Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राघो अनंत चिटगोंपेकर याचे पत्राचें उत्तर. लेखांक २१०. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री राघोपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मीं पत्र पा ते पावलें मौजे हनरगी पा चिटगोपें एथे चौथाईचा कडबा आहे त्यास लस्करचे कहीवाल्याचा उपद्रव लागतो यास्तव ताकीद् व बाणदार देवावा ह्मणोन लिा त्यास कहीवाल्यास उपद्रव न करण्याची ताकीद बहुतकरून नवाबाचे सरकारांतून आहे तथापि बाणदार असलासा पाहिजे तर अडीच रुो रोज द्यावा लागतो लिहून पा ह्मणजे बाणदार पाठऊ रा छ २५ रमजान हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सुभराव निा हरकारे याचे लेखांक २०९. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
पत्राचें उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सुभराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें राजे जोधसिंग यांजकडे ऐवज येणे येविषी मारनिलेस तुह्मी लिहिल्यावरून त्यांनी आमचे पत्रांत लिा आहे कीं हंगामसीर ऐवज पाठऊ त्यास हंगाम तर ऐवज पाठवावयाचा हाच आहे यास्तव त्यांचे पत्राचा जाब पा व तुह्मीहि लेहून ऐवज येऊन पोंहचे ऐसें जरूर करावें रा छ २५ रमजान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जोधसिंग खंदारकर यांचे पत्राचें उत्तर. लेखांक २०८. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
राजश्री राजे जोधसिंग बहादूर गोसावि यास- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें माहूरप्रांतीं नाईक याचा उपद्रव भारी होता सांप्रत राजश्री रघोजी भोंसले यांजकडून सुभेदार फौजसुधा नाईकड्याचे पारिपत्यास आल्याचा मार लिहिला तो सविस्तर समजला तुमचे तालुक्यांत पायमाली सबब खासगत ऐवज येणे त्यास विलंब जाला हंगाम-सिस्तीवर हुंडी करून पाठऊ ह्मणोन लिा त्यास ऐवजास किती दिवस जाले आपली मुदत होऊन गेली याजकरितां हिसेबसहित करारबमोजीब ऐवजाची हुंडी करून पाठवावी हंगामहि ऐवजाचा जाला याजवर दिवसगतीचा प्रकार नसावा रा छ २५ रमजान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
श्री वो आनंभट भट जिवणा लेखांक २०७. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
दीक्षित बेदरकर ब्राह्मणाविसीं पत्र
मागितल्यावरून दिल्हे छ २५ रमजान.
खांसाहेब मेहेरबान दोस्तान सिदीइमामखान बाहादूर दाममोहबतहू-
अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी एथील खैरसला जाणून साहेबी आपली खैरीयत हामेशा कलमी करीत असिले पा दिगर मार की वो महादेवभट याणी वर्तमान सांगितलें की मौजे सिकींदरें पा हवेली बेदर एथील जोतीषपण आमचे तीन पुरुष चालत आले असतां सांप्रत वो शामभट जोसी मौजे मदकहाली पा मजकूर याने आं मेहरबानापासी जाहीर जालें कीं मौजे सिकींदरे एथील जोतीषपण माझें आहे त्याजवरून आपण त्यास वतनावर दाखल करून दिल्हा त्यास एक वर्ष जाले ह्मणोन कळले त्याजवरून हे पत्र लिा असे की महादेवभट ब्राह्मण गरीब आणि वृत्तीचा कारभार यास समजोन आले पाहिजे त्यास महादेवभट व शामभट यांची एकवाक्यता करून कागदपत्र भोगवटा मनास आणून वाजबीचे रुईने मारनिलेची स्थापना वृत्तिवर करून द्यावी रा छ २५ रमजान ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
काकाजी व्यंकटेश अमील ताा लेखांक २०६. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
तुळजापूर यास याचे मागितल्यावरून.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री काकाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहावें विशेष मनोहर ना तुळजापुरात राहातात याजकडे समसरुलमुलुकबाहादूर याचा ऐवज वाजबी त्याची माहवार अडीचसें रुो करार करून दीड वर्ष माहवारीप्रा ऐवज पविता केला आज दोन वर्षे जाली एक पैसा दिल्हा नाही टाळां देत फिरतात याजकरितां तुह्मास हे पत्र लिहिले असे नवाबमवसूफ यांचा आमचा भाऊपणा दुसरा विचार नाही याजकरितां मनोहर ना यास ताकीद करून माहवारीप्रो मागील ऐवज देऊन पुढें माहवारी ज्यारी करवावी अथवा कांहीं दिकत असल्यास लिहून पाठवावें ह्मणजे एथून ऐवज-वसुलाची तजवीज हे करतील त्यास तेथें अटक असो द्यावी षमषेरुलमुल्क यांची दोस्ती या अर्थी अगत्य जाणून लिहिलें असे त्यास सदरहू कामाविसीं निकड करून लिहून पाठवावें रा छ २५ रमजान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
आपा जोसी बसणीकर यांस लेखांक २०५. १७१५ अधिक वैशाख वद्य १२.
