Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

लांकुड [ लकुटः = लगुडः = } लकुड = लाकुड, लाकडी, लकडा. 
लगुरः = लगुरी = लगोरी ( डाव ). (भा. इ. १८३२)

लाख १ [ लक्तक = लाख ]

-२ [ लाख् १ अलमर्थे. लाख्यः = लाख्या, लाख ] लाख माणूस म्हणजे कामाला पुरेसा माणूस. लाख्या बारगीर म्हणजे समर्थ बारगीर. ( धा. सा. श. )

-३ [ लाघ्, लाख् सामर्थ्ये. लाख = लाख, लाख्या ] लाख माणूस म्हणजे समर्थ माणूस. लाख्या बारगीर म्हणजे समर्थ, शूर शिपाई. लायक या फारशी शब्दापासून ल्याक् हा शब्द मराठीत आला आहे. त्याचा व समर्थार्थी लाख शब्दाचा कांही एक संबंध नाहीं. (भा. इ. १८३४)

लाखणी [ श्लक्ष्णिका = लाखणी सुपारी ( मऊ चिकण सुपारी ) ]

लाखाटणें [ लाख् १ शोषणे. लाक्षाक्तं = लाखाट (क्रियापद लाखाटणें ) ] लाखाटणें म्हणजे लाखेनें माखणें. ( धा. सा. श. )

लाखोली [ लक्षावालि = लाखोली ]

लाख्या १ [श्लाघ्यः = लाख्या ] श्लाध्यः बारकीरः = लाख्या बारगीर.

-२ [ लाघ्, लाख् सामर्थ्ये ] ( लाख ३ पहा)

-३ [ लाख् अलमर्थे ] (लाख २ पहा)

-४ [ लाख् to be competent) लाख्या बारगीर competent horseman.

लागणें १ [ लाघ्, राघ् १ सामर्थ्ये. लाग ] आम्हास लग्नास मणभर साखर लागली. ह्या कामास १०० माणसें लगतात. ( धा. सा. श. )

-२ [ लग् १ सङ्गे, गतौ. लग् ( बंद होणें ) = लागणें ( बंद होणें ) ] घर लागलें म्हणजे बंद झालें, पडलें, रिकामें झालें. ( धा. सा. श. )

-३ [ राखृ, लाखृ शोषणे. राखनं, लाखनं = लागणें ] तो मरीनें, प्लेगानें लागला म्हणजे शुष्क झाला. (धा. सा. श.)

लागलेंच [ द्राकच = (ल प्रलय लागून) लागलाच - लीच - लेंच. द्राक् म्हणजे जलद, तत्काल; तोच अर्थ लागल या शब्दाचा आहे. मराठींत विशेषण आहे; संस्कृतांत अव्यय आहे.] (भा. इ. १८३३)

लव १ [ लोमन् = लव ] (स. मं.)

-२ [ लव (कालाचा अंश) एकोनपंचाशदुच्छवासप्रमाण: काल: लव: ] लवमात्र डोळा मिटेना म्हणजे अत्यल्प काल इ. इ. इ.

लवंगी [ ललामगु = लवंगी ] ललामगु हा शब्द शिस्नार्थी तैत्तिरीयसंहितेंत आला आहे. ललामगु चें स्त्रीलिंग ललामगिका. त्यापासून मराठी लवंगी. लहान मुलांच्या शिस्नांना बायका लवंगी म्हणतात.

लवघा, लवंघा [ लंघः (शोप ) ] ( धातुकोश-लवंघ पहा)

लवंडणें [लोड् १ उन्मादे. लौड = लवंडणें, लवडणें. लौड: ( लिंग ) = लौडा ] ( धा. सा. श. )

लवडसवडी (अव्यय) [ सपदि (तात्काळ at once, without delay, hurriedly ) = सवडी ]

लवणें १ [ ली ९ श्लेषणे. ली = लवणें ] डोळा लवतो म्हणजे खालीं वर होतो. ( धा. सा. श. )

-२ [ नमनं = लवणँ = लवणें. न = ल ] थोरांपुढे लवावें म्हणजे नमावें. (भा. इ. १८३७)

लव बाई लव [ लम पुत्रि लम = लव बाइ लव ] अगदीं दोन तीन वर्षांच्या मुलींचें खेळतांना म्हणण्याचें गाणें आहे. त्यांत आई म्हणते लव बाई लव. येथें लव हा शब्द लम् ( रमणे ) या धातूपासून निघाला आहे. लम = रमस्व = लव. लम् हें रम् चें प्राकृत रूप आहे. रम आत्मने परंतु लम परस्मै. लव बाई लव म्हणजे रम पोरी रम, खेळ पोरी खेळ. (भा. इ. १८३६)

लव लव [ लप लप = लव लव ] लव लव साळू बाई, मामा येतो speak o darling, your uncle is coming.

