Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जीवनराव पांढरे यांचे पत्राचे उत्तर. लेखांक २२०. १७१५ वैशाख शुद्ध ८.
राजश्री जीवनराव पांढरे समसेर बाहदुर गोसावि यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्री गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें भेटीस येण्याविषी लिहिलें त्यास उत्तम आहे यावें भेटीनंतर कळेल शाकभाजी तुह्मी पाठविली ती पावली रा छ ७ सवाल बहुत काय लिो लोम कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सुरापूर नाईक यांस पत्र सिवशंकर लेखांक २१९. १७१५ वैशाख शुद्ध ८.
यानी मागितलें सबब.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहदूर गोसावि यास- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष राजश्री व्यंकटराव सरसुभेदार यांचे घरी लग्न मौजे सिणूर पा कलबर्गे एथें आहे त्यास आपल्याकडून कोणी कारकून मारनिलेकडे पाठवून त्या सरहादेस तालुक्यातील फरफर्मास पान पत्रावल लाकूडफांटे शाकभाजी वगैरे देऊन लग्नसाहित्य करावें व गांवगनापैकी कांही कडबाहि ताकीद करून देवावा रा छ ७ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सुरापूर नाईक याचे पत्राची उत्तरें लेखांक २१८. १७१५ वैशाख शुद्ध ८.
छ ८ सवाली.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादूर गोसावि यासि-
४ सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी-अलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष आपण पत्र पा तें पावलें रुसुम शाहापूर मलीखेड कलबर्गे वगैरे तालुकियास फडच्याविषी ताकीदा पाठवाव्या ह्मणोन विस्तारें लिा त्यास नवाब बंदगानअली यांचे सरकारचा ऐवज संस्था-समंधे आपल्याकडून नजराण्याबाबत व दरबारी खर्च व सालाबाद खंडणीचा याप्रा बहुत येणे याजकरितां छ ३ सवाली आह्मास समक्ष बंदगानअली यानी मंत्री समीप असतां बोलण्यात आणिले कीं सुरापूरकराकडील ऐवजाचा फडच्या पेशजीच करून घेतला असता परंतु हा कारभार तुमचे मारफातीचा बदलखातर तुमची इतके दिवस सबूरी जाली याउपरि फडच्या होतो कीं नाही हें सांगावयाचें उत्तर आह्मी दिल्हे कीं हजरतीचे सरकारचा ऐवज फैसला करावयाची तरतूद बहिरीबाहदूर नजराण्याचा ठराव आल्या दिवसापासोन करितात परंतु भरणा भारी तालुक्यांत आत्फी संस्थानचे नादारीचा अर्थ याजकरिता दिवसगत जाली सांप्रत लाख रुपयांची हुंडी पुण्याकडील साहुकाराची येणार व लाख रुपयाची चिठी सुरापुराहून रवाना करितो ऐसें लिा आहे बाकीचाहि सहुलतीने फैसला करतील याप्रा बोलणे जालें त्यास ऐवजाचा फडच्या झाडून करून घ्यावा ऐसी हजरत व मंत्रीची मर्जी रदबदल वागऊन घेण्याविषई इकडून होत आहे परंतु आपल्याकडून अद्याप ऐवज आला नाही हें काय दरबारी बोलण्याप्रा सचोटी राहण्यांत उपयोग यास्तव ऐवजाच्या हुंड्या आधी रवाना कराव्या यास विलंबावर न टाकावें करारास ज्याजती दिवस फार जाले इतक्यावर तरी ऐवजाची सरबराई जाल्यांत जाबसालास नीट उत्तर लौकर यावें व मंत्रीस पत्र येण्याविसी पेशजी इकडून लिहिल्याप्रा पाठवावें रा छ ८ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजश्री राजे रोषनराव यांचे लेखांक २१७. १७१५ वैशाख शुद्ध ८.
