पत्रांक १
श्री.
पौ छ १८ जिल्हेज.
१६८३ ज्येष्ट वद्य १२
राजश्री मोराजी शिंदे नामजाद, जजीरे रत्नागिरी गोसावी यासीः-
अखंडितलक्ष्मी राजमान्य श्रों रघुनाथ बाजीराव. सु।। इसन्ने सितैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. अनानासें शंभर पाठविलीं आहेत, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, शंभर अनानास, पौ अठावीस येथें आली, तींहि नासली. असला नासका जिन्नस दुरून न पाठवीत जाणें, असें पूर्वीं लिहिलें असतां, हाली रयतीस हैराण करून अनानासें प्रजंनकालाचीं पाठविलींत, हे गोष्ट कामाची नसे. या उपरी पाठवीत न जाणें. जाणिजे, छ २५ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
श्री राजा शाहु नरपति हर्षनिधान बाळाजी बाजीराव प्रधान,
