Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

सोा कासीबाई घारपुरी यांस                                                            लेखांक १८०.                                                      १७१५ चैत्र वद्य ५.
पत्र धारासींवकर याचे जासुदासमागमे
छ १९ साबान.

ती साौ मातुश्री कासीबाई वडिलाचे सेवेसी-
अपत्य बापूचे सां नमस्कार विज्ञापना ता चैत्र वद्य ५ पावेतो मुा भागानगर एथें सुखरूप असो विशेष तुह्मी पत्र पाठविले ते पावलें अकोलनेराहून धारासिंवास येताना मधे जातेगांव व मांगी या दोही गांवामधे चोरानी लुटले ह्मणोन विस्तारे लिो त्यास एथून राजश्री गोविंदराव भगवंत यांस लिो आहे बंदोबस्त करतील रा छ १९ चैत्र वद्य ५ हे विनंति.

गोविंदराव रघुनाथ अमील पाा                                                      लेखांक १७९.                                                      १७१५ चैत्र वद्य ४.
पालीम यांचे पत्राचे उत्तर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें तुह्माकडे सरदारुलमुलुकबहादूर याणी पा पालीम एथील ऐवजी तनखा केली त्याबाबत ऐवज येणे त्याचे करारनामे तुह्मी लेहून दिल्हे त्यापो नगदी आठ हजार रुो राजश्री कृष्णाजी शेषाद्रि यांजसमागमे पा ते पावले माहली मामलेदाराकडे ऐवज चौदा हजार च्यारसें सवा एकतीस रुो याच्या रसीदाच्या नकला काजीचे मोहरेनसी पाठविल्या ह्या ध्यानास आणून मजुरा द्यावा ह्मणोन लिा त्यास काजीचे मोहरेनसी रसीदाच्या नकला पाहिल्या त्यास बाबतीबा वसूल चौतीसें नऊ रुो चौदा आणे सन ११९९ बाबत व सन ११९८ सालचे बाबती पो साडेतेरासें को कृष्णराव भिवाजी यांचे मामलत ऐवजी एकूण दोन रकमाविषई पुण्याहून राजश्री गोविंदराव यांचे पत्र इकडे पाठवावें त्याप्रा समजोन याचें उत्तर लिहिण्यांत येईल बाकी रसीदा कादाराच्या मोहरेनसी असल एथें वो उपेंद्रभट यांजबा एक हजार रुपयांची बरात गोविंदराव यांची व त्यांचे कबजासुधा एकंदर पाठवाव्या ह्मणजे रसीदाअन्वयें सदरहू ऐवज मजुरा देण्याचें ठरावात येईल रा छ १८ साबान सलास तिसईन सन फसली १२०२ बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

कोन्हेरराव हरी व तिमाराव हरीचे                                                 लेखांक १७८.                                                      १७१५ चैत्र वद्य ३.
पत्राचें उत्तर.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कोन्हेरराव व तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें सरदारुलमुलुकबाहादूर यांजकडोन स्वराज्याचे मामलतीबा ऐवज येणे त्यापो पहिल्या हत्याऐवजी तुह्माकडोन साडेबाहत्तर हजार रुो येणे त्यापो तुह्मी हुंड्या पेशजी पाठविल्या त्याच्या रसीदा इकडून रवाना केल्याच आहेत बाकी ऐवज येणे तो व अलीकडे दोन हप्ते भरले त्याबाबत मिळोन एकंदर ऐवजाचा भरणा भारी तुह्माकडून येणे असतां अद्याप ऐवज येत नाही हे काय याउपरि पहिले हत्यापो बाकी व दोन हप्ते दरोबस्त याप्रा ऐवजाची रवानगी सत्वर करावी दिवसगत लागो नये राजश्री विसाजी प्रल्हाद निा सरदेशमुख यांजकडे खंदार व सारबाड एथील मोकासदाराकडे गांव आहेत तेथील वसूल त्यांजकडे पडला त्याच्या रसीदा देतों ह्मणतात आज्ञा जाली तर तीस हजारपावेतो रसीदा घेऊन पाठवितों ह्मणून लिा त्यास सन १२०१ पावेतो एकंदर स्वराज्याचा ऐवज एथें घेण्याचा ठरला त्यापक्षी परभारा गांवाचे वसुलाच्या रसीदा घेऊन पाठवावयाचें कारण नाही याजकरिता रसीदा घेऊन पाठऊं नयेत करारबमोजीब नगदी ऐवज पहिले हप्ते-याची बाकी व अलीकडील दोन हप्त्याबाबत याप्रा झाडून सत्वर पाठवावा कमाविसी जे गांव त्याऐवजी मजुरी देणे ऐसें तुह्मी लिहिणे आह्मी रुकार देणे हे रीतीची गोष्ट नाही याजकरितां कमाविसी गांवचा ऐवज तुह्मी परभारा घ्यावा इकडील ऐवज कराराबमोजीब लौकर पाठवावयास आळसाखालें टाकू नये रा छ १७ साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.

