Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

दहीवेल - दधिवेलं. २ खा नि

दह्याणें - दध्यानी ( सुदर्शना). ४ खा व

दळवेल - दलिकं (लांकूड). खा व

दाऊळ - दात्यूह (कोकिळा) - दात्यूहपल्लं. खा इ

दाडखेल - दृंष्ट्राखेटं. खा नि

दातर्जी - दात्र ( कुर्‍हाड) - दात्रपद्री. खा नि

दातवेळ — दात्र (कुर्‍हाड) - दात्रवेरं. खा नि

दापूर - दर्पक (अनंग) - दर्पकपुरं. ५ खा म

दापूरी - दर्पक (अनंग) - दर्पकपुरी. ४ खा म

दापोरें - दर्पक ( अभंग ). खा म

दांबुर्ले -डामरु (लोकनाम) - डामरपल्लं. खा म

दाभाडी - दर्भवाटिका खा म

दामरखेडें - डामर (लोकनाम) - डामरखेटं. खा म

दामळदें - डामर (लोकनाम) - दामपल्लं. खा म

दारुंबरें - द्वारौदुंबरं (देवद्वार व उंबर यांजवरून) मा

दासगांव - दाशग्रामं = दासगांव.  दाश म्हणजे मच्छीमार, कोळी.
दासगांव म्हणजे कोळ्यांचें गांव.

दिघावें - दीर्घ (उंट) - दीर्घवहं खा इ

दिघी - दीर्घ (उंट ) – दीर्घिका. खा इ

दिधवद - दिदिवि ( स्वर्ग ) - दिदिविपद्रं. खा म

दिवी - दिवि (चास) - दिवि. खा इ

दुगाणी - दुर्गा (कोकिळा) - दुर्गावनी. खा इ

दुजखेडें - दु:सथ (कोंबडी) - दु:सथखेटं. ४ खा इ

दुटल - डुंडुल (घुबड) - डुंडुलकं. खा इ

दुंदें - दुंदुभं (सर्प) - दुंदुभक. खा इ

दुधखेडें - दुग्घखेटं. खा नि

दुधाळे - दुग्धपल्लं. खा नि

दुधिवरें - दुग्धवेरं (दूध पुष्कळ असणारें गांव) मा

दुरंगपुर - दुर्गंध ( कांदा) - दुर्गधपुरं. खा व

दुसाणें - दु:सथ (कोंबडा) - दुःसधवनं. खा इ

दुसेगांव - दुःसध (कोंबडा) - दु:सथग्रामं. ४ खा इ

देउळवाडें - सं. प्रा. देउळवाडा. (शि. ता.)

देउळवाडें - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) देवकुलपाटकः खा म

देऊर - देवपुर = देवूर, देऊर.

देऊर - देव (राजाचें बहुमानदर्शक नांव) - देवपुरं. खा म

विन्द्या [ इन्द् १ परमैश्वर्ये. वीन्द्र: = विन्द्या ] ( धा. सा. श. ) विपाय [ विपाक (ना. ) ] ( धातुकोश-विपाइ पहा)

विरजण [ विजण (अमरकोश) = विरजण ] र मध्येंच घुसडला गला. (भा. इ. १८३२)

विरजणें [ विरंजन = विरंजणें ] दुधाचें रूपरंग बदलणें म्हणजे विरजणें. विरजण म्हणजे दुधाचें रूपरंग बदलणारी वस्तु आम्लादि. ( भा. इ. १८३४)

विरढा [ विरुध् = विरढा, बिरडी (बिरडया plural ) ] a grain which germinates through soaking. विराढ [ विराष्ट ] (बिर्‍हाड ३ पहा)

विराणें [ वि + रण् to sound : विराणनं = विराणें ] Military musical instrument

विरी [ वीर्य (potency) = विरी ] lustre, potency, उजळा, शक्ति.

विरोळा [ विरुलः = विरोळा ] पाणसाप.

