Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले                                                         लेखांक १७०.                                                      १७१५ चैत्र शुद्ध १५.
यांचे पत्राचा जाब रा छ १४
साबान सन १२०२ फसली.

राजश्री फत्तेसिंगबावा भोंसले गोसावि यांसि-
5 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष पत्र पा ते पाऊन मजकूर समजला राजश्री नारायणराव पांसरे शाहामतमुलूक याचा भाऊ रा मानसिंगराव पांसरे आवसेकर किलेदार याचा आसरा करून निलंगे परगण्यात धामधूम करितात कांहीं जाबसाल असल्यास येऊन बोलावे ते न करिता मनश्ची वर्तणूक आहे त्यास दोन्ही महाल नवाबाचे खालसा असे असतां अवसेकरानी जागा देऊन खराबी करवितात त्यास नवाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलून यांचे पत्र अवसेकर किलेदार यांचे नांवें पाठवावें ह्मणोन विस्तारें लिहिले ते समजलें ऐसियास आपले लिहिल्यान्वयें बाहादूर यांसी मजकूर करून त्याचे पत्र अवसेकर किलेदार मिर्जा उमरखानबेग यांचे नावें पी आहे की मानसिंगराव पांसरे यांस तंबी पोंहचाऊन त्याणी निलंगे परगण्याची गुरें व मवेसी काय आणिली असेल ते जराबजरा त्याजकडोन घेऊन आपली माणसे मारनिलेबराबर देऊन त्यास आंकलकोटास फत्तेसिंग भोंसले याजपासी पावते करून रसीद घेऊन पाठवावी त्यांजकडील कजिया आहे ते समजोन करतील तुह्माकडील पुन्हा बोभाट आलिया कामास येणार नाही ह्मणोन निक्षून ताकीदींत लिहिलें आहे रा छ १४ साबान बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.

बाळाजी कासी यांस.                                                                   लेखांक १६९.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ११.

राजश्री बाळाजी कासी स्वामी गोसावी यास-

पो गोविंदराव कृष्ण नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष नवाब बंदगानअली यांची स्वारी छ १७ साबानी डेरे-दाखल होऊन दरमजल बेदरास जाणार पागा सरंजामसुधा चाकरीस येण्याची फार निकड याजकरितां माहादजी सूर्यवंसी यांस पागा घेऊन येण्याविषई पत्र रवाना केलें तुह्मी पत्र पावतांच कसबे मुरूम एथें पागेची घोडी आहेत ती झाडून बारगीर पोरगे वगैरे सरंजाम तयार करून चाळीस स्वार हजरीचे यांची भरती सिलेदार वगैरे ठेऊन लौकर पागेसुधा येऊन पोंहचावें दोन्ही पागा एके समयास येऊन पोंहचेत ऐसें करणें येविषी पुण्यास राजश्री गोविंदराव यांजकडेहि लेहून पा आहे रा छ १० साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

रा छ १० साबान रघुनाथ गोविंद                                                लेखांक १६८.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ११.
कलबर्गेकर यांस मुजरद जासुदासमागमे.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत खामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष नवाब बंदगानअली यांची स्वारी बेदरास जाण्याकरिता छ १७ साबानी डेरें-दाखल होणार पागा सरंजामसुधा चाकरीस येण्याची निकड याजकरितां कसबे मुरुम येथें चिरंजीव राजश्री अमृतराव यांजकडील पागेची घोडी आहेत ती झाडून बारगीर पोरगेसुधा सरंजाम नवाजुना पाहून तयारी एक दो दिवसांत करून बाकीचे भरतीस सिलेदार ठेऊन चाळीस गणतीचे घोड्याचा बेत करून राजश्री बाळाजी कासी यांची रवानगी पागेसुधा पत्र पावतांच करावी येविषई पुणियास राजश्री गोविंदराव यांजकडे टप्यावर लिहिलें आहे माहादजी सूर्यवंसी यांजलाहि पागेसुधा निकडीनें बोलाविलें आहे तरी दोन्ही पागा एके समयास एथें येऊन पोंहचेत ऐसी तरतूद करून पागेची रवानगी जलदीने करावी या कामास आळस होऊ नये रा छ १० साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

