पत्र पांडुरंगराव बाबा यास छ १७ सवाल. लेखांक २४७. १७१५ वैशाख वद्य ३.
तिा राजश्री पांडुरंगराव बाबा स्वामी वडिलाचे सेवेसी आपत्य गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति एथील कुशल तो छ १६ सवाल मुा लस्कर दरजागा किले बेदर एथे वडिलाचे असीर्वादेकरून यथास्थित असे विशेष मौजे नवले बुा पा सीराढोण हा गांव राजश्री राये निलकंठराव सुंदर यास जागीर आहे तेथील कमाविसदार जैरामपंत यानी विनंति केल्यावरून मोकाशाचा फडच्या करून घेतला हे वर्तमान ऐकून संतोष जाला सरदेशमुखीचा फडच्या होणे आहे येविसीं आबाजीपंत खोत सेवेसी येऊन विनंति करवील त्याप्रो बंदोबस्त करून देणे यास आज्ञा व्हावी भगवंतराव लक्ष्मण कमाविसदार माहाली आहेत ते गांवास फार उपद्रव करितात याजकरितां परभारे फडच्या करून घ्यावा हे करारप्रो ऐवज पावता करितील राजश्री राजे रायरायांबाहादूर यांचे आप्त याजकरितां राजे मारनिले योणीहि आपणास पत्र लिहिले आहे त्याजवरून ध्यानास येईल बहुत काय लिहिणे हे विज्ञापना.