Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सांकू [ संक्रमः ] (सांकव पहा)
साँकू [ शंकु = संकू = साँकू ] ओढ्यावरील कैंच्या मारून बनविलेला फांद्या, वेळू वगैरेंचा पूल. (ग्रंथमाला)
साख [ साक्षिन् = सक्खी = साख ] witness.
साख पटली = witness approved.
साखरनिंबू [ शर्करीनिंबूक = साखरनिंबू = साखरलिंबू ] (भा. इ. १८३४)
साखरपरी [ शर्करापारी = साखरपारी = साखरपरी ] पारी म्हणजे शकल. साखरपारीच्या वड्या म्हणजे कणिकेंत साखरेचीं शकलें घातलेल्या वड्या.
साखरपरीच्या वड्या [ शर्कराप्राया वर्तिका = साखरपरीच्या वड्या. प्राया = परीच्या ]
साखर्या [ दह्या पहा ]
सांखवेल [ शंखिनीवल्ली = सांखवेल ]
साखी [ साक्ष्यं = साखी ]
सांग [ शंकुः = सांक = सांग ] एक हत्यार आहे.
सांगड १ [ संघाटः (लांकडाचा ताफा) = सांगाड = सांगड, सांघड ] सांगड म्हणजे काठ्या, भोपळे वगैरेंचा ताफा.
-२ [ संगति किंवा संगतं = सांगड ]
-३ [ संघटिः = सांघड = सांगड ]
-४ [ संघातः = सांगड ] एकत्र केलेल्या वस्तू,
-५ [ संघट्टिः = सांगड ] ( घड पहा )
सांगडें [ संकटम् = सांगडें ] अवघड.
सांगणी १ [ सम्+ गण् १० भाषणे ] उपदेश.
-२ [ संगणिका ] ( धातुकोश-सांग १ पहा )
सांगणे-पांघणें [ संख्यापनंप्रख्यापनं = सांघणेंपांघणें ] ( भा. इ. १८३४)
सागळ [(छगल) छागल = सागळ ] बकर्याचें मऊ कातडें. ( भा. इ. १८३३)
सांगातीं [ संघाते = सांगातीं ( vulger) ] तस्य संघाते = त्याच्या सांगातीं.
सांगोवांगी [ संख्याव्याख्या : संख्याव्याख्यम्=सांगोवांगी ] सांगण्यावरून व वाखाणण्यावरून.
सांघणें-सांगणें [ संख्यापनं = संघवण = सांघणें ] (भा. इ. १८३२)
साच (चा-ची-चें) [ शाश्वत = सासअ = साच (चा-ची-चें) (शाश्वत, निरंतर) सत्य=सच्च =साच (खरें)]
साचें [ शस्यं ] (सच्चा १ पहा)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पनाळें - पन्नगारि ( गरुड ) - पन्नगारिकं. खा इ
परखंडी - वांई शहराजवळ परखंदी, परखंडी नांवाचें एक लहानसें खेडें आहे. ह्याचें पूर्वीचें पुरातन नांव प्रगंडी. प्रचें पर व गचा ख होऊन परखंडी असें रूप झालें. प्रगंडी म्हणजे दुर्गप्राकारभितौ शूराणां उपवेशनस्थानम्. हा शब्द भारताच्या शांतिपर्वाच्या अडुसष्टाव्या अध्यायाच्या सत्तेताळिसाव्या श्लोकांत (कुंभकोण प्रत) आला आहे.
