श्रीसांब: सपुत्रो
(श्रीमत् रघुनाथराव)
लेखांक १०४.
१६९७ आश्विन वद्य ९.
रा। लक्ष्मण अपाजी यासि :-
सु॥ सीत.
मिस्तर होम आला. हा दोहींकडे समजाऊन डाक बसवीलसें दिसोन येतें. यास्तव कारनेलीची वाईट गोष्ट पत्त्याशिवाय बोलूं नये. सांप्रत कारनेलावर वज्रहोम आला आहे. आतां याच्यानें वेडें वांकडें ओढवणार नाहीं. इतके दिवस ओढिलें, तेव्हां कोणी दुसरा मुदई नव्हता. आतां चिंता नाहीं. परंतु, मिस्तर होम त्याचे हि बरेंच च्याहातो व सरकार चे कामावर हि नजर आहे. यास्तव कारनेलीसी वाद करूं नये. आपल्यास कामासी गरज. |
खरी हि गोष्ट असाक्ष असिल्यास बोलूं नये. तिची पंचाईत पडल्यास लटीक-वाद येईल. पत्तेवार मात्र बोलावी. कितेक तपसील रामचंद्र चिटणिसाचे पत्रावरून कळतील. कारनेलीसी ओढूं नये, म्हणोन लिहिलें. त्यास, आम्हीं गैरवाजबी तरी ओढीतच नाहीं. वाजबी हि कांहीं बोलतों. कांहीं किरकोळ बोलतच नाहीं. सालढालीखालीं घालितों. |
एकूण पांच कलमें लिहिलीं आहेत. जाणिजें. छ २१ साबान.
(लेखनावधि:)