विर्घळणें [ आविर्गलनं = विर्घळणें ] (भा. इ. १८३६)

विर्‍हाढ [विराद्धं] (बिराढ २ पहा)

विवंचणे [ मन् ४ ज्ञाने. मीमांसनं = विवंचणें ] विवंचोनि बोले (रामदास ) ( धा. सा. श. )

विंशति [ द्विदशति = विअशति = विंशति ] पूर्ववैदिक भाषेंत दशन् प्रमाणें दशति हा शब्द १० दहा या अर्थी होता. द्विदशति म्हणजे दोन दहा. द्विदशति या पूर्ववैदिक शब्दाचा अपभ्रंश विंशति. द्वि तला प्रथम द काढून टाकला आहे व दशति यांतील प्रथम द च्या बदली अनुस्वार उचारला आहे. कित्येक भाषाशास्त्रज्ञ शति, शत या शब्दाचा अर्थ पूर्ववैदिक कालीं दहा होता, असें प्रतिपादन करतात. परंतु तें असामंजस्यास्तव मला रुचत नाहीं.
त्रिदशति = त्रिअशति = त्रिंशति = त्रिंशात्.
चत्वारिदशति = चत्वारिअशति = चत्वारिंशत्.
पंचदशति = पंचअशति - पंचाशत्.
पंच या शब्दांत अन्त्य अ असल्यामुळे द चा लोप होऊन तत्स्थानी अनुस्वार झाला नाहीं.
षपदशति पष्पटि = पष्टि.
दोन ष झाल्यामुळे एकाचा लोप. पष्टि म्हणजे सहा दहा.
सप्तदशति = सप्तअअति = सप्तति
अष्टदशति = अषअअति = अषीति = अशीति

विटी [ वीटा (महाभारत-आदिपर्व)=विटी ] विटीदांडूच्या खेळांतील हत्यार. (भा. इ. १८३६)

विटी (दांडू) [ वीटा = इटीदांडू खेळण्याचा लाकडाचा दोन चार बोटांचा तुकडा. आ = ई (मराठी स्त्रीलिंग) ] (भा. इ. १८३४ )

विडा १ [ व्रीड् ४ चोदने. विडः = विडा] विडा उचलणें म्ह० युद्धचोदना स्वीकारणें. नागवेलीच्या पानांच्या विड्याशीं संबंध नाहीं. ( धा. सा. श. )

-२ [ विदथ (प्रतिज्ञा ) = विडा ] विडा मांडणें to set up a pledge.

विडा तोडणे [ व्रीडा तोडणे = वीडा तोडणें ] नागवेलीच्या पानांच्या विड्याशीं (व्रीडा) वीडा शब्द उच्चारसाम्यानें एक मानण्याकडे प्रवृत्ति झाली. ( ग्रंथमाला)

विडी [ विष्टि = विड्ढि = विडी ] मुसळ वगैरेंना जें लोखंडाचें वलय किंवा वळें घालतात त्याला विडी म्हणतात. (भा. इ. १८३५)

विणणें [ इव् १ व्याप्तौ. इन्वति=विणतो ] त्यानें माझ्या भोवतीं जाळें विणलें म्हणजे जाळ्याची माझ्या भोंवतीं व्याप्ति केली. ( धा. सा. श. )

विणणें बिणणें [ वयति विवयति = विणणें बिणणें ] बिनणें निरर्थक जोडशब्द नाहीं. (भा. इ १८३४)

विंदाण [ वि = इंद् ऐश्वर्ये : वींदन = विंदाण ] ऐश्वर्य.

विद्रें [ विद्रिय (निंदित, वांकडे) = विद्रें] अविद्रियाभिः ऊतिभि ( अनिंदिताभिः संरक्षणैः ) १-९-४६-१५ ऋग्वेद.

विनवणी [ विज्ञापना किंवा विनमनी किंवा विज्ञपन.
विज्ञापना = विनावणी
विनमनी = विनवणी
विज्ञपना = विनवणी ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३ )

विधवा [ विधवा = विध्वा ] (स. मं. )

विधुर [ विगतः धवः यस्याः सा विधवा । विगता धुरा यस्य सः विधुरः । ] धव म्हणजे नवरा, धुरा म्हणजे बायको. धू धातूपासून धव व धुरा हे शब्द निघाले आहेत. धवन करणारा जो तो धव; धवन करून घेणारी ती धुरा. (भा. इ. १८३४)

विजा १ [ ईजा ] ( इजा पहा )

