बडिये - पटिकाः (कों)

बदरे - बादरायणाः (स) ( क)

धांगडी [ ध्वांक्षी a begger, outcaste woman + ट (diminutive) धांगडी ] a low woman.
उ०- परि धर्मपत्नी कां धांगडि। पोसितां जरि एकि वोढि ।
तरि कां अपखडि । आणावी आंगीं ॥ ज्ञा. १८-९३६

धाड १ [ धाटी (दरवडा, हल्ला) = धाडी = धाड ] (भा. इ. १८३३)

-२ [ धाटी = धाड ] अस्माकमग्रे धाटी निपतिता ( धर्मदत्तचरितम् ) (भा. इ. १८३४)

धाडकन् १ [ ध्राड् विशरणे ]


-२ [ द्राड to break to pieces = धाडकन् ] धाडकन् हापटणें to let fall so as to break to pieces.


धाडधाड [ द्राड् १ अवयवे, विशरणे. (द्विरुक्ति) द्राडंद्राडं = धाडधाड किंवा दाडदाड भांडीं आपटलीं. ] ( धा. सा. श. )

धाडस १ [ धार्ष्ट्य = धाडस ]

-२ [ दार्घर्षं = धाडस ] ( धडक पहा)

धांदल [ द्रा २ गतौ ] ( धातुकोश-धांदल पहा)

धांदळ [ द्रा २ धावने. दाद्राय = दादल = धांदळ] ( धा. सा. श. )

धाबें [ धामन् = धाबें ] घराचा वरचा उघडा भाग.

धाम [ धर्म = धम्म = धाम ( कामधाम ) ] (भा. इ. १८३२)

धामण [ धन्वनः = धामण ( वृक्ष ) ]

धाम्या १ [ ध्याम: (काळें, मलिन) = धाम्या (black dirty) ] धाम्या माणूस म्हणजे मलिन माणूस. ` देशस्थ माध्यंदिनांना धाम्या हें विशेषण कोठे कोठें लावतात. कारण त्यांच्यापैकीं पुष्कळ लोक धामट असतात.

-२ [ धाममेहिन् (घरांत मुतणारा) = धाम्या ] धाम्या देशस्थ आहे म्हणजे आळशी गलिच्छ आहे.

धायटी [ धातकी = धायटी ]

धायरी [ धातकीपुरी = धायइउरी = धायरी ]

धार १ [ धारा ( शस्त्राची ) = धार ]

-२ [ धारू sucking = धार milk-suck ] धार काढणें म्हणजे दूध काढणें. धृ पासून धार निराळा.

-३ [ धारुः (स्तनपानं कुर्वन् धे ) = धार ] दुधाची धार-अथर्ववेद-चतुर्थकांड-अनुवाक ४-सूक्त १८-ऋच् २.

धमासा १ [ धन्वयासः = धमासा (वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)

-२ [ धन्वयवासः = धमासा ]

धरण [ धरणः (बांध) = धरण] बिनकमानीचा बांध. (भा. इ. १८३६)

धरती कांप [ धरित्रीकंप = धरतीकांप ]

धरपकड [धृ + प्रकट्= धरपकड ]

धरधरून [ धृ to hold ]

धरम वाढा [ धर्म उपपादय = धरम वाढ ] धर्म उपपादय याचा अर्थ धर्म मिळवा, धर्म जोडा, पुण्य मिळवा, असा मूळचा आहे. आतां धर्म, धरम म्हणजे दान, भिक्षा असा अर्थ होऊन धरम वाढा म्हणजे दान, भिक्षा वाढा असा अर्थ झाला आहे. ( धा. सा. श.)