तिमाराव हरी अमील देगळूरकर                                                  लेखांक १६७.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
यास पत्र जोती भास्कर याणी मागितले सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष राजश्री जोती भास्कर हे कसबे कोंडलवाडी एथे मुलेंमनुष्येंसहित पूर्वीपासोन फार दिवस राहत आहेत यांचे घरी चिरंजिवाचें लग्न सालमारी त्याचे साहित्य पानपत्रावळ लांकूडफांटे फरफर्मास सरंजाम कसबेमारी ताकीद करून देवावा व कामजकूर एथें मारनिलेची असामी चिरंजिवाचे नावें दरमाहा रुो पांचप्रा मीरबदरुदीन हुसेनखां यांचे अमलांत चालत आली त्यास मारनिले पदरचे यांचा अगत्यवाद धरून चालत आल्याप्रा असामीचे वेतन यांजकडे चालवावें हरएकविषई यांजवर ममता करीत जावी मानिलेकडे कर्जवाम साहुकार वगैरे लोकांचे आहे त्याचा उपसर्ग यांस न होय कोणी तंटा तगादा यांस न करी ऐसें करावें यांचे अगत्य जाणून लिा असे तरी पूर्ववत्. प्रा असामी चालवावी विषय बहुतसा नाही कोणाचा उपद्रव न लागे ऐसे करावें रा छ ५ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

गोविंदराव कोकाटे यांस पत्र                                                           लेखांक १६६.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
जोती भास्कर यांजपासी दिल्हे.

राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावि यांसि-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्माकडील मामलतीचे कार्याकरितां राजश्री जोती भास्कर एथें होते त्यास सन ११९९ पावेतो जागीरदार व खालशाकडील नगदी ऐवजाचा फडच्या पेशजीच मारनिलेपासी करून दिल्हा राजे शंकरराव भोंग यांचे नावें नवाजषनामा नवाबाचे सरकारचा ता चोलाखे वगैरे पा बासर व सिरपूर वगैरे पा इंदूर एथील सन १२०० व सन १२०१ दुषाला घेऊन मारनिलेस दिल्हा त्यांची तनखा माहली घेऊन मारनिलेचे स्वाधीन केली फडच्या करून घ्यावा सन १२०२ सालचाहि नवाजषनामा तयार करविला आहे हरकारे यांजकडील अमील एथें होते त्यांजकडील जाबसालाविषई पूर्वी तुह्मास लिहिलें तुमचे उत्तर आलें कीं माहलीच जमीदाराचे मारफातीने फडच्या करून घेऊ त्यावरून आमील एथून माहली गेले आहेत वाजबीप्रा जाबसाल तेथे विल्हे लाऊन घ्यावा ता जोतीपंत सांगतील त्यावरून कळेल तुमचे कामास अनमान व्हावयाचा नाही रा छ ५ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

मीरअलमबाहादूर यांचे                                                              लेखांक १६५.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
मागितल्यावरून हरदो मुसज्ञापत्रे
दोन बहेरीबाहादूर यांचे नावें
लिहून एक हवाले तापीराम
वकील बाहादूर मवसूफ व दुसरें
पत्र इवाले सिवशंकरपंत
वकील निा बहेरीबाहादूर छ ५
साबान सन १२०२ फसली.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरीबाहादूर मुतहवरुदौला रोबजंग बहरुलमुल्क गोसावि यांसि-
७ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावे विशेष मौजे मिरवेल व मजरे व्यंकटापूर पा रायचूर हे गांव मीरअलमबाहादूर यांचे जागीरीत तेथें तुह्माकडोन उपद्रव लागो नये ह्मणोन पेशजी लिहिलें असतां हाली बाहादूर मवसूफ यांचे एथें वर्तमान आलें की सुरापूरकर यांची जमयेत रामदुर्गाहून स्वार प्यादे येऊन मीरमजकूरचा मालमहसूल घेऊन गेले याजकरितां तहसील बंद व लोक परागंदा जाले आहेत त्यास येविसीचा बंदोबस्त जाला पाहिजे त्यास बाहादूरमवसूफ याणी बजीनस पत्रच आह्माकडे पाहावयास पा त्याजवरून हे पत्र लिहिलें असें की हे करणें ठीक नाही याजमुळें कितेक कामात खलल आहे त्यास याउपरि मजरेमारचा मालमहसूल वगैरे काय जिनस नेला असेल तो जराबजरा देऊन रसीद घेऊन पाठवावी पुढें गावास व मजरेमजकुरास कोण्हेविसी उपद्रव न करावा फिरोन बोभाट न ये असे व्हावें रा छ ५ माहे साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