-२ [ वि + ईज् ]

विंझणा [ वीजनः ] (विंझुणा पहा)

विझणें [ विध्मा = विज्झा = विझ. विझ + णें = विझणें ] (भा. इ. १८३६)

विझवणें १ [विघ्मायते] (विझावणें पहा)

[ विधमनं = विझवणें ]

विझवणें [ विघ्मायते=विझ्झाअतो=विझावतो, विझवतो ] (भा. इ. १८३२)

विंझुणा [ वीजनः = विज्जणो = विंझुणा, विंझणा, विंजण ]

विट [ विष् ]

विटणें १ [ वोट पहा ]

-२ [ विन्ट् हिंसने = विटणें ] वस्त्र विटलें. (धा. सा. श.)

-३ [ विष् विप्रयोगे । विष्णाति ] रंग विटला म्हणजे रंगाचा विप्रयोग झाला. माझे मन विटलें म्ह० मनाचा विप्रयोग झाला. ( धा. सा. श. )

-४ [ विंटनं = विटणें. विण्ट् वुण्ट् हिंसने, वस्त्र विटलें = वस्त्रं विंटितं किंवा वुंटितं ] (भा. इ. १८३६)

विटाळ [ भ्रष्ट = बाट. विभ्रष्ट = बिट. भ्रष्टविभ्रष्ट = बाटबिटणें. विभ्रष्टनं = विटणें ] ( भा. इ. १८३६)

विटाळणें [ विट्वलितं विटालितं=विटळलें विटळलें पिलालितं विटालितं = विटाळलें. टल् टल् वैक्लव्ये ] (भा. इ. १८३६ )

विटाळशी १ [ विट्वालशयाना = विटाळशी ]

-२ [ विट्वालासुः = विटाळशी ]

-३ [ विष्टरजस् - विट्टलसी = विटळशी = विटाळशी. विष्टं रजः यस्याः विष्टरजाः ] विष्ट म्हणजे टाकाऊ. (भा. इ. १८३६ )

-४ [ विष्टालसा = विट्टाळशी = विटाळशी. विष्ट्या अलसा म्हणजे विष्टेनें मद, थकलेली ] विष्टा म्हणजे शरीरांतून वहाणारें टाकाऊ रक्त. परंतु रजस् या पदार्थाशीं ज्या अर्थी विटाळशीचा संबंध आहे. त्या अर्थी पहिली (३) ही व्युत्पति प्राह्य दिसते. ( भा. इ. १८३६)

-५ [ विभ्रष्टरजा = विटलसी = विटाळसी ] जिचें रजस भ्रंश होतें ती विटाळशी. (भा. इ. १८३६)

-६ [ विष्टरजाः = विठ्ठलसी = विटाळसी ] विष्ट म्हणजे स्रवणारें आहे रजस् जिचें ती स्त्री. बहुव्रीहि समास. विष्ट सेचने या धातूचें निष्ठारूप विष्ट. विष्ट् म्हणजे स्रवणारें. विष्टरजस् म्हणजे जिचें रजस् स्रवतें आहे ती स्त्री. ह्या शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या मी करून पाहिल्या. परंतु ही व्युत्पत्ति आतां कायम समजावी. (भा. इ. १८३६)

वावडें १ [ व्यावृत्तक - वावडअ = वावडँ = वावडें ] आरोग्यापासून वांकडें नेणारें तें वावडें. ( स. मं. )

-२ [ व्यापद्= वावडें ] रोगीट.

वावर १ [ वापार्ह (क्षेत्रं ) = वावार = वावर ] वावर म्हणजे पेरण्याला योग्य जमीन.

वावरणें [ (ब्रज्) वाव्रज्यते = वावरतो ] वावरणें म्हणजे वांकडें तिकडें फिरणें. (भा. इ. १८३६ )

वाव्हटा [ बाहुअस्यि ] (बाव्हटा २ पहा)

वाशेळें [ वासिर = वाशिल = वाशेळें (तूप वगैरे) ]

वांसा [ वंशक = वंसअ = वांसा ( नाकाचा ) ] (स. मं.)