धरसणें [ धृष् ५ प्रागल्भ्ये. धर्षणं = धरसणें ] (भा. इ. १८३४)

धरसोड १ [ उद्धरोत्सृजा (मयूरव्यंसकादि) = धरसोड ] ( ओसाड पहा )

-२ [ धृतिसृष्टि = धरसोड ]

धर्मलंड [लण्ड् उत्क्षेपणे ] धर्माचें उत्क्षेपण करतो तो. ( ग्रंथमाला)

धवलार [ धवलागार = धवलार (चुनेगच्ची घर)
कवलागार = कवलार (कवलानें शाकारलेलें घर)
तृणागार = तणार ( गवतानें पांजरलेलें घर)] धवलार व तणार हे शब्द ज्ञानेश्वरींत येतात. (ग्रंथमाला)

धवलारें [ धवलगृहं ( राजवाडा) = धवलारें, ढवलारें]

धश्चोट [ अधश्चोदक = धश्चोडअ = धश्चोट ] खालीं पाडून मारणारा. (भा. इ. १८३६)

धस [ धासस् = धस, ढस ] डोंगराची धस, ढस.

धस्स [ साध्वसं = धस्स ( सा लोप ) ] माझ्या हृदयांत धस्स झालें = मे हृदि साध्वसं समभवत्. (भा. इ. १८३५)

धा [ दाहः ] ( डाह पहा )

धाक [ ध्राघ् १ सामर्थ्ये. ध्राघः = धाक] सामर्थ्य, दरारा. ( धा. सा. श. )

धाकधुक [ संकसुक (अस्वस्थ, चंचल) = झांकझुक = धीकधुक. वसिष्ठ संहिता-दहावा अध्याय शेवटील कलम ]

धमासा १ [ धन्वयासः = धमासा (वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)

-२ [ धन्वयवासः = धमासा ]

धरण [ धरणः (बांध) = धरण] बिनकमानीचा बांध. (भा. इ. १८३६)

धरती कांप [ धरित्रीकंप = धरतीकांप ]

धरपकड [धृ + प्रकट्= धरपकड ]

धरधरून [ धृ to hold ]

धरम वाढा [ धर्म उपपादय = धरम वाढ ] धर्म उपपादय याचा अर्थ धर्म मिळवा, धर्म जोडा, पुण्य मिळवा, असा मूळचा आहे. आतां धर्म, धरम म्हणजे दान, भिक्षा असा अर्थ होऊन धरम वाढा म्हणजे दान, भिक्षा वाढा असा अर्थ झाला आहे. ( धा. सा. श.)

धरसणें [ धृष् ५ प्रागल्भ्ये. धर्षणं = धरसणें ] (भा. इ. १८३४)

धरसोड १ [ उद्धरोत्सृजा (मयूरव्यंसकादि) = धरसोड ] ( ओसाड पहा )

-२ [ धृतिसृष्टि = धरसोड ]

धर्मलंड [लण्ड् उत्क्षेपणे ] धर्माचें उत्क्षेपण करतो तो. ( ग्रंथमाला)

धवलार [ धवलागार = धवलार (चुनेगच्ची घर)
कवलागार = कवलार (कवलानें शाकारलेलें घर)
तृणागार = तणार ( गवतानें पांजरलेलें घर)] धवलार व तणार हे शब्द ज्ञानेश्वरींत येतात. (ग्रंथमाला)

धवलारें [ धवलगृहं ( राजवाडा) = धवलारें, ढवलारें]

धश्चोट [ अधश्चोदक = धश्चोडअ = धश्चोट ] खालीं पाडून मारणारा. (भा. इ. १८३६)

धस [ धासस् = धस, ढस ] डोंगराची धस, ढस.

धस्स [ साध्वसं = धस्स ( सा लोप ) ] माझ्या हृदयांत धस्स झालें = मे हृदि साध्वसं समभवत्. (भा. इ. १८३५)

धा [ दाहः ] ( डाह पहा )

धाक [ ध्राघ् १ सामर्थ्ये. ध्राघः = धाक] सामर्थ्य, दरारा. ( धा. सा. श. )

धाकधुक [ संकसुक (अस्वस्थ, चंचल) = झांकझुक = धीकधुक. वसिष्ठ संहिता-दहावा अध्याय शेवटील कलम ]

धण ( धाकट) [ धणियबंधणबद्धाओ ( भगवतीशतकजैन ग्रंथ) ] धनिय म्हणजे निबिड, चिक्कण. धणिय = धण
धणधाकट या जोडशब्दांत हा धण शब्द आढळतो. (भा. इ. १८३६)

