व्यंकटराम पिला यांचे पत्राचा लेखांक १९९. १७१५ अधिक वैशाख शुद्ध ३.
जाब रा छ ३० साबान सन १२०२.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यासी- अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे विशेष तुह्माकडोन येणेप्रो पत्रें रवाना जालीं.
१ छ २५ रजबचे छ १७ माहे मारी पावले
२ छ ७ साबीनची छ १७ मिनहूस पावली
१ छ ११ साबानचे छ २० मिनहूस पावले
१. छ १५ साबीनचे छ ३० रोजी पावले
यो पांच रवानग्याची पत्रें पाऊन सविस्तर मार अखबार-पत्रावरून ध्यानास आला अखबारा पुण्यास रवाना जाल्य राजश्री नाना यानी तुमचे पत्राचे उत्तर पाठविलें तेहि रवाना केलें आहे त्यावरून कळेल वरचेवर अखबारेची रवानगी होत असावी भाजी वगैरे मेवेज्यातचे बिना व फर्मासीचा मार लिा त्यास तलाश करविला आहे व मोरछेल-जोडीविसी लिा त्यास त्याचाहि तलाश करवितों मिळाल्यानंतर पाठविण्यात येईल सध्या हाजरत बंदगानअली याची स्वारी बेदरास जाण्याकरितां छ २७ साबानी डेरे-दाखल जाले या गडबडीत हा जिनस मिळणे कठिण आह्मी स्वारीसमागमेंच आहोंत कळलें पाहिजें तुह्मी जिनस पावती करण्याविसीं राजश्री राज्याजीस पत्र लिहिलें होते त्याजवरून त्याणी जिनस येणेप्रा आह्मास पावती केली तपसील
२३ चिनी सरंजाम
४ बिल्लोरी कुलफया झांकणीसुधां
५ चिनी कुलफया झांकणीसुधां
० बिल्लोरी सिष्या दस्ती झांकणीसहित
१ सफेद
१ निळी
------
२
राज्याजीनी सांगितलें की मार्गात फुटल्या एथें आल्या नाहीत
१४ प्याले बिल्लोरी मयरिकाबी
८ निळी मयरिकाबी जोडी च्यार
६ सबज मयरिकाबी जोडी ४ पैकी एक जोडी मार्गात
फुटली सबब आह्मास पावली नाही बाकी अदद
----
१४
---
२३
२ दफा
१ पालखीमयगालिच्या विलायती व मुतका
१ भत्ता विलायती
० काळ्या वाळ्याचे रोपे-याची चटी ह्मणोन लिा त्यास | रोपें वाटेंत येता मेली एथवर पावली नाहीत
----
२
एकूण फुटली व मेली जिनस वजा जातां बाकी जिनस पावली व कुशलपुरी पिला यांचे नावें सुभराव याणी पुणियाहून लखोटा पा तो रवाना केला आहे कुशळपुरी यास पावता करून उत्तर पाठवावें अखबार वरचेवर पाठवीत जाणे म्हणोन राजश्री नानानी तुह्मास पत्रांत लिहिलें असे तरी बातनी चांगलीपैकी पैहाम लिहून रवाना करीत जाणे ह्मणजे एथून पुणियास रवानगी होत जाईल रा छ १ माहे रमजान बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)