लेखांक १५
श्री १६१३ चैत्र शुध्द १०
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १७ प्रजापतीनाम सवत्सरे दशमी सो (भौ) मवासरे क्षत्रियकलवतस श्रीराजाराम छत्रपती याणी समस्तसेनाधुरधर राजमान्य राजश्री सताजी घोरपडे सेनापती यासि आज्ञा केली ऐसीजे तुह्मी माहादजी जगदळे देसमुख रा हरी विनतीपत्र पाठविले ते पावले महादजी जगदळे देशमुख ता। मजकूर याचे वतन याचे यास चालविण्याची आज्ञा केली पाहिजे ह्मणोन लिहिले त्यावरून व माहादजीच्या विनतीवरून मनास आणिले पुर्वी बेदरचे पादशाहाचे व विजापूरचे पादशाहाचे होते तेही पाहिले
हे मर्हाटे लोक त्या प्रातीचे वतनदार होते त्यास ही पूर्वी + + + जगदळे का। मजकूरचे देशमूख ऐसे नेमस्त जाले व तुमच्या पत्रावरून विदित जाली ह्मणोन स्वामी याच्यावरी कृपाळू होउनु याचे वतन यास चालवायाची आज्ञा करून पत्र दिल्हे असे सुभियाचे नावे सनदा सादीर केल्या असेती. त्या प्रमाणे चालेल कोण्ही बिलाहरकत करील त्यास तुह्मी ताकीद करून सुरक्षीत चालवणे. ये विशि राजश्री राजचद्र पडित अमात्य यास लिहिले आहे ते चालवीतील जाणिजे बहूत लिहीणे तरी सुज्ञ असा
बार सुरू सूद बार
प्रविष्ट श्रावण सुध गुरुवार छ ६