वासरूं [ वत्सतर ] ( रूं पहा)

वासिपु [ व्या + क्षिप् ४ क्षेपे-व्याक्षेपः ] चलबिचल. ( धातुकोश-वासिप १ पहा)

वासिपे [ वासाप्यते ( वस् १० छेदे, अपहरणे ) ] ( धातुकोश-वास १ पहा)

वास्त [ वस्त् to enquire, beg, solicit वस्तिः = वास्त ] solicitation, enquiry. तो लुच्चा म्हणून कर्जाची वास्त सोडिली.

वास्त पुस्त करणें [ वस्त् to solicit + पुस्त् to honour = वास्तपुस्त ] inquiry about and regard for any one.

वाहणा [ उपानहौ = पाहणाओ ( स्थाणगसुत्त ) = वाहणा ] वाहणा हें रूप वस्तुतः द्विवचनात्मक असून मराठींत अनेकवचनी योजतात. (भा. इ. १८३२)

वाहणें [ वाणें पहा ]

वाहतुक [ वाहतुकं = वाहतुक ] वहतु म्हणजे रस्ता. वाहतुक म्हणजे रस्ता चालून जाण्याचें भाडे.

वाहाण [ प्रा + नहिता (caus p. p. ) shoe, boot = पाण हां ( मानभाव ग्रंथ ) = वाहाणा, वाहाण ] shoe.

वाहाणा [ प्रा + नहिता ] (वाहाण पहा)

वाहावा - संस्त्रवभागा स्थेषा बृहंतः प्रस्तरेष्टाः परिधेया श्च देवाः ॥ इमां वाचं अभि विश्वे गृणन्त आसद्यास्मिन्बर्हिषि क्षादयध्वम् । स्वाहा वाट् ॥ १८ ॥

-२ [ विद्यावृद्धः=विजावडा=विजवटा (Sarcastically learned). विद्योतक = विजोटा = विजवटा (प्रकाश पाडणारा Sareastically) म. धा. २४

-३ [ विद्यामत्तः = विज्जवट्टा = विजवटा (intoxicated by his wisdom). विजयमत्तः = विजवटा mad with success

-४ [ विद्यावत् = विजवटा (wise sarcastically) ]

दभासी - दर्भ - दर्भकर्षा. खा व

दरखेड़ें - दर (दरी ) - दरखेटं. खा नि

दरा ( दरः ) - दर ( दरी ) - दरः खा नि

दरेगांव - दर (दरी) - दरीग्रामं. ५ खा नि

दरेंभणंगी - दर (दरी) - दरंभणंगिकं. खा नि

दर्‍हाणें - दर (दरी) - दरीवनं. २ खा नि

दर्‍हेल - दर (दरी) - दरीवेल्लं. खा नि

दलवट - दलिकं (लांकूड) - दलावर्त. खा व

दलवाडें - दलिकं (लांकूड) - दलिकवाटं. खा व

दलू - दलिकं (लांकूड) - दलिकद्रु. खा व

दलेलपूर - मुसलमानी नांव. खा

दवड - दव (अरण्य) - दववाटं. खा नि

दवड डोंगरी - दव (अरण्य) - दववाटं = दवड. खा नि

दवली कराड - दव (अरण्य) - दवपल्ली = दवली. खा नि

दसकवरडी - दशी (गांधिलमाशी ) - दंशकवरंडिका खा इ

दसनूर - सं. प्रा. दशनपुर. खा (शि. ता.)

दसनूर - दशार्ण ( देशविशेष ) - दशार्णपुरं. खा म

दसवड - दशी (गांधिल माशी) - दंशकवटं. खा इ

दसवेल - दशी (गांधिल माशी ) - दंशकवेलं. ३ खा इ

दसाण - दशार्ण (देशविशेष) - दशार्णकं. खा म

दसाणें - दशार्ण (देशविशेष). खा म

दहिवली - दधिपल्ली (दहीं पुष्कळ उत्पन्न होणारें गांव) मा

दहिवी - दधि - दधिवहा. खा नि

दहीकूट - दधिकूटं. खा नि

दहिगांव - दधिग्रामं. ३ खा नि

दहीठाण - अधिष्ठान ( नगर ) = धिठाण = दहीठाण. दहीठाण हें ग्रामनाम आहे.