धणगट [धष्णज् + ट = धणगट ]

धणंतर [ धन्वंतरी = धणंतरी = धणंतर = धनत्तर ] धणंतर, धनत्तर ह्या शब्दाचा अर्थ सध्यां मराठींत समर्थ असा आहे. (भा. इ. १८३२)

धंदा [ धनदा = धनदा = धंदा ] धनदा (वैदिक ` म्हणजे धन देणारा. धन देणारा उद्योग तो धंदा, काम (कर्म), धाम (धर्म), आणि धंदा (धनदा) किंवा काम (इच्छा), धाम ( घर), आणि धंदा (रोजगार). धंदा म्हणजे रोजगार. धंदा मराठी शब्द व रोजगार फारसी शब्द. शब्दांच्या अशा जोड्या मुसलमानांच्या रियाशींत प्रचारांत फार आल्या. कारण फारसी शब्द समजून घ्यावे लागत. त्यामुळें मराठी शब्द व फारसी प्रतिशब्द एकदम बोलत. (भा. इ. १८३३)

धन - फांसे, कवड्या वगैरे टाकून जें दान घेतात त्याला धन म्हणतात. वेदांत धन हा शब्द फांशांच्या दानाला लावलेला आढळतो. धन = धन
तुला चांगलें धन पडलें, तूं चांगलें धन घेतलेंस, असे प्रयोग होतात. धनचाच अपभ्रंश दान. धन = धान = दान. (भा. इ. १८३६)

धनको [ धनकामः ( धने कामः यस्य ) = धनको.
ऋणकामः ( ऋणे कामः यस्य ) = रिणको, ऋणको ] धनको नाम विष्णु, रिणको नाम हरि.

धनत्तर [ धन्वंतरी ] (धणंतर पहा)

धपाटणें, धपाटा [ पट् १० ग्रंथे. अधःपाटन = धपाटणें, धपाटा] धपाटा म्हणजे खालीं पडेसें मारणें. (भा.इ. १८३६ )

धबका [ स्तंबघातः ] (घातुकोश-धबक पहा)

धबधबा [ दवीधू ५ चलने. दबीधावः = घबधबा ] (धातुकोश-धबधव पहा)

धमक [ ध्मांक्ष् १ इच्छायाम्. ध्मांक्षा = धनक ] ( धा. सा. श.)

धमनी १ [ धमनी = धमनी (सं.) ] (स. मं.)

-२ गुजराथेंत दमणी म्हणून एक बैलांची चलाख जात आहे. दमणी बैलांच्या गाड्या दगडगोटे यांच्या वरून इतक्या जलद जातात कीं, त्या घोड्याला हि आटपत नाहीत. धरमपूरचे राजे ह्या गाड्या ठेवतात. ह्या दमणी शब्दावरून मराठी धमनी शब्द झाला आहे. (भा. इ. १८३२)

पांडरे - पाण्डाराः ( स )

पांडे - पांडाः (स)

पांढरे - पाण्डाराः (स)

पाणके - पणिका: (स) 

पाताणे - पातानकाः (पाठारे पहा) 

पाध्ये -  उपाध्याय = पाध्या = पाध्ये (अनेकवचन).
              उपाध्याय = उपाध्या = उपाध्ये (अनेकवचन).
              उपाध्याय = उवझ्झा = ओझा = झा. ( सरस्वतीमंदिर )

पानसे - पानस्यः (स)

पारखी - १ पार्षतिः (कों)
-२ पार्षतिः = पारखइ = पारखी (स)

पारणे - पारणाः (स)

पारधी - पारिधेयाः ( स )

पाळंदे - हें आडनांव पालद ह्या पाणिनीय शब्दाचा अपभ्रंश दिसतो. प्रस्थोत्तरपलद्यादिकोपधादण् ( ४-२- ११०) ह्या सूत्रांतील पलदी शब्दाला अण् प्रत्यय लागून पालद झालें. पलदी प्रांतांत किंवा गांवांत राहणारा जो तो पालद. मराठींत अनुस्वार होतो; ह्या नियमानें पाळंद (मंग, कदाचित इ. इ.). ( भा. इ. १८३२)

