श्री.
लेखांक ३३५.
१७२२ वैशाख शुद्ध ५.
ती ॥ राजश्री रावजी स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्य गोपाल धोंडाजी शिरसा नमस्कार विनंति विज्ञापना. येथील कुशल ता।। वैशाख शु॥ ५ पो।। वडिलांचे आशिर्वादें सुखरूप असो. विशेष. वडिलांकडून बहुत दिवस जाहले पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. असो. रा।। वेंकाजी जयराम याजकडे गजीच्या संताचे वगैरे काम सांगितलें त्यास फार उत्तम केलें हालीं श्रीमंताचे स्वारी बरोबर रा।।. भिकाजीपंत आप्पा व माधोराव आले यांणीं आक्षेप केला आहे त्यास रा।। माधवराव भय्या राजे बाहाद्दर यांचे पत्र आन्या धुमाळ याचे नांवें आल्यास बंदोबस्त होईल. दुसरें आपण आह्मांस लिहिलें कीं आमचे हातची बाकी सर कानगोई संबंधी बागलाण प्रांतीची वसूल करून घ्यावी ह्मणून लि॥ त्यांस पदच्युत जाहल्यास कोणी उभे राहूं देत नाहीं. आपण वडील आहांत सर्व आपल्या ध्यानांत आहे परंतु बंदोबस्त राखावा. भिकाजी मोरेश्वर याचीं बोलणीं बहुत जाहलीं. भेटीनंतर सविस्तर निवेदन होईल. पत्रीं विस्तारे कोठवर लिहूं ? समक्ष भेटीस लवकरच येतो. कळावें बहुत काय लिहिणें? लोभ करावा हे विज्ञापना.