Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पिलकोट - पीलु (हत्ती) - पीलुकोट्टं. खा इ
पिलखेडें - पीलु (हुत्ती ). २ खा इ
पिलनोड - पीलुनी (मूर्वा) - पीलुनीवाटं. खा इ
पिलवाण - पीलु (हत्ती) - पीलुवाहनं. खा इ
पिसावर - पिशाच्च (लोकनाम) - पिशाच्चपुरं. खा म
पिसोर - पिश ( हरिण ) - पिशपुरं. खा इ
पिसोळवाडी - पिशि ( हरिण) - पिशपुरवाटिका. खा इ
पिसोळी बारीघाट - पिशपल्ली द्वारिका घाटः. खा प
पिळादें - पीलु (हत्ती) - पीलुकापद्रं. २ खा इ
पिळोदें - पीलु (हत्ती ) - पीलुपद्रं. २ खा इ
पुणा - सं. प्रा. पूनक. बडोदा, सुरत ( शि. ता. )
पुणें - पूर्णक (स्वर्णचूडपक्षी चार्स) - पूर्णकं (महाराष्ट्राचा वसाहतकाल पृ. ९५)
पुनखेडें - पूर्णक (स्वर्णचूड पक्षी चार्स)- पूर्णक खेटं. खा इ
पुनगांव - पूर्णक (स्वर्णचूड पक्षी चार्स) - पूर्णकग्रामं. ३ खा इ
पुनवडी - सं. प्रा. पूनक. ( शि. ता.)
पुनवळी - सं. प्रा. पूनक. ,,
पुनवळें - ,, ,,
पुनागावी - पुन्नागवहा. खा व
पुर - पुरं. खा नि
पुरी - पुरी. खा नि
पुरी - सं. प्रा. पुरी. नाशिक, सोलापूर. खा. ( शि. ता. )
पुसनद - पूषणा (स्कंदमाता) - पूषणापद्रं. खा म
पुसाणें - पुष्यवनं (झाडावरून). मा
पूर्णी - पूर्णा. खा न
पेडका - पेटिका ( सागरगोटी ). खा व
पेडगांव - पेटिका (सागरगोटी ) - पेटिकाग्रामं. खा व
पेडलें - पेटिकापल्लं. खा व
पेंढराणें - पिंडार (लोकनाम) - पिंडारवनं. खा म
पेढणें, पेढी, पेढें - पीठ = पीढ = पेढ = पेढें (ग्रामविशेष). बसावयाचा ओबडधोबड पाट. पठिका = पीढिआ = पेढी = पैसे देण्याघेण्याचें स्थान. पेढ शब्दाचें र्हस्व रूप पेढण - पेढणें = पेंढणें (ग्रामविशेष). (ग्रंथमाला)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सारीगम [ स्वरग्राम = सारगाम = सारीगम.
सा + री + ग + म = सारीगम ]
सारीपाट १ [ शारीपट्ट: = सारीपाट ]
-२ [ शारिपट्ट: = सारीपाट ]
सारूं ( गुजराथी ) [ चारु = सारूं ]
साल [ शल्कं = साल ]
-२ [ शल्क (नपुंसक) = साल (स्त्री) ] झाडाची त्वचा. ( भा. इ. १८३४)
सालई [ सल्लकी = सालई ]
सालवन [ शालिपर्णी = सालवन (वनस्पति) ] (भा. इ. १८३४)
साला-ली-लें [ श्यालक = सालअ = साला-ली-लें ] (स. मं.)
साल्या [श्यालिक = सालिअ = साल्या ] बायकोचा भाऊ, बहिणीचा नवरा. (स. मं.)
सांव [ स्वामिन् = सावी = सांव, सांई ]
साव म्हणजे स्वामी, राजा.
साव = साऊ = साहू
औरंगझेबानें शिवाजीच्या नातवाला साव, साहू म्हटलें त्यांत विशेष कांहींच नव्हतें. साव, साहू या शब्दांचा अर्थ राजा असा मराठींत होता च.
सावकास [ स्वावकाश = सावकास ] सावकास म्हणजे स्वत:ला बनेल तसें, स्वेच्छेनें, मंद.
सावध १ [सावधि (अवधि = अवधान) = सावध]
-२ [ समवहित greatly attentive = सावध ] very attentive.
