जाब गदवालकर यांचे पत्राचे लेखांक ८३. १७१४ पौष वद्य २.
ऐवजाचे वगैरे मार छ १५ जावल.
राजे यांस पत्र.
राजश्री राजे सामभूपालराव बाहादूर गोसावी यांस- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असिले पाहिजे विशेष पत्र पो ते पावले मार समजला प्रस्तुत राजश्री बालाजीपंत यांचे विद्यमाने व्याजाचा ऐवज हिशेब करून रु।। अज रु।। हिशेब १२८०० बारा हजार आठशे राजश्री भगवानदास मुरलीदास यांचे दुकानीं देविले आहेत याचा तपसील बालाजीपंत लिहितील त्याजवरून ध्यानास येईल आपले पदरचे जाणावे राजश्री कृष्णाजी नरसिंह संस्थानाचा मार विनंति करतील ती ध्यानांत धरून संस्थानचे संरक्षण करणे आपणास लागले आहे ह्मणून लिो त्यास साडे बारा हजार रुा भगवानदास याणी आपले गुमास्ता याजबराबर पाठविले बाकी ऐवज लवकर पाठविण्याविसी भगवानदास यांस सांगावे वरकड संस्थानविषईंचा अगत्य-वाद आह्मास आहेच ये विषई वारंवार लिहावे असे नाहीं राजश्री कृष्णाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल रा छ १५ जावल बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)