राजे जोधसिंग खंदारकर यांचे                                                      लेखांक १७७.                                                      १७१५ चैत्र वद्य ३.
पत्राचें उत्तर.

राजश्री राजे जोधसिंगबहादूर गोसावि यास-

७ अखंडीतलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावे विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें ह्मसें मुधोळ वगैरे तालुक्याचें काम नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून करून घेण्याविषई तपसिलें मार लिहिला व राजश्री हरिपंत तात्या यांचे पत्र पाा तें पावोन सविस्तर समजलें त्यास सांप्रत सैफुलमुलुकबाहादूर यांचा काल जाला गोष्ट अनुचित जाली याजकरितां नवाब-अजमुलउमराबाहादूर आपले चित्तांत उदासीन आहेत बंदगानअली यांची स्वारी बेदरास जाण्याचीहि गडबड आहे इतक्यावर प्रसंग पाहून नवाब-मवसूफ यांसी बोलण्यांत येईल त्याप्रा लिहिण्यांत येईल ता राजश्री सुभराव लिहितील त्यावरून कळेल आपले कार्यास इकडून दुसरा प्रकार व अनमान व्हावयाचा नाही ता लिहिणे कारण नाही निरंतर पत्र पाठऊन संतोषवीत असावें रा छ १७ साबान बहुत काय लिा लोभ असो दीजे हे विनंति.

रंगराव निा रोशनखान यांस पत्र.                                                    लेखांक १७६.                                                      १७१५ चैत्र वद्य २.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रंगराव स्वामीचे सेवेसीपो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे मोकाशाची ठाणी पा वसमत एथील सेंदूर-सणे वगैरे गांव पेशजीपासोन बहुत दिवस आहेत यांजकडील गांवास आजपर्यंत कोणीं इजा दिल्ही नाही ऐसे असतां सांप्रत ठाण्याचे गांवास तुह्माकडून उपसर्ग लागतो ह्मणून बोभाट आला त्यावरून लिा असे त्यास यांचे ठाण्याचे गांव पूर्वीपासोन मोकाशाकडे आहेत त्यास उपसर्ग देण्याचें कारण काय याउपरि ठाण्यास इजा न लागे ऐसें व्हावें रा छ १६ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.

सैदमुजवरखान अमील पा वसमत                                                लेखांक १७५.                                                      १७१५ चैत्र वद्य २.
यास पत्र.

खांसाहेब मेहरबान दोस्तां सैदमुजवरखांबाहादूर सलामत-
5 अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी एथील खैरअफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे मोकाशाची ठाणी पा बसमत एथील सेंदूर-सणे वगैरे गांव आहेत ते पेशजीपासोन बहुत दिवस मारनिलेकडे त्यास आजपर्यंत कोणाचा उपसर्ग नसतां प्रस्तुत यांजकडील गांवास उपसर्ग होतो ह्मणून कळले त्यावरून लिा असे त्यास यांचे ठाण्याचे गांवास उपद्रव न लागे ऐसे व्हावें येविषीचा बोभाट न ये तें करावें हरएक-विषई यांचे साहित्य करीत जावें रा छ १६ साबान ज्यादा काय लिहिणे.