पिंगळे - पिंगलाः (स)

पिंगे - पिंगाः ( क )

पिंजरे [ सं. पिंजरक - महा. पंजरअ - मरा. पिंजरे ] (म) ( इतिहाससंग्रह )

पिटकर - ग्रामनामावरून (कों)

पिटके - १ पेटकाः (स)
-२ पैटाकाः (स )

पिठरे [ सं. पीठरक ] (म) (इतिहाससंग्रह)

पिठे - पैष्टाः (स)

पित्रे - पैत्र्याः (स) (क)

पित्र्ये - पित्र्यः ( पितरः देवताः अस्य ) = पित्र्या. पित्र्ये,
पित्रे अनेकवचन. माहाराष्ट्र ब्राह्मणांत आँडनाँव. ( भा. इ. १८३३)

पिंपळे - १ पैप्पल: पैप्पलाः (स)
-२ पिप्पलाः (क)

पुत्रे - पुत्रिणः ( स )

पुनवे - पौणमासाः (स)

पुराणिक - धंद्यावरून (कों)

पुरोहित - पौरोहितिकाः (क) (स)

पूर्णपात्रे — पूर्णपात्र Taking from friends at festivals by free chothes, garlands etc वैजयंती कोश = पूर्णपात्रे हें आडनांव आहे.

५ पतंजलीचा हा पातानप्रस्थ शब्द हेमचंद्रानें आपल्या व्द्याश्रयमहाकाव्याच्या सोळाव्या सर्गाच्या तेविसाव्या श्लोकांत वातानुप्रस्थ अशा अपभ्रंशरूपानें योजिला आहे. प्रस्थपुरवहान्त व योषध जे सांकाश्य फाल्गुनीवह, नांदीपुरं व वातानुप्रस्थ शब्द सत्संबंधक सोदाहरणा व्याख्यानाच्या निमित्तानें हेमचंद्रानें वातानुप्रस्थ हा प्रस्थान्त शब्द उद्धरिला आहे. पतंजलीचा पातानप्रस्थ शब्द हेमचंद्राजवळील महाभाष्याच्या पोथींत वातानुप्रस्थ असा लिहिलेला असल्यामुळें हेमचंद्रानें तो भ्रष्ट पाठ उद्धरिला आहे, हें सांगावयाला नको. वातानुप्रस्थे भवः नृपः ब्राह्मणः वैश्य अथवा कोपि जनः वातानुप्रस्थकः । वातानुप्रस्थ ऊर्फ पातानप्रस्थ गांवांत किंवा प्रांतांत राहणार्‍या मनुष्याला वातानुप्रस्थक ऊर्फ पातानप्रस्थक म्हणत.

