Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रामचंद्र दादो वकील निा. लेखांक १३०. १७१४ फाल्गुन शुद्ध ६.
भोंसले यांचे पत्राचा जबाब.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी छ २० जावलचे पत्र पा ते छ जाखरी पावलें छ १५ जावली पुण्यास पोंहचून राजश्री गोविंदराव यांसी भेटून राजश्री नाना व तात्या यांजकडे त्यांचे समागमे जाऊन भेट घेतल्याचा मार लिहिला तो कळला उत्तम केलें श्रीमंताचें दर्शनहि जाल्याचें वर्तमान परभारा कळलें वरचेवर तुह्मी आपल्याकडील तिकडील लिहित जावें राजश्री माधवराव एथें आहेत हमेषा येतात यांजविषी चिंता न करितां तिकडील कामकाज-प्रकर्णी होईल तें लिहून पाठवावें राजश्री सेनासाहेब सुमा यांजकडील पत्रेंहि इनायतनाम्याकरितां आली होती इनायतनामे जागीरदार वगैरेस पेशजीच रवाना जालें एथून उत्तरें त्यांजकडे माधवराव यांचे स्वाधीन करून रवाना केली कळावें निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें राजश्री माधवराव तुमचे नांवाचे लखोटे देतात ते टप्यावर रवाना होत असतात पावतच असतील अलिकडे श्रीमंताची व मदारुलमहाम यांची व राजश्री तात्या समवेत भेट जालीच असेल काय बोलणे जालें तुह्मी कोणेप्रकारें विनंति केली हें ल्याहावें राजश्री गोविंदराव यांचे लिहिल्यावरून समजण्यात येत आहे परंतु तुह्मी आपले हातें लिहिलें ह्मणजे तुमची प्रक्रत यथास्थित आहे असे समजेल एथून तुह्मी दुखण्यातच गेला पुण्याची हवाहि एकाएकी प्रक्रतीस सोसणार नाही याजकरितां बहुत जपून शरीरसंरक्षण करून असावें पत्र वरचेवर येत असावें राजश्री माधवरावजीस वरचेवर तुमचें पत्र हुषियार राहण्याविसी येत असावें कार्यास निविष्ट असे पुत्रास वडील आज्ञा करतील ऐसे असणे हें माधवराव यांस अति सुक्रत-फल आहे तुमचे पत्रांतच प्राचीन गोष्टी मामलत वगैरे ऐकण्यात व पाहण्यात येईल हें दुस-याचे पत्रांत लिहिलें यावयाचे नाही रा छ ४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे है विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंदराव कोकाटे यांस पत्राचें उत्तर. लेखांक १२९. १७१४ फाल्गुन शुद्ध ६.
राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावि यांस- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले सिरपूर वगैरे तालुका राजश्री शंकरराव भोंग यांजकडील मुकासा मामलतीचे फडच्याविषई नवाजषनामे पाठवण्याचें लिा त्यास शंकरराव एथें आले त्यांस नवाबाचे सरकारांतून परवानगी दिल्ही नवाजषनामेहि तयार करविले दुषाला फडच्याविषई तनखा घेऊन जोतीपंत यांचे स्वाधीन करण्यात येईल त्याप्रा माहाली फडच्या करून घ्यावा सन ११९९ पावेतो मामलतीचा ऐवज पटांत लागला त्यांचा फडच्या करून घेण्याविषई लिहिलें त्यावरून जोती-पंत यांजकडे नगदी फडच्या करून दिल्हा मारनिले लिहितील त्यावरून कळेल ता बासर एथील फडच्या सन ११९५ पासोन नाही ह्मणोन व सेरीचा जाबसाल लिहिला त्यास सन ११९५ पासोन सन १२०१ पावेतो मामुलाप्रा जमा धरून तुह्माकडे सालबासाल वसूल रसीदा मोहरानसी आवल हिसेबी पावल्याची रुजुवात होऊन बाकी जोतीपंताचे मारफातीने ठरली त्यापैकी अमीलाचें ह्मणे की तुमचे दस्तऐवजाप्रा सेरी व तहरीरीचा ऐवज सालोसालचा वजा करून बाकीचा फडच्या करून घ्यावा कौल रसीदा द्याव्या त्यास हा जाबसाल आपले दस्तऐवजाप्रा समजोन जोतीपंत यांस लेहून पाठवावें व कौल रसीदा मोहरसुधा पाठऊन द्याव्या त्याप्रा आमीलासि बोलावयास येईल माहाली फडच्या होत असल्यास हेंहि चांगले उत्तर समजोन पाठवावें त्याप्रा करितां येईल छ ४ रजब बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र तिमाराव हरी याजला लेखांक १२८. १७१४ फाल्गुन शुद्ध ५.