प्रगंडीः कारयेत्सम्यगाकाशजननीस्तदा । ह्या परखंडीस जुन्या कोटाचीं अवशेषें अद्याप आहेत. (भा. इ. १८३२ )
परचुली - प्रज (शेतकरी, प्रजा) - प्रजपल्ली = परचुली. खा म
परजपुर - प्रज (शेतकरी, प्रजा) - प्रजपुरं. खा म
परंदवडी - पारदवाटी (पारद गांवाच्या म्लेंछांचें गांव). मा
परसामळ - पलाश-पलाशामलिका-पळस आणि आंवळा. खा व
परसाळें - पर्शु (लोकनाम) - पर्शुपल्लं. खा म
परी - परीवाह (नाला ) - परीवाह = पर्या = परी. खा नि
पर्धाडी - प्रधा (दक्षकन्या) - प्रधावाटिका. खा म
पर्धाड़ें - प्रधा ( दक्षकन्या ) - प्रधावाटं. खा म
पलदी - पाणिनीय गणपाठाच्या चवथ्या अध्यायांत प्रस्थोत्तरपदपलधादिकेपधादण् ( ४-२-११० ) ह्या सूत्रांतील पलद्यादि गण दिला आहे. पलाद्यादि गण बहुवचनी आहे. त्यांतील पहिले तीन शब्द पलदी, परिषद् व रोमक हे आहेत. पैकीं पलदी हा शब्द ग्रामवाचक आहे. हा शब्द महाराष्ट्रांतील ग्रामांचा वाचक सध्यां सांपडतो. खानदेशांत पाचोरा स्टेशनाच्या पूर्वेस व जळगांवच्या दक्षिणेस पहुर गांवाजवळ पलधी, पालधी या नांवाचें गांव सध्यां आहे. हा शब्द पलधी पलदी ह्या पाणिनीय शब्दाचा अपभ्रंश दिसतो. आर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे आले असतां त्यांनीं जीं गांवें वसविलीं त्यांना उत्तरेकडील आपापल्या गांवांचीं नांवें दिली. जळगांवापासून चार पांच मैलांवर कुसुंबें म्हणून खेड़े आहे. त्याचें नांव कौशांबी ह्या शब्दाचा अपभ्रंश दिसतो. ह्यावरुन असें दिसतें कीं, कुसुंबें व पलधी हीं गांवें कौशांबी प्रांतांत राहणार्या आर्यांनीं वसविलीं. (भा. इ. १८३२ )
पळास - प्लक्ष - प्लक्षं. खा व
पष्टाणें - पृष्टहायन (हत्त्ती ) - पृष्टहायनं २ खा इ
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सस्त [ सस् to sleep ससस्ति अश्वकः (तै. संहिता ) = सस्त निजलाहे ]
सहज [ सहस् = सहज ] सहज म्हणजे शीघ्र. (भा. इ. १८३४)
सहज ( अव्यय) [ सहसा = सहजा. सहसि = सहजी.
सहजासहजी accidentally.
सहसा उपसृत्य coming accidentally ]
सहजात [ सहसा = सहजा = सहजात. त आगंतुक ] (भा. इ. १८३४)
सहजासहजीं [ सहसासहसि = सहजासहजीं ] ( भा. इ. १८३४)
सहणें व सोसणें [ सह्= सह = सहन = सणणें. सहस्य = सोस (सोसणें) ] सोसणें म्हणजे सहन करणें. ( भा. इ. १८३३)
सहरी [ शफरी = सहरी ( एक प्रकारचा मासा ) ]
सहल [ सहचार = सहआल = सहाल = सहल ] सहल म्हणजे मित्रांबरोबर फिरावयास जाणें.
सहाण [ शाणः = सहाण ]
सहेली [ सहेला (खेळगडीण) = सहेली ] female friend.
सळसळणें [ पल् गतौ = सळसळणें (सर्पादिकांचें, पाण्याचें) ] (ग्रंथमाला)
-सा [ -शी पहा ]
सा-शा [ सह् बलवान् असणें या धातूपासून साह् आणि साह् चा अपभ्रंश सा-शा. ]
नागरशा, प्रतापशा इत्यादि क्षत्रियवाचक शब्द यांतील शा-सा हा शब्द साह्-पाह् या वैदिक शब्दाचा अपभ्रंश आहे. परंतु
मोतीसा, बुलासा इत्यादि क्षत्रियेतर वाचक शब्द यांतील शा-सा हा शब्द साधु-साहु या शब्दाचा अपभ्रंश समजणें युक्त.