लव्हाळा [ लघुलय: = लव्हाळा ]

लस [ लसीका = लस ]

लसालसा [ लप् to long for = लसालसा खातो ]

लहंगा १ [ ह्रग् to cover ]

-२ [ हलग: ( हलग to cover ) = लहगा = लहंगा ] petty coat.

लहान [ लघीयान् + लहान ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६४) [ लघीयान् = लहीआन् = लहान ] अति बारीक. (ग्रंथमाला)

लहानगा [ लघीयस् + क] (पोरगा पहा )

-ला १ [ आरे ] (स १ पहा)

-२ [ आरात् ]

झुरखेड़े - जूर्य (जुनें) जूर्यखेटं. खा नि

झोटवाडें - झोटक (सुपारीचें झाड) - झोटवाटं. खा व

झोटग - झोटक (सुपारीचें झाड) - झोटकं. खा व

झोपाणी - श्वपदवनी. खा इ 

 

टंकाई - टंकावती. ( अंकाईटंकाई पहा )

टणकवाडी - तण्डक (खंजन) - तण्डकवाटिका. खा इ

टवरदें - तवर ( कथिल ) - तवरपद्रं. खा नि

टहू - डहू ( ओट) डहू. २ खा व

टहेरें - डहू (ओट) - डहूवेरं. खा व

टाकबारी - टक्क ( लोकनाम ) - टक्कद्वारिका. खा म

टाकरखेडें - ठक्कुर (लोकनाम ) - ठक्कुरखेटं. ५ खा म

टांकवें - टंकवहं ( टंक लोकांचें गाव). मा

टांकवें (बुद्रक) - टंकवहं. मा

टाकळी - तर्कारी (टाकळी) - तर्कारिका. ७ खा व

टाणें - ठ ( शिव ) - टवनं. खा म

टाहकळी - टक्क (लोकनाम) टक्कपल्ली. खा म

टिटवी - तित्तरिका खा न

टिटवी - टिट्टिभ ( टिटवी ) - टिट्टिभकं. खा इ

टिटवें - टिट्टिभ (टिटवी ) - टिट्टिभकं. खा इ

टिपें - तृपा - तृपकं. खा व

टेकवद - तिक (तिककितव, व्यक्तिनाम ) - तैकावर्त. खा म

टेकवाडी - तिक (तिककितव, व्यक्तिनाम ) - तैकवाटिका. खा म

टेकवाडें - तिक (तिककितव, व्यक्तिनाम ) - तैकवाटकं, ३ खा म

टेकू - तिक (तिककितव, व्यक्तिनाम) - तैकं. खा म

टेंगोडें - तिक (तिककितव, व्यक्तिनाम) - तैकवाटं. खा म

टेंभला - तिमिरा (नगरनाम ) - तिमिरा. खा म

टेंभली -तिमिरा (नगरनाम)- तिमिरिका. खा म

टेंभा - तिमि ( दक्षकन्या ) - तैम: ३ खा म

टेंभी - तिमि (दक्षकन्या) - तिमिका. २ खा म

टेंभे - तिमि ( दक्षकन्या ) - तैमं. ७ खा म

लड्ड १ [श्लथ=लड्ड ] तो माणूस लड्ड आहे म्हणजे शिथिल आळशी, मंद आहे.

-२ [ लट्टः ( childish, stupid) = लड्ड ]

लढ् (to fight) युद्ध करणें.   [ १ लढणें. २ लढाई. ३ लढा. ४ लढवय्या. ५ लढाऊ. पाणिनीय धातुपाठांत रध हिंसासंराध्योः असा धातु आहे. हिंसार्थी रध् आहे. र चा ल् व ध् चा ढ् होऊन लढ् हें महाराष्ट्रीतून अपभ्रंश द्वारा मराठींत रूप आलें आहे. लढ् चा मूळचा अर्थ ठार मारणें. द्वितीयार्थ युद्ध करणें. तृतीयार्थ भांडणें; ईरेस पडून त्वेषानें वाद करणें; इत्यादि ] (भा. इ. १८३२)

लत्ता [ नक्तकः, लक्तकः = लत्ता ] लत्ता म्हणजे कपडा.