दहीतुलें - दधिदोलं. खा नि

दहीदी - दधिपद्रा. खा नि

दहीवड - दधिवाटः खा नि

दहीवद - दधि - दध्यावर्त. २ खा नि

दहीवर - दधिवरिका. वरी = नदी. खा नि

दहीवाहाळ - दधिवाहालि. खा नि

वारा [ वातर: = वाअरा = वारा ] (ज्ञा. अ. ९ पृ.१९)

वारी १ [ वृ १० आवरणे. वारि = वारी ] खाण्यावारी = खादनवारि (खादनं वृणोति वारयति आच्छादयति एवं प्रकारेण). अर्जुनवारि पौरुषं ( नलचंपूः चतुर्थ उच्छ्वासः १८ श्लोक) ( धा. सा. श. )

-२ [ वरि:-री (प्रवाश्यांची टोळी) = वारी ] पंढरीची वारी म्हणजे पंढरीला जाणार्‍या प्रवाशांची टोळी.
वारकरी म्हणजे वारीला जाणारा प्रवाशी.

वारून - मी त्याला वारून आलों = मी त्याचा त्या कामापासून निषेध करून आलों.
वारयित्वा = वारून = बजावून, निषेधून.
निवारयित्वा = निवारून. (ग्रंथमाला)

वारूळ १ [ वामलूर = वाँरूळ = वारूळ. र च्या स्थलीं ळ आणि ळ च्या स्थलीं र, असा वर्णविपर्यय झाला आहे.] (भा. इ. १८३२ )

-२ [ श्लीपदं पादवल्मीकं ॥ वल्मीक = वारूळ ] (भा. इ. १८३४)

-३ [ वल्मीकूट ant-hill = ववींऊड = वारूळ. ल = र. ट = ड = ल = ळ ]

-४ [ वल्मीगृहं = वाळूर = वारूळ ] ant-hill.

-५ [ वामलूर = वावरूळ = वारूळ ]

वालभ [ पारिरंभ्यं ]

वाली [ व्री to support : व्रायः = वाली ] supporter. माझा वाली कोण ? who is my supporter ?

वाव १ [ व्यामः = वाव ( करसहितयो वाव्होरन्तरं) व्या + मा ३ माने ] (धातुकोश-वाव पहा)

-२ [ व्योम = वोवं = वाव ] (स. मं.)

-३ [ व्यापः = वाव (व्याप्ति, सवड). व्यामः = वाव ]

वांव १ [ व्यामः ] (वाव ३ पहा)

-२ [ व्याम (चार हात प्रमाण अंतर) = वांव] (भा. इ. १८३६)

वावडी १ [ व्यावृत्ति exclusion = वावडी ] वावडी होईल म्हणजे exclusion shall result.

-२ [ वाताटी = वावाडी = वावडी ] पतंग.

२. सीयडोणी शिलालेख संवत् ९६० पासून १०२५ पर्यंत खोदला जात होता व वैल्लभ भट्टस्वामीचा शिलालेख संवत् ९३३ तला आहे. म्हणजे वार हा शब्द शक ८७६ त प्रचलित होता.

३. वार ह्या शब्दाचा अर्थ ह्या दोन शिलालेखांत ( १ ) जमात व (२) पेठ या दोन अर्थी योजलेला आहे. वार या शब्दाचा अर्थ जमाव, जमात असा अमरकोशांत दिला आहे. शिवाय वार म्हणजे दरवाजा, असाही एक अर्थ आहे. प्राचीन काळीं महाराष्ट्रांत व सध्यां गुजराथेंत कित्येक पेठांना दरवाजे असत व असतात. दरवाजा बंद केला म्हणजे पेठ बंद होत असे. दरवड्याच्या भीतीनें पेठेला दरवाजा केलेला असे. ह्या दरवाजाला वार हा मध्यकालीन संस्कृत किंवा प्राकृत शब्द होता. त्यावरून लक्षणेनें वार म्हणजे दरवाजाच्या आंतील पेठ असा अर्थ झाला. वार म्हणजे दरवाजे व पेठा ज्यांनीं बांधल्या त्यांचीं नांवें त्या वारांना किंवा पेठांना सहजच मिळत. सीयडोणी शिलालेखांत (१) वहुलू व रुद्रगण यांचा वार, (२) अ (इ) बुआ नरासिंघ यांचा वार, (३) वारप व पद्य यांचा वार, (४) पाहू व देदेक यांचा वार, (५) द्वाविंसतक व छित्तराक यांचा वार आणि (६) तुंडि व प्रद्युम्न यांचा वार असे सहा वार बांधणार्‍यांच्या नांवानें उल्लेख आलेले आहेत. हुल्झनें वार याचा अर्थ जमात असा एकच दिला आहे; व कीलहार्नानें ह्या शब्दाचा अर्थ मुळींच दिला नाहीं. परंतु ह्या शिलालेखांत वर लिहिलेल्या सहा स्थळीं वार ह्या शब्दाचा अर्थ पेठ असा आहे, हें मीं वर स्पष्ट करून दाखविलें आहे.

