Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १९.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, इंग्रजासीं बिघाड करून मसलत कर्णें. तेव्हां शिखासी बिघाड करावयाचा नव्हता. जाला असो. हालीं हरवजेनें शिखास सामील करून घ्यावें, ही मसलत फार चांगली. जरूर लिहिल्याप्रमाणें अमलांत यावें. इंग्रजांचें पारपत्य केल्याखेरीज पातशाहींत कोणास चैन पडणार नाहीं, हें पुर्ते समजावें. याप्रमाणें बोलावें, म्हणून लिहिलें. त्यास आपले आज्ञेप्रमाणें यांशीं भाषणें केलीं व लिखित केले. याणींहीं पूर्वी गजपतसिंग जाट यास सजामुफीखान याची फशैज कुंजपुरियाकडे आहे येथें धरून कैद केलें, याचा तपसील पूर्वीच विनंतिपत्रीं पाठविला होता. त्यास हालीं नजबखान याणीं गजपतसिंगास दिल्लीस बोलावून आणून, सा लक्षाचा मागला फडशा करून त्यास वस्त्रें व शिरपेंच, झालरदार पालखी याप्रों बहुत सन्मान करून, पुत्रास व त्याचे कारभारी यांस व भावाबंदास यथायोग्य वस्त्रें देऊन बोळवण्यांत आणिलें कीं शिखाचा मुलूक आहे तो शिखाकडे असावा आणि त्याणीं व तुह्मीं आपले फौजेनिशीं सामील असावें. ह्मणून पक्केपणें बोलून त्यास छ १५ रजबी रुकसत करून कुंजपुरियाकडे मार्गस्त केलें. व यापूर्वी जाबेत-खानासही छ ५ माहे मारीं याच कार्यानिमित्त रुकत केले. ते गासगडास गेले आहेत. त्यास जाबेत-खान व गजपतसिंग एकत्र होवून, शिखाशीं सलूख करून, तिकडील फौज मिर्जा सफीखान सु।। रिकामी करून अंतर्वेदीत मेरट प्रांतीं छावणी करावी हा विचार ठरला आहे व तोफखान्याचीही तयारी आहे. बादजबरसात पातशहा सा। बाहेर निघतों, ह्मणोन, आह्मांसी बोलतात; परंतु काबूचा रंग पाहून आहेत. अमलांत येईल तें मागाहून विनंति लिहूं. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदीन. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १८.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं, इंग्रजांचा सहवास नजबखानास बहुत. पादशाहींत त्यांचा कदम व सीरावा हें आहेच. श्रीमंत राव पंतप्रधान हजूरचे फिदवीयाची फते असावी हेंच रात्रंदिवस चित्तांत आहेच; यांत संवषय नाहीं. टोपीकराचे वकिलास रुकसत दिल्ही, हे फार नेक सलाह केली. तुह्मीं लिहिल्यावरून मूळीची व हजूरची इनायक याजवरून इकडील खातरजमा आहेच. सरकारचे सरदार आजपों। पोंहचले असते. गुंता नव्हता. परंतु दरम्यान इंग्रजी पलटणें आलीं, तो शह पडला, ह्मणून दिक्कत पडली. याची तर्तूद अलाहिदा लिहिली, त्याप्रमाणें अमलांत यावें. ह्मणजे सर्व गोष्टींत उभयपक्षीं खातरजमा होवून, योजितली मसलत सिद्ध झाली. गाडर कोंकणातून घाट चढून आला होता, त्यास सरकारचे सरदारांनीं शिकस्त दिल्ही. त्याचा तपशील अलाहिदा लिहिला आहे. त्यावरून कळेल. ह्मणून लि।। त्यास आज्ञेप्रमाणें हा मार सविस्तर नजबखानास समजावून प्रसंग पाहून, संतोषातें पावले. तेव्हां बहुतेक ममतेनें पूर्वी वचनें दिधलीं आहेत. तीं दुहराहून बोलोन त्याणीं उत्तर दिलें कीं, श्रीकृपेनें बादजबरसात काय घडून येतें तें प्रत्ययास येईल. इंग्रजांची व आमची बरोबरीची लढाई आहे, त्यास आमचा तोफखाना व पलटणें सन्मुख व तुह्मांकडील फौज करोलीस उपराल्यास असलिया सहा महिन्यांचें काम आठ दिवसांत फडशा करूं, इंग्रज काय वस्तु आहेत ? याप्रमाणें बोलून आपल्यास व श्रीमंत स्वामीस खलिता पत्रें दिल्हीं. त्याजवरून ध्यानारूढ होईल. पुढें अमलांत येईल ते मागाहून विनंति लिहू. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक १७.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेशी :-