पत्र मोर जोसी यांजबराबर
छ २५ रमजान.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री आपा ज्योतिषी बसणीकर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीये लिा असावें विशेष वो राजश्री मोरेश्वर जोसी यांस बहुत दिवस येऊन जाले सबब च्यार महिन्यांचा निरोप देऊन पा आहेत येऊन पावतील तुह्मांकरितां शालजोडी एक पाठविली आहे ही स्नान-संध्या-समई पांघरत जावी उत्तर पाठवावें रा छ २५ अधिक वैशाख वा १२ हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
रसीद महमद हुसेनखां घटाले लेखांक २०४. १७१५ अधिक वैशाख वद्य १०.
यांचे नावें तिमाणा नाईकाचे
पत्रांत पाठविली.
खांसाहेब मेहरबान दोस्तां महमहुसेनखांबाहादूर सलामत अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी पा मंगथल व अमरचिता व कडेचूर व वडमान एकूण च्यार माहाल एथील स्वराज्याचे मामलतीबाबत सन १२०१ सालचा ऐवज रुो १७२५० सतराहजार दोनसें पन्नास याची तनखा नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून आपल्यावर जाली सदरहू ऐवजाचा वायदा छ १२ माहे रमजानचा आपण करून करारनामा लेहून दिल्हा सदरहू ऐवज सतराहजार अडिचसें रुपये मा तिमाणा नाईक भागवत अमरचितेकर दिल्हे ते पावले असेत रा छ २३ माहे साबान सलास तिसईन अखेर साल सन १२०२ ज्यादा काय लिहिणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटपा नाईक सुरापूरकर याचे लेखांक २०३. १७१५ अधिक वैशाख वद्य ७.
पत्राचें उत्तर छ २० रमजानीं.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बाहादूर गोसावि यासि- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्ना गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष तुह्मीं पत्र पा तें पावलें संस्थानसमंधी नवाबाचे सरकारचा जाबसाल ठरावात आला त्याचे ऐवजाची सरबराई होणे पैकी कांहीं चिटी पुण्यास पाठविली आणिकहि कांही चिटी स्वल्प दिवसांत पाठवितो ह्मणोन ता - लिहिलें व राजश्री गोविंदराव यांचे पत्र संस्थानचे साहित्यप्रकर्णी मंत्रीसी बोलण्याविसी पाठविलें यावरून सविस्तर ध्यानांत आले त्यास मंत्रीसी संस्थानचे नादारीचा प्रकार बहुत कांहीं बोलण्यात आला त्यांचे ह्मणे की एक महिन्याचा करार असतां किती दिवस लांबण पडली या जाबसालांत आपण सबब इतके दिवस सबूरी जाली याप्रा बहुत बोले त्यास मंत्रीस तुह्मी आपलें एक पत्र ममता व घरोब्याचे विच्यारें पाठवावें त्यांत संस्थानचे नातवानीचा प्रकारहि दर्शऊन सर्वप्रकारें पार पाडणे आपणाकडे सविस्तर फलाणे अर्ज करतील याअन्वयें जरूर यावें ह्मणजे बोलण्यास फार सेमर्पक पडेल ऐवजाचा भरणा गोविंदराव यांजकडे लौकर करून त्यांचे पत्र आह्मांस यावें यास विलंब न व्हावा नवाब बंदगानअली यांचा मुकाम तूर्त बेदरावर आहे रा छ २० रमजान बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंद व्यंकटेश नाईक नारायणपेंठकर लेखांक २०२. १७१५ अधिक वैशाख वद्य ७.
