१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. लेखांक १५.
र॥ छ १९ जिल्हेज, समानीन श्री. २८ डिसेंबर १७७९.
श्रीमंत खुदावंत न्यामंत राव पंतप्रधान यांचा व आंमेहरबांचा पक्का सलूख व दोस्ती होऊन सरकारचे मातबर व आपणांकडील वकील एकलासदस्तगाहा नरसिंगराव यांस आहादशर्तीचे कागदपत्र देऊन पट्टनास रवाना केले. ते येऊन पोंचले असतील, अगर पोंहचतील. इंग्रेजाचा इरादा अदवानीकडे येण्याचा ही शकल नामुनासब जाणून, आंसाहेबीं अदवानीतालुक्यांत फौज पाठऊन हांगामा करविला. त्यास, तो तालुका नवाबनिजामअल्लीखांबहादूर यांचा. नवाब मवसूफ व रावपंतप्रधान यांची कदीमापासोन दोस्ती व एकरंगी; जुदागी नाहीं. दोन्ही दौलती एक. इंग्रेजाचे तंबीचे मसलतीस नवाब शरीक. टोपीवाले यांणीं बहुत बेअदबी केली व बेबाहां जाले. त्यांची चाल खुशकींत नीट नाहीं. याची तदबीर दक्षणचे रयासतवाले यांणीं करावी; तरीच काय हाली व काय पेस्तर, सर्वा दौलतीस नेक ऐसें दूरंदेशीनें समजोन, आंमेहरबांची व सरकारची दोस्ती जाली, हें सलाह दौलत ऐसें जाणोन, नवाबमवसूफ बहुत खुश जाले. दरींसुरत नवाब व रावपंतप्रधान व आंसाहेब तिन्ही दौलती एक सलाह व तदबीर एक; दुसरा विचार राहिला नाहीं. सर्वत्रांची नजर मोठे मसलतीवर. तेव्हां घरांतले घरांत आपआपणांत नाखुसी येणें, हें सलाह नाहीं. अजीं सबब अदवानीचा हंगामा मना करवावा. आपण चेनापट्टणाकडे जमीयत सुधां गेल्यानंतर अदवानीस इंग्रेज येऊन मुलकांत सिरोन बखेडा करून मोठे मसलतीस पायबंद होईल, ऐसें आपले दिलांत आलें असेल. त्यास, नवाब अव्वल अदवानीचा बंदोबस्त राखून, तसेंच सिकाकोल राजबंदरीकडे जातील. याविसीं पेशजीं आमेहरबांस पत्रें पाठविलीं, ते पोहचून हांगामा मना जालाच असेल. इंग्रेजास तंबी करणें, ही मोहीम मोठी. आरसा न्याहायत कम राहिला, सबब आंमेहरबांचें निघणें चेनापट्टणाकडे जलद व्हावें. अदवानीचे बंदोबस्तास फौज रवाना केली. व इंग्रेजांचीं पलटणें तुमचे फौजेनें माघारीं हटविलीं, तीं कृष्णा उतरून उत्तर तीरानें अदवानीकडे जावयास येत होतीं, त्यांजवर नवाबांनीं फौज रवाना केली. त्यांणीं जाऊन घांटाची बंदी करून ठांसून राखिलें. त्यांच्यानें इकडे येवत नाहीं. खासा नवाबही तयार आहेत. सिकाकोल राजबंदरीकडे जाणार.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57