तुराषाह् ह्या वैदिक सामासिक शब्दांत जो साह् हा पोटशब्द येतो त्याचा अपभ्रंश गुजराथींत शा-सा असा होतो. ( महिकावतीची बखर पृ. ७८ )
साई [ स्वामिन्] (सांव पहा)
साउली [ शामा + ली = साँवली (छाया ) = साउली किंवा छाया + ली ( स्वार्थक) = साअली = सावली = साउली ] (ज्ञा. अ. ९ पृ. ६ )
सांकव [ संकनः (पूल) = सांकव, सांकू ] म. धा. २६
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सवडी [ समर्द्धि = सवडी, सवड ] मला सवड झालें म्हणजे = यदि मे समृद्धिः स्यात्.
सवंडी [ समर्द्धि = सवडी = सवड, सवंड ], competence सवडीनें कर्ज फेडूं म्हणजे समर्द्धि आली असतां कर्ज फेडूं.
सवत [ सपत्नी = सवत्ती = सवत ] (स. मं.)
सवता [ स्वायत्तः = सवता ( स्वतःच्या अधीन ) ] सवता सुभा म्हणजे स्वायत्त सुभा. स्वतंत्र पासून सतंत अपभ्रंश होतो.
सवतें-ता-ती [ स्वतंत्र = सवँत = सवत (ता-ती-तें) ] सचंतर असा हि अपभ्रंश सध्यां मराठीत होतो. सतंतर असें हि, रूप आढळतें व तें सचंतर हून प्राचीन आहे. ( भा. इ. १८३३ )
सवंदणी [ शुन्धनी ] ( सौंदणी पहा)
सवन [ स्वननं = सवन ] सवन म्हणजे गातांना स्वरावर जें स्वामित्व ठेवतात तें, स्वरस्वामित्व.
सवंय [ (पु.) समय (चाल, कायदा, संगति ) = सवंय ( स्त्री. ) ] (भा इ. १८३३)
सवरतो [ स्वरयति = सवरतो ] स्वर म्हणजे दोष काढणें
बोलतो सवरतो म्हणजे बोलतो आणि दोष काढतो. ( भा. इ. १८३५ )
सवशान [ शवशयनं = सवशान ( स्मशान ) ] हा शब्द गांवढे योजतात.
( झाडणें ) सँवाँरणें [ संमार्जन = सँवाँरअणँ = संवारणें = संवरणें ] ( भा. इ. १८३४)
सवाशीण, सवाष्ण १ [ संवासिनी ( a woman cohabiting with her husband ) = सवाशीण, सवाष्ण ]
-२ [ सुवासिनी = सवाष्ण ] (स. मं.)
सवें [ समता = सवआ = सवा; सवें सप्तमी एकवचन स्त्रीलिंग ] ( ज्ञा. अ. ९ )
संशयबिंशय [ संशयविशयः = संशयबिंशयः ] doubts and objections. सं च्या सादृश्यानें वि वर अनुस्वार.