लपेटणें [ वेष्ट् १ वेष्टने. लतावेष्टनं = लतेटणें = लपेटणें ] लतावेष्टन म्ह० आलिंगन. ( धा. सा. श.)

लफ्फा [ लक्ष्मन्=लफ्फ= लफ्फा ] बायकांच्या लुगड्याचा किंवा पैठणीचा जो कलाबतूचा किंवा रेशमाचा पदर त्याला लफ्फा म्हणतात.

लब [ लक्ष्मन् characteristic, mark = लकत characteristic, लबक, लब (मिश्यांची लब, घेर्‍याची लव)

लबक [ लक्ष्मन् ] (लब पहा)

लबका [ लिप् उपदेहे. उपदेहो वृद्धिः. लिप्तकः = लबका ] चिखलाचा लबका म्हणजे लिबलिबित गोळा. (धा. सा.श.)

लबलव, लबालब [लबि शब्दे] (ग्रंथमाला)

लमाण [ लोहवणिक् = लोहवाणि (कुडें, शिलालेख नं. २०) = लोहवाण = लहवाण = लव्हाण अथवा लमाण ] (ग्रंथमाला)

लय १ - लय काल, लय वेळ, लय पीक असे शब्द गांवढे योजतात. येथें लय म्हणजे अंत. लय वेळ म्हणजे मर्यादातिक्रान्त वेळ; अमर्याद वेळ; अति फार वेळ; अर्थात् लय म्हणजे फार, पुष्कळ, अति, अमर्याद. (भा. इ. १८३२)

-२ [ रयस् velocity = लय ] continous, much लयलूट much exessive gain.

लला [ ललक = ललअ = लला (ली-लें) ललक = लडक (का-की-कें)] लला म्हणजे मूल किंवा लाड. ललक म्हणजे लाड. (ज्ञा. अ. ९ पृ. ४ )

लल्ल [ ललकक ] (लडका पहा)

लल्लाट [ ललाट = लल्लाट ] (स. मं.)

लल्लु [ ललकक ] ( लडका पहा )

लगोरी १ [ लग्नगोलि = लग्गगोरी = लगोरी ] (भा. इ. १८३२)

-२ [ लगुरः ] (लांकुड पहा)

लग्गा १ [ लग्नक surety, boil = लग्गा. लग् १ सङ्गे, गतौ ]

-२ [ लग् १ सङ्गे, गतौ. लग्नक = लग्गा ] ( धा. सा. श. )

लघालघा १ [ लघ् भाषार्थ: (द्वि.)] ( धातुकोश-लघलघ १ पहा)

-२ [ श्लाघश्लाघं = लघालघा ] लघालघा जीभ बोलते = श्लाघश्लाघं जिव्हा वल्हति.

-३ [ लंघ् to speak = लघालघा ]

लचका [ लुंच् १ अपनयने. लुंच् लचका घेणें. लुञ्चिका = लुचका = लचका ] ( धा. सा. श.)

लज्जत् [ रसयतिः = लझअति = लजति = लजत् = लज्जत् ] रसयति म्हणजे चव. (भा. इ. १८३६)

लज्जत [ रस् nown रसति taste = लझत = लज्जत ] taste.

लटकन, लटदिनि [ चटकर पहा ]

लटलट कांपणें [ लट् बाल्ये. बाळ चालतांना जसें कांपतें तसें कांपत चालणें. लटलट (द्विरुक्ति) ] (ग्रंथमाला) लटुपुटीचा, लटुफुटीचा [ लट् बाल्ये व स्फुडि, स्फुटि परिहासे. लटस्फुंट = लटुफुटी = लटुपुटी ] लटुपुटीचा म्हणजे पोरखेळ व परिहास यांचा. ( धा. सा. श. )

लंड [ लंड =गू ] घ्या आमचा लंड म्हणजे घ्या आमचा गू. ( भा. इ. १८३२)

लडका-की-क [ ललकक = लडका-की-क. लल्ल, लल्लु ] (स. मं.)

