गिरमाजी विठल निा। मोकासी लेखांक २२८. १७१५ वैशाख शुद्ध १०.
यास पत्र मोहसनअलीखां यानी
मागीतले सबब.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गिरमाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिो जावें विशेष का विसाद जागीर मीरमोहसनुदौलीबाहदूर यांजकडे आहे तेथील मोकाशाचा अमल सन १२०२ सालचा मामुलबमोजीब पेशजीपासोन चालत आल्याप्रा यांजकडील फडच्या तेथील अमील करून देत असतां तुह्मी इजाफा मामुलसिवाय ऐवज मागतां व च्याहरूम तहकूफ ठेवीत नाहीं ह्मणून बोभाट आला त्यावरून लिा असे त्यास पेशजीपासोन मोकाशाचा अमल चालत आल्याबमोजीब च्याहरम तहकूफ ठेऊन फडच्या करून घ्यावा ज्याजती ऐवजाचा उपसर्ग करून वर्तमान कळले त्यावरून लिो असें त्यास मौजेमाराकडे तुह्माकडील मामलतीचा अथवा कांही एक लडा नसतां पाटील कुलकर्णी यास धरून नेऊन दंड घेण्याचे कारण काय त्यांत बळवंतराव हरी आप्त तेथील पाटीलकी ती आह्माकडील हे मल्हार तुकदेव कारकून पाटीलकीवर आहे त्यानी सांगितले असता रुपये घ्यावे हे उचित नाही त्यास पाटील कुळकर्णी यापासोन ऐवज घेतला तो माघारा देऊन पुढे मौजेमारास कोणेविषई उपसर्ग न लागे ऐसा बंदोबस्त व्हावा बोभाट येऊ नये हे काम घराऊ समजोन लिाप्रो व्हावे रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)