मागितल्यावरून पत्र रा छ ७ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव नाईक वानवले स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष तुह्मी पत्र पा तें पाऊन मार समजला मनुलाल यास भागा-नगरी पाठवावें परंतु रंगोबा नाईक यांचे पत्र आलें की आह्मी व मामानी श्रीमंत राजश्री बापूसाहेब यांस पत्रें लिहिली आहे. त्यास मनुलाल यास भागानगरास न पाठवावें याजकरितां शाहागडाहून पैठणास आणून ठेविलें सांप्रत आपलें पत्र आलें तेंहि पुण्यास पा आहे त्याचें उत्तर आलें ह्मणजे सेवेसी लिहीन ह्मणोन लिहिलें त्यास पेशजी राजश्री गोविंदराव व रंगोबा नाईक यांची पत्रें टप्यावरून आलीं होती त्याचीं उत्तरे त्यांस लिहिलीं आहेत कीं त्या मुलाच्याने तेथें फडच्या होणार नाहीं एथें त्याचा बाप आणिक राजे रोषनराव च्यार सोयरे आहेत याणी करारनामा लिहून दिल्हा आहे कीं मुलास आपणाजवळ आणून ठेवावें फडच्या करून देऊ मग मुलास आमचे हवालीं करावें त्याजवरून तुह्मांस च्यार वेळां पत्रें लिहिली त्याचीं उत्तरें तुह्मांकडोन एकहि दुरुस्त आलें नाहीं त्याजवरून अपूर्व वाटतें त्यास शंकरदास याजकडील कर्जाचा फडच्या जाला म्हणजे सर्वत्र फडचे जाले असे तुमचे मनांत येत असेल त्यास असें न करावे पुढें कामें फार आहेत त्याजवर दृष्ट द्यावी सांप्रत सरकारचा जासूद पा आहे याजबार मनुलाल यास एथें पाठऊन द्यावें अनमान न करावा एथें कळेल त्याप्रा फडच्या करून घेऊ मग त्यास निरोप देऊ इतकियावर तुमचे चित्तास न आले तर न यो लिहिण्याची पराकाष्टा जाली रा छ ७ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भीमराव श्रीपत करनूळकर यास लेखांक २१६. १७१५ वैशाख शुद्ध ८.
पत्र विठल वासुदेव निाा हरकारे
यानी मागितलें सबब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष मौजे मुनगाल पा कमरनगर करनुळ हा गांव जागीर राजश्री राजे रामचंद्रराव हरकारे बादषाही यांजकडे आहे त्यास सन १२०१ सालचा ऐवज मारनिलेचा रुो च्यारसें व सन १२०२ सालची जमाबंदी मारची कचे आकाराअन्वयें होऊन ऐवज येणे तो अद्याप येत नाही याजकरितां मुजरद जासूद एथून पा आहे त्यास दुषालाचा ऐवज सदरहूप्रा ऐन व तहरिरीबाबत तीन साला पाऊणसें याप्रा ऐवजाची हुंडी करून पाठवावें यास दिवसगत न लागतां काम जलदीनें उगऊन पाठवावें जासुदास फडच्या करून दे तोपर्यंत तेथे ठेऊन दरमहा पांच रुो राजश्री विठल वासुदेव निा मारनिलेनी लिहिल्याप्राा देत जावे या कामास टाळा न देतां लिहिल्याप्रा उगऊन जासुदाची रवानगी करावी रा छ ७ सवाल बहुत काय लिाा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
बापू वैद्य यांचे मागितल्यावरून लेखांक २१५. १७१५ वैशाख शुद्ध ८.
