Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
मल्हार रघुनाथ निा वानवले लेखांक १६०. १७१५ चैत्र शुद्ध ६.
जाफराबादी आहे त्यास पत्र
भौवराव निा मादि इभराईमखां
याणी मागितलें सबब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री मल्हारपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावे विशेष पा जाफराबाद एथें नवाब महमद इभराईमखांबाहादूर याणी राजश्री भीवराव जिवाजी यांजला दरमहा पंनास रुो माहवारी ईापासोन मख्त्याचेऐवजी मजरा देविली त्याचें पत्र बजीनस नवाब मवसूफ यांचे असतां तुह्मी माहे रमजानपासोन माहवारीचा ऐवज मारनिलेस दिल्ही जावलपासोन अखेर शाबान एकूण च्यारमाही ऐवज दिल्हा नाही ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास जावलपासोन देविला असता रमजानपासोन ऐवज दिल्हा याचें कारण काय माहाली आमल दखल जाला सबब रमजानपासोन दिल्हा ऐसें असल्यास मागील ऐवज वासलात तुह्माकडे पडली असेल तरी रमजानपावेतो च्यार-माही माहवारीचा ऐवज दरमहा पंनास रुोप्रा यांचा यांस पावता करावा यांचे माहवारीचे ऐवजास दिकत करू नये मौजे मालखेड वगैरे देह पामार यांजकडे तुमचे आमलदखलापूर्वील बाकी येणे त्या ऐवजावर साहा महिन्याचा माहवारीबाबत रोखा जमीदाराचा त्याजवर मोजूल अमील मिसरीखान याची उगवणी आहे तो ऐवज फडच्या जाला नाही त्यास जमीदारास ताकीद करून देवावा हली यांचे माहवारीस आटकाव करू नये माहबमाह करारबमोजीब पावता होत जावा रा छ ४ माहे साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जिवाजी बाबूराव अमील पाा लेखांक १५९. १७१५ चैत्र शुद्ध ६.
निलंगे यांस पत्र.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जिवाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष पा निलंगे एथील सावोत्रियाची मामलत सन १२०२ सालची श्रीमंत राजश्री पंतसचीव यांजकडून आहे त्यास पामारचे सावोत्र्याचा आमल सालाबाद मामुलप्रा मारनिलेकडे फडच्या करून द्यावा येविषई मेहरबाने अजमलमुलुकबाहादूर यांचे पत्र तुह्मास पा असे तरी दिवसगत न लाविता मामलतीचा ऐवज पदरी घालून रसीद घ्यावी बोभाट येऊ न द्यावा रा छ ४ साबान बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदीइमामखां यास पत्र रामाजी लेखांक १५८. १७१५ चैत्र शुद्ध ६.
कोन्हेर याणी मागितले सबब.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदीइमामखां बहादूर सलामतअजदील येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरआफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा कलबर्गे एथील सावोत्रियाची मामलत सन १२०२ सालची राजश्री बापूजी केशवराव यांजकडे श्रीमंत राजश्री पंतसचीव यांजकडून आहे त्यास सन मारचे सावोत्रियाचा मामुल बमोजीब फडच्या मारिनिलेकडे करून घ्यावा येविषई मेहरबान अजमलमुलुकबाहादूर यांचेहि खत पाठविलें आहे याउपरि दिवसगत न करितां मामलतीचे ऐवजाचा फडच्या मारनिलेकडे करावा बोभाट येऊ नये रा छ ४ माहे साबान ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
त्रिंबकपंत आणा यांस पत्र. लेखांक १५७. १७१५ चैत्र शुद्ध ६.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिंबकपंत आणा स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें। लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पो ते पावलें वो राजश्री बाळकृष्णदेव व वो राजश्री नारायणदेव यांची सून श्रीकासीहून आली आठ दिवस एथे राहून बारामतीस जाणार तेथून आपणाकडे यावे हे त्याचे मानस आहे इत्यादिक लिहिले व श्रीमंताचे लग्न जाले ह्मणून लिा ते सर्व कळले बारामतीची मंडळी वर्षप्रतिपदेस एथे येऊन पावली मातुश्री चिमाबाई यांच्या येण्याचा मजकूर लिा त्यास नवाब्याच्या स्वारीची निघण्याची गडबड आहे याजकरितां तूर्त चिमाबाई याणी येण्याची गडबड करू नये पुढें लेहू तैसे करावे सौरवती मातुश्री आकाबाई यांची प्रकृत स्वस्थ नाही घरचे आत्मीय मनुष्याने त्यांचा परामृष करावा ऐसे तेथे कोणी नाही याजकरितां मातुश्री चिमाबाई यांस आमचा निरोप सांगावा की आकाबाई यांजपासी तुह्मी जाऊन राहावे त्यांचा समाचार घेत जावा ह्मणजे आमचे मनाची स्वस्थता होईल ऐसे त्यास सांगून त्यांची रवानगी बारामतीस करावी आह्मीहि त्यास पत्र लिा आहे तुमच्या असामीच्या ऐवजाच्या तनख्याचा इनायतनामा शमषुलउमरा याजकडे देऊन महमदअजीमखा यांचे पत्र सिदीइमामखान यांस देऊन राजश्री रघुनाथपंत यांजकडे रवाना केले ऐवज येण्यास आतां गुंता नाही ऐसे गोविंदराव यास सांगून मुबादला ऐवज येण्याचा राहिला असेल तो त्यांजपासून घ्यावा रा छ ४ साबान बहुत काय लिा लोम कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
अनंतभट वैद्य यांस. लेखांक १५६. १७१५ चैत्र शुद्ध ६.
