Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

वाड १ [ वड्र= वाड ] पुष्कळ. ( भा. इ. १८३३)

-२ [ बहुत ह्या अर्थी वाड शब्द ग्राम्य भाषेंत सध्यां योजतात. जसें वाड वेळ. वृद्ध = वढ्ढ = वाढ = वाड. ] ( ग्रंथमाला)

वांड १ [ वंडा (जारिणी) = वांड]

-२ (वंडा unchaste woman = वांड, वांडकी ]

-३ [ वाड् विभाजने. वंडति. वांड = विभक्त राहणारा, बेपर्वाईनें असणारा ] (ग्रंथमाला)

-४ [ वंड (पुंश्चली ) = वांड] (भा. इ. १८३३)

वांडकी [वंडा ] (वांड २ पहा)

वांडकीच ( चा-ची-चें ) [ वान्धकिनेय = वांडकिच (चा-ची-चें) ] छिनाल बाईचें पोर. (भा. इ. १८३६)

वाडगें [ वाटक = वाडअ = वाडा. वाटकक = वाडगअ = वाडगा-गी-गें ] (ग्रंथमाला)

वाढ [ उपपादय = उववाडअ = वाड = वाढ ] अन्नं उपपादय = अन्न वाढ. (भा. इ. १८३२)

वाढदिवस [ वर्धमानदिवस ] (वाढवीस १ पहा)

वाढवणें [ (वर्ध) वर्धापन = वड्रढावण = वाढावणें = वाढवणें. वर्ध् कापणें, तोडणें ] तुटणें, तूट येणें. (भा. इ. १८३३)

वाढवीस १ [ वर्धमान दिवस = वाढद्विस = वाढवीस, वाढदिवस. वर्धमानदिवस (नाळ कापण्याचा दिवस) ] (भा. इ. १८३६)

-२ [ वृद्धदिवस = वड्ढद्वीस = वाढवीस ] वृद्ध-द्धा म्हणजे मूल किंवा मुलगी त्याचा दिवस तो वाढवीस. (भा. इ. १८३३)

वाण १ [ उपायन ] (वायन पहा)

-२ [ अपायन = वाअण = वाण (न्यूनता)
उपायन = वाअण = वाण (अधिकता, बक्षीस) ] वाण म्हणजे कमतरता व वाण म्हणजे बक्षीस असे दोन भिन्न शब्द मराठींत आहेत.

-३ [ पाणः (trade ) = वाण ] वाणजिन्नस म्हणजे विकण्याचा जिन्नस. वणिज्, शब्दाशीं संबंध नाहीं.

वाणसी [ पण्यस्त्री = वाणसी ] वेश्या.

वाणा [ दीनवर्णः = दीनवाणा. दीनवर्ण = दीनवाणें.
वाण गाईचा = गोः वर्णः ( जातिः ) ]

वाणी [ मन् ४ मनने ] देवावाणी चालतो = देवमानी चलति
माणसावाणी बोलतो = मनुष्यमानी वक्ति
येथें देवावाणी, माणसावाणी हे समास आहेत. देवं आत्मानें मन्यमानः देवमानी. ( धा. सा. श. )

तोरणमाळ - तोरणमालः खा प

तोरणमाळघाट - तोरणमालघाटः खा प

तोरणें - तौरणं ( तोरणवृक्षावरून ) मा

तोरदें - तुवरीपद्रं. खा व

तोरवाडे - तुवरीवाटकं. खा व

तोरी - तुर्या. खा न

त्रिशूल - त्रि - त्रिशूलकं. खा नि

 

थवें - स्तंबकं (गवताचा थोंब) - स्तंबकं. खा व

थाळनेर - स्थालि - स्थालिनीवरं. खा नि

थिकवी - तिक (तिककितव, व्यक्तिनाम ) - तिकवहा. खा म

थिटेघर - तीर्थगृहं - थिटेघर. ( ह्याहून उत्तम ) तीर्थंकरं (स्थानं ) = थिटेघर. shows that बुद्ध लोकांची या प्रांतांत वस्ती होती.