लडका-की, लाडू (बाई) [ दारक = डारक-लाडक= लडक (का-की) ] लडका व लडकी हे दोन शब्द हिंदी भाषेंत प्रचलित आहेत, मराठींत नाहींत. हिंदींत नपुंसकलिंग नाही. आतां दारिका = डारिआ = लाडिआ = लाडी.
लाडी हा स्त्रीवाचक शब्द मराठींत प्रचलित आहे. लाडू हें त्याचें दुसरें रूप आहे. लाडका-की-कें हे लट् धातूपासून निघाले असून लडका-की या शब्दांहून अर्थात् निराळे आहेत. (भा. इ. १८३६ )

लडवड [ लट्+ वल्ह = लडवड ]

जुथल - यूथरः (पा. ना.)

जेतपुर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतकपुरं. खा म

जेवरें - जयपुरं (जेऊर = जेवरें ) मा

जैतपीर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतप्रियां. खा म

जैतपुर - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतपुरं. खा म

जैताणें - जयंत ( इंद्रसूनुः ) - जयंतवनं. २ खा म

जोंग - वंशकागुरुराजार्ह लोहकृमिजजोंगकम् । ( अमर - द्वितीय - नृवर्ग १२६)
हिमालयाच्या उत्तरेस खोर्‍यांना जोंग म्हणतात. कोणताही भूगोल पहा.
तात्पर्य, अमराच्या कालीं हि या प्रदेशांना जोंग हेंच नांव होतें.
अगुरु जोंग प्रदेशांत होतो म्हणून त्याला जोंगक म्हणत. ( भा. इ. १८३४)

जोगरहळ्ळी - युगंधर. (पा. ना. )

जोगलखेडी - योगिन् (जोगी लोक ) - योगिकुल खेटिका. खा म

जोगलखेडें - योगिन् ( जोगी लोक). योगिकुलखेटं. ३ खा म

जोगशैलू- योगिन् (जोगी लेक) - योगिशैलं. खा म

जोगेसरी घाट - योगेश्वरी घाटः खा प

जोधपुर - यौधेयपुर. (उपनाम व्युत्पत्तिकोश - जेधे पहा)

जोनपूर - यवन. (पा. ना.)

जोर - यौकरीयं. (पा. ना. )

जोरण - जुहुराण (चंद्र ) - जुहुराणं. खा म

ज्वार्डी - यवनारवाटिका. ३ खा व

 

झरपाडा - झर (झरा) झरपाटकः खा नि

झरें - झर ( झरा ) - झरकं. खा नि

झळंबी - झर (झरा) - झरांबिका. २ खा नि

झाडी - झाटी - झाटिका. २ खा व

झामणझरी - यमुना (यामुन = लोकनाम). यामुनझरी. खा म
झालगांव, झालरापट्टण, झालवाडी - (कर्णाटक पहा).

झिरवें - झिरिकावहं. खा इ

झिरी - झिरिका (रातकिडा) - झिरिका. २ खा इ

झुमकटी - झूणिकंधा. खा व
म. धा. ३८

लकडा [ लकुट: , लगुड: ] ( लांकुड पहा )

लकड्या [ लागुडिक: = लकड्या ] पहिलवान, one with a stick, भालदार.

लकतर [ लक्तक (चिंधी) + तर = लकतर ] फाटकी चिंधी.

लकव [ लक्ष्मन् ] (लव पहा)

लंका [ लंका = दुराचारी स्त्री ] प्रस्तुत लहान पोरींना विनोदानें अपशब्दार्थी किंवा अवगुणार्थी लावतात. (भा. इ. १८३२ )

लक्ती [ (लक्तक) लक्तिका = लक्ती ] फाटकें वस्त्र. लक्ती = रगटी-टें. (भा. इ. १८३७)

लखलखणें [ लप ( ख ) कांतौ ] (ग्रंथमाला)

लखलाभ १ [ लखलाभ = लाखलाभ. लाखृ अलमर्थे लखलाभ = पुरेसा लाभ ] (ग्रंथमाला)

-२ [ लास् to be sufficient ] तुझें द्रव्य तुला लखलाभ होवो be sufficient to you.