४. शक ८७६ त बांधणार्‍यांच्या नांवानें वारांचा उल्लेख करीत. पुढें मुसलमानी अमलांत बांधणार्‍यांच्या नांवाची ओळख बुजून म्हणा किंवा मनुष्यांच्या नांवांपेक्षां ग्रहांचीं नांवें बरीं वाटलीं म्हणून म्हणा, वार ह्या शब्दाचा उपयोग ग्रहांच्या नांवांबरोबर होऊ लागला. कदाचित् वार म्हणजे दिवस व वार म्हणजे पेठ ह्या दोन अर्थाचा वाचक असा एकच शब्द असल्यामुळें, पेठांना आधुनिक लोकांनीं दिवसांचीं नांवें दिलीं असावीं. असें दिसत कीं, पूर्वी प्रत्यक धंद्याच्या व जातीच्या लोकांच्या निरनिराळ्या पेठा असत व त्यांस त्या लोकांचे वार म्हणत. पुढें मुसलमानी अमलांत वाटेल त्या जातीचा माणूस वाटेल त्या वारांत राहूं लागल्यामुळे व धंदे व जाती ह्यांच्या जमातीचें माहात्म्य कमी झाल्यामुळे, वारांच्या पाठीमागील अधिष्टात्या व्यक्तींच्या नांवाचा लोप झाला आणि त्या नांवांच्या ठिकाणीं वार शब्दाच्या अनेकार्थत्वामुळें ग्रहांचीं नांवें आलीं. एकंदरींत, वार हा शब्द एक हजार वर्षांचा जुना आहे. ( सरस्वती मंदिर-संकीर्ण लेख )

वायिल [ व्यवहित + ल ] (वयििल पहा)

वार १ [ व्री to choose = व्रायः choice = वार ] a selection to a dinner given to a begger student.

-२ [ वारक = वार] वारक म्हणजे प्रतिदिवशींचें देणें, जेवण वगैरे. वाराने जेवणें म्हणजे प्रतिदिवशीं नेमलेल्या घरी जाऊन जेवणें.

-३ - पुणें, सातारा, सोलापूर वगैरे महाराष्ट्रांतल्या शहरांत कित्येक पेठांना रविवार, आदितवार, सोमवार, शनवार अशीं नांवें आहेत. हीं नांवें दिवस या अर्थी जो वार शब्द आहे त्यावरून पडलीं, अशी कित्येकांची समजूत आहे. आठवड्याच्या सात नांवांवरून पेठांचीं नांवें पडलीं म्हणावें, तर कित्येक शहरांत एकदोन दिवसांच्याच नांवानें पेठा आहेत. एकदोन पेठाच त्या शहरांत असतील म्हणून एकदोन दिवसांचीं नांवें पडलीं म्हणावें, तर सातांहूनही अधिक पेठा त्या शहरांत असलेल्या आढळतात. गांव किंवा शहर प्रथम वसलें त्या वेळीं फक्त एकदोन पेठा होत्या व तेवढ्यांना एकदोन दिवसांचीं नांवें दिलीं, असा एक पक्ष आणतां येण्याजोगा आहे. पण दिवसांचींच नांवें पेठांना कां दिलीं, ही शंका राहतेच. ह्या शंकेचें निराकरण करावयाला वार या शब्दाची प्राचीन परंपरा पाहिली पाहिजे. Epigraphica Indica च्या पहिल्या खंडांत सीयडोणी शिलालेख डा. कीलहार्नानीं छापला आहे, त्यांत वार हा शब्द खालील स्थलीं येतो:-