थुगांव - स्तूपग्रामं (थूअगांव = थूगांव. बौद्धांचा स्तूप ज्या गांवांत आहे तो गांव). मा

थुटी - त्रुटि, त्रोटि. खा व

थुरटी - स्थूर - स्थूरवाटिका. खा नि

थूगांव - स्तूपग्राम = थूअगावं = थूगांव. (भा. इ. १८३३)

थेराळें - स्थविर (बौद्धवृद्ध) - स्थविरपल्लं खा म

थोरगव्हाण - स्थूर - स्थूरगवादनी. २ खा नि

थोराण - स्थूरवनं (मोठ्या रानांतील गांव). मा

 


दगडी - दृषदू (दगड) - दृषद्. खा नि

दडलाणें - दर (दरी ) - दरलयनं. खा नि

दंडाराजपुरी - दंडक = दण्डअ = दंडा (राजपुरी). दंडा प्रांतांतील राजपुरी. (भा. इ. १८३२ )

दताणें - दत्त (देव) - दत्तवनं. खा म

दताळें - दत्त (देव) - दत्तपल्लं. खा म

दवापिंपरी - दर्व (राक्षसनाम). दर्विकपिप्पली. खा म

वाचून, वांचून १ [वृच्, वृज्, वृंज्] ( धातुकोश-वांच ३ पहा)

-२ [ वर्ज् १० वर्जने. वर्जयित्वा ] (धातुकोश-वांच २ पहा)

वांचून (शिवाय) [ वचणें म्हणजे जाणें. न वचणें म्हणजे न जाणें. वाचणें व नवचणें हे दोन्ही शब्द ज्ञानेश्वरकालीन आहेत. वचणें ह्याचें प्रयोजक रूप वाचणें. वाचणें म्हणजे घालवणें. वाचून = घालवून. तुजवाचून म्हणजे तुला घालवून, सोडून, तुझ्या खेरीज. (ग्रंथमाला)

वाजट [ वादरत disputations = वाजट ] भांडखोर, वादी, विवादांत कुशल.
उ० - हें जाणों मृत्यु रागिठा । सिंहाडेयाचा दरकुटा ।
परि काइ वाजटां । पूरिजतसे ॥ ज्ञा. १३-६०

वाजणें, वाजे [ वाशृ शब्दे । वाश्यते = वास्सए = वासे = वाजे ] तुंडं वाश्यते = तोंड वाजे. (भा. इ. १८३३)

वाजवणें [वी (विणें) वाययति = वाजवतो ] वाजवा जा म्हणजे स्त्रीसंग करा असा प्रयोग मराठींत करतात. येथें वाजवा म्हणजे विण्याची क्रिया होईल असें विधुवनाचें कृत्य करा. ( धा. सा. श. )

वाजवी [ कुत्सितं बहु भाषते सः वाचालः वाचाटः सभ्यग्बहु भाषते सः वाग्मी. वाग्मी (वाज् + मिन् )= वाजवी. वाग्मी = वाचवी = वाजवी. ग = ज ] वाजवी बोलतो म्हणजे वाग्मी भाषते.

वांझ करटोली [ वंध्या कर्कोटक वल्ली = वांझ करटोली ] (भा. इ. १८३७)

वाट १ [ वार्ता = वाट ] पोटापाण्याची व्यवस्था.