सांवरणें [ वृ ९ संभक्तौ. संवर्य (आच्छादणें) = सांवरणें ] पदर सांवरणें = प्रदरसंवर्यणं ] (धा. सा. श.)
सांवरासांवर [ सम् + अंबर्यति ] (धातुकोश-सांवर ५ पहा)
सांवरी [ शाल्मली = सांवरी ] हा वृक्ष निराळा खालच्याहून
सांवरी [ शंबरी = सांबरी = सांवरीं ]
(दोन्ही शब्द-भा. इ. १८३४)
सावली [ छाया ] (सांवली पहा)
सांवली [श्यामलिका = सांवली
छाया = सावली (स्वार्थ ल) ]
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पिटापुर - सं. प्रा. पिष्टपुर. सोलापूर. ( शि. ता. प.)
पिटेवाडी - सं. प्रा. पिष्टपुर, हैदराबाद ( शि. ता. प. )
पिठोर - सं. प्रा. पिष्टपुर. रेवाकांठा. (शि. ता. प.)
पिंपरखेडें - पीपरखेटं. खा व
पिंपरडें - पिंपर + वाट = पिंपरवाड = पिंपरड = पिंपर्डे. (ग्रंथमाला)
पिंपरडें - पिप्पल ( पीपरिका ) - पीपरवाटं. खा व
पिंपरपाडा - पिप्पल ( पीपरिका). खा व
पिपराड - पिप्पल ( पीपरिका) - पीपरवाटं खा व
पिंपराणी - पिप्पल ( पीपरिका). खा व
पिंपराळ - पिप्पल. खा व
पिंपराळें - पिप्पल (पीपरिका). ३ खा व
पिंपरी - पिप्पली ( ग्रामं ). मा
पिंपरी - पिप्पल ( पीपरिका) - पीपरिका. २७ खा व
पिंपरी पिंपळगांव - पिप्पल (पीपरिका). खा व
पिंपरुंड - पिप्पल ( पीपरिका) - पीपरवाटं. खा व
पिंपळ - पिप्पल ,, खा व
पिंपळकोट - पिप्पल ,, खा व
पिंपळकोटें - पिप्पलकोट्टकं. ३ खा व
पिंपळगांव - पिप्पल ( पीपरिका). खा व
पिंपळचोख - पिप्पलचोक्षं. खा व
पिपळदर - पिप्पल (पीपरिका). खा व
पिंपळनेर - पिप्पलनीवरं. खा व
पिंपळपाडा - पिप्पल ( पीपरिका). खा व
पिंपळवारी - पिप्पलाद्वारिका. खा व
पिंपळभैरव - पिप्पलकंभैरवं. खा व
पिंपळवाड - पिप्पल (पीपरिका). २ खा व
पिंपळवाडे - पिप्पलवाटं. खा व
पिंपळसोंड - पिप्पलशुंडा खा व
पिंपळदर - पिप्पलहरकं. खा व
पिंपळास - पिप्पलकर्ष. खा व
पिंपळी - पिप्पल ( पीपरिका). खा व
पिंपळे - पिप्पलकं. ८ खा व
पिंपळोद - पिप्पल ( पीपरिका). ३ खा व
पिंपळोली - पिप्पलपल्ली (पिंपळाच्या झाडांवरून). मा
पिपी - पिप्पका (वैदिक पक्षिविशेष). खा इ
पिंपोर्दे - पिप्पल ( पीपरिका) - पापरपद्रं. खा व
पिरंगुट - प्रियंगुवाटं = पिरंगुट (ग्रामनाम).
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
सांबर [ सृमर = सांबर ] a kind of deer.
सांबळ १ [ शंबुल ] ( संबळ २ पहा)
-२ [ शंबल (पाथेयपात्र) = संबळ, सांबळ, चंबळ, चवाळें] (भा. इ. १८३६)
सांबारें १ [ सांभारिकं, संभारं ] (सांभारें पहा)
-२ [ भृ to fry भृणाति. संभारः = सांबारें ] ( धा. सा. श. )
-३ [ सम् + मृ. संभारकं = सांबारें ]
सांभारें [ भृ १ भरणे. सांभारिकं, संभारं = सांभारें = सांबारें ] संभार म्हणजे मसाला. मसाला घातलेलें डाळीचें आंबट वरण. ( धा. सा. श.)
सामान्य [सामान्यक= सामान्यअ = सामान्य (विशेषण)] तो पुरुष सामान्य आहे.