वेा राजश्री अनंतभट वैद्य स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले घरीहून निघोन इंदापुरास आलो तेथें राजश्री महादेव भट यांची भेट घेऊन ते व मी समागमे बारामतीस आलो तेथून पुण्यास आलो राजश्री गोविंदराव यास सर्व वर्तमान निवेदन केले ह्मणोन विस्तारे मजकूर लिो तो कळला त्यास तुमचे कार्याविषी राजश्री गोविंदराव यांजला लिहिले आहे रा छ ४ साबान हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रामाजी कोन्हेर यांचे पत्राचें उत्तर. लेखांक १५५. १७१५ चैत्र शुद्ध ६.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें। लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले मौजे सिणूर पा कलबर्गे एथें तुमचें कर्ज गांवाकडे येणे येविषी दावरजंग यांचे ताकीदपत्र व सरकार मलीखेड वगैरे माहाल एथील सन १२०२ सालची मामलत सावोत्रीयाची पंतसचीव यांजकडून केली त्याचे फडच्याविषी ताकीदा पाठवाव्या ह्मणोन लिा त्यास दावरजंग यांची ताकीद तयार करविली आहे मागाहून आली ह्मणजे रवाना होईल सावोत्रीयाचे मामलतसमंधे जेथील वहिवाट त्या माहालच्या ताकीदा तयार करविल्या पैकी पा कलबर्गें प्रतापपूर निलंगे एथील ताकीदपत्रें महमदअजीमखान बाहादूर यांच्या घेऊन पाठविल्या आहेत रा छ ४ माहे साबान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भोलानाथ शास्त्रीचे पत्राचें उत्तर. लेखांक १५४. १७१५ चैत्र शुद्ध ३.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री भोलानाथ शास्त्री स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पांच सात पत्रे पा ती पावोन लिहिल्याअन्वयें सविस्तर मार समजला रोजाचा ऐवजाविषई लिहिल्यावरून सांप्रत तेथील कादार नरसिंगराव यांस नवाब अजमुलमुलूकबाहादूर व अबूसमदखान यांची पत्रें निक्षुण रोजाचा ऐवज एकंदर सालचा तुह्मास औरंगाबादेस पोंहचाऊन देण्याचें वगैरे मार लेहून पाठविली व आह्मीहि त्यास पत्र लेहून रवाना केले आहे तीन पत्रें त्यांस पावती करून कार्य करून घ्यावें इकडे ल्याहावें तुह्मी रंगीन फेटा पाठविला तो पावला रंग चांगला परंतु सुतास फार मोठा याजकरितां इतकाच लांबरुंद दुसरा फेटा आबासी गंडेरीदार तयार करऊन बारीक सुताचा पाठवावा ह्मणजे बांधण्याचे उपयोगी पडेल आपल्याकडील तुह्मी वरचेवर वर्तमान लेहून पाठवीत जावें रा छ २ चैत्र शा ३ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
नरसिंगराव अमील ताा मानूर लेखांक १५३. १७१५ चैत्र शुद्ध २.
