Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

                                                                                            लेखांक २३०.                                                      १७१५ वैशाख शुद्ध १०.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रामचंद्र गुणाजी स्वामीचे सेवेसी-

पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष मौजे देवपिंपलगांव पो रोशनगांव एथील पाटीलकी राजश्री बळवंतराव हरी यांची आहे मारनिलेनीं पाटिलकीवर गुमास्ता ठेविला त्यास आलमपुराकडे राजश्री बळवंतराव सेळूकर फौजसुधा जाऊन मौजे मारास स्वार पाठऊन पाटील कुळकर्णी धरून नेले तीनशे रुा दंड घेतला ह्मणोन कळले त्यावरून बळवंतराव त्यांस आह्मी पत्र लेहून पो आहे पाटीलकी आमची बळवंतराव आप्त हे तुह्मास ठाऊकच असेल त्यांत मौजेमारी कांही मामलतीचाहि लडा बळवंतराव यांजकडील नसतां जाहाला दंड घेतला येविसी तुह्मी बोलोन दंडाबाबत ऐवज घेतला तो मल्हार तुकदेव गुमास्ता पाटील यांचे पदरी पडे व पुढे गांवास उपसर्ग न लागे ऐसा बंदोबस्त करून इकडे लेहून पाठवावें रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

राजे व्यंकटपा नाईक यांस                                                          लेखांक २२९.                                                      १७१५ वैशाख शुद्ध १०.
पत्र मारनिलेचे वकिलासमागमे छ ९ सवाल.

राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादूर गोसावि यांसि.
5 सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य भो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावे विशेष तुह्मी पत्र राजश्री वेणु गोपाळ याजबराबर पाठविले ते पावले नवाबाचे सरकारचा ऐवज तुह्माकडोन येणे त्याऐवजी काही भरणा पुण्यात राजश्री गोविंदराव याजकडे करविला काहीं ऐवज आपल्यापासी भरणा करावयास साहुकार पाठविले आहेत ह्मणोन तपसिले लिहिले त्यास ऐवज किती पाठविला हे काहींच लिहिले नाहीं मोहगम सावकारास पाठविले भरणा करतील ऐसे लिो त्यास ऐवजी कामास ऐसे लिहिणे नसावे साहुकार मारनिलेस वेणु गोपाळ याचे रुबरू किती ऐवजाचा भरणा करितां हे विच्यारिलें त्यास यांचे ह्मणे साहासष्ट हजाराचा भरणा करूं परंतु साहुकाराचे बोलणे तीन महिन्यांत ऐवज आदा होईल आपले तर लिहिण्यात वायदा मुदत काहींच नाहीं नवाबाचे सरकारची निकड ऐवजाकरितां कसी आहे आठ महिने करारास होऊन गेले ऐवजास ठिकाण नाहीं नवाब बंदगानअली याची रुबुरु तुह्मी या कारभारात सबब इतके दिवस सुरापूरचे ऐवजाची बरदास्त केली इत्यादिक बोलणी जाल्याचा तपसील यापूर्वी इकडून जासूदजोडी समागमे लिहिण्यात आला आहे त्यावरून कळले असेल सारांश यांचे सरकारची निकड असी आपल्याकडून ऐवज येण्याचा प्रकार असा साहुकाराचे बोलणे याअन्वयें पाहतां कशास कांही मिळत नाही मातबर जाबसालाचे बोलण्यात पत राहणे हे सर्व गोष्टीचा उपयोग त्यास साहुकारास आह्मी सांगीतले की तीन महिन्याची मुदत ऐवजास तुह्मी ह्मणतां परंतु नाईकांचे पत्रांत नाही वायदा नाही त्याअर्थी साहुकारापासोन सासष्टहजार रुा नवाबाचे सरकारांतून घेतील बाकी ऐवजाची रवानगी लवकर करावी की बोलल्याप्रो सचोटी राहून पुढील जाबसालास नीट येविषीचा सर्व तपसील वेणु गोपाळ यांसी बोलण्यात आला मारनिले सांगतील त्यावरून कळेल सारांश ऐवज आधी येऊन पोहचावा इतक्यावर दिवसगत होऊ नये वेणु गोपाळ यांजला जाण्यास पांच दिवस येण्यास पांच दिवस दोन दिवस तेथे एकूण बारा दिवसात मारनिलेनीं लाख रुायांची तरतूद एथे सध्या ऐवज पोंहचावयाची करून यावी ऐसे सांगून पो आहे बारा दिवसपरियंत वाट पाहून येणे न आल्यास साहुकारास ऐवजाचा तगादा एथें होईल हे समजोन मारनिलेस लवकर रवाना करावे ऐवज रोख पोहचावा रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