साय १ [ श्यै १ गतौ. श्याया = साय ] (धा. सा. श.)
-२ [ सार्या ] ( धातुकोश-साय १ पहा)
-३ [ श्राया, श्रा, श्याया] ( धातुकोश-साय १।२ पहा)
-४ [ स्यै-स्या to coagulate = साय ] दुधावरची साय coagulation of scum on milk.
-५ [ छाया = साय, सायटें ] दुधाची साय = दुग्धछाया.
सायटें [ छाया ] (साय ५ पहा)
सार [ तुझ्या बोलण्यांत कांहीं सार नाहीं, या वाक्यांत सार या शब्दाचा अर्थ न्यायादनपेतं असा आहे. सार म्हणजे न्याय्यसारं न्यायादनपेतं (काशिका २-४-३१ ) ] ( भा. इ. १८३७)
सारखा [ साक्षात् (प्रत्यक्षे ) = साखा. र मध्यें येऊन सारखा ] तो सारखा बघत होता = सः साक्षात् पश्यन् आसीत्. (भा. इ. १८३४)
सारंगी [ शाड्गी ( शार्ङ्ग - धनुष्य) = सारंगी ] धनुष्यानें वाजविण्याचें वाद्य.
सारमंडळ [ स्वरमंडलं ( वाद्यविशेष ) = सारमंडळ. स्व = सा. स्वर = सूर ]
सारवट गाडी [ सर्वपथनः रथः = सारवटी गाडी, सारवड गाडी ] a cart serviceable on any road good, bad or indifferent.
सारवणें [ वृ ९ संभक्तौ. संवर्य = सांरवणें (वर्णविपर्यय)] शेणानें सारवतो = शक्ना संवर्यति. (धा. सा. श.)
सारा ( सं + रा to grant, bestow = सारा ] gift, सं + रा = संरा ] land assessment grant by a landholder to the Government.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पाथर्डें - प्रस्तरवाटं. २ खा नि
पाद्रा - पद्रक = पद्रा = पाद्रा. (भडोच पहा)
पान - पन्नगा खा न
पानखेड़ें - पन्नगखेटं. खा इ
पानवाडी - पन्नगवाटिका. २ खा इ
पायवड - पादवटकं. खा नि
पायविहीर - पादविवरिका. खा नि
पारगांव - पारेग्रामः
पारगांव - पारा (नदी विशेष) - पाराग्रामं. २ खा म
पारनेर - पारा (नदी विशेष ) - पारानीवरं. खा म
पारवडी - पारवाटिका किंवा प्राकारवाटिका. पार म्हणजे नदीचा तीर. मा
पार्शें - पर्शु (लोकनाम ) - पार्शवं. खा म
पार्हाळे - पारपल्लं. खा नि
पाल - पातालं. २ खा म
पाल - (गांवावरून ). खा प
पालक - पालक्य. खा व
पालख - पालक्क (देशनाम) - पालक्कं. खा म
पालघाट - (गांवावरून ). खा प
पालवण - (गांवावरून). खा प
पालें - पातालं ( पाआलं = पालें ). मा
पालें - पातालं ( स्थानावरून ). मा
पावलें - पापा (पावा - ग्रामनाम) - पापापल्लं. खा नि
पावोनाळ - पापा (पावा - ग्रामनाम) - पापानालि. खा नि
पाशाण - प्रस्रवणं = पासवण = पाशाण name of village.
पाष्टें - पृष्ठ - पार्ष्ठ खा नि
पासरडी - प्रस्रवण (स्थान नाम) - प्रस्रवणवाटिका. खा म
पाहाण - पाहण (रोमक सिद्धांताच्या श्रीषवायण भागांत उल्लेखिलेलें नगर ) - पाहणं. खा म
पाळधी - पलदी ( ग्रामनाम) - पलदी. ३ खा म
पिंगलवाडें - पिंगल (पिंगळा). खा इ
पिंगाणें - पिंग (महिष) - पिंगवनं. खा इ
पिचर्ड़े - पिश ( हरिण ) - पिशपद्रं. खा इ
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साथ १ [ साहिती (accompaniment) = साथ ] साथ करणें.