यांस पत्र दयारामभट शास्त्री
याणी मागितलें सबब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिो असावें विशेष वेदशास्त्रसंपन्न राजश्री भगवंतभट बिन दयाराम भट शास्त्री अंतापूरकर व सिद्धेश्वर बिन भोलानाथ शास्त्री औरंगाबादकर या उभयतांस नवाब शमषुलउमराबाहादूर याणी ता मानूर एथें दर आठ आणेप्रा उभयतांस एक रुपया रोज इनाम करून दिल्हा त्याच्या सनदापत्रें दिल्ही व तुह्मास पत्रें पेशजी पा असतां अद्याप यांचे रोजाचे ऐवजाचा फडच्या न केला ह्मणोन कळलें त्यास नवाब मवसूफ याणी रोज करार करून दिल्हा त्याप्रा बेदिकत ऐवज यांचा यांस पावता व्हावा तें न करतां बोभाट आला त्यावरून नवाब अजमुलमुलूकबाहादूर यांसी बोलणे होऊन त्याणी पत्र निक्षूण यांचे रोजाचा ऐवज पत्र पावतांचे भोलानाथ शास्त्री यांसमागमे औरंगाबादेस पावती करून देण्याविषी लिहिले व सदरहूअन्वयें अबूसमदखान यांचेहि पत्र पा आहे त्यास सन १२०२ सालबाबत रोजाचा एकंदर साल तमाम ऐवज भोलानाथ शास्त्री यांस देऊन औरंगाबादेस त्यांजला पावते करून तेथें पावल्याचें त्यांचे पत्र घेऊन आमचे नावें पाठवावें यांचे रोजाबदल ऐवजास याउपरि दिकत न पडतां सनदेबमोजीब साल दरसाल ऐवज पावतां करीत जावा उभयता शास्त्री यांचे अगत्य कसें याचा ता ल्याहावा ऐसें नाहीं सनदा व इनायतनामे वगैरे पत्राच्या नकला तुह्मी घेऊन असल पत्रें यांजला भोगवट्यास द्यावी व जमीदाराचेंहि पत्र करून देवावें रा छ १ षाबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जिवाजी बाबूराव अमील निलंगेकर लेखांक १५२. १७१५ चैत्र शुद्ध २.
यांचे पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जिवाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें तुह्माकडे स्वराज्याचे मामलतीबाबत ऐवज नवाब अजमलमुलूकबाहादूर यांजकडील हवाल्याबाबत साडे तीन हजार व दोन तनखा येणे त्या पो साडेतीन हजार रुा नगदी व केसो मदन साहुकार यांचे वरातेबाबत नऊ हजार पहिले वायद्याचे याप्रा साडे बारा हजार रुपयांच्या दोन रसीदा अजमलमुलुकबाहादूर यांचे नावें लेहून दिल्या सदरहू रुपयाचे व्याजाबाबत ऐवज तुह्माकड़ोन येणे तो व तनखापो दुसरे वायद्याचा ऐवज याप्रा सत्वर पत्र पावतांच पाठऊन द्याव्या फुट-मोकासदार वगैरे ऐवजाविषई तुह्मास तगादा करितात येविषी ता लिहिलें त्यास एथून तुह्मास लिहिण्यात येईल त्याप्रा मामलेदाराकडे फडच्या सन १२०२ सालचा करणे तो करीत जावा ऐवज करारबमोजीब व्याजसुधा लौकर पा द्यावा रा छ १ माहे पाबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रघुनाथ गोविंद कलबर्गेकर यांजकडे लेखांक १५१. १७१५ चैत्र शुद्ध २.
गोविंद यांजकडे पाठविले.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बाहादूर दाम-मोहबतहु.
७ अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरअफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून राजश्री त्रिंबक तुकदेव यांची असामी सालाबाद नवाबाचे सरकारातून एक हजार रुाप्रा सन १२०० य सन १२०१ एकूण दुषाला असामी बाबत दोन हजार रुा याची तनखा इनायतनामा नवाब शमषुलउमराबाहादूर यांजवर जाला तो मेहरबान अजमुलमुलुक बाहादूर यांजपासी देऊन सदरहू रुपयाची तनखा त्यांजपासोन आपले नावें पा चिटगोपे एथील माल ऐवजी दोन हजार रुा देण्याची घेऊन व ताकीदपत्र याप्रा दोन कागद घेऊन पा आहेत त्यास सदरहू दोन हजार रुा राजश्री रघुनाथ गोविंद यांजला पावते करून सदरहू ऐवज पावल्याची मारिनिलेची रसीद घ्यावी ऐवज पत्र पावताच पावता करावा दिवसगत लागो नये पत्राचा जवाब इकडे रवाना व्हावा रा छ १ षाबान ज्यादा काय लिा हे किताबत.