विनंति सेवक पुरुषोत्तम महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल तागाईत छ ५ जमादिलाखर मुक्काम दिल्ली स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असो. विशेष. कृपा करून छ १५ रबिलावलचें पत्र पाठविलें तें छ ५ माहे जमादलावली सरकारचे कासिदा-समागमें पावलें. पत्रीं आज्ञा कीं, तुह्मीं पातशहासी व नबाब नजबखानासी बोलून इंग्रजांचे तंबीचा आहद-पैमाना घेऊन पाठवणें, वरकड सविस्तर राजश्री बाळाजी जनार्दन यांनीं लिहिलें आहे त्यावरून कळेल ह्मणून आज्ञा. त्यास आज्ञेप्रमाणें याजपासून आहद-पैमान सरकारचे नांवें लिहून घेतला आहे. त्याप्रमाणें राजश्री महादजी शिंदे यांचे नांवें मागतों. पाटीलबावा यांनीं ग्वाल्हेर प्रांतीं इंग्रजांची लढाई मारली ह्मणजे याजवर दाब बसून पूर्वी कौलनामा लेहून दिधला आहे त्याप्रमाणेंच वर्तणूक करतील व सरकारचे सरदाराचे सामीलही होतील. वरकड सविस्तर राजश्री बाळाजी जनार्दन यांचे पत्रीं लिहिलें आहे त्यावरून श्रुत होईल. सदैव कृपा करून हस्ताक्षर- पत्रामृतीं सनाथ करणार. स्वामी समर्थ आहेत, दर्शनलाभ होय तो सुदिन. कृपा केली पाहिजे. हे वि.
पौ। छ १६ रजब सन
समानीन बाा सरकारची जोडी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र पांडुरंगराव बाबा यास छ १७ सवाल. लेखांक २४७. १७१५ वैशाख वद्य ३.
तिा राजश्री पांडुरंगराव बाबा स्वामी वडिलाचे सेवेसी आपत्य गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति एथील कुशल तो छ १६ सवाल मुा लस्कर दरजागा किले बेदर एथे वडिलाचे असीर्वादेकरून यथास्थित असे विशेष मौजे नवले बुा पा सीराढोण हा गांव राजश्री राये निलकंठराव सुंदर यास जागीर आहे तेथील कमाविसदार जैरामपंत यानी विनंति केल्यावरून मोकाशाचा फडच्या करून घेतला हे वर्तमान ऐकून संतोष जाला सरदेशमुखीचा फडच्या होणे आहे येविसीं आबाजीपंत खोत सेवेसी येऊन विनंति करवील त्याप्रो बंदोबस्त करून देणे यास आज्ञा व्हावी भगवंतराव लक्ष्मण कमाविसदार माहाली आहेत ते गांवास फार उपद्रव करितात याजकरितां परभारे फडच्या करून घ्यावा हे करारप्रो ऐवज पावता करितील राजश्री राजे रायरायांबाहादूर यांचे आप्त याजकरितां राजे मारनिले योणीहि आपणास पत्र लिहिले आहे त्याजवरून ध्यानास येईल बहुत काय लिहिणे हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र कृष्णराव तात्या यांस नरसीभट लेखांक २४६. १७१५ वैशाख वद्य २.
यानी मागितल्यावरून छ १६ सवाली.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष वो राजश्री नरसींभट काकीरवार यांस सरकारातून वर्षासन सालाबाद शंभर रुा ऐन मनुष्याबाबत आठेचाळीस बारमाही एकूण एकसे आठेचाळीस रुा पो सेवली एथील ऐवजी आहे त्यास वर्षासनाची बाकी सन १२०१ पावेतो तीनसे व सालमार सन १२०२ बाबत एकसे आठेचाळीस एकूण च्यारसे आठेचाळीस रुपये येणे याकरितां मल्हारी जासूद रवाना केला आहे सदरहू ऐवज राजश्री बाळाजी रघुनाथ यांजकडे पावता होऊन उत्तर यावे यास दिवसगत लागो नये रा छ १६ माहे सवाल बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
आपाजी बालाजी यास पत्र नरसीभट लेखांक २४५. १७१५ वैशाख वद्य २.