-२ [ स्वस्ति = सथ्थि = साथ ] साथ देणें म्हणजे दुसर्याच्या भाषणाला, गाण्याला किंवा कृतीला 'स्वस्ति' म्हणून म्हणणें. पुढें ताल धरणें असा अर्थ निघाला. (ग्रंथमाला)
साथी [ सहस्थिति = साथिइ = साथी = साथ ] साथ म्हणजे सहकार.
सांद [ संधि: ] ( सांदी पहा)
सांदणें [ संदा (संदित) = सांदणें (ग्रंथणें) ] सांधणें धातू, निराळा. (भा. इ. १८३५)
सादळणें [ आर्द्र ११. सार्द्र = सादळ ] सादळणें म्हणजे सार्द्र, ओलें होणें. ( धा. सा. श. )
सांदी १ [ संधि = साँधि = साँदी ] भिंतीच्या सांदीस बसूं नको म्हणजे भिंतीच्या संधीस, जेथें दोन भिंती मिळतात तेथें. (भा. इ. १८३६)
-२ [ संधिः = सांदी, सांद, सांध ] घराच्या सांदीकोपर्यांत म्हणजे संधींत व कूर्परांत.
साध ( धा-धी-धें ) [ साधु = साध ( simple) उभयगतिस्तस्य भवति साधीयो वा यष्टिहस्तं गमिष्यति । (पतंजलि-व्याकरणमहाभाष्य -Vol. I, P. ८१, Line ५-Kielhorn येथें साधीयस् शब्द simple साधा या अर्थी योजिला आहे.) ] (भा. इ. १८३३)
सांधः [ संधिः ] (सांदी २ पहा)
सांधा [ संधि = सांधा ] (स. मं.)
साधासुधा [ साधुः सुधीः = साधासुधा ]
साधून [ आ + सद् पद्यर्थे ] रात्र साधून पळाला. ( धातुकोश-साध ४ पहा)
सान [ सन्न ( अशक्त, ठेंगू, अत्यल्प) = सानें, सान ] ( लहान ) सान.
साना ( सनातन perpetual = साना ) perpetual, continuous. उ०-जिये ब्रह्माचलाचां आधाडां । पहिलेया संकल्पजलाचेया उभडा । सवें चि महाभूतांचा बुडडा । साना आला ॥ ज्ञा. ७-६७.
सानें १ [ सन्न ] [ सान पहा )
-२ [ सन्न weak, feeble = सानें ) weak, feeble, दुर्बल.
-३ [ सन्न ( क्षीण ) = सानें ] weak.
सान्हाउ ( सन्नाहः accouterments = सान्हाउ, सान्हाओ सान्हाव, सान्हाअ ] चिलखत.
सांपळा [ पाशजालक = पासलअ = सापला = सांपळा (अक्षरविपर्यास) ] (स. मं.)
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साठीं १ [ साहिती ]
-२ [ साहिती = साइटी = साटि, साठी, साठीं (सप्तमी) तस्स्यर्थे (ज्ञा. अ. ९ पृ. ७७)
-३ [ तस्य + अर्थे = तस्स्यार्थे (प्रा. ) तस्स्साठम्मि = तस्साठइँ= तस्साठीँ= तसाठीं = त्यासाठीं ] साठीं हा प्रस्तुत कालीं चतुर्थीचा प्रत्यय समजतात. परंतु वस्तुतः तो षष्ठीचा प्रत्यय स्य व अर्थे ह्या दोन पदांच्या संहितेपासून निष्पन्न झाला आहे. (स. मं. )
साठीचें भात [ षष्ठिकः = साठी ] (भा. इ. १८३४)
सांड [ षंडः = सांड ] वळू बैल.
सांडगा [ शांडाक: = सांडगा ] (भा. इ. १८३४)
सांडणी [संडयनी (सम्+ डी ) flying together with man perched = सांडणी ] a camel flying with post-speed.
सांडणीस्वार a swift horseman, camal-man.
सांडणी स्वार [ स्यंदनी अश्ववारः = सांडणीस्वार ]
स्यंदन = रथ.
वेगवान गाडीच्या घोड्यावर बसणारा.
सांडरूं [ साध्वीतरी = साडरी = सांडरी ] हा शब्द स्त्रीला प्रेमानें लावतात.
सांडस १ [ संडिश = सांडिस = सांडस ] हत्यार. (भा. इ. १८३३)
-२ [ संदंश = सांडस (वाग्भट-यंत्रविधि ) ] (भा. इ. १८३४)
साण [ शान = साण, साहाण ] (भा. इ. १८३४)
सात १ [ शक्ति = सत्ती = सात ] देवीची सात, साथ.
