Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र राजे सोमभूपालराव बहादर लेखांक २००. १७१५ अधिक वैशाख शुद्ध ६.
यांस पत्र कृष्णाजीपंत वकील माारनिले
कडील यांनी मागितले त्याजवरून
दिल्हें छ ४ रमजान
राजश्री राजे सोमभूपालराव बाहादर गोसावि यांसि सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी * * * * *********
( पुढे मजकूर गहाळ )
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला यांचे पत्राचा लेखांक १९९. १७१५ अधिक वैशाख शुद्ध ३.
जाब रा छ ३० साबान सन १२०२.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यासी- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे विशेष तुह्माकडोन येणेप्रो पत्रें रवाना जालीं.
१ छ २५ रजबचे छ १७ माहे मारी पावले
२ छ ७ साबीनची छ १७ मिनहूस पावली
१ छ ११ साबानचे छ २० मिनहूस पावले
१. छ १५ साबीनचे छ ३० रोजी पावले
यो पांच रवानग्याची पत्रें पाऊन सविस्तर मार अखबार-पत्रावरून ध्यानास आला अखबारा पुण्यास रवाना जाल्य राजश्री नाना यानी तुमचे पत्राचे उत्तर पाठविलें तेहि रवाना केलें आहे त्यावरून कळेल वरचेवर अखबारेची रवानगी होत असावी भाजी वगैरे मेवेज्यातचे बिना व फर्मासीचा मार लिा त्यास तलाश करविला आहे व मोरछेल-जोडीविसी लिा त्यास त्याचाहि तलाश करवितों मिळाल्यानंतर पाठविण्यात येईल सध्या हाजरत बंदगानअली याची स्वारी बेदरास जाण्याकरितां छ २७ साबानी डेरे-दाखल जाले या गडबडीत हा जिनस मिळणे कठिण आह्मी स्वारीसमागमेंच आहोंत कळलें पाहिजें तुह्मी जिनस पावती करण्याविसीं राजश्री राज्याजीस पत्र लिहिलें होते त्याजवरून त्याणी जिनस येणेप्रा आह्मास पावती केली तपसील
२३ चिनी सरंजाम
४ बिल्लोरी कुलफया झांकणीसुधां
५ चिनी कुलफया झांकणीसुधां
० बिल्लोरी सिष्या दस्ती झांकणीसहित
१ सफेद
१ निळी
------
२
राज्याजीनी सांगितलें की मार्गात फुटल्या एथें आल्या नाहीत
१४ प्याले बिल्लोरी मयरिकाबी
८ निळी मयरिकाबी जोडी च्यार
६ सबज मयरिकाबी जोडी ४ पैकी एक जोडी मार्गात
फुटली सबब आह्मास पावली नाही बाकी अदद
----
१४
---
२३
२ दफा
१ पालखीमयगालिच्या विलायती व मुतका
१ भत्ता विलायती
० काळ्या वाळ्याचे रोपे-याची चटी ह्मणोन लिा त्यास | रोपें वाटेंत येता मेली एथवर पावली नाहीत
----
२
एकूण फुटली व मेली जिनस वजा जातां बाकी जिनस पावली व कुशलपुरी पिला यांचे नावें सुभराव याणी पुणियाहून लखोटा पा तो रवाना केला आहे कुशळपुरी यास पावता करून उत्तर पाठवावें अखबार वरचेवर पाठवीत जाणे म्हणोन राजश्री नानानी तुह्मास पत्रांत लिहिलें असे तरी बातनी चांगलीपैकी पैहाम लिहून रवाना करीत जाणे ह्मणजे एथून पुणियास रवानगी होत जाईल रा छ १ माहे रमजान बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र बापू जोसी गारवडेकर यांजला लेखांक १९८. १७१५ अधिक वैशाख शुद्ध २.