-२ [ पथिवस्तुनि वाटः स्यात् ( त्रि. शे. ) ] ( ग्रंथमाला )

वांटा, वांटणें [ वट्, वंट् विभाजने ] (ग्रंथमाला)

वाटाणा [ वटधान्य = वटदाण = वटआण = वटाण = वटाण = वाटाणा. वट = वाटोळी गोळी ] (भा. इ. १८३३)

वाटी १ [ (वैदिक ) अष्ठीवत् = अठ्ठि = आठि = वाटी (घुडघ्याची ) ] (भा. इ. १८३४)

-२ [ वर्तिका = वट्टिआ = वटी, वाटी (चंदनाची ) ] (भा. इ. १८३२)

वाटेचें [ पाथेयं = वाटेचें ] किंचित् पाथेयं अत्तुं दत्त = कांहीं वाटेचें खायला द्या. वाटेचें म्हणजे वाटेंत खाण्याचा पदार्थ.

वळंबा [ वलंबः perpendicular = वळंबा, ओळंबा ] वळी १ [वली = वळी ] ( स. मं. )

-२ [ वलभी = वळी, वळचण ] घराच्या वळी किंवा वळचणी गळताहेत.

वाइणें [ वाणें पहा ]

वाईक [ पातिक = वाईक. आस्थेवाईक = आस्थापातिक.
नातेवाईक = ज्ञातिपातिक ]

वाईट [ पापिष्ट = पाविट्ट = वाइट्ट = वाईट ] तो वाईट माणूस आहे = स पापिष्ट: मनुष्यः

वाकडें तिकडें [ वक्रं तिर्यक् = वांकडें तिकडें ( पंचतंत्र- लुघुपतनकाची कथा ) ]

वांकणे [ वंक् १ गतौ वंकनं = वांकणें ] वांकून नमस्कार करावा म्हणजे खालीं गती करून नमस्कार करावा. ( धा. सा. श. )

वांकिस [ वार्क्ष = वाँकस. वृक्षादनी = वार्क्षं ]

वाका [ व्याख्या = वाखा = वाका ] आकारांत म्हणून साम्यानें पुल्लिंगी. फारसी वाका शब्द निराळा.

वांकुडा १ [ वक्रट = वांकुड ( डा-डी-डें ) ] (ज्ञा. अ. ९ पृ. ८)

-२ [ वाह् १ प्रयत्ने = वागणें. ह = घ = ग. सिंह = सिंघ = सिंग ] ( धा. सा. श. )

-३ [ वगि गतौ । धातुपाठे भ्वादिः । वग = वागणें म्हणजे चालणें ] तो कसा वागतो म्हणजे चालतो. (भा. इ. १८३४)

वागणें [ वगि गतौ. वगनं = वागणें ] तो कसा वागतो ? = सः कीदृशः वगतिं ( धा. सा. श.)

वागूळ [ वल्गुली ] ( वाघूळ पहा)

वांगें [ वातिग = वांगें ] egg-plant

-२ [ वार्तागं = वाआंगं = वांगें ]

-३ [ वातिंगणं = वाइंगण = वांगें, वंगण ]

वाघरूं [ व्याघ्रतर ] ( रूं पहा)

वाघाटी [ व्याघात-व्याघातिका (कौटिल्य) = वाघाटी ] a shrub.

वाघांटी [ व्याघ्राटक = वाघांटी ] (भा. इ. १८३४)

वाघाड [ व्याघ्राढ्यः ] (उंटाड पहा)

वाघूळ [ वल्गुली (जैनग्रंथ) = वागुळ, वाघूळ ]

वांचवणें [ वंच् १० प्रलंभने. वंचयति (वर्जयति) =वांचवतो ] व्ययं वंचयति = खर्च वांचवतो. ( धा. सा. श.)

तिटाणें - तिष्टी ( तेवरी ) तिष्टीवनं. खा व

तितरी - तित्तिरि (तितर) - तित्तिरिका. खा इ

तितिवरी - टिट्टिभावरी ( वरी = नदी ). खा न

तिधारें - त्रिधारक. खा व

तिबेट - त्रिविष्टप = तिबिट्टअ = तिबेट. (भा. इ. १८३४)

तिरखेडें - तीर - तीरखेटं. खा नि

तिरपोळें - तृपा - तृपापल्लं. खा व

तिरुखी - त्रि - त्रिवृक्षिका. खा नि

तिरुसलें - त्रि - त्रिशूलकं. खा नि

तिर्‍हळ - तीर - तीरपल्लं. २ खा नि

तिलवण - तिलपर्णिका. खा व

तिलवण - तीरवन = तिलवण (भट्टीकाव्य)

तिलाली - तिल - तिलकपल्ली. खा व

तिलासर - तिल - तिलकसरस्. खा व

तिवडी - सं. प्रा. त्रिकूट. चिपळूण. (शि. ता.)

