न
न [ अन्यत् = आणि, नि-नी-न ]
मी आलों न, नि, नी, आणि तो गेला.
नस्य विभाषा-गुफ, लिप, फुक, सोप, कुप, लुट, सिव, सिप इत्यादि धातूं पासून ( १ ) गुफणें, गुंफणें; ( २) लिपणें, लिंपणें; (३) फुकणें, फुंकणें; (४) सोपणें, सौंपणें; (५) कुपण, कुंपण; (६) लोंटणें, लोटणें; (७) सिंवणें, सिवणें, (८) सिंपणें, सिपणें; अशीं नोपध व अनोपध अशीं दोन रूपें मराठींत होतात. पैकीं नोपध रूपें पुणेरी भाषेंत शिष्ट समजलीं जातात व अनोपध रूपें देसोर भाषेंत हमेषा योजिलेलीं आढळतात. हा उच्चारभेद सकृद्दर्शनीं आपातिकसा भासण्याचा संभव आहे, परंतु तसा प्रकार नाहीं. भेद परंपरित आहे. पाणिनीय अष्टाध्यायी अध्याय १, पाद २, सूत्र २३ येणेप्रमाणें आहेः-
" नोपधात्थफान्ताद्वा " १-२-२३ या सूत्रांत ( १) ग्रथ्र्, ग्रन्थ्, (२) श्रथ् , श्रन्थ्, ( ३ ) गुफ्, गुम्फ् वगैरे धातूंचीं नोपध व अनोपध अशीं दोन हि रूपें दिलीं आहेत. तीच वंशपरंपरेनें आपण मराठींत उच्चारतों. (भा. इ. १८३३)
नकका [( नकि: अकच्क) नककि: = नककी, नकका ]
नककी जाऊं = जाऊं नको
नकि = वर्जने निपातः (भा. इ. १८३६)
नका, नको १ [ न + कग् नोच्यते ] (धातुकोश-नक पहा)
नको २ [ नकि: = नको ]
जाऊं नको = नकि र्याहि. बोलूं नको = नकि र्वद. तात्पर्य, नको हें अव्यय आहे. ( भा. इ. १८३६)
-३ [ १ न्यक्कृ, २ नक्क, ३ नकृ, ४ नकम्, ५ नकिः निपात, ३ नकं ( अकच्क) = नको ] (भा. इ. १८३४)
नकों, नकोत [ न + कग्] ( धातुकोश-नक पहा)
नकोरे [ न खलु = न करु = नकोर = नकेरे ]
(न) खलु पीत्वा = नकोरे पीऊं = मा पिब
(न) खलु गत्वा = नकोरे जाऊं = मा गम:
प्रथम खलु पीत्वा, खलु गत्वा असा न खेरीज प्रयोग पाणिनि व **** यांच्या कालीं होत असे. पुढें पुढें पाठीमागें न लावूं लागले. त्यापासून मराठी नकोरे निघाला आहे. (भा. इ. १८३७)
नकोस [ न + कग् ] (धातुकोश-नक पहा)