सखाराम अनंत याणी कल्याणराव लेखांक ८९. १७१४ पौष वद्य ४.
निंबालकर यांस पत्र मागीतलें सबब
छ १७ जावली दिल्हे.
राजश्री कल्याणराव बापू गोसावी यास-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष राजश्री अंताजी बाजी देशपांडे पुणेकर पाटस एथें देशपांडपणाचे वृत्तीवर आहेत मारनिलेकडे तेथील दोन सेतें रुसुम ऐवजी इशा पासोन चालत आहेत व रामनवमीचे उछहाकरितां मारनिलेस देशमुखाचे गुमास्ते व गांवकरी पाटीलकुळकर्णी याणी गांवचे नजीक जमीन बरड सिवाय रकबा गायराण फुलें शाकभाजीकरितां दाखविली त्या जाग्यावर फुलें तुलसी शाकभाजी लाऊन उछहास अनभवीत असतां अलीकडे तेथील कादार राजश्री गोपाळपंत याणी दिकत करून सेतचे मालास अडथळा केला ह्मणोन कळलें त्यावरून लिहिलें असे त्यास पेशजीपासोन मारनिलेकडे जमीन बहुत दिवस चालत आली त्या प्रा चालावी गैरवाका कोणी समजाविल्यावरून सेत व जमिनीस दिकत कादारानी केली त्यास राजश्री पाटीलबावा यांचे पत्र देवऊन चालत आल्या प्रा! सुरळीत चाले ऐसें व्हावें रा छ १७ जावल अगत्य याविषईंचा बंदोबस्त करून द्यावा बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.