६ पातानप्रस्थ ह्या पतंजलिकालीन ग्रामनामाचा व प्रांतनामाचा पाआणपत्त पानपत असा सध्यां दिल्ली प्रांतांत व महाराष्ट्र देशांतील मराठी भाषेंत उच्चार प्रचलित आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, हे पाताणे ऊर्फ पाठारे प्रभू लोक मूळचे पंजाबांतील पानपत तालुक्यांत राहणारे लोक होते. ते पंजाबांतील शुक्लयजुर्वेदी ब्राह्मणांबरोबर व क्षत्रियांबरोबर दक्षिणारण्यांत व विशेषतः कोंकण किनार्‍यास वसाहत करण्यास आले. केव्हां आले त्याचाही स्थूल अंदाज करतां येतो. शकाच्या अकराव्या शतकांत झालेल्या अनहिलपट्टणच्या हेमचंद्राला वातानुप्रस्थ असा उच्चार माहीत होता. ह्या वातानुप्रस्थ शब्दाचा अपभ्रंश बाताणे, बाआणे, बाणे असा झाला असता, पाताणे असा झाला नसतां; सबब पाताणे लोक हेमचंद्राच्या वेळीं म्हणजे शक अकराशेंत अनहिलपट्टणाहून कोंकणांत उतरले असल्याचा संभव नाहीं व हे लोक अनहिलवाड प्रांतांतील मूळचे राहणारे नव्हत. हे लोक ज्याप्रमाणें शक अकराशेंच्या सुमारास अनहिलवाड प्रांतांतून कोंकणांत उतरले असण्याचा संभव नाहीं, त्याप्रमाणेंच महाराष्ट्री भाषा ज्या कालीं महाराष्ट्रांत जिवंत बोलत असत त्या कालींहि उतरले असण्याचा संभव नाही. महाराष्ट्रींत पातानप्रस्थ ह्या शब्दाचें रूपांतर पाआणपठ्ठ असें होऊन तद्वारां मराठींत पाणपाठ असें रूप निपजलें असतें. तसा अपभ्रंश ज्या अर्थी मराठींत झालेला नाहीं, पाताण असा अपभ्रंश झालेला आहे, त्या अर्थी महाराष्ट्रांत महाराष्ट्री भाषा बोलली जात असतां हे लोक कोंकणांत उतरले असल्याचा संभव नाहीं. म्हणजे शकपूर्व २०० पासून शकोत्तर ११०० पर्यंतच्या अवधीत हे लोक महाराष्ट्रांत व कोंकणांत उतरले नाहींत. पातान ह्या संस्कृत शब्दाचा पाताण असा अपभ्रंश चंड ज्या प्राकृत भाषेचें व्याकरण देतो व ज्याला आर्य प्राकृत म्हणून सोईखातर कित्येक यूरोपियन नांव देतात, ती आर्य प्राकृत भाषा प्रचलित असतां म्हणजे शकपूर्व २०० च्या पूर्वी किंवा सुमारास हे लोक कोंकणांत उतरले असले पाहिजेत. त्या कालीं ह्या लोकांना पातानकाः व प्रस्थाहारकाः ह्या संज्ञा पडून त्यांचीं आर्य प्राकृत रूपें पाताणे व पाठारे अशीं त्या काळीं प्रचलित झालीं.
( रा. ले. सं. भा. २ )

धकणें [ दक्ष् १ वृद्धौ = धकणें, ढकणें ] धकणें म्हणजे निभणें, योग्य ठरणें. गोष्ट धकली पाहिजे म्हणजे निभली पाहिजे. (भा. इ. १८३६)

धकाधकी [ धक्कः धक्किः = धकाधकी. धक्क् १० नाशने ] धकाधकी म्हणजे पीडा, नाश, नुकसान. धक्कः = धोका = झोका (पीडा, नाश) ( धा. सा. श. )

धक्का १ [ धक्क् नाशने धक्कः = धक्का, ढक्का ]

-२ [ धाक: ( ओझें ठेवावयाचा खांब; तक्ता वगैरे) = धक्का ] धक्का म्हणजे माल, माणसें उतरावयाचा मातीचा, दगडाचा किंवा लांकडाचा ताफा वगैरे. (भा इ. १८३६)

धग १ [ इंधनाग्नि = धग्गि = धग ] रसरसणार्‍या कोळशाचा ताव. (स. मं.)

-२ [ दग्ध = धग्ग = धग ] (भा. इ. १८३४)

धगधग [ धकक् (अकच्) = धगधग (अव्यय ) ] घर धगधग जळूं लागलें.

धजणें [ धृज् गतौ ] धजणें = जाणें, जाववणें. ( ग्रंथमाला)

धट १ [ धृष्ट ] ( धट्ट पहा )

-२ [ धट ( तुला ) = धट ] धट म्हणजे परीक्षा. काम धटाला लागलें म्हणजे परीक्षेला लागलें, खरें का खोटें याच्या निर्णयाला लागलें. ( भा. इ. १८३६)

धटाई [ धृष्टता = धटाई, धिटाई ]

धटिंगण [ धटिगणः = धटिंगण ]
धटिन् म्हणजे शंकर, त्याचे गण ते धटिंगण. मराठींत धटिंगण म्हणजे बेपर्वा पुरुष किंवा स्त्री.