लग [ लकः an ear of wild rice = लग ]

लंगड (डा-डी-डें ) [ लंग = पायानें व्यंग ] (भा. इ. १८३२)

लंगडणें [ लंग् ( लंगडणें ), लंगट = लंगड. लंगटति = लंगडणें ] लंगडणें हा नामधातू आहे.
ट व ड ज्या कित्येक मराठी धातूंत येतात ते धातू, नामधातू होत. ( धा. सा. श. )

लंगणें १ [लंघ् १ क्षये. लंघनं (क्षय पावणें ) = लंगणें ] ( धा. सा. श.)

-२ [ लंग् १ गतौ = लंगणें ] लंघनानें मी अगदीं लंगून गेलों म्हणजे दुर्बल झालों. लंघ धातू निराळा व लंग निराळा. (धा. सा. श.)

लगतरी [ लक्तक + वस्त्र = लगतअअर = लगतर (रो-रें)] लक्तक म्हणजे फाटकें वस्त्र, फटकूर. (भा. इ. १८३७)

लंगर [ अलंकार = ( अलोप ) लंगार = लंगर ] नवरा गळ्यांत सोन्याचे लंगर घालील कीं, या वाक्यांत लंगर म्हणजे अलंकार.

लंगरसोनें [ अलंकारसुवर्ण = लंगरसोनें ]

लगाम [ ललाम ( अश्वभूषा ) = लगाम ]

जामाटी - जंब्वट्टिका. खा व

जामुनपाडा - यमुना ( यामुन लोकनाम ) - यामुनपाटक: खा म

जामुनवाई - यमुना (यामुन = लोकनाम) - यामुनावती. २ खा म

जामोद - जंबुपद्रं. खा व

जायखेड - जाति (जाई) - जातिखेटं. खा व

जायदें - जाति ( जाई) -जातिपद्रं. खा व

जारगांव - जार (अग्नि किंवा सूर्य) - जारग्रामं. खा म

जावदें - यवपद्रं. २ खा व

जावळी - यामलायन: (पा.ना.)

जावसई - यवासकं. (पा. ना.)

जावळें - जाबालि (ऋषिनाम) - जाबालं. खा म

जिरकुळ - झरकूला. खा न

जिरवाडें - जीरक. खा व

जिरा - झरका. खा न

जिरादर - जीरकदरी. खा व

जिरापुर - जीरक. खा व

जिराळी - जीरकपल्ली. खा व

जिरेथळ - जीरकस्थलं. खा व

जीवधन - जीवधन abounding in cows and bufellows = जीवधन. हें एका किल्ल्याचें नांव आहे.

जुंजार- योयोद्धृ - योयोद्धृकं = भयंकर युद्ध करणार्‍या वीराचें नांव.

जुडेवाडी - यौथ्यं. ( पा. ना.)

जुनखेड - युवन (चंद्र) - युवनखेटं. खा म

जुनटेंक - युवन (चंद्र) - युवनत्रिकं. खा म

जुनवण - युवन ( चंद्र )- युवनवनं. ३ खा म

जुनवणें - युवन ( चंद्र ) - युवनवनं. खा म

जुनवाणें - युवन (चंद्र) - युवनवाहनं. ३ खा म

जुनोण - युवन ( चंद्र ) - युवनवन. खा म

जुनोणें - युवन ( चंद्र ) - युवनवनं. खा म

जुनोन्याचा घाट - (गांवावरून). खा प

जुन्नेर - युवन ( चंद्र ) - युवननीवरं. खा म

जुवर्डी - युवराज. ( पा. ना.)

जुवाणी - युवा (इंद्र) - युवावनी. खा म

जूड - यौथ्यं. ( पा. ना.)

जून - युवन (चंद्र ) - युवनं. २ खा म

रोखणें [ वृक्ष् १ वरणे, पसंत करणें. वृक्ष् = रोख + णें = रोखणें ] मला रोखून बैल धांवला म्हणजे मला निवडून काढून बैल धांवला. ( धा. सा. श. )

रोगट [ रोगित ] ( रोगीट पहा)

रोगराई [ रोगराजिः = रोगराई ( रोगांची साथ ) रोगराज्यं = रोगराई ( रोगांचें राज्य ) ]

रोगीट [ रोगित = रोगीट, रोगट ] रोगः संजात: अस रोगितः ( ५-२-३६ )

रोठा [ लोष्टः ] (रोठी पहा)

रोठी [ लोष्टः = रोठा (दगडाच्या सारखी वाटोळी, मोठी सुपारी ), रोठी ]

रोड १ [ रोड् उन्मादे ] (रोडणें पहा)

-२ [ रुद्रः (रुद् अश्रुविमोचने) = रुड्डः = रोड ] रडका पाळलेला, आसवें ढाळणारा. ( भा. इ. १८३३)

-३ [ रौद्र (तामस) = रोड्ड = रोड ] तामस अतएव क्षीण.