टप्यावरून छ ३० साबान.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापू जोसी गारवडेकर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी पत्र पाठविले ते पावले राजश्री राघोपंत यांचे पत्राचा व त्यांचे घोड्यासुधा कांही सोय करण्याचा प्रकार विस्तारे लिहिला तो कळला त्यास राघोपंत यांस दहा घोड्यापर्यंत तयारी करून लवकर पाठवणे घोडी चांगली असली पाहिजेत दाहा नसल्यास पांच परंतु चांगली पराकाष्ठा दाहा लिहिली यापेक्षा अधिक न पाठवणे राजश्री बाळाजी रघुनाथ लवकर येत असल्यास त्यांजबरोबर पाठवावे मारनिलेस विलंब लागत असल्यास राघोबाची रवानगी लवकर करणे घोडे माणूस चांगले असीले पाहिजे गैरसाल नसावा हरएक जागा सोय करावयास येईल रा छ ३० साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रफातुलमुलुक यांस पत्र. लेखांक १९७. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
नवाब साहेब मुषफक् मेहरबान दोस्तां रफातुलमुलुकबाहदूर सलामत-
४ अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरअफीयत जाणून साहेबी आपली खैरषादमानी हमेषा कलमी करावी दिगर मजमून रंगो प्रल्हाद निा सरदेशमुख यांजकडे पा नांदेड एथील सरदेशमुखीची मामलत आहे त्यास सन १२०२ सालचा मामलतीचा फडच्या अद्याप मारनिलेकडे आला नाही ह्मणोन बोभाट आला त्यावरून आपल्यास लिहिलें असे त्यास मारनिलेकडे सन १२०२ सालचे मामलतीचा फैसला करून देऊन रसीद घेऊन पाठवावी साल गुजरून गेलें याउपरि ऐवजास दिवसगत न होतां इनफी-साल व्हावा बोभाट न ये तें करावें रा छ २९ साबान ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सखाराम अनंत याणी पत्रे मागितली लेखांक १९६. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
सबब सैदमुजवरखान यास.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सैदमुजवरखांबाहादूर सलामत अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरअफीयत. जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा मुदखेड व अर्धापुर एथील सरदेशमुखीची मामलत राजश्री रंगो प्रल्हाद यांजकडे आहे त्यास सन १२०० साल पो बाकी च्यारसें पस्तीस रुो राहिली व सन १२०२ सालचा अमल दरोबस्त येणे त्याचा फडच्या जाला नाही ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास बारासें सालची बाकी व सालमारचा अमल सदरहू ऐवज मारनिलेकडे फडच्या करून रसीदा पाठवाव्या साल गुजरून गेलें याउपरि मामलतीचे ऐवजास दिवसगत लागोन बोभाट न ये तें करावें रा छ २९ साबान ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
मातुश्री चिमोबाईस पत्र १ बारामतीचे लेखांक १९५. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
डांकेवर छ २९ साबान.
तीर्थस्वरूप मातुश्री चिमाबाई वडिलाचे सेवेसी-
अपत्य बापूचे सां नमस्कार विज्ञापना ता चैत्र वद्य १० पावेतो मुा भागानगर एथे सुखरूप असो विशेष तुह्मी बारामतीस आलियाचे वर्तमान ऐकिलें संतोष जाहला पूर्वी तुझी पुणियास असतां एक पत्र पाठविले ते पावले न पावले हे कळले नाही बारामतीहून आह्माकडे तुह्मी येणार ऐसे ऐकिले त्यास प्रस्तुत नवाबाची स्वारी निघाली आह्मासहि त्याजबरोबर निघणे प्राप्त त्यास या समयात तुमचे येण्याची सोय नाही आमचेच येणे तिकडे होईल असे आहे कदाचित आमचे येण्याचा योग न जालियास तुह्मास येण्याविसी लिहून पाठऊ तेव्हां यावे तीर्थस्वरूप सौ आकाबाई यांचे शरीर बहुत अशक्त जाले आहे स्वकीय कळकळीचे मनुष्य त्याजवळ समाचार घेण्यास प्रस्तुत कोणी नाही त्यास या प्रसंगी तुमचे येणे जाले तर वडीलपणे तुह्मी आकाबाई यांचा समाचार घ्यावा हे योग्य आणि याजमुळे मला विश्रांत वाटेल आत्मीय मनुष्य प्रसंगास जवळ असावे असा नवस करावा लागतो ते गोष्ट तुमचे येण्यामुळे अनायासे प्राप्त जाली मी तेथे नाही याजकरितां तुह्मास लिहिले आहे इतके मनात येऊन लिहिल्याप्रमाणे करावे रा छ १९ अधिक शुद्ध १ हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
