लेखांक २२४. १७१५ वैशाख शुद्ध ९.
पु।। राजश्री व्यंकटपा नाईक बळवंत बहिरी बाहदूर गोसावि यासि-
आसीर्वाद विनंति उपरि संस्थानचे कारभारसमंघी सरसुभेदाराकडून पेंचाचे भाव लिहिण्यात येतात येविषी ता लिहिल्याप्रा समजलें इकडून जें ठरावात आलें त्याप्रा फडच्या अमलांत यावा ह्मणजे कोणतेहि गोष्टीविषई आदेशाचें कारण नाहीं कराराप्रा कारभार न उलगडण्यात कबहाती आहेत येविषी ता ल्याहावें ऐसें नाहीं रा छ ८ सवाल हे विनंति.