जाब आपाजी बाबजी यांचे पत्राचे लेखांक ४८. १७१४ मार्गशीर्ष वद्य ७.
छ २० राखर. टप्यावर
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकुशल लिहित जावें विशेष तुह्मी छ १५ रावलचे पत्र पाठविले ते छ २४ मीनहूस पावले मजकूर समजला.
तुह्मावर चिटी तीस हजार रुपयाची राजश्री गोविंदराव भगवंत यांची केली आहे जरूर जाणून दिल्ही आहे तरी चिटीप्रा ऐवज देऊन पावती घ्यावी त्यास आज्ञेप्रा ऐवज सिध करून ठेविला आहे ते आल्या वर ऐवज देतो गुंता पडावयाचा नाहीं ऋणून लिो ते कळले कलम १ पूर्वी जाधवाची वगैरे पत्रे पा ती पावली असतील जाब आला नाहीं त्यास जाब पाठवावयास आज्ञा जाली पाहिजे ह्मणून लियो येविसी गोविंदराव यास सांगितले आहे तुह्मी पुसावे झणजे बंदोबस्त करून देतील कलम १ बापु सिवदत यास ऐवज देऊन त्याची हुंडी विठलदास गोकुलदास याजवर १०००० दाहा हजार रुपयांची पा आहे मुदतीप्रा ऐवज देऊन उत्तर पाठविले पाहिजे ऐवज आपले नावे लिहिलो तेथे जमा करा- वयास आज्ञा जाली पाहिजे ह्मणून लिो हुंडी लागू करून मुदती प्रा ऐवज घेऊन जमा केला. कलम १ |
यंदा अवर्षणामुळे रा बाळाजी पंत यानी पागा बारगीर गणोरीस रा केली त्यास तिकडे प्रथम पाऊस पडोन पेरणी खरीफाची जाली होती भाद्रपदापासोन अगदीच पाऊस नाहीं रबीची पेर देखील जाली नाहीं वि- हिरी आताच आटल्या उंस वाळतात ह्मणून गांवकरी याचे पत्र आले तेच बजीनस आवलोकनार्थ रवाना केले माझी तरतूद ध्यानांत भरावी आसे होते परंतु दरसाल नालास्ता होतो यास इलाज नाहीं दोन्ही कुरणाची गवते कापून पागेस चंदी दाणा खरीदी करून देविला त्याची याद बाळाजीपंतानी सेवेसी रवाना केली आसल तीन सालचे हिशेब गांवचे तयार करून ठेविले आहेत आज्ञा येईल तसे करीन ह्मणोन लिो त्यास गांव तुमचे स्वाधीन केला तेव्हां त्याची उस्तवारी यथास्थित करुन दाखवाल ही खातरजमा आहे हिशेबविसी बाळाजीपंतास लिहिले आहे. कलम १ नवल विशेष वर्तमान आलीकडे तुह्माकडून लिहिले येत नाहीं. तर पत्र पाठवित जावे. कलम १ |
पाच कलमे रा छ २० राखिर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति. |