श्री.
लेखांक ३०५.
नकल.
सिका.
ज्येष्ठ शु. ८ शके १७०८.
कबालेपत्र कोतवाली शहर पुणे विद्यमान घाशिराम सावलदास त॥ ताराचंद व॥ धरमचंद जोहोरी व हरीकचंद व॥ हिराचंद वखारी व पाणाचंद व॥ भुकण व मूळचंद व॥ रायचंद जोहोरी व आसाराम व॥ भुदरजी शेट व॥ कसबें शहर-मजकूर सु॥ सीत समानीन मया व अलफ सन हजार ११९५ शके १७०८ पराभव नाम संवच्छरे दिल्हे कवालेपत्र ऐसे जे माणिकविजे जती गुरू हरकविजे गछविजे अनसूर व॥ पेंठ वेताल याची जागा पेंठ-मजकुरीं घर कवलार एक मजला खण सुमार ३ होते. ती देवालय पारसनाथाचें बांधावयास आगवड्या पिछवड्या सुव्धां इमल्यासमेत तुह्मांस विकत दिल्हीं. त्याची किंमत रुपये १५० दीडसे तुह्मांपासून घेऊन जागा स्वसंतोषे देऊन खरेदी पत्र करून दिल्हें. तें तुह्मीं चैत्रा आणून दाखवलें. त्याजवरून चैत्रांहून गणेश रंगनाथ कारकून व कृष्णाजी बिन सुभानजी गवड्या चाकर नि॥ सरकार यास पाठवून जाग्याची मोजणी वगैरे चौकसी करून कलमें करार करून दिल्हीं बि॥ बि॥
लांबी पूर्व पश्चिम आगवड्यास पश्चिमेस गल्लीचे हाद्देस भिंतीचे आसार सुध्धां पिछवड्यास पूर्वेस गल्लीचे हाद्देस घराचे भिंतीचे आसार सुधा गज १९॥ सुमार. यासी चतु:सीमा: सेजार १ पूर्वेस मधी गल्ली, उत्तरेकडील सेजारी दामोदर कोठारी वगैरे याचे घरापासून दक्षिणेस रस्त्याकडे जात असे. रुंद पूर्व पश्चिम गज सुमार २॥ अडीच पलीकडे बाळा बल्लद जयराम कुंभार याचे घर कवलार.
१ पश्चिमेस मधीं गल्ली दक्षिण-उत्तर जात असे. रुंद पूर्व पश्चिम गज ४॥ साडेच्यार. पलीकडे कृष्णाजी बहिरव थत्ते यांचे घर कवलार.
१ दक्षिणेस सुकलाल परदेसी रजपूत याचे घर कवलार.
१ उत्तरेस इछी गुजराथीण व दामोदर कोठारी व केशवजी व बनेश्वर ब्राह्मण गुजराथी याचें घर कवलारी.
----
४
रुंदी दक्षिण उत्तर गज सुमार
६१॥ ऐन गर्भी गज
.।१॥। चांदई दक्षिणेकडील ऐन रुंद गज .॥३॥ पैकीं निम्मे सुकलाल परदेसी रजपूत याची गज सुमार .।१॥ बाकी तुमचे घराखाली.
.॥. चांदई उत्तरेकडील खुद्द तुमचे जागा खाली गज
-------
६॥।३।
घरास शेतखाना जागा नाहीं स॥ दखल बाद कलम ०
घराचे पाणी मोरी बांधोन सिरस्ते-प्रों। रस्त्याचे मोरीस मेळवावें. कलम १.
पिछवड्यास पुर्वेस घराचे भिंतीस दर्वाजा गल्लींतून वागावयास पुर्वुख असे. कलम १.
एकूण लांबी साडे एकूणीस गज व रुंदी पावणेसात गज सवातिन तसू व कलमें सात येणेंप्रमाणें जागा तुह्माकडे करार करून देऊन किमतीच्या रुपयांवर सरकार सिरस्ता दरसद्दे रुपये १० प्रमाणें रुपये १५ पंधरा तुह्मांपासून घेऊन कबालेपत्र तुह्मांस भोगवटियास करून दिल्हे असे. तर सदर्हू जाग्यांत देवाल- याची इमारत बांधोन मूर्तीची स्थापना करून तुह्मी व तुमचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेनें पारसनाथाचा उत्छाव करीत जाणें. जाणिजे. छ ७ साबान. मोर्तब सूद. मोर्तब.
बार रुजू.