-२ [ साति = सात. सै to destroy ] destruction.
साँत [ साति = सात = साँत ] साति म्हणजे ओळ, पंक्ति. तापाची साँत म्हणजे तापाची ओळ. (भा. इ. १८३७)
सातवण [सप्तपर्ण = सत्तवण्ण = सातवाण = सातवण ] (भा. इ. १८३२)
सातेरें १ [ सप्तवारकं = सातेरें ] सात दिवसांचें जुडगें.
-२ [ साप्तान्तर्यं = सातेरें ] काढ्याचें सातेरें म्हणजे सात दिवस काढा घेण्याचा क्रम.
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पाटगांव - पाठाग्रामं = पाठगांव, पाटगांव.
पाटण - पत्तन = पट्टण ( नाणे मावळांतील राजाची राजधानी) मा
पाटण - पट्ट, पट्टन - पट्टनं. खा नि
पाटणें - पट्ट, पट्टन - पट्टनकं. ३ खा नि
पाटी - पट्टिका (रक्तलोध्र) - पट्टिका. खा व
पाटीबेडकी - पट्ट, पट्टन - पट्टिका = पाटी. खा नि
पाटोदें - पट्टपद्रं. खा नि
पांडरक - पांडर ( नागनाम ) - पांडरकं. खा म
पाडल - पाटली - पाटलं. खा व
पाडलपुर - पाटलीपुत्रकं. २ खा व
पाडसें - पट्टिका ( रक्तलोध्र ) - पट्टिकाकर्ष. खा घ
पाडळद - पाटलीपद्रं. खा व
पाडळदें - पाटलीपद्रकं. खा व
पाडळसें - पाटलीकर्ष. खा व
पाडळी - पाटली = पाडळी (ग्रामनाम). (भा. इ. १८३३)
पाडळी - पाटली - पाटलिका. खा व
पाडळें - पाटली - पाटलकं. खा व
पांडळें - पंडु ( व्यक्तिनाम) - पंडुपल्लं. खा म
पाडा - पद्रक = पड्डअ = पाडा. गुजराथेंत व कोंकणांत क्षुद्र गांवांना पाडा म्हणतात. जांबुळपाडा वगैरे. (भा. इ.१८३३) पाडा म्हणजे लहान गांव.
पाडामुंड - पाटक (गांव) - पाटक: मुंडः. खा नि
पांढरद - पांडर (नागनाम) - पांडरपद्रं. खा म
पांढरी - पांडरा. खा न
पांढरूण - पांडर (नागनाम) - पांडरवनं. खा म
पाणथ - पन्नगकंथं. २ खा इ
पाताळगंगा - पातालगंगा. खा न
पातोंडी - पात (यजुवः शाखाभेद) - पातवंटिका. खा म
पातोंडे - पात ( यजुवः शाखाभेद ) - पातवंटं. २ खा म
पाथरखेड़ें - प्रस्तरखेटं. खा नि
पाथरगांव - प्रस्तरग्रामं (दगडांची समृद्धि असणारें गांव). मा
पाथरजें - प्रस्तरपद्रं. खा नि
पाथरी - प्रस्तर - प्रस्तरिका. खा नि
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
साज १ [ सज्ज = साज (गाणारणींची सर्व वस्त्रे इ.) ] सज्ज म्हणजे वस्त्रें घालणें. (भा. इ. १८३३)
-२ [ सज्जा ( Equipment) = साज ] सारा साज तयार करून, कसबीण नाचू गाऊं लागली. (भा. इ. १८३६)
साजणी [ सज्जनी = साजणी ] (स. मं.)
साजरा गोजरा [ सज्जगिरिः = सज्जइरि = साजेरी = साजरा. गुत्ह्यगिरि: = गुज्जइरि = गुजेरी = गोजरा ]
सांजवणी [ सम् + धे णिच् धापय = सांजव. संधापन = सांजवण, संधापनी = सांजवणी ] ( धातुकोश-सांजव २ पहा)
सांजा [ संयावः = सांजाआ = सांजा, संयावस्तु धृतक्षीरगुडगोधूमपाकजः । ] दूध, तूप, गूळ व गहूं मिळून जो पाक त्याचें नांव सांजा. (भा. इ. १८३६)
सांजावणें [ दिवस सांजावतो - दिवसः संध्यायते. मला सांजावतें = में संध्यायते (भावे ). मी काळ क्रमतों = अहं काल क्राम्यामि ( simple ). मला करमतें = मे क्रम्यते (भावे ) ] ( भा. इ. १८३३)
साजूक [ सद्यस्क = सज्जुक = साजूक = ताजें, नवें ] ( ग्रंथमाला)
साटें १ [ घराचें साटें, गाडीचा साटा इत्यादि शब्दसमूहांत जो साटें, साटा शब्द येतो तो संस्कृत शकट शब्दाचा अपभ्रंश आहे. शकट: = सअटा = साटा -टें.