धट्ट [ धृष्ट = धट्ट = धट ]

धड [ दृढ = दढ = धड ]
धड हें नाहीं आणि धड तें हि नाहीं.

धडक [ धृष् १० प्रहसने. दधृश = दधृक - धडक ( धार्ष्ट्यानें ). दार्धर्षं = धाडस ] ( धा. सा. श. )

धडधड [ धटधटं ] (धडाधडा पहा)

धडपडणें [अधउत्पतनं = धउडपडणं = धोडपडणें = धडपडणें ] धडपडणें म्हणजे वर खालीं हालचाल करणें. (भा. इ. १८३५)

धडस [ द्रढीयस् comparative = धडस ]

धडाधड, धडाडा [ धटधटं ] ( धडाधडा पहा )

धडाधडा [ धटधटं = धडाधडा, धडाडा (हापटतो), धडाधड, धडधड ]

धडी [ धटी ( जीर्णवस्त्र, वस्त्रविशेष) = धडी (पगडी)] धडी म्हणजे जुनेरें, जुनें वस्त्र. (भा. इ. १८३३)

धडौतें [ धड + ओत = धट + ओत. धट = दांडगें व ओत = विणलेलें ] दांडग्या विणकरीचें लुगडें म्हणजे धडौतें. ( स. मं.)

द्रम्म - हा शब्द ग्रीक drachm या शब्दापासून निघाला आहे किंवा असावा असा आग्रहपूर्वक तर्क कित्येक यूरोपीयन शब्दविद किंवा शाब्दिक करतात. परंतु तें म्हणणें सशास्त्र दिसत नाहीं. कारण ( १ ) ग्रीक drachm ह्या शब्दाची ग्रीक भाषेत व्युत्पति कोणी दाखविलेली नाही. (२) ग्रीक भाषेतील ग्रंथांत किंवा नाण्यावर हा शब्द संस्कृत भाषेंतील ग्रंथांतल्यापेक्षां किंवा नाण्यांपेक्षां पुरातन कालीं येतो, असें हि कोणीं दाखविलेलें नाहीं.

द्रम्म हा शब्द प्राकृत आहे. द्रम् धातूपासून द्रम्य कृदन्त होतों. द्रम् गतौ. द्रम्य म्हणजे That which wanders, circulates. द्रु धातूपासून द्रव्य कृदन्त होतें. त्याचा हि अर्थ That which moves, wanders, circulates असाच आहे. सारांश द्रव्य व द्रम्य हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. द्रम्य ह्याचें प्राकृत द्रम्म. द्रम्म याचें प्राकृत दाम. द्रम्म म्हणजे circulating money असा मूळ अर्थ. नंतर तो शब्द एका विशिष्ट नाण्याला लावूं लागले. द्रम्म सोन्याचे, रुप्याचे किंवा तांब्याचे असत.

तात्पर्य हा शब्द मुळीं ग्रीक भाषेतील नाही; संस्कृत भाषेंतील आहे. विशेष प्रचार प्राकृत भाषेंत आढळतो. मुळीं हा शब्द पंजाबापासून असुर्या देशांतील प्राकृत भाषांत प्रचलित असावा व तेथून ग्रीक ऊर्फ हेलेनिक लोकांनीं तो उचलला असावा.
चलन, चलनी हे शब्द हि चाल् गतौपासून च निघाले आहेत. currency, circulation हे हि शब्द गत्यर्थक धातूंपासून च निघाले आहेत.

द्रु = द्रव्य, द्रविण.
दाम याचें क्षुद्रत्व दर्शक रूप दमडी, दामाडू. (भा. इ. १८३२)

द्रव्य [द्रु गतौ ] (द्रम्म पहा )

दुग् (कानडी) [ दुर्ग = द्रुग् (कानडी ) ]

द्वाड १ [ दुर्वाट = दुवाड = द्वाड ] दुवाड रूप ज्ञानेश्वरींत येतें. (स. मं.)

-२ [ दुविदग्ध = दुवाड, द्वाड ] Slow, sluggish.