गिरमाजी विठल निा। मोकासी                                                     लेखांक २२८.                                                      १७१५ वैशाख शुद्ध १०.
यास पत्र मोहसनअलीखां यानी
मागीतले सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गिरमाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिो जावें विशेष का विसाद जागीर मीरमोहसनुदौलीबाहदूर यांजकडे आहे तेथील मोकाशाचा अमल सन १२०२ सालचा मामुलबमोजीब पेशजीपासोन चालत आल्याप्रा यांजकडील फडच्या तेथील अमील करून देत असतां तुह्मी इजाफा मामुलसिवाय ऐवज मागतां व च्याहरूम तहकूफ ठेवीत नाहीं ह्मणून बोभाट आला त्यावरून लिा असे त्यास पेशजीपासोन मोकाशाचा अमल चालत आल्याबमोजीब च्याहरम तहकूफ ठेऊन फडच्या करून घ्यावा ज्याजती ऐवजाचा उपसर्ग करून वर्तमान कळले त्यावरून लिो असें त्यास मौजेमाराकडे तुह्माकडील मामलतीचा अथवा कांही एक लडा नसतां पाटील कुलकर्णी यास धरून नेऊन दंड घेण्याचे कारण काय त्यांत बळवंतराव हरी आप्त तेथील पाटीलकी ती आह्माकडील हे मल्हार तुकदेव कारकून पाटीलकीवर आहे त्यानी सांगितले असता रुपये घ्यावे हे उचित नाही त्यास पाटील कुळकर्णी यापासोन ऐवज घेतला तो माघारा देऊन पुढे मौजेमारास कोणेविषई उपसर्ग न लागे ऐसा बंदोबस्त व्हावा बोभाट येऊ नये हे काम घराऊ समजोन लिाप्रो व्हावे रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

नारोपंत देशपांडे पा सोलापूर                                                        लेखांक २२७.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ९.
यांचे पत्राचें उत्तर छ ८ सवाल.

राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री नारोपंत देशपांडे पाा सोलापूर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पांवलें मौजे राळेरास पा मार्डी एथील पाटिलकीसमंधें राजश्री अंताजीपंत यांस मार्डीचे मुकामी सांगितल्याप्रा पाटीलकीचा महजर करून देवितील रा छ ८ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

 

कृष्णराव ठाकूर यांचे पत्राचे                                                         लेखांक २२६.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ९.
जाब छ ८ सवाल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री ठाकूर कृष्णराव देशमूख पा केज धारूर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावले स्वस्थळास क्षेमरूप पावल्याचे लिहिल्यावरून संतोष जाहला राजश्री नारोपंत देशपांडे सोलापूरकर यांजकडील पाटीलकीचे वृत्तीचा मार लिहिल्यावरून राजश्री अंताजी निराजी कादार यांस पत्र व नारोपंत यांचे पत्राचे उत्तर पाठविले आहे दरबारी हरएक कामाचे साहित्य होत असावे ह्मणोन लिा त्यास तुह्माकडील कार्यास इकडून अनमान सहसा व्हावयाची नाही येविषई उपरोधिक लिहिण्याचे कारण नाही वरचेवर पत्र पाठऊन संतोषवीत जावे रा छ ८ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

 

                                                                                             लेखांक २२५.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ९.

पु।। राजश्री व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बाहदूर गोसावि यासि-
आसीर्वाद विनंति उपरि संस्थानचे कारभारसमंघी सरसुभेदाराकडून पेंचाचे भाव लिहिण्यात येतात येविषी ता लिहिल्याप्रा समजलें इकडून जें ठरावात आलें त्याप्रा फडच्या अमलांत यावा ह्मणजे कोणतेहि गोष्टीविषई आदेशाचें कारण नाहीं कराराप्रा कारभार न उलगडण्यात कबहाती आहेत येविषी ता ल्याहावें ऐसें नाहीं रा छ ८ सवाल हे विनंति.

 

                                                                                             लेखांक २२४.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ९.

पु।। राजश्री व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बाहदूर गोसावि यासि-
आसीर्वाद विनंति उपरि संस्थानचे कारभारसमंघी सरसुभेदाराकडून पेंचाचे भाव लिहिण्यात येतात येविषी ता लिहिल्याप्रा समजलें इकडून जें ठरावात आलें त्याप्रा फडच्या अमलांत यावा ह्मणजे कोणतेहि गोष्टीविषई आदेशाचें कारण नाहीं कराराप्रा कारभार न उलगडण्यात कबहाती आहेत येविषी ता ल्याहावें ऐसें नाहीं रा छ ८ सवाल हे विनंति.

 

राजश्री व्यंकटराम पिला                                                            लेखांक २२३.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
गोसावि यांस.

श्नो बालाजी जनार्दन आसीवाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष तुह्मी छ २५ माहे रजब ता छ ८ माहे साबान पावेतो अखबार पा ते पावली त्याची कलमें.