रोडणें [ रोड् उन्मादे = रोडणें, रोड ] उन्मादानें वाळणें. (ग्रंथमाला)

रोडा [ रोडः (चूर्ण) = रोडा ] दगड, विटा इत्यादींचे तुकडे.

रोराण [ रोरवण ] (रोराव पहा)

रोराव [ रु २ रोदने. रोरवीति = रोरावतो. रोरावः = रोराव. रोरवण = रोराण ] रोराण म्हणजे अति मोठ्यानें हाका मारणें. ( धा. सा. श. )

रोशें गवत [ रोहिषं तृणं = रोशें गवत. गोअत्तं = गवत्तं = गवत ] (भा. इ. १८३७)

रोशेल १ [ रोहिशतैलं ] (तिळेल पहा)

-२ [ रोहिसतैल = रोइसएल = रोशेल = रोशेल ] (गर्दे-वाग्भट ) (भा. इ. १८३४)

रोषणाई [ रुश् प्रकाशणें णिच्= रोषणाई ] illumination

रोही [ रोहित् ] ( रुई २ पहा )

रोळी [ र व ण क = र व णि का }  = रोणी = रोळी ]
रं व ण क म्हणजे पाणी निधळण्याकरितां केलेलें कळकाचें पात्र. (भा. इ. १८३६ )

जांब - जांबवं ( पाणिनि २-४-७ ) = जांब.
रामदास स्वामी ज्या गांवीं जन्मले त्या गांवास जांब म्हणतात व त्याचें मूळ संस्कृत रूप जांबवं होतें. (भा इ. १८३७ )

जांब - जांबव = जांब. जांबवंनगरं (पाणिनीय सूत्र २-४-७ खालीं हे शब्द दिले आहेत). (भा. इ. १८३६) जांबवडें - जंबुवाटं (झाडावरून). मा

जांबवली - जंबुपल्ली (जंबुवृक्षावरून). मा

जांबवा - सं. प्रा. जंबुवाविका ( जैबुवापिका ). बडोदें (शि. ता.)

जांबवाहाळ - जंबुवाहालि. खा व

जाबळी - जाबालि (ऋषिनाम). जाबालिका. खा म

जांबुळपाडा - जांबुलपाटी = जांबुलपाट = जांबुलपाटक = जांबुळपाडअ = जांबुळपाडा. नागपाडा, नवापाडा. पाटक, पाटी = अर्धागांव, गांवाचा भाग, थळ वगैरे. (ग्रंथमाला)

जांबोली - जंबु, जंबुल ( जाम) जंबुलिका. खा व

जांभळी - जंबुपल्ली. खा व

जांभापाडा - जंभ (राक्षस नाम) - जंभकपाटकः. खा म

जांभूळ - जंबु ( स्वार्थ ल ). मा

जांभोरें - जंभ ( राक्षसनाम ) - जंभपुरं २ खा म

जांभोळ - जंबुपल्लं. खा व

जाम - जंबु. खा व

जामकी - जंबुक ( कोल्हा) - जंबुकी. खा इ

जामकी माकडी - जंबुक (कोल्हा) - जंबुकी मर्कटिका. खा इ

जामखेल - जंबुखेटं खा व

जामटी - जंबु - जब्वाट्टिका. खा व

जामडी - जंबु, जंबुल (जाम) - जबुंवाटिका. ३ खा व

जामणें - जंबुवनं. ४ खा व

जामतळें - जंबुतलं. खा व

जामध - जंबुधं. खा व

जामधें - जंबु, जंबुल ( जाम ) - जंबुधं. ३ खा व

जामनेर - जंबुनीवरं. खा व

जामदरी - जंबुदरी. खा व

जामलें - जंबुपल्लं. ३ खा व

जामशेत - जंबुक्षेत्रं. खा व