टपा पुण्यास रवाना केला त्यांत                                                   लेखांक १६४.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
पत्रे पाठविली ती छ ५ साबान
आपाजी बाबजी यांस.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी छ ७ रजबचे पत्र पा ते छ १७ माहे मारी पावले आह्माकडील ऐवजाविसी लिो व पुण्यात ऐवजाची वोढ आहे ह्मणोन विस्तारे लिा त्यास राजश्री बाळाजी रघुनाथ एथे आलियावरी तुह्मास ऐवज कांहीं पाठऊन देऊ अलीकडे तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान नवल विशेष समजले नाहीं तर लिहीत जावें रा छ ५ माहे साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

जिवनराव पांढरे यांचे पत्राचे उत्तर.                                                लेखांक १६३.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.

राजश्री जिवनराव पांढरे समसेरबाहादूर गोसावि यांसी-

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें नवाब बंदगानअली यांची स्वारी बेदरास येणार कर्जदार वगैरे कितेक लोकांचे तंटे येविषीचें बंधान असावे ह्मणोन लिहिलें त्यास बंदगानअली यांचे निघण्याचा निश्चय जाला आहे कर्जदार वगैरेचे जाबसालाविषई नघाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलणे ते प्रसंग पाहून बोलण्यात येईल तुह्माकडील कार्यास इकडून अनमान व्हावयाचा नाहीं राजश्री आनंदराव लिहितील त्यावरून कळेल निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें रा छ ५ माहे षाबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

रवाना छ ५ साबान रघुनाथ                                                         लेखांक १६२.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
गोविंद कलबर्गेकर यांचे पत्राचें उत्तर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रघुनाथपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें राजश्री रावरंभाजी जयवंत निंबाळकर यांचे माहवारीचे ऐवजास लाला नन्हुमल साहू हैदराबादकर यांजला पांच हजार रुा तुह्माकडोन राजश्री गोविंदराव याणी देविले सदरहू ऐवज कलबर्ग्यात जमा हे ह्मणोन ता लिहिलें त्यास पांच हजार रुा एथें आणोन घेण्याविषई नन्हुमल यांस सांगितलें मानिलेनी तुह्मास पत्र लिा आहे त्याप्रा ऐवजाची हुंडी करून लौकर पा द्यावी माहवारीचे ऐवजाची एथें निकड भारी या ऐवजास फार दिवस जाले याउपरि पत्र पावतांच नन्हुमल यांचे पत्राप्रा हुंडी पाठवावी एथे खोळंबा न होय ऐसें करावें हुंडावन देऊ ऐसें नन्हुमल आह्मासी बोले तुह्मासहि त्यानी लिा आहे रा ५ शाबान सलास तिसईन, बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

मल्हार रघुनाथ यांस पत्र महमद                                                  लेखांक १६१.                                                      १७१५ चैत्र शुद्ध ६.
इभराईमखां यांजकडे पाठविलें.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री मल्हारपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष पा जाफराबाद एथें खालासाहेब व अहमदखान यांजला माहवारी नवाब महमद इभराईमखांबाहादूर याणी करार करून मख्त्याचे ऐवजांत मजराईचे पत्र दिल्हे त्यास माहवारीचे ऐवजापैकी खालासाहेबास रुा साहा व अहमदखान यास रु।। पांच एकूण रु।। अकरा दरमहा कमी देतां ह्मणोन कळले त्यावरून लिा असे त्यास जाविलपासोन आजपावेतो बाकी माहवारीची राहिली असेल ते देऊन पुढें दरमाहा नेमणूकबमोजीब ज्यारी करावा रा छ ४ माहे साबान सलास तिसईन मया व अलफ बहुत काय लिया लोभ कीजे हे विनंति.