संसार [ संसारमार्गः योनिद्वारे ( त्रिकांड शेषः ) ] संसार म्हणजे योनि, असा अर्थ संस्कृतांत आहे, तो च महाराष्ट्रांत मराठींत परंपरेनें रूढ आहे. (भा. इ. १८३६ )
ससेमिरा - सिंहासनद्वाचिंशतिकेच्या द्वितीयकथेंत हीं चार अक्षरें आलीं आहेत. हीं चार अक्षरें चार श्लोकांचीं प्रथमाक्षरें आहेत. कृतदोषाबद्दल जी चिंता लागते तीस मराठींत ससेमिरा म्हणतात.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
प
पाखरूण - प्रखर ( गाढव ) - प्रखरवनं. खा इ
पगराव - प्रग्रह (बंदीवान) - प्रग्रहकवहा. खा म
पंचक - पंचक ( रणक्षेत्र). खा नि
पंचिमाळें - पश्चिमपल्लं. खा नि
पंजाणें - पंचक ( रणक्षेत्र) - पंचकवनं. खा नि
पटावें - पट्टिका (रक्तलोध्र ). खा व
पट्टी - पट्टिका (रक्तलोध्र). खा व
पठाड - पृष्ठवाटं. खा नि
पडावद - पट्टि (लोकनाम) पट्ट्यावर्त. खा म
पंढरी - गांव व भोंवतालील शिवार ह्यांना पंढरी व काळी अशा संज्ञा महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत. गांवांतील घरठाणाची जेवढी जागा तेवढी पांढरी; व शेतें, कुरण वगैरे सर्व काळी. पंढरीस मूळची कोष्ट्यांची वस्ती दहा पांच घरांची होती, म्हणून तिला मुळीं पंढरी अथवा पांढरी म्हणत. जेथें सध्यां विठोबाचें देऊळ आहे तेथें पूर्वी शेतें होतीं. ह्या काळींचा जो देव त्याला काळ्या म्हणत. ह्याच काळ्याला सान्निध्यानें पंढरीचा राणा म्हणूं लागले. ही माहिती एका वारकर्याने दिलेली आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)
पणजी - पण्याजीवं = पणजी.
पण्याजीवं म्हणजे बाजार, बाजारगांव.
पणजी हें गोवेप्रांतांतील गांवाचें नांघ आहे.
पणास्वर - प्रणव - प्रणवेश्वर = पणास्वर. खा नि
पत्तन - पत्तन हा शब्द संस्कृत नाहीं, प्राकृत आहे. प्रस्थान ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश पट्टण, व त्याचा अपभ्रंश पत्तन असावा. पट्टण व पत्तन ही दोन्ही अपभ्रष्ट प्राकृत शब्द पुढें संस्कृतांत जसेचे तसे घेतले गेले, असें दिसतें. ( भा. इ. १८३२ )
पथराई - प्रस्तर - प्रस्तरावती. खा नि
पथराट - प्रस्तर - प्रस्तराट्ट: ४ खा नि
पथराळें - प्रस्तरपल्लं. खा नि
पथारें - प्रस्तर - प्रस्तरागारं. खा नि
पनाळी - पन्नगारि ( गरुड ) - पन्नगारिका २. खा
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सर्वजाण [ सर्वज्ञ ] (सुजाण पहा)
सरसर् [सरंसरं = सरसर्, झरझर्. सृ सरणें ]
सल [ शल्य (शरिरांत घुसलेली बाह्य वस्तु) = सळ, सल ( पोटांत ). ल्य ळ किंवा ल] ( भा. इ. १८३४)
सलग [ संलग्न = संलग्ग = सलग ] ( भा. इ. १८३५ )
सलगी १ [ संलग्नता = सलगी ]
-२ [ संलगना किंवा त्याहून उत्तम सहलगना. संलगना = सलगी ] संचा अनुस्वार मराठींत उडून जातो, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तं सं ताडयति-त्यास मारतो. षष्ठी किंवा तृतीया.
सलगी = संलग्ना किंवा सहलग्ना. (ज्ञा. अ. ९ पृ.३ )
सल्ला [ सम् + ली ] ( सनला पहा )
सवंग १ [ समर्घ = सवंग ]
-२ [ सम्यक् = सवंग. सम्यग् स्नेही = सवंग स्नेही. सम्यग् सूद्यमः = सवंग सौदा ] सवंग म्हणजे चांगला (लक्षणेनें वाईट)
-३ [ संस्कृत स्वयंग्राहम् ह्या शब्दाचें प्राकृत सअंगाहम् असें रूप होतें. ह्या सअंगाहं शब्दाचा मराठी संक्षेप सअंग, सवंग आहे. सवंग सौदा म्हणजे असा सौदा कीं, स्वतःच्या हातांचा उपयोग करून वाटेल तितका न्यावा; दमडीही खर्चावयाला नको. ( सरस्वतीमंदिर, श्रावण शके १८२६ )
सवंगडी १ [ सांगतिकः = सवंगडी ]
-२ [ सवयोगडक: ] ( सवंचोर पहा )
सवघड [ स्ववघटं = सवघड ] मूळ अर्थ बरेंच अवघड, नंतर अवघडच्या उलट.