१  तोफा रेड कुडते बनाती व सफेत आंगरखे व सफेत नवार पोषागी कोपड बंदुखा बनातीचे तागे व टोप्या च्याहाचा संदूख इतका सरंजाम फर्मासी एथून हैदराबादेस रवाना जाला ह्मणोन लिा तें कळलें कलम.
१  ज्यानपूर नावे विलायतीमध्ये बंगाल्याची गौरनरी मुकरर पावला विलायतेहून परभारा बंगाल्यास पावला त्याचा यत्खीयार मामले पेषावर सिपायगिरीचे कामावर मंबईचा आबरकरंबी करार जाला ह्मणोन लिा तें समजलें कलम.
१  लाट कारनवालीस यास विलायतेहून मारकेस ह्मणोन खिताब देऊन दुसरा वजीर मुकरर केलें लाट या पटीस येणार ह्मणोन लिा तें समजलें वरचेवर बातनी पकी लिहीत जाणे कलम.
१  टिपूबाहादर यांजकडील पालेगार बागी होऊन च्यारगलचे पालेगाराचा आश्रा केला टिपूनें गौरनरास लिहिलें होतें हाली ऐकण्यात टिपूबाहदरानी पालेगारास धरून आणून कैद करावें सबब कांहीं जमीयत च्यारगल्यास रवाना केलें ह्मणोन लिया त्यास हे कंपणी इंग्रजबाहदूर यांचे सलाहाने किंवा गैरसलाहाने याचें तहकीक करून लिहिणे........कलम.
१  बंगाल्याहून जाहाज आलें तें विलायतेस रवाना जालें त्याजवर बसून गेले त्याची नावें लिहिली ती कळली कलम.
१  लाट कारनवालीस बंगाल्यास आहेत तोपावेतों यत्खीयार त्यांचा ऐसा विलायतेचा हुकूम ह्मणून लिा तें कळलें कलम.
१  लाट कारनवालीस विलायतीस जाण्यास्तव चेनापटणास येऊन एथें महिनाभर राहून मग विलायतेस जाणार ह्मणोन लिो त्यास कारणवालीस चेनापटणास कधी येणार याची पकी बातनी राखून लिहिणे कलम.
--  
 


एकूण कलमें सुमार सात लाट कारनवालीस यांस विलायतीस वजिरीची खिदमत होऊन मारकेसी खिताब होऊन आला त्यास टिपूबाहदरानी व त्यांजकडील गुलामअली आहे त्यानीं मुबारकबादीची पत्रें पाठविलीं व वालाज्याहा यानीहि मुबारकबादीची पत्रें पाठविलीं ह्मणोन लिा तें समजलें वरचेवर पकी बातनी घेऊन पाठवीत जाणे रा छ ७ रमजान बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.

 

बळवंतराव हरी धारासिंवकर                                                       लेखांक २२२.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
यानीं पत्र आणविले त्याजवरून
दिल्हे बळवंतराव सेळूकर व
रामचंद्र गुणाजी निता फत्तेसिंग भोसले
यांस छ ९ सवाल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष मौजे देवपिंगलगांव पा रोशनगांव एथील पाटिलकी राजश्री बळवंतराव हरी यांची आहे मारनिलेनी पाटिलकीचे कामावर कारकून ठेविला आहे त्यास तुह्मी आलमपुरीकडे फौजसुधा जाऊन मौजेमारावर स्वार पाठऊन पाटील कुलकर्णी धरून नेले त्याजपासोन दंड तीनसे रुा पर्यंत घेतले ह्मणोन बोभाट न ये तें व्हावें रा छ ७ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

बळवंतराव लक्ष्मण सेकूकर                                                       लेखांक २२१.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
यांस पत्र मोहसन अलीखान
यानीं मागितलें सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीयें लिा जावें विशेष का विसाद सरकार नांदेड जागीर मोहसनुदौलाबाहदूर यांजकडे तेथील बाबतीचे अमलाचा मामुलप्रा सालबसाल यांजकडील अमीलानी फडच्या करून देऊन रसीदा घेतल्या असतां तुह्मी दोन सालें इजाफा रुो मामुलासिवाय ज्यादा तलबी करून घेतले याचें कारण काय वाजबी अमीलाचा फैसला मामुलबमोजीब करून घेऊन गैरवाजबी ज्याजती ऐवज घेतला तो यांचे यास द्यावा व मवेसी चीजबस्त नेली असेल ते माघारी द्यावी येविषई नवाजे बंदगानअली व अजमुलउमराबाहादूर यानी आह्मास सांगितल्यावरून पेशजीहि तुह्मास पत्रें पाठविली परंतु फडच्या होत नाहीं हें काय सांप्रतहि नवाबानी सांगितलें त्यास इजाफा ऐवज व मवेसी घेतली असेल ते देऊन पुढें सुरळीत अमल घेत जावा गैरवाजबी बोभाट न ये तें करावें रा छ ७ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.