Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव हरी यास पत्र गोविंद लेखांक २४०. १७१५ वैशाख शुद्ध १५.
बकाल याजकडे पाठविले छ १३ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजेश्री तिमाराव हरी स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावे विशेष खासगी पागा राजश्री गोविंद बकाल यांजबराबर पा आहे तर तेथे आल्यानंतर पागा राहण्याची ठाणी सोय चांगली व चौकी पाहन्याचा बंदोबस्त चांगला करवावा येविषई अजमसाहेब यानीहि पत्र दिल्हे ते पो आहे तर ठाण्याची व कडब्याची सोय चांगली करवावी दाणा खरीपी करतील त्यास सोईचार पडे ऐसी सोय तुह्मी करवावी पागा खासगी जाणून लिा आहे तर लिहिल्याप्रा पागेचा बंदोबस्त दाण्या वैरणीचा व ठाणाचा व्हावा तुमचे भरवसियावर पागेची रवानगी तिकडे केली असे रा छ १३ सवाल बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंद रघुनाथ पालीमकर लेखांक २३९. १७१५ वैशाख शुद्ध १३.
अमील यास पत्र संताजी नागनाथ
यानी मागितलें.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष राजश्री संताजी नागनाथ यास व मुशाहिन्याबाबत तनखा नवाब सरदारुलमुलुक बाहदूर यानी तुह्मावर दोनसें रुपयाची केली आहे. त्यास मारनिलेनी सदरहू रुपयाची तनखा तुह्माकडे पा आहे तरी पांच को तनखाप्रा द्यावे यास दिवसगत करू नये सरकारी आंदाजा वगैरे दिकत न करितां यांचा ऐवज तनखाबमोजीब पावता होय तें जरूर करावें यांचे आगत्य कसें तुह्मास माहीत त्यापक्षी विशेष ल्याहावें ऐसे नाही रा छ १२ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव हरी यांस पत्रे दोन लेखांक २३८. १७१५ वैशाख शुद्ध १३.
अजमसाहेब यांचे व आपले छ १३
सवाल गोविंद बलाले पागे याजकडे
पाठविली अजमसाहेब यांचे.
येखलास दस्तगाह तिमाराव हरी दाम-मोहबतहू - अजदिल येखलास मिर्जा अजमसाहेब सलाम आंकी लस्कर बेदरास दाखल जाहल्यामुळे इकडील तमाम तालुकचे चारा सरून गेला यास्तव साहेब मेहेरबान गोविंदराव कृष्ण यांजकडील घोडेचे रागाबदल तुह्माकडे मारे करून पाठविले आहे ते सेंभर घोडे व पंचेवीस तीस तटू कांहीं उंट यांस चारा दर महिनेस पनास हजार पुळे सुमार पाहिजे ऐसियास हे दिवस पाऊसपाणीचे आहेत ज्या गांवींचे रागा मारे करून ठेवाल त्या गांवी चाराचा बंदोबस्त व चौकीपाहरांचा बंदोबस्त करून ठेवणे चाराविशई सरकारचा चारा व पागेचा नव्हे फख्त खरीपीस घेऊन चाराचा बंदोबस्त करून देणें हे रुपये तुह्मास मुजर देऊ नाहीं तर नगदी रुपये पाठऊन देऊ कळले पाहिजे ज्यादा काय लिहिणे दिवस पाउसाळा आहे छपरवंदीचा आसरा करून बंदोबस्तीने ठेवणें कळले पो हे किताबत ता छ १२ सवाल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जीवनराव पांढरे समसेरबहादर लेखांक २३७. १७१५ वैशाख शुद्ध १२.
यांस पत्र सलाबतखानानी मागितलें.
राजश्री जीवनराव पांढरे समसेरबाहदूर गोसावि यासि- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा असावें विशेष नवाब महमद सलाबतखांबाहदूर यांची पागा मौजे तडकल पा कवलास एथें चराईस जात आहे त्यास कडबा वगैरे सरंजाम खुषखरिदी करतील त्यास पागेचे लोकास कोणेविषी तोसीस न होतां गांवकरी यास ताकीद करून राहतील तेथें हरकत न व्हावी येविषी कवलासकर अमील यांस नवाब अजमुलउमराबाहदूर यांचेहि पत्र बाहदूर मवसूफ यानी घेऊन रवाना केलें आहे रा छ ११ सवाल बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
नारायणराव पुनतांबकर यांस लेखांक २३६. १७१५ वैशाख शुद्ध १२.