पंक्ति
२ द्वाविंसतिकच्छितराकयोर्व्वारे वारप्रमुख
४ वारस्वहस्ताय
७ वहुलूरुद्रगणयोर्व्वारे वारप्रमुखस्थानेन
१० वारप्रमुखस्थानसंवद्धकन्दुकानां
११ सीयडोण्यां वारप्रमुखस्थाने आइवुआनरसिंघयेर्व्वारे
१९ अ (इ) वुआनरासिंघयोर्व्वारे
२३ वारपपद्मयोर्व्वारे
२९ पाहूदेदेकयोर्व्वारे
३० तुण्डिप्रद्युम्नयोर्व्वारे
३६ पाहूदेदेकयोर्व्वारे

Epigraphica Indica च्या पहिल्या खंडांत डा. हुल्झ यांनीं ग्वालेर येथील वैल्लभभट्ट स्वामीच्या देवळांतील दोन शिलालेख छापले आहेत. पैकीं दुसर्‍या शिलालेखांत हा शब्द असा येतो :-
२।३ सार्थवाहप्रमुख सवियाकानां वारे

वाणें, वाहणें, वाहिणें, वाइणें, वायणें. वाहणें म्हणज अर्पण करणें.

वातरट [ वातर ( वायू झालेला, वादळी ) वातरिष्ठ = वातारिठ्ठ = वातरट ] वेडा, भंगट. ( भा. इ. १८३३)

वादवीद [ वादविवाद = वादबीआद = वादबीद = वादब्याद ] (भा. इ. १८३४)

वांदर [ व्यंतर = वांदर, बांदर ]

वांधा [ व्यव + धा-व्यवधान ] (धातुकोश-वाढ ८ पहा)

वाँधा [ ( स्त्री ) वाधा ( विरोध ) = वाँधा ( पुल्लिंग ) ] ( भा. इ. १८३६)

वाधाणा [ व्यव + धा-व्यवधान ] ( धातुकोश-वाढ ८ पहा)

वानर [ वननर = वानर ( wood-man = ape ) ] वा + नर हा समास मला मान्य नाहीं.

वापवणें ( धोतर) [ वै-वायति-वापयति ( शोषणें ) वापन = वापवणें ] नवें कोरें धोतर धुणें, शुष्क करणें. ( भा. इ. १८३४)

वापसा [ वापसमय = वापसा ] season to sow.

वाफा [ वप्र = वाप्पा = वाफ्फ = वाफा ] मळ्यांतील चौकोन. (ग्रंथमाला)

वाफारा [ वाष्पभर: = वाफारा ]

वाभाडा [ बाध् १ लोडने. वावाध्य = वाभाड, वाभाडा. आबाधा = आबाढा = आबाळ, आबळ (वेदना, दुःख) ] ( धा. सा. श. )

वायगोळा [ वातगुल्मः = वायगोळे ]

वायणें [ वाणें पहा ]

वायन [ उपायन - वायन (वाअण) वाण ] ( भा. इ. १८३६ )

वायफळ १ [ व्यर्थफल = वायफळ ]

-२ [ वायुफलं (इंद्रधनुष्य) = वायफळ (खोटें) व्यर्थ ]

-३ [ व्ययफलं = वायफळ ]

वायल [ व्यवहित + ल ] (वयिल पहा)

वायवर्णा [ वातवरुणः = वायवर्णा ( वृक्ष ) ]

वायस [ वयस् = वायस ] सर्व पक्षी, केवळ कावळाच नव्हे. सर्व पक्षी या अर्थी हा शब्द तुकाराम योजतो. (भा. इ. १८३४)

वायाँ [ म्लान = वाअ = वाय = कोमेजलेलें, फुकट गेलेलें. वाय हा प्रातिपदिक त्याची चतुर्थी वाया, वायाँ ] वायां गेलें = आशाप्रत गेलें. (ग्रंथमाला)