एकूण कलमे ७ सात रास याचा कलमाचे कलम सदर्हूप्रमाणे निर्वाह केला आहे ऐसियास माहालीं आकस व कोसीस कराल आणि हुजूर राजश्री स्वामि कलमाचा कलम मनास आणितील तेव्हा आकास व कोसीस दिसोन आली ह्मणजे स्वामि तुमचा मुलाहिजा करणार नाही ऐसे बरे समजोन परनिस्ट लिहिलेप्रमाणे चौकस मनास आणोन हुजूर राजश्री स्वामिचे सेवेस लिहिणे ह्मणोन देशाधिकारी व पारपत्यगार ता। मजकूर यासि आज्ञा हे निवाडपत्र सत्य निदेश समक्ष रुजू.*
तेरीख ५ रबिलोवल
सु।। खमस समानीन सलफ
सुरु सूद बार