श्री.
लेखांक ३७९.
विनंति उपरि. आपण मुलामाणसांस पाठवावयाचा निश्चय केला होता त्यांत कांहीं विपर्यास ऐकतो. त्यास चित्तांत विपर्यास काडीमात्र न आणितां सुखरूप मार्गस्थ करावीं. येथें आल्यावर दुसरा अर्थ किंवा किंत चित्तात न आणावा. वारंवार काय ल्याहावें ? दुसरा अर्थ घडावयाचा नाहीं. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.