तिवर ( रा-री-रें ) - तिमिर (dark ) = तिवर (रा-री-रें). North तिवरा घाट = North dark घाट in the सह्याद्रीs.

तिवरा-जं - तिमिरा (नदीनाम) तिमिरा-जं. खा म

तिवरें - सं. प्रा. त्रिकूट, पुणें, रत्नागिरी, ठाणें, कुलाबा. ( शि. ता.)

तिसगांव - तिष्याग्रामं. ३ खा व

तिसी - तिष्या. खा व

तुंगण - तुंगीवनं. खा व

तुंगारली - तुंगद्रिपल्ली (तुंग नांवाच्या पर्वतावरील गांव) मा

तुंगेरी -तुंगगिरि = तुंगइरि = तुंगेरी. (भा. इ. १८३३)

तुळसें - तुलसी - तुलसीकं. २ खा व

तूरखेडें - तुवरी - तुवरीखेटं. खा व

तेर - } सं. प्रा. तेरवाटक (शि. ता.)
तेरगांव - }
तेरडी - }
तेरवाड - }

तोंडापुर - तुंडिकापुरं २ खा व

तोंदें - तुंड (देव) (लोकनाम ) - तुंड. खा म

तोंदें - तुंडिका. खा व

तोरखेडें - तुवरीखेटं. २ खा व

तोरणमाळ - तोरणमालः खा प

वलगणें [ अवलगनं = वलगणँ = वलगणें ]
“ वलग्गए दिठ्ठी ” हेमचंद्र-काव्यानुशासन पृ. २४६ पं. ४ निर्णयसागर. (भा. इ. १८३२)

वलुतें [ प्लेव to serve प्लेवितं ] (वलुता पहा)

वल्लभ [ परिरंभक embracer, lower = वल्लभ.
पारिरंभ्यं = वालभ love ]

वल्हे ! [ भलं ! = वल्हे ! भले ! ] Molesworth म्हणतो त्याप्रमाणें लघुशीं कांहीं संबंध नाहीं.

वल्हें [ वहित्रं, वाहित्रं ]

वसकन् १ [ वक्ष् १ रोपे = वस ] वसकन् म्हणजे angrily ( धातुकोश-वसक २ पहा, धा. सा. श.)

-२ [ वष् हिंसायाम् ] वसकन् आंगावर आला म्हणजे क्रूरपणें हिंसा करण्या करितां आंगावर आला. (धा. सा. श.)

वसतीचें घर [ वासतेयं = वसतिज्जं = वसतीच (चा-ची-चें) ]

वसवसणें [ वश् २ कांतौ, इच्छायाम् द्विरुक्तीनें वशवश = वसवस ] खायला वसवसतो आहे म्हणजे अतिशय इच्छा करीत आहे. ( धा. सा. श. )

वसू [ वृषभः = वसहो = वसू ] bull.

