नारोपंत देशपांडे पा सोलापूर लेखांक २२७. १७१५ वैशाख शुद्ध ९.
यांचे पत्राचें उत्तर छ ८ सवाल.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री नारोपंत देशपांडे पाा सोलापूर स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पा तें पांवलें मौजे राळेरास पा मार्डी एथील पाटिलकीसमंधें राजश्री अंताजीपंत यांस मार्डीचे मुकामी सांगितल्याप्रा पाटीलकीचा महजर करून देवितील रा छ ८ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.