पत्र छ ११ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारायणराव स्वामीचे सेवेसी-
पोरा गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावे विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें आपलें प्रापंचिकता-पत्र याचा मार विस्तारे लेहून आज्ञा आल्यास येईल ह्मणोन लिो त्यास तूर्त च्यार महिने तुह्मी येण्याचे न करावें व सांप्रत येण्यात सोईचा प्रकार नाही यास्तव छ ७ जिलकाद नंतर एक मनुष्य पत्र देऊन पाठवावा त्याचे उत्तर इकडून लिहिण्यात येईल त्याप्रमाणे मग यावयाचें करावें कितेक उपरोधिय अर्थ पत्री लिहिला इतक्याचे कांहीं कारण नाहीं तुमचे विस्मरण व्हावयाचें नाहीं तुमचे पत्राची होती दोन च्यार वेळ स्मरण जाले इतकियात तुह्मांकडून पत्र आलें त्याजवरून तुमचे राहणे आहे तें स्थळ आणि प्रपंचाचे तापत्र याचे वर्तमान कळलें लिहिल्याप्रमाणें तुह्मांकडून मनुष्य आणि यानंतर समयोचित लिहिणें तें लेहूं राजश्री नानाकडे तुमचे जाणे व्हावें असें असल्यास राजश्री नानास पत्र पाठऊ शरीरेंकरून आणि प्रपंचाचे व्यवहारास बहुत जपत जावें ज्या वृत्तीनें परिणाम शुध असी वृत्ती असावी हेंच चागलें विशेष लिहून सुचवावे असें नाहीं रा छ ११ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक २३५. १७१५ वैशाख शुद्ध १२.
पु।। राजश्री तिमणी नाईक भागवत स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि घटाले यानीं ऐवज पेठचाल तेथील द्यावा अथवा पंचमेल दिल्हा त्याचा बटा च्यार शो सेंकडाप्राा द्यावा याप्रा अमोलिकराम याचें पत्र त्यांस घेऊन पाठविलें हें पत्र देऊन ऐवज तेथील पेंठ चलनी घ्यावा अगर पंचमेलीचा बटा च्यार रु। सेंकड्याप्रा घटाले यांजपासून घेऊन साहुका-यांत पंचमेल रुपयास व पेंठचालीस जो भाव सेंकडा असेल तो देऊन ऐवज बटाऊन पेंठचाल रुो गोविंद व्यंकटेश याचे दुकानी देऊन पत्र भुकणदासाचे नावें पाठवावें च्यार रुा सेंकडा बटा येईल त्याची कसर बाजारभावास जे राहील ते लेहून पाठवावी तुह्मांपासी ऐवज जमा जाला असेल तो पंचमेल असल्यास बटाऊन घ्यावा अथवा घटाले यापासोन च्यार रुाप्रा बटा घ्यावा ऐवज जमा जाला तो त्यास माघारा देऊ नये फिरोन येणे दिवसगत लागेल यास्तव जमा जाला ऐ वज तो बटाऊन अथवा बटा घेऊन सदरी लिहिल्याप्रा त्या ऐवजाचें पत्र गोविंद व्यंकटेश याचें पाठवावें रा छ ११ सवाल सलास तिसईन हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमणा नाईक भागवत अमरचिते. लेखांक २३४. १७१५ वैशाख शुद्ध १२.
कर याचे पत्राचे उत्तर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमणा नाईक भागवत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पावलें महमद हुसेनखान घटाले यांजकडून साडे चौतीस हजार रुो येणे त्यापो पंधरा हजार वसूल जाले त्याची हुंडी करावी तर पंचमेल ऐवज यास सेंकडा तीन रुो बटा पडतो व सिवाय हुंडोवन याची आज्ञा यावी ह्मणोन लिा त्यास हा ऐवज सरकारी मामलतीचा पेंठ चाल तेथील घ्यावा पंचमेल ऐवज घेण्याची गरज नाही येविषई नवाब अजमुलउमराबाहदूर यांसी बोलून त्यांनी अमोलिकराम वकील यास निक्षुण ताकीद केली त्याचें पत्र घटाले यांस पारसी घेऊन पा आहे त्यांत लिा आहे कीं ऐवज तेथील चलनी द्यावा पंचमेळ ऐवज दिल्हा असल्यास सेंकडा च्यार को प्रा अमोलिकरामाचें पत्र घेऊन तुह्माकडे पा आहे हे त्यास पावतें करून पंधरा हजार रुो तुह्मी घेतले ते माघारे न देता दुसरें पेंठ चाल बटाऊन घ्यावे अथवा च्यार रुा शेकडाप्रा बटा घेऊन एकंदर ऐवज साडे चौतीस हजारापैकी जो वसूल केला असेल तो राजश्री गोविंद व्यंकटेश दामरगिदीकर साहुकार यांचेथें जमा करावा भगवंत गोविंद बुडुख यांचे पत्र पेशजी पा होते तो मार राहिला हली भुकणदास साहुकारासी बोलणे जालें त्याचें पत्र गोविंद व्यंकटेश यास देऊन जो ऐवज त्याचे दुकानी जमा कराल त्याचें पत्र भुकणदास याचे नावें घेऊन इकडे आह्माकडे पाठवावें हुंडावन वगैरे तेथें तुह्मी कांहीएक बोलू नये ऐवज भरणा करून पत्र घेऊन मात्र पाठवावें एथें सर्व बोलणे जालें आहे तरी वसूल ऐवज जाला असेल तो पेंठचाल नाईक मारनिलेचे दुकानी पावती करून भुकणदासाचे नावें त्याचें पत्र घेऊन लौकर पाठवणे व घटाले यांस निकड करून बाकीचा ऐवज साडेचौतीसहजार पो राहिला तो उगऊन नाईक मारनिलेचेच दुकान देऊन पत्र भुकणदास यास घेऊन पाठवावें ऐवज जमा असेल त्याचें पत्र आधी पाठवावें मागाहून राहिले ऐवजाची लिाप्रा चिठी पाठऊन द्यावी सदरहूप्रा समजोन कारभार उगऊन जासुदाची रवानगी करणे रा छ ११ सवाल सलास तिसईन हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जिवाजी बाबूराव निलंगेकर लेखांक २३३. १७१५ वैशाख शुद्ध ११.