वहान [ वहनं = वहान ]

वहाळ [ अवहालिका ] ( वाहाळ पहा)

वहाळी ( अवहालिका a bound hedge, wall = वहाळी ] a hedge. वहाळीनें जा go along the hedge. ( वाहाळ पहा)

वहिनी [ भगिनी ] (बहिण पहा)

वहिल [ व्यवहित + ल = विअहिअ + ल = विहिअल = विहिल = वहिल ( ला-ली-लें) = वायल ( ला-ली-लें) ] वायल, वहिल म्हणजे पृथक्, निराळें, तुटक. (भा. इ. १८३३)

वळगणें [ अवलग्न = ओळगण = ओळंगणें = वळगणें ] वेली वगैरेंचें वर चढणें. (ग्रंथमाला)

वळचण १ [ वलभी ] (वळी पहा)

-२ [वलीकस्थानिका = वळीयचाणी = वळचाण = वळचण् ]

-३ [ वलभीस्थान = वलइचाण = वळीचाण = वळचाण = वळचण ] वळचाण असा उच्चार गांवडे अजून करतात. ( भा. इ. १८३२ )

वळणें [ वृत् = वर्तय्= वळ ] हस्तवर्त वर्तपति = हातानें गोळी वळतो. गोवरी वळतो = गोपुरीपं वर्तयति. (भा. इ. १८३६)

तळवें - तलवहं. खा नि

तळोदें - तलपद्रं. = तळोदें. ३ खा नि

ताजखेडें - तार्य ( तरीचें गांव)-तार्यखेटं. २ खा नि

ताजदिनवली - मुसुलमानी नांव खा प

ताजपुरी - तार्य (तरीचें गांव). खा नि

ताजें - मा

ताडगें - ताड - ताडकं. खा व

तांडवें - तांड (ऋषिनाम) - तांडवहं. खा नि

ताडशिंगी - ताड - ताडशृंगिका. खा व

तांडें - ताड - ताडकं २ खा व

तांदळज तंडुल - तंडुलीयं. खा व

तांदळवाडी - तंडुल. ४ ख व

तांदळी - तंडुल - तंडुलिका. खा व

तापी - तपती. खा न

तापीखडकलें - तापी ( नदीनाम ) - तपती - तापीकटकपल्लं. खा म
तांबोरबारी ताम्रपुरद्वारिका. खा प (मूग पहा)

तांबोळे - ताम्रा ( मंज़िष्ठ) - ताम्रालयं ३ खा व

तामगव्हाण - ताम्रा (मंजिष्ठ) - ताम्रागवादनी. खा व

तमथरें - ताम्रस्तरं. खा नि

तामसवाडी - तमसा (नदीनाम) - तमसावाटिका. ५ खा म

तामसा - ( Tapsa) तमसा नामनदीविशेष:

तारखेड़ें - तारा ( स्त्रीनाम ) - ताराखेटं. ३ खा म

तारापुर - तारा ( स्त्रीनाम ) - तारापुरं.

तावखेडें - तापी (नदीनाम) तपती. - तापीखेटं. २ खा म

तांवसा - तमसा = तावंसा = तांवसा. ही नदी ठाणें जिल्ह्यांत आहे. तमसा ह्या नांवाच्या नद्या उत्तर हिंदुस्तानांतही आहेत.

तावसें - तापी (नदीनाम) तपती - तापीकर्ष. २ खा म

ताहरावाद - मुसुलमानीनांव. खा

तिखी - तिक्तका (किराईत). २ खा व

तिखोरें - त्रि - त्रिकुहरकं. खा नि

तिंघरी - त्रिगर्त (देशलोकनाम ) - त्रिगर्ता. २ खा म

तिंघरें - त्रिगर्त (देशलोकनाम ) - त्रिगर्त. ५ खा म

तिघोरें - त्रिगर्त (देशलोकनाम)- त्रिगर्त. खा म

वरवर १ [ परिपरि = वरवर. परेर्वर्जने । ] देशांत वरवर पाऊस पडला म्हणजे देश वर्जून पाऊस पडला, देशांत तुरळक पाऊस पडला.

-२ [ परि परि कृ, रट्, हस् etc = वर वर करणें, रडणें, हसणें ] to do, cry, laugh superficially.

