श्री.
लेखांक ३१५.
१७१४ मार्गशीर्ष.
पैबस्ती मार्गशीर्ष वद्य १३ शके १७१४ परिधावीं संवत्सरें.
श्रीमंत राजश्री रावजी स्वामीचे शेवेसी:-
सेवक आबाजी भास्कर ठकार कृतानेक सा० नमस्कार विज्ञापना ल्याहावेया जे आपले थोरले कामाविशीं माहदजी रानवडे याचे कानावर घातलें आहे कीं पाटील बावाकडून करून घेणें त्यांस त्यांनीं मान्य केलें आहे ते म्हणतात कीं त्यांची आमची भेट जाली म्हणजे बंदोबस्त करून देऊं त्यास आपण पंचमीस मुळखेडास यावें म्हणजे ते तिकडे येणार बेत केला आहे तर आपण अगत्य यावें कार्य करावया जोगे आहेत मी श्री कोल्हापुराहून आल्यापासून शरीरास समाधान नव्हते. बायकोस व आम्हास उभयतांस समाधान नव्हतें. आताशीं समाधान वाटत आहे. चिरंजीव बाळास त्याचे मागें लाविलें आहे. त्यांनीं मान्य केलें आहे. पंचमीचा करार केला आहे. आपण यावयाची चिटी त्यांचे नांवें द्यावी. मोघम द्यावी कीं आम्ही येतों. कळावें बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विनंति.
आवंदा आडचण फार आहे. रुपयाची मात्र तजवीज करितों. माघ अखेरपर्यंत रु॥ १०० शंभा देतों. कळावें. हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57