शरीरं शकटं देहं पुरं कायं कलेवरं ॥
॥ धन्वंतरीयानिघंटु ॥ ] ( भा. इ. १८३७ )
- २ [ शट्टकं (पाणी व तूप घातलेलें पीठ) = साटें ] आंब्याचें, फणसाचें साटें म्हणजे पाणी व तूप घालून कुटून केलेली आंबरसाची पोळी.
सोटें (लोटें) [ षट् अवयवे] साटें म्हणजे वाटा. co-partnership. (भा. इ. १८३३)
साठ [षष्टि ] (विंशति पहा)
सांठ [ संस्था ] (धातुकोश-साठव २ पहा)
सांठवणें [ संस्थापनं = संठ्ठावणँ = सांठवणें ] (भा. इ. १८३२)
साठिं [सध्रि ] (ज्ञा. अ. ९ पृ. ३४)
साठी [ साहिती = साठी (aquisition) (सप्तमी) साठीं ( आवाप्त्यर्थ ) साठीं ह्या शब्दाचें हें निर्वचन खरें. ] ( साठीं पहा)
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पसरणी - प्रास्त्रवणिका = पसरणी.
प्रास्रवणिका म्हणजे झरा.
पाण्याचा झरा असलेला घाट जो तो पसरणीचा घाट.
पसरणीचा घाट - प्रश्रेणी = पसरेणी = पसरणी. (भा. इ. १८३३)
पहूर - प्रहि (विहीर ) - प्रहिपुरं. खा नी
पहूर पिंपळगांव - पिप्पल ( पीपरिका). खा व
पळशी - सं. प्रा. पलासिका. ( शि. ता.)
पळशी, पळसगांव - पलाश. खा व
पळसनेर घाट - (सेंधवा पहा). खा प
पळसोड - पलाशवाटं. खा व
पळसोद - पलाशपद्रं. खा व
पळासकुवा - पलाशकुंबः खा व
पळासखेडें - पलाशखेटं. १६ खा व
पळसदड - पलाशदर: ३ खा व
पळासदरें - पलाश. खा व
पळासनेर - पलाशनीवरं. खा व
पळासर - पलाशसरस्. खा व
पळासी - पलाश - पलासिका - Plassy. खा व
पाईनगंगा - प्राचीनगंगा = पाईणगंगा = पाईनगंगा.
पाईनघाट - प्राचीनघाट = पाईणघाट = पाईनघाट.
पाखरी - पंकार (शेवाळ) - पांकारिका. खा व
पागणें - प्रांगणं - प्रांगणकं. खा नि
पांगरी - पांगुलिका. खा व
पांगळोली - पांगुलपल्ली. मा
पांगारी - सं. प्रा. पंगरिका. (शि. ता.)
पांचगणि-णी - पंचभिः गोणीभिः क्रीतं क्षेत्रं, ग्रामं वा पंचगोणिः । पंचगोणिः = पांचगणी (गांवाचें नांव) पांचपांडव - पंचपांडवाः खा प
पांचवड - पंचक ( रणक्षेत्र) - पंचकवाटं. खा नि
पाचाणें - पाषाणं. मा
पांचोड - पंचक ( रणक्षेत्र) - पंचकवाटं. खा नि
पांचोरें - पंचक ( रणक्षेत्र) - पंचकगृहं. खा नि
पांझण - प्राजिक (ससाणा) - प्राजिकवनं. खा इ
पांझरा - प्राझरा. खा न
पांझूर - प्राजिक ( ससाणा) - प्राजिकपुरं. खा इ
पाटखडकी - पट्ट, पट्टन - पट्टकटकिका. खा नि
पाटखेडें - पट्टिका (रक्तलोध्र ). खा व