वर वर [ परे र्वर्जने (८-१-५ पाणिनि ) ] परि परि त्रिगर्तेभ्यः वृष्टो देवः म्हणजे त्रिगर्ताला सोडून वर वर पाऊस पडला. वर वर बोलणें म्हणजे मुख्य मुद्द्याला सोडून वर्जून बोलणें. येथें वर वर याचा अर्थ वर्जून असा आहे.

वरात १ [ व्रात, व्रातिः = वरात ] व्रात, व्रातिः म्हणजे जनसमूह.

-२ [ पर्याप्ति end, completion = वराती = वरात ] लग्नाची वरात completion ceremony of marriage. हुंडीची वरात honouring a हुंडी.

वरिचिल [ उपरि + चि = वरिचिल, वरचील ] sitting above.

वरिचील [ उपरि + ची ]

वरि वरि [ उपर्यध्यधसः सामीप्ये ( ८-१-७ पाणिनि ) उपरि = वरि] उपरि उपरि ग्रामं = गांवा जवळ जवळ.
वरि वरि म्हणजे अति जवळ.
वरि वरि हा शब्द तुकाराम योजतो.

वरील [ अपरस्थ = अवरिल (जुन्नर शिलालेख ) = वरील = वरलें, ला, ली ] (ग्रंथमाला)

वर्चष्मा [ वर्चस्मन्] (वर्चस्मा पहा )

वर्चस्मा [ वर्चस्मन् = वर्चष्मा, वर्चस्मा ] वरचढपणा.

वर्चस्व [ हा शब्द संस्कृत वर्चस्व या शब्दापासून निघाला आहे. वर्चस्त्व = वर्चस्व ] (भा. इ. १८३३)

वर्म १ [ मर्मन् = वर्म ]
स मे मर्म क्राथयति = तो माझें वर्म काढतो. क्राथू= काढ म्हणजे हणणें. स मे मर्माण कर्षति = तो माझीं वर्मे काढतो. कृष् = काढ म्हणजे फरफटून ओढणें. (भा. इ. १८३६ )

-२ [ मर्मन् = वर्म, वरम ] वर्मी जखम = मर्मणि यक्ष्मा.

वर्‍या [ वरका = वरआ = वार्‍या (हेमचंद्र) ] (ग्रंथमाला)

वर्षअखेर [ वर्षाक्षरी ] ( अखेर पहा)

वर्‍हाड - नवर्‍या मुलाबरोबर लगिनघरीं जी मंडळी जाते तिला वर्‍हाड म्हणतात. वर + हाट = वरहाट = वरहाड = वर्‍हाड (नवर्‍या मुलाचा बाजार) (ग्रंथमाला)

वरकड १ [ परिकरः retinue, servants, subordinates = वरकड = ( लोक इ. इ.)]

-२ [ परिकथा fiction = वरकड ] वरकड बोलणीं काय कामाचीं what's the use of fictitious talk.

-३ [ प्राकृत = पराकड = वराकड, वरकड ] (बाणहर्षचरित) प्राकृतप्रमदेव प्रारोदीत् = वरकड स्त्रियांप्रमाणें फार रडली. प्र = फार. (भा. इ. १८३५)

वरख [ परिष्कार: ornament = वरख ] वरखाची बांगडी म्हणजे ornamental बांगडी. साधी बांगडी आणि अलंकाराची बांगडी ती वरखाची बांगडी. परिष्कारीया = वरखाची.

वरचट [ परिशिष्ट = वरचट ] बाकी.
वरचट वस्तू विकून टाकल्या remaining things were sold off.

वरचढ [ वर्पिष्ट = वरचिढ = वरचढ. को वो वर्षिष्ट आ नरो (१-८-३७-६ ऋग्वेद )] वर्षिष्ठ म्हणजे अति उंच.

वरचील [ उपरि + चि ]

वरताळ [ परितालः = वरताळा ]

वरदान [ परिदानं restoration of a deposil = वरदान ] हें वरदान द्यावें मज.