थमी काळा खरीदीस पाठविली
त्याजबराबर दिल्हे छ ३ रजब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित असावे विशेष यमा काळा गल्ला तूप तेल वगैरे खरीदीकरितां पाठविला आहे तर आपले जिम्यात जिन्नस खरीदी करून ठेवील त्यास जागा चांगली देऊन मारनिलेस सध्या तुपाची जोडी एक व कांहीं एका उंटावर गला भरून मारनिलेस हैदराबादेस वाटे लावावे जिनस खरीदी करील त्यास रुपये २०० दोनसे द्यावे आणि इकडे ल्याहावे काही ज्यास्त मागीतल्यास शे पनास द्यावे गल्ला वगैरे सरकारी दराने खरीदी करवावा रा छ ३ रजब सलास तिसईन सन फसली १२०२ बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पैमाजी निशा भावसिंग चौधरी लेखांक १२७. १७१४ फाल्गुन शुद्ध ४.
निा तोफखाना सरकार बंदगानअली
याचे मागीतल्यावरून आपाजी
भीमराव अमील पा शाहगड यांचे नावें पत्र दिल्हें
छ २ रजब सन १२०२ फसली.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामी गोसावि यांसी-
सेवक गोविंदराव कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष राजश्री शंकरलाल यांचा व हरबाजी नाईक वानवले यांचा देण्याघेण्याचा प्रसंग आहे सबब शंकरदास यांचा गुमास्ता मनुलाल यास नाईकमजकुर याणी तुह्माकडून मनुलाल औरंगाबादेहून हैदराबादेस जात असतां अटकाव करविला आहे त्यास पत्र द्यावें कीं मनुलाल यास हैदराबादेस पाठवून द्यावे उभयतांचा जाबसाल आहे तो एथे मनास आणावयास येईल तुह्मी तेथें कोणे गोष्टीचा गुंता न करितां मनुलाल यांस पाठऊन द्यावें दोन मनुष्ये त्याचे समागमी तुह्मी आपली देऊन एथे आह्मापासीं पोंहचतें करावें रा छ २ रजब बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजश्री राजे रायेरायां बाहादूर लेखांक १२६. १७१४ माघ शुद्ध १२.
याणी पत्र मागीतल्यावरून दिल्हे
रा छ १० जाखर सन १२०२.
राजश्री जोत्याजी जाधवराव गोसावि यांस- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष राजश्री राजेरायांबाहादूर याणी वर्तमान सांगीतलें की मौजे बोडके वगैरे देहात पा टांकळी एथील कुळकर्ण राजश्री खंडोराम कुळकर्णी यांचे सात पुस्तांपासोन चालत आले आहे असें अस्तां सांप्रत मौजे मारचा मुसलमान पाटील याने तुह्मास गैरवाका वर्तमान समाजाविलें की वतन कुळकर्णीमजकूर यांचे नाही ह्मणोन पागेस पत्र आणून अटकाव केला आहे त्यास यांचा मोकासा बहुत दिवसाचा आहे यास.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रा कृष्णराव देवाजी नवाब लेखांक १२५. १७१४ माघ शुद्ध १२.
बंदगानअली यांचे पत्र व तीळ आले त्याचे
उत्तर रा छ १० जाखर सन १२०२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष तुह्मी पत्र व मकरसंक्रमण-प्रयुक्त तीळ शर्करा–युक्त थैलींत पा ते तुमचे लिहिल्याप्रो श्वीकार केला एथूनहि तीळ शर्करायुक्त थैली व पत्र तुमचे नावें टप्यावरून रवाना जाले आहे. राजश्री आपाजी कोंडाजी पावतें करतील रा छ १० माहे जादिलाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
विठलबावाचे पत्राचें उत्तर. लेखांक १२४. १७१४ माघ शुद्ध ८.
राजश्री विठलबावा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें आमचे प्रक्रतीचें वर्तमान सांप्रत यथास्थित असे तुह्मी आपले प्रकृतीचें वर्तमान लिा ते कळलें आवषधपथ्यास जपत जावें वरचेवर वर्तमान ल्याहावें पुण्याकडील वर्तमान लोक मनास येईल तसें बोलतात अजमुलउमरा पुण्यास जाणार ह्मणोन ऐकतों याचें सत्य मिथ्या कळत नाही आज्ञा यावी ह्मणोन लिा त्यास लोकांच्या वार्ता चित्तास येईल तशा गपा हाकितात याजवर काय आहे पुण्यास जाण्याचेहि वर्तमान असेंच एथें। कांहीच नसतां लोक आपले आवडीसारखे बोलतात राजश्री गोविंदराव यांजकडील पत्रेंहि वरचेवर येतात स्वस्थ आहे चिंता न करावी तुह्मास जाऊन फार दिवस जालें आता प्रकृतहि बरी जालीच असेल लवकर यावयाचें करावें तुह्माकरितां मकरसंक्रमण-प्रयुक्त तीळ शर्करा युक्त पा आहेत स्वीकार करावा रा छ ६ जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
छ ६ जाखरी रसीद हबीबुलाखां लेखांक १२३. १७१४ माघ शुद्ध ८.
