पत्र बापू जोसी गारवडेकर यांजला लेखांक १९८. १७१५ अधिक वैशाख शुद्ध २.
टप्यावरून छ ३० साबान.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बापू जोसी गारवडेकर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष तुह्मी पत्र पाठविले ते पावले राजश्री राघोपंत यांचे पत्राचा व त्यांचे घोड्यासुधा कांही सोय करण्याचा प्रकार विस्तारे लिहिला तो कळला त्यास राघोपंत यांस दहा घोड्यापर्यंत तयारी करून लवकर पाठवणे घोडी चांगली असली पाहिजेत दाहा नसल्यास पांच परंतु चांगली पराकाष्ठा दाहा लिहिली यापेक्षा अधिक न पाठवणे राजश्री बाळाजी रघुनाथ लवकर येत असल्यास त्यांजबरोबर पाठवावे मारनिलेस विलंब लागत असल्यास राघोबाची रवानगी लवकर करणे घोडे माणूस चांगले असीले पाहिजे गैरसाल नसावा हरएक जागा सोय करावयास येईल रा छ ३० साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)