सवंचोर [ सवयश्चोराः = सवंचोर thieves of the same age. सवयोगडकः = सवंगडी ]
सवड १ [ शमथुः = सवड ] शमथुः म्हणजे शांति. मला सवड नाहीं म्हणजे कामाच्या गर्दीमुळे शांति नाहीं.
-२ [ संपत्तिः ] ( संवड पहा)
-३ [ समर्द्धि ] (सवंडी पहा)
-४ [ समृद्धि ] (सवडी पहा)
संवड १ [ संपत्तिः = संवडी = संवड, सवड ]
कालस्य संपत्तिः = काळाची संवड.
-२ [ समृद्धि = सवड ] तुला सवड झाली म्हणजे पैसे दे = यदा ते समृद्धिः स्यात् तदा द्रव्यं प्रतिदेहि.
सवंड [ समर्द्घि ] (सवंडी पहा)
सवडि [ सपदि ( in a moment, instantly ) = सवडि ] लवडसवडि - जुनीं काव्यें.
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सरसः [ सर्वरसः = सरस.
सर्जरसः = सरस.
धूपः सर्वरसः सर्जरसः । ]
राळेसारख्या कातडीं वगैरेंपासून केलेल्या चिकास हि सादृश्यानें सरस म्हणतात.
सरसकट् [ सर्वसकृत्] (सरसगट् पहा )
सरसगट् [ सर्वसकृत् = सारँसकट् = सरसकट् = सरसकट्, सरसगट् ] सरसगट् म्हणजे सर्व एकाच वेळीं. सरसगट [ सर्वसकृत् = सरसगट ]
सरसर, सरसरां [ सरसरं = सरसर, सरसरा, सरासरा, सरसरां, सरांसारां ]
सरसा [सरसः = सरसा ] सरसा म्हणजे ताजा. दिवा सरसा करणें म्हणजे काजळी झाडून ताजा करणें.
सराई १ [श्रयी: सरई = सराई. श्री १ सेवायाम् ]
धर्मशाला, उतरण्याची जागा.
-२ [ श्राया = सराय, सराई ] श्रायः shelter पाणिनिः ३-३-२४.
सराटा १ [ श्रृंगाट: = सराटा ]
-२ [श्वदंष्टा = सराटा ]
सराय [ श्राया ] ( सराई २ पहा )
सराव १ [ स्त्रावः flowiug forth = सराव ]
-२ [ स्रु १ गतौ ] ( धातुकोश-सराव २ पहा)
सरांसरां [ सरसरम् ] ( सरसर पहा)
सरासरी [ सर्व + असर्व = सर्वासर्व, सर्वासर्वस्यभावः = सार्वोसार्वं. सार्वासार्विका = सरासरी ]
सर्जा [ सर्वजित् = सरजिअ = सरज्या, सर्जा ] सरज्या हा शब्द पोवाड्यांत शिवाजीला लावलेला असतो.
सर्जू [ सर्ज् प्रापणे ] व्यापारी. (धातुकोश-साट ३ पहा)
सर्दी [ छर्दिः ( आजार ) = सर्दी ] फारसी सर्दी पासून हि हा शब्द व्युत्पादितात. (भा. इ. १८३३ )
सर्पण १ [ चृप् १० संदीपने to kindle चर्पणं = सर्पण that which kindles.
-२ [ छृप् १० संदीपने. छर्पणं = सर्पण ] जळण.