वरदी [ परिदेयः = वरदी ] trusted, favoured. वरधारा [ वृद्धदारक = वरधावा (वनस्पति) ]

वरघावा १ [परिघाय: (लवाजिमा, स्वारी) = वरधावा ( retinue ) ] वराचा वरधावा म्हणजे नवरदेवाची स्वारी.

-२ [ परिधाव् to pursue ] लग्नांत वरधावा म्हणून एक प्रसंग असतो. त्यांत नवर्‍याचा pursuit. नवरीकडील माणसें करतात.

वरपंकी [ उपरिपांक्तिकः = वरपंकी ]

वरपणें [ वल्भ् १ भोजने. वल्भ् = वरपणें, ओरपणें व = व, ओ. ल = र. भ = प ] (धा. सा. श.)

वरपास [ परिपार्श्वे = वरपास ] वस्तू, वरपास कोठें असली तर सांपडेल.

वरवडणें [ वोरबडणें पहा ]

वरम [ मर्मन्] ( वर्म पहा )

वरमाय [ वरमातृ = वरमाअ = वरमाय ] (स. मं.)

वरवंटा १ [ परिवंटनं ] (धातुकोश-वरवंट २ पहा)

-२ [ परिपंथ: ] ( धातुकोश-वरवंट १ पहा)

-३ [ वरीवृंतन = वरवंटा (Continuously rolling about ) वृन्त् धातूचें अभ्यस्त रूप आहे.

वडप [ वर्षापात = वडप (ज्ञानेश्वर) ] fall of rain, rainfall.

वंडर wander [ वठ् वंठति एकचर्यायां to wander alone. वंठर wanderer = to wander. wander हा शब्द वंठर या संस्कृत शब्दाचा सहोदर आहे. ]

वडा १ [ वटक = वडा (भक्ष्यविशेष) ] (भा. इ. १८३५)

-२ [ वटक: पिष्टपूरःस्यात् (त्रि. शे. ) ] ( ग्रंथमाला)
वडीलधारें [ { वृद्धस्य इव धारा ( सादृश्यं ) यस्य } वृद्धधारं = वडीलधारें ]

वणवा [ वनवह्निः ] (ज्ञा. अ. ९ पृ. १७१ )

वाणिज १ [ वणिज् (कृ ), वाणिज्यं ( कृ) ]

वाणिज करणें [ वणिजकृ to trade = वणिजकरणें किंवा वाणिज्यंकृ = वणिज करणें. वाणिज्य या भाववाचकाचें मराठी वणिज. ]

वणिजें [ वाणिज्यं = वणिजें ]

वदन्ता [ उदन्ता = वदन्ता (बातमी ) ] उदन्ता म्हणजे बातमी. (भा. इ. १८३७)

वनसं [ वरकश्वसा = वरअससा = वअअंस = वनस = वनसं ] नवर्‍याची बहीण. (स. मं.)

वन्सं [ पतिश्वसा = वइससा = वइंसा = वयन्स = वन्सं ] अनुनासिक आगंतुक. मराठींत असा आगन्तुक अनुनासिक अनेक शब्दांत येतो. शिंपी, कदांचित्, तुंप, मंग, (vulgar), समुंदर इ. इ. इ. (भा. इ. १८३३)

वयिल [ व्यवहित + ल = वहिल ( ला-ली-लें), वयिल, वायल, वायिल, वाहिल ] seperate

वर १ [ त्या वर = तत् परि after, beyond that, over and above that ]

-२ [ परि (वृक्षं परि against the tree) = वर, वरि ] सैन्या वर = सैन्यं परि against army.

-३ [ परम् = वर ] तस्मात् परं न अब्रुवम् = त्वा वर मी बोललों नाहीं.

-४ [ द्रव्यं परि on account of money = द्रव्या वर उड्या मारतो ]

-५ [ शतात् परा = शें वर, शंभरा वर. सहस्वात् परा = हजारा वर. शंभरा व हजारा या पंचम्या आहेत ]