पत्र लिहिले असे रा छ ७ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे मेडेगाव वगैरे च्यार गांव पा बाराहली हे गांव तुह्मी वो रा बापू वैद्य यांजकडे मख्त्याने इस्तावा सालबसाल करून सांगितले मारनिलेनी आपले तर्फेने देहाय-मारचे कामावर चिंतामणी यास मुकरर करून ठेविलें गांवचा कुल कच्चा आकार यानी घेऊन सरकारचे इस्तावियाप्रो ऐवज द्यावा असे अस्तां सन १२०२ फसली सालात तुह्माकडील काळोपंत अमील याणी गांवचा ऐवज येणेप्रो नेला त्याची याद अलाहिदा आहे त्यास वाजबी देणे घेणे यास जुलुमज्यास्ती नसावी ह्मणोन हे पत्र लिहिलें असें की यादीप्रो अन्याय मनास आणून काळोपंत यांस निक्षूण ताकीद करून सदरहू यादीची ऐवज इस्तावियाचे ऐवजात मुजरा द्यावा अथवा जे नेले आहे ते चिंतामणी यास देऊन रसीद घ्यावी पुढे गांव निर्वेधपणे याचे यांजकडे चालवावें फडफर्मास वगैरे काय जे असेल ते यास देवावे यासहि लाभ इतकाच आहे येविसीचा फिरोन बोभाट येऊ न द्यावा घराऊ काम जाणून लिहिले आहे खासगत काम समजोन लिहिल्याप्रो अमलात आणून याचे उत्तर लौकर पाठवावें रा छ ७ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र रामचंद्रपंत सुभेदार यांस लेखांक २१४. १७१५ वैशाख शुद्ध ६.
अंताजी निराजी यांजकडे मार्डीस
पाठविले ते छ ५ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्रपंत सुभेदार स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत असावें विशेष मौजे वरलेगांव पा मार्डी व मौजे बोरामणी पा सोलापूर या दो गांवचे सिवेचा धारा पेंडवळा सर्व असतां माजुल जागीरदाराचे कारकीर्दीत गांव बेचिराग सबब बोरामणकर वरलेगांवची जमीन दीड चावर पेंडवळ्याची हाद मोडून पेरू लागले सांप्रत आह्मांकडे मार्डी एथील जागीर आल्यानंतर गांवची वस्ती जाली गांवकरी यानी बोरामणकरास आपले जमिनीचा तगादा केला त्यास बोरामणकर यानी कजियाचे राण पोटांत घेऊन चालते राण वरलेगांवचे एथें नांगर धरून कजिया करूं लागले येविषई राजश्री अंताजी निराजी कमाविसदार यानी आपल्यास पत्र लिा वरलेगांवकर गांवकरी यासहि आपल्याकडे पों त्यावरून आपण वीरेश्वर हजारी यास शिवेची चौकसीकरितां पों त्यानी धारा पेंडवळा पाहून बोरामणकर यानी सेव रेटली ऐसे बोलून आपल्याकडे गेले असतां बोरामणकर आगळिक करून वरलेगांवचे राणांत नांगर धरितात यास्तव आपल्यास लिो असे त्यास गैरवाजबी बोरामणकर जमीन घेऊ ह्मणतात येविषई त्यास निक्षूण ताकीद होऊन पेशजीपासोन चालत आल्याप्रमाणें चालावें येविषीचा बंदोबस्त जरूर व्हावा वरलेगांवकराकडील बैल व माणसे बारामणकरानी धरून नेली आहेत ती सोडून देवावी व चालते राण यांचे हे पेरतील त्यास मुजाहीम न देण्याची ताकीद व्हावी व धान्याचे राण निर्णय होय तोपर्यंत उमयतांकडील अमानत असावें पुढे वाजबीचे निर्णयात जिकडील तिकडे चालेल मार्डी परगणा आह्माकडे तो आपलाच असें असतां है बोभाट येणे हे स्नेहाचे जागा अपूर्व वाटले आह्मीं प्रसंगी नसतां परगणेमारीचे उणे पडल्यास त्याची दुरुस्ती आपण करावी ते विस्मरण होऊ लागले याचे काय कारण हे समजले पाहिजे याजकरितां या पत्राचे उत्तर जरूर पाठवावें रा छ ५ सवाल बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंदराव बलाल पागेवाले यांचे लेखांक २१३. १७१५ वैशाख शुद्ध ६.