यांस बापू रामदासी यानी
पत्र मागितलें सबब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री जिवाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पोाा गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिा जावें विशेष हरिभक्तिपरायण राजश्री बापूजीबाबा रामदास मठ कसबे निलंगे यांस मठाचे खर्चास स्वराज्याकडून मौजे लांबोटे पा मार हा गांव दरोबस्त आहे त्यास ईशा सन ११९७ ता सन ११९९ पावेतों तीन साला बाकी मौजेमाराकडे राहिलीं त्याचे बजीनस रोखे-पत्र असतां फडच्या होत नाहीं ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे तरी रामदासीबावाकडील बाकी राहिली असेल ते रोख्याप्रा मौजेमारचे गांवकरी यास ताकीद करून वाजबीप्रा फडशा रुबरू करून देवावा पामारी गांवगना एक रुपया सालाबाद व दिपाराधनेस तूप पावसेर रोज चालत आलें असतां अलीकडे तुमचे अमलापासोन दिकत ह्मणोन समजलें त्यास चालत आल्याप्रा चालवावें बोभाट येऊ न द्यावा रामाजी मल्हार यांचे अमलांत राजश्री अपाजी नाईक पंढरी यानी यांचे मोकाशाऐवजी पेशजीचें आपलें देणे ह्मणोन वीस रुो वजा करून घेतले त्याचा दस्तऐवज बजीनस आहे त्यास ते रुपये यांचे याजकडे देवावे सदरहू जाबसाल वाजबीमा विल्हे लावावे बोभाट येऊ न द्यावी रा छ १० सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला याचे पत्राचा लेखांक २३२. १७१५ वैशाख शुद्ध १०.
जाब रा छ ९ सवाल सन १२०२.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यांसि- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्माकडोन अलीकडे एक महिना दीड महिना होत आला पत्र येत नाही याचें कारण समजत नाही नवाब बंदगानअली याची स्वारी हैदराबादेहून छ ११ रमजानी किले बेदरास दाखल जाली आह्मी समागमेच मुकाममारी आलो तूर्त एथेच मुकाम आहेत मिस्तर किनवी दिलावरजंग बाहादूर हैदराबादेस आहेत त्यांजपाशी तुह्माकडोन पत्रे आली असल्यास तेथून आणविली येतील वरचेवर तिकडील वर्तमान लिहून पत्राची रवानगी करीत जावी तुह्माकडील पत्रे व अखबारा पेशजी पुण्याकडे रा नाना यांस पाठविल्या होत्या त्याचा जवाब तुमचे नावे आला तो हाली रवाना केला आहे पावल्याचे उत्तर पाठवावे चीनची जहाजें आली आहेत त्यापैकी आपल्याकडील यादीची जिनस तलाश करून घेतो ऐसे तुह्मी पेशजी लिहिले होते त्यास चीनचे जाहाजापैकींकोणता जिनस घेतला व कोणता घ्यावा याचा आमचे यादीप्रा व सिवाय चांगला जिनस आधी धाडल्या किमतीत कोणता कसा घेतला हे तपसीलवार ल्याहावें रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
भोलानाथ शास्त्री यांस पत्र लेखांक २३१. १७१५ वैशाख शुद्ध १०.
दयाराम पंडित यांचेजवळ
दिल्हे छ ९ सवाल.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री भोलानाथ शास्त्री स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष श्रीगणपतीकरितां माती तीन प्रकारची याचे मसाले सेरभर मातीस किती कोणते जिनस कसे त्यांचे प्रमाण काय याप्रमाणे तीन मृत्तिकेचा सरंजाम वेगळा वेगळा तपसीलवार याद समजावयाजोगी नीट क्रिया कुटावयाची वगैरे सर्व लेहून पाठवावे याजकरितां मुजर जासूद पाठविला आहे याजबराबर लिहून पाठवावे रा छ ९ सवाल वैशाख शुा १० हे विनंति.