दौलतखान यांस पत्र.                                                                लेखांक १७४.                                                      १७१५ चैत्र वद्य २.

खांसाहेब मेहरबान दोस्तां महमद-दौलतखांबाहादूर सलामत-
5 अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा तामसें एथील मोकासा राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे आहे त्यास मोकाशाचा अमल फार दिवसापासोन येणे त्याचा फडच्या होत नाही ह्मणोन बोभाट श्रीमंताचे सरकारांत गेला त्यावरून सरकारची पत्रे आह्मास येविषई आली त्यास मोकाशाचा अमल पेशजीपासोन चालत आल्याप्रा ज्या सालापासोन राहिला असेल तेथून सालमारसुधा मारनिलेकडे वाजबी फडच्या करून रसीदा पाठवाव्या बोभाट न ये तें करावें रा छ १६ सोबान ज्यादा काय लिहिणे.

महमद रोषनखान यास पत्र.                                                         लेखांक १७३.                                                      १७१५ चैत्र वद्य २.

खांसाहेब मेहरबान दोस्तां महमद-रोषनखां बाहादूर सलामत-

5 अजदील एखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफियत जाणून आपली खैर खुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांजकडे मोकाशाची ठाणी पा वसमत एथील सेंदूरसणे वगैरे गांव पेशजीपासोन बहुत दिवस आहेत यांचे गांवास आजपर्यंत कोणी इजा दिल्ही नाही होली आपल्याकडून ठाण्याचे गांवास उपद्रव होतो ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास यांजकडील गांवास तोसीस लागो नये पेशजीपासोन चालत आल्याप्रा ठाण्याचे गांव यांचे यांजकडे चालत आहेत त्या गांवास उपद्रव लागल्याचा बोभाट न ये ते करावें रा छ १६ साबान ज्यादा काय लिहिणे.

मानाजी बळवंतराव देवकांते                                                          लेखांक १७२.                                                      १७१५ चैत्र वद्य २.
यांचे पत्राचें उत्तर.

राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते गोसावी यास-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें पा वसमत पो ठाण्याचे गांवास रोशनखान व रंगराव यांचा उपसर्ग लागतो सबब उभयतास तुमचे लिहिल्याअन्वयें पत्रें लेहून पा आहेत देऊन बंदोबस्त करून घ्यावा पा तामसें एथील मोकाशाचे फडच्याविषई महमद दौलतखान यांस पत्र लिहून रवाना केले आहे त्यास देऊन मामलतीचा फडच्या ई।। राहिल्या सालापासोन करून घ्यावा तुह्मी ह्मैस पा ते पावली रा छ १६ साबान बहुत काय लिहिणे हे विनंति.

छ १६ साबानी रवानगी-पत्रें                                                            लेखांक १७१.                                                      १७१५ चैत्र वद्य २.
आनंदराव मोरेश्वर यांचे पत्राचें उत्तर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आनंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र तें पावलें पागा चाकरीस पाठवण्याचें लिहिलें त्यास पेशजी तुमचे तैनात-पागा पाठवावयाचा इनायतनामा आल्यावरून पागेची सरंजामी करविली रवाना करावी तो हजूर चाकरीस पागा आणविल्या सबब तुह्माकडे येण्याचें तूर्त राहिलें घाटावर मुफसदाचा बखेडा ह्मणोन लिहिलें त्यास येविषई लिहिलें तें नवाब अजमुलउमराबाहादूर यांस ल्याहावें बंदोबस्त करावयाचा तसा करतील तुह्मी पुण्यास गेलां होतां राजश्री पाटीलबावाचे वराती पो पंनास हजार देऊन कबज घेतलें व पंनास देणे आहेत तालुक्यांत तर जीव नाहीं ह्मणोन लिा त्यास तुह्माविषई राजश्री नेमवंत यांसीहि बोलण्यात आलें यांचे ह्मणे कीं वरातेचा ऐवज कोणेहि प्रकारें त्याणी द्यावा त्याजकडे ऐवज फार येणे त्यास तालुक्याची अवस्था सर्वत्र सारखी युक्तिप्रयुक्तीने निर्गम होण्याची तजवीज करावी रा छ १६ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.