मागितल्यावरून आनंदराव मोरेश्वर
यांचे नावें पत्र रा छ ५ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष पा राजणी एथील घांसदाणीयाचे अमलाबाबत ऐवज सन १२०१ सालचा पैकी कांहीं वसूल पावला तो वजा जातां बाकी बहुत येणे व सन १२०२ सालचा दरोबस्त मामलतीचा ऐवज तटला याजकरितां पेशजी पागेकडील स्वारहि पो परंतु फडच्या ने जाला त्यावरून लिहिले असे त्यास दोन सालां झाडून ऐवज राजश्री सदासीव नारायण निा पागा त्याचे पदरी घालून रवाना करणे याप्रा तेथील तुह्माकडून अमील असेल त्यास पत्र देऊन फडच्या होय ते करावे फिरोन बोभाट येऊं नये खासगत कामाची कळकळ सर्वोपरी तुह्मास असावी दोनसाल इकडील मामलतीचा ऐवज तुह्माकडे काम असतां तटून राहावा ऐसे घडू नये याउपरि फडच्या करून दिल्ह्याचे पत्र यावे दिवस गत न लागावी रा छ ५ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र भीमराव संपत यांस लेखांक २१२. १७१५ वैशाख शुद्ध २.
छ १ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष मरहूम नवाब रणमस्तखां बाहादूर याजकडून कर्जाऊ ऐवज येणे त्याचा फडच्या पेशजी मरहूम असतांच तुमचे मारफात ऐवजहि लाऊन दिल्हा एथून कोणी पाठवावा त्याचे पदरी ऐवज घालितो ऐसे तुह्मी लिा होते तुमचे लिहिण्याची खातरजमा त्यावरून राजश्री बालाजी व्यंकटेश यांस रवाना केले अलफखान बाहदूर यांनी आज आज उद्या यात्रा करून नंदपाळ वगैरे तालुक्यास जिकडे गेले तिकडे मारनिले ऐवजाकरितां च्यार महिने समागमे राहून सेवटी कांहीच नाहीं फिरोन आले त्यास इकडील दोस्ती घरोबा नवाबासी कसा हे इशापासोन अलफखान बाहदूर यांस तुह्मांस माहीत पुढेंहि मोठे कामाची उमेद त्यापक्षी खासगत कर्जाऊ ऐवजाची हे अवस्था यांत दोस्ती घरोब्यास लाजम की काय हे खान-बाहदूर यांस विचारावें आह्मीही त्यांस व रणदुलाखान यांजला पत्रे पाठविलीं आहेत देऊन ऐवजाचा फडच्या होय ऐसी तजवीज लौकर आमलात आणावी इकडील ऐवजाची काळजी व कळकळ तुह्मांस असावी याची तपसील ल्याहावा ऐसे नाहीं रवाना छ १ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोपाल नरसिंह जिवनगीकर लेखांक २११. १७१५ अधिक वैशाख वद्य १४.
याने पत्र मागितले त्याजवरून
छ २७ रमजान.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदीइमामखां बाहदूर सलामत-
४ अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर अफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून गोपाल नरसिंह मौजे जिवनगी एथे आह्माकडील गांवी बहुत दिवस आहे यानी एक मनुष्य तीन वर्षांचे कराराने नौकर ठेविला तीस रुो आगाव दिल्हे पैकी एक वर्ष चाकरी जाली दोन वर्षे करारबमोजीब राहिली असतां तो माणूस तेथून उठोन चितापूर तालुक्यांत जाऊन राहिला आहे ह्मणोन कळले त्याजवरून लिा असे त्यास चितापुरी आपल्याकडून कोण असेल त्यास ताकीद करून यांचा मनुष्य यांचे स्वाधीन करून देवावा अथवा दोन वर्षेंबाबत आगाऊ ऐवज त्याने यांजपासोन घेतला तो व्याजसुधा फडच्या करून देवावा रा छ २७ रमजान ज्यादा काय लिहिणे.