नाथूराम चौधरी याचे मागितल्यावरून पत्र. लेखांक १९४. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
राजश्री राजे सदाशिव रड्डी बाहादूर देसाई सरकार मेदक गोसावि यासि- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष सुरजमल मारवाडी हे सरकार श्रीमंत राजश्री याचे बाजारचे बेपारी याची दुकान पेठ संगारही ता मेदक एथें आहे यांचे देणे घेणे लोकाकडे पेठेत व आसपास गांवगना आहे लोक देण्यास हिलेहरकत करितात त्यास ताकीद करून वाजबी हिसेबप्रो देवावें व यांचे हरएकविसी साहित्य करीत जावें यांचे भाऊ जैगोपाळ एथे आमचे बाजारात आहेत यांचे हरएकविसी साहित्य केल्यांत आमचा संतोष रा छ २९ साबान बहुत काय लिहिणे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १९३. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळ नाईक वानवले स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष मनुलाल यास एथे रवाना करण्याविसी दोन वेळां पत्रे पा परंतु त्यास पा नाही पुण्यास राजश्री गोविंदराव व राजश्री रंगोबा नाईक वानवले यास तुह्मी मार लिहिला त्याजवरून उभयताची पत्रें आह्मास आली होली राजश्री राजे रोषणराव व चंचलराव व भावसिंग चौधरी यांचे ह्मणे की त्या मुलाच्याने तेथे फड्च्या कसा होतो त्यास एथे आणवावें आह्मी चौघे बसोन फडच्या करून देऊ तोपावेतों मुलास आपणापासी आणून ठेवावे त्याजवरून एथून राजश्री गोविंदराव यांस विस्तारें मार लिहिला आहे ते तुह्मास लिहितील त्यांस मनुलाल याजबार तुह्मी आपली दोन माणसे देऊन त्याजला एथे आमापासी पाठऊन द्यावें अनमान न करावा रा छ २९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १९२. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रंगोबा नाईक वानवले स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें ल्याहावें विशेष तुह्मी टप्यावरून पत्र पा ते पाऊन सविस्तर मार अवगत जाहाला शंकरदास याजकडोन हरबाजी नाईक वानवले याचा ऐवज येणे त्याचा फडच्या करीत नाही ह्मणोन त्याचा पुत्र मनुलाल यास अटक केली आहे त्यास आमचा ऐवज तो आपला आहे याचा फडच्या कोण्हेहि प्रकारें व्हावा इत्यादिक मार विस्तारें लिहिला होता तो सर्व समजला ऐसियास एथें रा रोषनराय वगैरे यांचे ह्मणे त्या मुलाकडोन तेथें फडच्या होतो असा अर्थ नाही मुलास एथें आणवावें ह्मणजे चौघे बसोन फडच्या करूं त्याजवरून पेशजी दोन वेळां पत्रें लिहिली असतां मुलास पा नाही हाली लिहिलें जातें की मनुलाल याजबार दोन माणसे आपली देऊन एथें पा द्यावें फडच्या होय तोपावेतो त्यास आपल्याजवळ ठेऊन घेऊ येविसीचा मार राजश्री गोविंदराव यांस लिहिला आहे तेहि तुह्मास सांगतील त्याजवरून कळेल रा छ २९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रोषनराव याचे मागितल्यावरून लेखांक १९१. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
पत्रे च्यार रा छ २९ साबान पत्रें
च्योर पैकी गोविंदराव यांचे पत्राची
नकल अलाहिदा जुजांत आहे
बाकी ३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत कमाविसदार का शाहागड स्वामीचे सेवेसी-
सेवक गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष मनुलाल शंकरदास याचा पुत्र यास हरबाजी नाईक वानवले यांचे देणे आहे त्यास मनुलाल याजबार दोन माणसे देऊन एथें पाठऊन द्यावें ह्मणजे फडच्या करून घ्यावयास येईल त्यास तुह्मी शाहागडास नसता राजश्री गोपाळ नाईक वानवले याणी त्या मुलास न पाठवितां पत्राचे उत्तर पा पुण्यास राजश्री गोविंदराव व रंगोबा नाईक वानवले यास लिा त्याजवरून याणी आह्मास लिहिलें की भनुलाल यास पुण्यास आणविलें आहे एथेंच फडच्या करून घेऊ त्यास त्या मुलाची वडील धाकटी सर्व एथे आहेत मुलाकडोन फडच्या होतो असा अर्थ नाही येविसीचा मार गोविंदराव यास लिहिला आहे ते तुह्मास सांगतील अथवा लिहितील त्याप्रा मनुलाल याजबार दोन माणसे देऊन आह्मापासी पावते करून द्यावे रा छ २९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.