जागीरदार मौजे पांडुरणी वगैरे देह
३॥ पा खंदार बाबतीची
खांसाहेब मेहरबान दोस्तां महमद हबीबुलाखां सलामत-
७ अजदिलएखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की मौजे पांडुरणी वगैरे देह साडेतीन पी खंदार एथील बाबतीचा आमल आमचा ई॥ सन ११९९ ता सन १२०१ पावेतो येणे त्यापैकी अललहिसेबी वसूल रुो १२४ एकसे चोवीस दिल्हे ते पावले असेत छ ६ जाखर सुा सलास तिसईन मया व अलफ सन १२०२ फसली ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी इममाखां यांस पत्र महादेव लेखांक १२२. १७१४ माघ शुद्ध ७.
बावा गोसावी समंधे.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बहादूर सलामत अज दीलएखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरआफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून वो महादेवबावा गोसावी संस्थान वडगांव यांजकडे श्रीमंताचे सरकारातून मौजे बेतगी पा चिटगोपें एथील मोकासा–बाबती-सावोत्र्याचा अमल पेशजीपासोन बहुत दिवस आहे त्यास अकडे मौजे मारचा अमल आकाराबमोजीब पावत नाही व सनवात बाकी मागील येणे त्याचा फडच्या होत नाही व च्याहरूम तहकूफ ठेवण्याची दिकत होती कडबा व पोटगी कारकुनी आंबआंबळी सुरळीत पावत नाही। ह्मणोन सरकारांत बोभाट गेला त्यावरून येविषी सरकारची पत्रें आह्मास आली त्यास येविषी मेहरबान अजमलमुलुकबाहादूर यांचे बोलणे आपल्यासी रुबरू जालेंच आहे व पत्रहि त्यांचे घेऊन पा आहे त्यास मौजे मारचा अमल पेशजी चालत आल्याबमोजीब दरसाल बेदिकत फडच्या करीत जावा जुनारदार यांजकडील गावचें च्याहरूम तहकूफ न ठेवावे ऐसा करार आहे याजकरितां च्याहरूम तहकूफची हरकत होऊ नये सनवात बाकीचा फैसला करून देवावा कडबा वगैरे पेशजीपासोन चालत आल्याप्रा चालवावें येविषीचा बोभाट येऊ न द्यावा रा छ ५ जाखर ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
महादेव बावा गोसावी वडगांवकर लेखांक १२१. १७१४ माघ शुद्ध ७.
यांचे पत्राचें उत्तर.
हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री माहादेवबावा संस्थान वडगांव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष आपण पत्र पाठविलें ते पावलें श्रीचे अन्नसत्राचे बेगमीस स्वराज्याकडून मौजे बेतगी पा चिटगोपें ही गांव व मौजे चिंचोली तपसे पा अवसे एथील मोकासाबाबती व सावोत्रा इनाम पूर्वीपासोन चालत असतां अलीकडे जागीरदार आकाराप्रा देत नाहीत व च्याहरम वजा करितात त्यास ताकीद होऊन अमल यथास्थित पोंहचावा व सनवात बाकी राहिली ते देवावी ह्मणोन विस्तारें लिहिलें त्यावरून हा मार जागीरदार यांसी बोलण्यात येऊन सिदी इमामखान अमील पा चिटगोपें यांजला समक्ष ताकिद जाली व ताकीदपत्रहि निखालस घेऊन पा आहे बेतगी एथील स्वराज्याचा अमल पेशजी कैलासवासी रावसाहेब यांचे कारकीर्दीस चालत होता त्याप्रा देत जावा च्याहरम न घ्यावें ऐसें बोलण्यांत आले त्याप्रा वहिवाट करावी सनवात बाकी मौजेमाराकडे वाजबी असेल ते जमीदाराचे रुजूने तहकीक करून फडच्या करून देण्याविसी ताकीदीत लिहिलें आहे याप्रा ठराऊन रुबरू ताकीद जाली व ताकीदपत्र इसबबेग आपणाकडून आला याजबराबर पा आहे पावेली चिंचोळी तपसे एथील स्वराज्याचा अमल राजश्री खंडो शंकर यांजकडे सुदामतप्रा च्याहरम वजा न होतां सालाबाद फडच्या होत आहे. सबब मौजेमाराची ताकीद घेण्याचें प्रयोजन नाही संस्थानचे कार्यास इकडून सहसा अनमान व्हावयाचा नाही रा छ ५ जाखर बहुत काय लिा लोभ असो द्यावा हे विनंति.