यास पत्र भगवंत गोविंद बुडूख यांचे.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंद व्यंकटेश नाईक नारायणपेंठकर मुा दामरगिदी स्वामीचे सेवेसी-
सेवक भगवंत गोविंद बुडूख मुा लस्कर दरजागा किले बेदर सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहित गेले पा विशेष श्रीमंत राजश्री गोविंदराव कृष्ण बापू सा वकील निा श्रीमंत पंतप्रधान यांचा ऐवज मामलतसमंधी महमदहुसेनखानबाहादुर घटाले यांजकडे साडे चौतीसहजार रुा येणे त्याचे वसुलाकरिता राजश्री तिमणा नाईक भागवत अमरचितेकर याजला खानमार यांजकडे पाठविलें नाईक मारिनिलेनी कांहीं ऐवज तेथें वसूल केला आहे व बाकीचाहि वसूल करून एकंदर ऐवजाच्या हुंड्या नाईकमार करितात ह्या सवद्याची गव तुमची कांही असल्यास लस्कर बेदरच्या हुंड्या करून द्याव्या हुंडा वन बाजारभाव चौकसी करून हुंड्या करून द्यावे तुह्मास ल्याहावें ऐसे नाहीं काम घरोब्याचे आहे तर आगते जाणून काम करून द्यावें बहुत काय लिा कृपा लोभ कीजे हे विनंति वैशाख अधिक वाा ७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
महमद हुसेनखां घटाले यास पत्र. लेखांक २०१. १७१५ अधिक वैशाख वद्य ७.
खांसाहेब मेहरबान दोस्तां महमदहुसेनखां बाहादूर सलामत
७ अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आंकी एथील खैरअफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून आपल्याकडे पा मंगथल वगैरे च्यार माहाल एथील स्वराज्याचे मामलतीबाबत ऐवज सन ११९९ व सन १२०१ दुषाला साडेचौतीस हजार रुो येणे त्याचा करार वायद्याचा लेहून दिल्हा त्याबमोजीब ऐवजाचा फडच्या व्हावा याकरितां तिमणा नाईक भागवत यास आपल्याकडे पाठविलें च्यार महिने जाले अद्याप ऐवज फडच्या जाला नाही सबब नवाब अजमुलउमराबाहादूर यांसी बोलण्यात आलें त्याणी आपल्याकडील वकील राये अमोलिकराम यांस ताकीद केली मारनिलेनी आपल्यास खत लेहून दिल्हें तो पारसी लखोटा पा आहे त्यास पहिले वायद्यापैकी तेराहजार नाईक मारिनिलेस वसूल दिल्हा ऐसें मारनिलेनी लिहिलें बाकी सवाच्यार हजार व दुसरे वायद्याबाबत सवासतरा हजार छ १२ रमजानी द्यावे त्याचाहि वायदा गुजरून गेला दोन्ही वायद्याचा एकंदर ऐवज नाईक मारनिले सांगतील तेथें समागमे आपल्याकडील उंट भारबारदारी व प्यादे वगैरे माणसाचा बादरका देऊन ऐवज पोंहचाऊन द्यावा वायदे होऊन गेले याउपरि ऐवजास दिरंग न होतां फडच्या करावा रा छ २० रमजान ज्यादा काय लिहिणे.