-३ [ श्रपण ( शिजवणें ) = सरपण. श्रा २ पाके ] शिजविण्याला लागणारें लाकुडफाटें म्हणजे सरपण. सरपणाला म्हणजे शिजविण्याला लाकुडफाटें पाहिजे. असा प्रयोग होतो. त्यावरून लांकुडफाट्याला च सरपण म्हणूं लागले. (भा. इ. १८३३ )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
समुदें [ समुदितम्] (समदें ३ पहा)
समेट १ [ स्मिट् १० अनादरे. स्मेट = समेट ] ( धा. सा. श. )
-२ [ इ २ गतौ. समेत = समेट ] समेत म्हणजे एकमत. ( धा. सा. श. )
समैक [ सम्यक् = समैक ] excellent.
उ०- तरि तप जें कां समैक । तें हिं त्रिविध आइक ।
शारीर मानसीक । शब्दीक गा ॥ ज्ञा. १७-१९९
समोर [ मुखर = मोहर = मोर्ह = मोर. संमुखर = संमोहर = समोर्ह = समोर ] ( ग्रंथमाला )
सयसुमार [ स्मृतिस्मारः = सयसुमार ] दोन्ही शब्दांचा अर्थ स्मृति असा आहे.
सर [ सर: = सर ( माळ ) ]
० सर १ [ शील ] (० शीर पहा)
-२ [ ० इशतर = ० सअर = ० सर ]
(काल) कालिशतर = काळसर
(पीत) पीतलिशतर = पिवळसर.
सरकणें [ स्रेकनं = सरेकणं = सरकणें. स्रेक् गतिकर्मा ] ( भा. इ. १८३५ )
सरकार [ सर्वकारकः = सरकार. कृ ८ करणे ]
अष्टाध्यायी (उत्तरपदवृद्धौ सर्वंच ६-२-१०५)
सरज्या [ सर्वजित्] (सर्जा पहा)
सरड [ शरट = सरड ( डा-डी-डें ) ] (भा. इ. १८३२)
सरडा १ [ शरंड: = सरडा ]
-२ [ सृदाकुः = सरडा] पालीच्या जातीचा प्राणी.
सरता १ [ स्मर्यमाणः = सरता ] सरता संतांत = सत्सु स्मर्यमाणः
-२ [ स्मर्यमाणः = सरता ] हा शब्द संतनामावळींत येतो. केला सरता संतांत म्हणजे संतांत स्मरण करण्याजोगा केला. सरता कर्मणि कृदन्त आहे.
सरदी [ शर्धिः = सरदी. शृध् आर्द्रीभावे ]
सरपणा [ श्रपणं = सरपण (पंचतंत्र अंधकुब्जकथा ) ]
सरभरित [ सम्+ परि + मृ ] (धातुकोश-सरभर पहा)
सरमिसळ [ मिश्र् १० संपर्के. सर्वमिश्रं = सरमिसळ ] ( धा. सा. श. )
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सपासप् [ सर्पंसर्प ] (सपसप् २ पहा )
सपासप [ क्षिप्रंक्षिप्रं ] ( सपसप् १ पहा )
सपीट [ संपिष्टं = सपीट ] उत्तम बारीक दळलेलें.
सपील [ संपीलु ( संपूर्ण दूध पिणारें वासरूं इ. = सपील ) ] ज्ञानेश्वरी.
सप्पा [ संप्सा = सप्पा ( eating up) प्सा खाणें । तत् संप्साय शुद्धो भवति तें खाऊन टाकून शुद्ध होतो. ( बृहदारण्यक, पंचमोध्यायः चतुर्दश ब्राह्मण).
सपसप् १ [ क्षिप्रंक्षिप्रं = सिपसिप् = सपसप् ( जलद ) = झपझप्, सपासप, झपाझप ]
-२ [ सर्पंसर्पं = सपसप्, झपझप्, सपासप्, झपाझप्, सृप सरपटणें ]
सफेत [ श्वेत = सवेत = सपेत = सफेत ] सफेत हा फारशी शब्द संस्कृतांतून फारशी भाषांत गेलेला आहे. ( भा. इ. १८३४)
सवर [ सत्वहर = सव्वअर = सब्बार = सवार = सवर ] सबार उच्चार गांवढे करितात. (भा. इ. १८३२ )
संबळ १ [ शंबल ] ( सांबळ पहा)
-२ [ शंबुल = संबळ, सांबळ ] शंबुल म्हणजे प्रवाश्याच्या, सामानाची धोकटी.