यानी मागितल्यावरून छ १६ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आपाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष वो राजश्री नरसीभट यांस वर्षासन सरकारातून पो सेवली एथील ऐवजी सालाबाद ऐन शंभर व सिबंदीबद्दल आठेचालीस याप्रो आहे त्यास सन १२०१ पावेतो तीनसे व सालमारसुधा च्यारसे आठेचालीस येणे याकरितां मुजरद मल्हारी जासूद पाठविला आहे येविषी राजश्री तात्या जोसी, यांस आह्मी पत्र लेहून पा आहे त्यास तुह्मीहि सांगोन ऐवज राजश्री बालाजी रघुनाथ यांस पावता करून उत्तर पाठवावें रा छ १६ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
त्रिमलराव सुरापूरकर यांस पत्रे लेखांक २४४. १७१५ वैशाख वद्य २.
छ १६ सवाली पांडुरंग रघुनाथ
यानी मागितल्यावरून.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिमलराव स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष मौजे बरूल पा नलदुर्ग एथील पाटीलकी राजश्री विठ्ठल रघुनाथ यांची आहे त्यास पाटीलकीसमंधे आंबराई मौजेमारी आहे ते जप्तीत आली ह्मणोन कळले त्यावरून हा मजकूर महमदकबीरखान यांसी बोलण्यात आला त्यानी सिवशंकरपंत यांस सांगितले त्यानी तुह्मास पत्रें लेहून दिल्हे ते रवाना केले असे त्यास विठल रघुनाथ हे आमचे पदरचे पाटीलकी आह्माकडील हें समजोन वतनबाबेचा हकलवाजिमा पूर्ववत व आंब्याची झाडे आंबराई चालवावी यास दिकत होऊ नये रा छ १६ बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
पत्र कासीराव नलदुर्गकर किलेदार लेखांक २४३. १७१५ वैशाख वद्य २.
यांस पांडुरंग रघुनाथ यानी
मागितल्यावरून छ १६ सवाली.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कासीराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष मौजे बारुल पा नलदुर्ग एथील पाटीलकी राजश्री विठल रघुनाथ यांची आहे त्यास मारनिले आमचे पदरी हे तुह्मास वाकीफ असेल ल्याहावेसे नाही पाटीलकीची आंबराई तेथे आहे त्यास जप्ती अलीकडे जाल्याचे ऐकिलें त्यावरून महमदकबीरखानबाहदूर यांसी बोलण्यात आले त्यानी आंबराईची परवानगी देऊन सिवशंकरपंत यांजला पत्र लेहून देण्याचे सांगितले त्यावरून मारनिलेनी राजश्री त्रिमलराव यांस व तुह्मास पत्रें दिल्ही ती रवाना केली आहेत पाटीलकी आह्माकडील समजोन हकलवाजिमा व आंबराई चालावी दिकत होऊ नये हरएकविषई यांचे साहित्य करावे रा छ १६ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटपा नाईक सुरापूरकर यास लेखांक २४२. १७१५ वैशाख वद्य १.
पत्र जासुदाबराबर छ १४ सवालीं.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बलवंत बहिरीबाहदूर गोसावि यासि- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असावें विशेष तुह्मी पत्र पो तें पावलें नवाब अजमुलउमराबाहादूर यांस थैली-पत्र संस्थानचे नादारीचा प्रकार दर्शऊन पा ते पावतें केले मसविद्यावरून मार समजला जवाब घेऊन मागाहून रवाना होईल नवांबाचे सरकारचा ऐवज आपल्याकडून बहुत. यावयाचा याची सरबराई लौकर जाली पाहिजे येविषी ता यापूर्वी राजश्री वेणू गोपाळ यांजबराबर लिहून पा आहे ऐवज लौकर यावा राजश्री गोविंदआपा यांचे येण्याविसी पुण्याकडे ल्याहावें ह्मणोन लिा त्यास मारनिलेस तेथून निरोप देऊन रवाना केलें ऐसे गोविंदराव यानी लिा होते सुरापुरास येतील इकडूनहि आणिक त्यांचे रवानगीविषई लिहिण्यात येत आहे रा छ १४ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भावसिंग चौधरी निा तोफखाना लेखांक २४१. १७१५ वैशाख शुद्ध १५.
यांस पत्र छ १३ सवाल.
राजश्री भावसिंग चौधरी गोसावि यांसि-
श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि हैदराबादेस आमचे हवेलीत सागवाणी तख्ते पंचवीस तीस पावेतो लाहाण हालके आहेत त्याचे एथें आह्मास प्रयोजन आहे त्यास तुमचा कारखाना तोफा वगैरे सरंजाम एथें येणार आहे आह्मी एथून जासूद पा आहे त्यास सदरहू तख्ते छेकड्यावर घालून आणावे जासूद तुह्मापासी राहील येतेसमई तख्ते दाखऊन देईल ते जरूर आणिले पाहिजेत घरचे काम आहे ह्मणोन लिहिलें असे रा छ १३ सवाल हे आसीर्वाद.