जाब व्यंकटराम पिला यांचे चेना- लेखांक ३२. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.
पटणास इंग्रजांचे डाकेवरून रवाना
करावयास मिस्तर किनवीस दिल्हे
छ ११ राखर.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास- अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी छ १० व छ १२ व छ २२ रविलावलचीं पत्रे पाठविली ती छ ४ व छ ८ राखरीं तीन दफेचीं पोहोचून लिहिल्याप्रमाणे सविस्तर मजकूर ध्यानास आला छ २८ माहे सफरी चिनापटणास कुशलपुरी पोहोचल्याचें लिहिल्यावरून कळलें. राजश्री नाना यांचे नावें तुह्मी आपली अर्जी व अखबार लेहून बेगोंद पाठविली ते पाहून तीन वेळाचीं पत्रें व अखबारा लाखोटे गोंद करून पुणियाकडे रवाना केले तिकडून डांकेवर उत्तरें आलीं ह्मणजे तुह्माकडे रवाना होतील वरचेवर तिकडील सविस्तर वर्तमान लिहून पाठवित जावे काळा वाळा पाठविला तो पावला कागदांत लपेटून वाळा पाठविला याजमुळें त्याचा सुगंध गेला याजकरितां वाळा तेथून पाठविणें तो कागदांत लपेटून पाठवूं नये त्याचा सुवास न जाये ऐशा बंदोबस्तानें रवाना करावा ह्मणजे उपयोगी पडेल तुमचे सेवटील पत्र आले त्यांत च्यारदफे पत्रें पाठविलीं पावलीं कीं नाहीं उत्तर पाठवावें ह्मणोन लिहिलें त्यास आह्मापासी तीन वेळाचीं पत्रे पावलीं त्याचा तपसील तारीखवार सदरी लिहिला आहे मिस्तर किनवी याजकडे आली सांगून पाठविलें कीं च्यार दफे पत्रें पाठविली ऐसे आमचे पत्रांत लिहिली असता तीन वेळाचीं पत्रे पोहोंचली एक रवानगीचीं पत्रे काय झाली याचा निरोप त्याजकडून आला की आह्मापासी पत्रे आलीं तितकी आह्मीं दिल्ही यापरतें पत्र इकडे नाहीं त्यास चौथे रवानगीचे पन्नाचा शोध तेथे करावा. रा छ ११ राखर बहुत काये लिहिणें हे आशिर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)