सभोंवता [ सभ्रमतः ] (भोंवता पहा)
समई [ संदीपिका = समइइआ = समईआ = समई, समय ] दिवा. (भा. इ. १८३३)
समज [ सम् + बुध् ४ अवगमने. सम् + बुध् = संबुध = समुज = समज ] ( धातुकोश-समज ५ पहा)
समंजस [ समनुज्ञीप्सु agreeable, approved intelligent = समंजस agreeable intelligent ]
समजाव [ सम्+ आ + ज्ञापय ]
समदा-दी-दें [ समस्त = समदा-दी-दें ] entire.
समदें १ [ समुदित = समुदिअ = समुद = समद ( दा-दी-दें) ] समदें म्हणजे एकत्र गोळा केलेलें. सम् + उत् + इ = समुदि. (भा. इ. १८३३)
-२ [ समस्त = समत्त = समतें = समदें ] सर्व
[ समस्त = मस्त ] सर्व, पुष्कळ. (भा. इ. १८३२)
-३ [ समुदितम् total, aggregate = समुदें, समदें total, whole, all.
समधात [ समधातु = समधात ] त्याची प्रकृति समधात आहे = तस्य प्रकृतिः समधातुः (भा. इ. १८३४)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सनला [ सं + ली to cling. संलय: = सनला, संल्ला ] well powdered lime which adheres completely.
सनाटा १ [ (वैदिक) श्नथ् to do violence = सनाटा ] violent, enormous.
-२ [ सनाथः = सनाटा. नाथ् संपत्तिमान् होणें ] सनाटा म्हणजे संपन्न, बळकट.
-३ [ सनाथः ( powerful ) = सनाटा. संनाथः = सन्नाटा ]
सनोळख १ [ स ओळख व न ओळख = सनोळख = ओळखीचें किंवा नोळखीचें ] उ०- तीर्थ अतीर्थ हे भाष । उदकीं नाहीं सनोळख । माडगांवकर ज्ञानदेवी १८-५५९.
पाणी प्यावयाचें असल्यास तीर्थ, अतीर्थ ही ओळख किंवा नोळख विचारांत घ्यावयाची नसते.
-२ [ सना ancient + ओळख as if acquainted with anything from very old. ]
उ० - जे जग चि सनोळख । जगेंसी जुनाट सोयरिक । आप पर हे भाक । जाणणें नाहीं ।। माडगांवकर ज्ञानदेवी १३-३५८
सन्नाटा [ संनाथः ] ( सनाटा ३ पहा )
संप [ षप् समवाये ] (ग्रंथमाला)
सपक [ पच् १ पाके. संपक्व = सपक ] सं चा स मराठींत हमेश होतो. सपक म्हणजे अति शिजविल्यानें बेचव झालेला. ( धा. सा. श.)
संपणें [ समापन = संपन्न = संपणँ = संपणें ] (ग्रंथमाला)
सपाट १ [ समप्रस्थ (horizontal) = सपाट ]
-२ [ सपाट (समभूभाग) = सपाट ]
-३ [ सत्पथः = सपाट (रस्ता) (रत्थ्या ) ]
सपाटा [ पत् १० गतौ. संपातः rush = सपाटा, झपाटा ] rush at. सं चा मराठींत स होतो. प्रावृट्संपातः = पाउसाचा सपाटा. रोगसंपातः = रोगाचा सपाटा. (धा. सा. श. )
सपाटून १ [ सम्+ पाट् १० अवयवे ] ( धातुकोश-सपाट २ पहा)
-२ [ सम्+ पत्र (नामधातु ) ] (धातुकोश-सपाट १ पहा)
-३[ पत्र ११. सपत्रं = सपाट (अतिव्यथने) सपाटून खातो म्हणजे अति खातो. ( अष्टाध्यायी-५-४-६१ ) (धा. सा. श.)