विळे १ - ऐलाः (स)
-२ विलवः (स)
वैद्य १ - बैदाः (कों) ( क) (स)
-२ शूलगवं यो वेत्ति असौ वैद्यः ( आश्वलायन-गृह्यसूत्र नारायणीयवृत्ति) शूलगव प्रकरणांत आहे.
वैद्य हें आडनांव कोंकणस्थ, कर्हाडे ब्राह्मणांत आहे. वैद्य म्हणजे वैद्यकी औषधांचा धंदा करणारी जात निराळी.
वैशंपायन - वैशंपायनाः ( कों ) ( स )
वोक - मौकाः (कों ) ( स )
वोझे - बौध्याः (क) (स)
व्यास - व्यासाः (कों) (स)
श
शारंगपाणी - शार्ङपाणि = शारंगपाणी, सारंगपाणी. ( भा. इ. १८३६)
शार्ङ्गपाणि - शार्ङ (रवाः) पाणिः च = शार्ङ्गपाणि. ( कों )
शिखावत - शिखापत्तिः (स)
शिंत्रे - श्वैत्रकाः (अनुनासिक आगंतुक) (कों)
शिंदा [ (शक ९०० तील) सिंद: = शिंद ] (रा. मा. वि. चंपू पृ. १८९)
शिरवटे - श्रीपथाः (स)
शिर्के [ शिरीषक ] (म) (शिखें पहा)
शिर्खे [ सं. शिरीषक-महा. शिरीखअ - मरा. शिर्खे, शिर्के ] (म ) (इतिहाससंग्रह)
शुक्रे - शौक्रेयाः (स)
शुक्र्या - शुक्रियः (शुक्रो देवता अस्य) = शुक्र्या. शुक्रये, शुक्रे अनेकवचन. महाराष्ट्र ब्राह्मणांत हें आडनांव आहे. (भा. इ. १८३३ )
शेखदार - धंद्यावरून. (क)
शेखावत - शिखापत्तिः (स)